७
आज रविवार होता. आज रविवारचा दिवस उजळला. ज्या दिवसाची त्याला प्रतिक्षा होती. त्यातच तो त्या दिवसाची तासागणिक वाट पाहात होता. एक एक मिनीट त्याला कठीण जात होता. दुपारी त्याला झोपही येत नव्हती. आज तसं त्याला तिच्यासोबत फिरायलाही जायचं नव्हतं. जसा तो दर रविवारी तिच्यासोबत फिरायला जायचा. ज्यात त्याला मजा यायची.
तो वाट पाहात होता तीन वाजायची. तसं तिनं त्याला चार वाजता घरी बोलावलं होतं. अशातच तीन वाजले व तो उठला. त्यानं हातपाय धुतले. त्यानंतर त्यानं चेहर्यावर थोडासा पावडर चोपडला. कपडे घातले व लवकरच तो घरातून बाहेर पडला. तसा तो लगबगीनं निघाला. ज्यातून तो तिच्या घरी अर्धा तास आधीच पोहोचला. त्यानं दारात गाडी लावली व तिला दाराच्या बाहेरुनच आवाज लावला. तशी ती बाहेर निघाली.
आवाज ऐकताच स्नेहल बाहेर आली होती. तिनं त्याला पाहिलं. तिनं त्याला बाहेर पाहताच त्याला घरात बोलावलं. तशी तिनं त्याची ओळख आपल्या वडिलांना करुन दिली. त्यानंतर ती घरात गेली.
स्नेहलनं स्वानंदची ओळख आपल्या वडिलांना करुन दिली. त्यानंतर ती घरात गेली. तसं पाहिल्यास ती घरात जाताच तिच्या वडिलानं त्याचेशी संवाद साधला. ते म्हणाले,
"काय नाव आपलं?"
"स्वानंद."
"घरी कोण कोण आहेत?"
"कोणीच नाही."
"आई वडील वैगेरे."
"नाही."
"आई वडील कुठे राहतात?"
"मरण पावलेत."
"हाऊ सॅड. बरं इथं मकान आहे का स्वतःचं?"
"होय."
"काय कामधंदा करताय?"
"शिक्षक आहे."
"बराच पेमेंट असेल."
"होय."
"माझ्या मुलीनं सांगीतलं की एक मुलगा आहे. मी त्याचेवर प्रेम करते. तो तूच का?"
"माहित नाही."
"म्हणजे?"
"मला काय माहित, तिच्या मनात कोण आहे ते."
"हो, तुमचंही बरोबरच आहे. हे तिलाच विचारावं लागेल."
थोड्या वेळाचा अवकाश. स्नेहल चहा घेवून बाहेर आली. तिनं दोघांनाही चहा दिला. तशी ती लगतच असलेल्या दुसऱ्या खुर्चीवर बसली. तोच तिचे वडील म्हणाले,
"बेटा, तू जे सांगत होती, तो हाच काय?"
"होय." ती म्हणाली.
"सरकारी शाळेत नोकरीला आहेत काय?"
"होय."
"तुझं यांच्यावरच प्रेम आहे काय?"
"होय."
"कोणत्या जातीचे आहेत?"
जात....... तिच्या वडिलांनी त्याची नाही म्हणत म्हणत जात विचारुनच टाकली. तशी जात विचारताच त्याच्या मनातही धस्सं झालं होतं. वाटत होतं की हिच्याशी विवाहच करु नये.
ते तिच्या वडिलांचं त्याला जात विचारणं काही आवडलं नाही. ती जात विचारणं म्हणे त्याला त्याच्या कानपटात थापट मारल्यासारखी वाटलं. वाटलं की त्यांना काही बोलावं. त्यांची खरडपट्टी काढावी. म्हणावं की आपण एवढे म्हातारे झालात. परंतु आपणास अक्कल कवडीचीही आली नाही. परंतु क्षणातच आठवलं की ते हार्ट पेशंट आहेत. ज्यांना केवळ बोलण्यानंच अटॅक येवू शकतो. तसं त्यानं त्यांना बोलायचं टाळलं. अन् जे होईल ते पाहिल्या जाईल. हाच उद्देश मनात बाळगून त्यानं आपली जात सांगीतली.
"मी आदिवासी समाजातून आहे."
"बरं बरं."
स्नेहलच्या वडिलांनी कोणतेच आढेवेढे न घेता म्हटलं. काही वेळ शांततेत गेला. काही वेळानं तिचे वडील तिला म्हणाले,
"एक विचारु बेटा?"
"विचारा." स्वानंद म्हणाला.
"माझ्या मुलीनं तुझ्याबद्दल सगळं सांगीतलं. त्यामुळं मला तुझी कल्पना आहेच. आता मला सांग, तू माझ्या मुलीवर प्रेम करतो काय?"
"होय."
"किती?"
तिचे वडील त्याला प्रश्नच करीत होते. तसे प्रश्न ऐकून तोही परेशान झाला होता. परंतु उपाय नव्हता. कदाचीत ही त्याची लग्नाची एक परीक्षाच होती.
तिच्या वडिलांनी विचारलेला प्रश्न. त्यावर स्वानंदनं उत्तर दिलं नाही. परंतु एक घडलं. त्या प्रश्नावर तिचे वडील पुन्हा म्हणाले,
"तू सांगीतलं नाहीस, किती प्रेम करतोय माझ्या मुलीवर?"
"शंभर प्रतिशत."
"ठीक आहे. तर मी जे म्हणतो ते करशील?"
"का नाही करणार? करावंच लागेल मला."
"माझ्या मुलीशी थाटामाटात विवाह करशील?"
तिच्या वडिलानं विचारलेला प्रश्न. त्यावर स्वानंदला बराच आनंद झाला होता. तसा त्यानं झटकन होकार दिला. तोच तिच्या वडिलांनी आणखी एक प्रश्न केला.
"माझी इच्छा आहे आणि अटही की तू जर माझ्या मुलीवर प्रेम करीत असशील तर या दोन वर्षात दोन एकर शेती घेवून दाखवशील. जर तू तशी शेती घेतलीच तर मी समजेल की तू माझ्या मुलीच्या लायक आहे. आता तू ठरव, ती शेती कशी घ्यायची ते?"
"ही काय अट झाली. शेती घ्यावी. अहो, मी जन्मात शेती घेवू शकणार नाही. तेवढा पैसा नाहीच माझ्याकडे. शिवाय आपण दोन एकर म्हणत आहात. मी एक एकर सुद्धा घेवू शकत नाही."
"तर मग ठीक आहे. असं समज की तुझं माझ्या मुलीवर अजिबात प्रेम नव्हतं. आजपासून विसर तिला. अन् आता जावू शकतोस. ज्यावेळेस तू शेती घेशील. तेव्हाच ये. तुझ्याकडे दोन वर्ष शिल्लक आहेत. मी थांबवेल तिला आणखी दोन वर्ष. दोन वर्ष तिचा मी विवाह करणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव."
स्नेहलच्या वडिलांची विचित्र अट. तो एक विचार करण्यासारखा प्रश्न. तसं पाहिल्यास स्नेहलचे वडील हे शहरातच राहात होते. त्यातच त्यांना काही शेतीची गरज नव्हती. अन् शेती करेल तरी कोण? शेतात राबणारे हात आता वर्गातील चार भिंतीत वर्ग घडविण्याच्या कामी लागले होते. ते नव्यानं शेती करणार नव्हतेच.
स्नेहलही ती वडिलांची गोष्ट बारकाईनं ऐकत होती. ती विचित्र अट तिनंही आपल्या वडिलांच्या तोंडून ऐकली होती. तिलाही ते बरं वाटत नव्हतं. अर्धी हयात निघून जाईल. परंतु स्वानंद काही शेती घेवू शकणार नाही. हे तिलाही वाटत होतं. कारण शेतीचे दर हे तगडे होते. तेवढा पैसा स्वानंदकडे नव्हताच.
स्नेहलनं आपल्या वडिलांना त्याबद्दल समजावून पाहिलं. परंतु वडिलांचा निश्चय अटळ होता. ते काही तिचं ऐकू शकत नव्हते. त्यातच तिला वडिलांचीही चीड आली होती.
शेती...... स्वानंदचा शेती हा अगदी जिव्हाळ्याचा विषय होता. त्याला शेतात आताही राबावेसे वाटत होते. परंतु ना आता त्याचेकडे शेती होती. ना आता शेती त्याला घ्याविशी वाटत होती. तसं त्याला त्याचं प्रेमही सोडून द्यावंसं वाटत नव्हतं.
स्वानंदकडे शेती होती व त्यानं आपल्या नोकरीसाठी शेती विकली होती. ती गोष्ट त्यानं स्नेहलला सांगीतली होती व स्नेहलकरवी तिच्या वडिलांना. मात्र ज्यावेळेस स्वानंदनं शेती विकली. त्यावेळेस त्याला अतीव दुःख झालं असल्याचं त्यानं स्नेहलला सांगीतलं होतं.
आज स्नेहलच्या वडिलांनी स्वानंदनं शेती घेण्याची मागणी केली होती नव्हे तर तीच अट टाकली होती. त्याची दोन कारणं होती, स्वानंदला त्याचं गतवैभव परत मिळवून देणं व स्वानंदचं आलेल्या परिस्थितीवर कशी मात करतो ते पाहाणं. कदाचीत तो नोकरीच्या भरवशावर कर्ज काढूनही शेती घेवू शकेल. असंच स्नेहलच्या वडिलांना वाटलं. तसंच जर तो स्नेहलवर निरतिशय प्रेम करीत असेल तर तो शेती घेवूनच दाखवेल. असंही त्यांना वाटलं. त्यातच त्यांनी कधीकाळी ऐकली होती प्रेमाची ताकद. जर खरं प्रेम असेल तर प्रेम जिंकतं हे त्यांनाही माहित होतं.
स्नेहलला आपल्या वडीलांच्या कृतीबद्दल आश्चर्य वाटत होतं. त्यांनी असं का केलं? त्याचा विचारही मनात येत होता. तसं पाहिल्यास स्वानंद परत जाताच ती आपल्या वडिलांना नानातऱ्हेचे बोल बोलली. परंतु तिच्या वडिलांनी ते सगळं स्नेहलचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं.
स्नेहलला आपला विवाह आता होत नाही असंच वाटत होतं. तशीच ती स्वानंदसोबत पळून जाण्याचाही विचार करीत होती. परंतु दुसऱ्याच क्षणी तिला विचार आला. विचार आला की आपण आपल्या वडिलांची एकुलती एक मुलगी. शिवाय आपले वडील हार्ट पेशंट. आपण जर पळून गेलोच तर आपल्या वडिलांचं चांगलं होणार नाही. ते धसका घेतील व त्यात मरण पावतील. त्याचं पाप आपल्यालाच लागेल. आपलं कधीच भलं होणार नाही. परंतु स्वानंद...... स्वानंद आपल्याला सोडून जाईल त्याचं काय? ती विचार करु लागली व विचार करता करता तिनं स्वानंदची भेट घेण्याचा विचार केला.
आठ दिवस झाले होते. तशी मधात सुट्टीच मिळाली नाही स्नेहलला. तसं पाहिल्यास स्नेहल शाळेत स्वानंदशी जास्त बोलत नव्हती. त्यात एक विचार होता. कोणाला त्यांच्या प्रेमाबद्दल शंका येवू नये. त्यानंतर लागलीच पुढील रविवारी तिनं स्वानंदला भेटायला बोलावलं. तसा ज्यावेळेस स्वानंद तिला भेटायला आला. तेव्हा तिनं सर्वात आधी त्याची माफी मागीतली. म्हटलं की त्यानं तिला माफ करावं.
स्वानंद व तिची भेट. आजची तिची भेट रोमांचकारी होती. त्या भेटीत एक विचार होता. जसा स्वानंद तिला भेटायला आला आणि बोलावण्याचं प्रयोजन विचारलं. तेव्हा ती म्हणाली,
"माझे वडील विपरीत बोलून गेलेले आहेत. ज्याचं मलाच वाईट वाटतं. याचा अर्थ आपलं प्रेम मिटून जाणार असं नाही. मी आपल्या प्रेमाची शपथ घेवून सांगते की मी आपलं प्रेम असंच वाया जावू देणार नाही. तू मला आवडतोस आणि मी तुझ्याशीच विवाहबद्ध होणार. परंतु हे जरी खरं असलं तरी माझ्या वडिलांच्या बोलण्यातून जे दुःख झालं तुला. ते विसरता येत नाही. तुला काय वाटतं त्याबद्दल?"
"मला तुझे वडील बोलून गेले. त्याचं काहीच वाईट वाटलं नाही. हं, जेव्हा जात विचारली. तेव्हा थोडंसं वाईट वाटलं. शेती तिही दोन एकर विकत घे. हे त्यांचं आव्हानात्मक बोलणं मला सुखकारकच वाटलं. जरी ते आव्हान असलं तरी. कदाचित तुला मी ज्या शेतीबद्दलच्या गोष्टी सांगीतल्या. त्या तू तुझ्या बाबांना सांगीतल्या असतीलच. त्यावरुनच ते आव्हानात्मक बोलले असतील असं वाटते. शिवाय ते जे बोलले, ते माझंच गतवैभव परत यावं म्हणून. अन् समजा मी त्यांचं आव्हान ऐकून शेती घेतलीच तर ती माझी घेतलेली शेती माझ्याकडेच राहिल. तुझ्या बाबांकडे परत जाणार नाही. त्यात त्यांचा स्वार्थ नाही. हं, एक आव्हान आहे. जे आव्हान मला पेलवायचं आहे. आता ते कसं पेलवायचं, ते ठरवावं लागेल. तसंही पाहिलं तर अपेक्षा ह्या कोणीही कोणाकडून करीत नाहीत. आपल्याच व्यक्तींकडून करतात. तुला ते समजलं नाही. अगं तुझ्या वडिलांनी मला आपलं समजलं. पराया समजलं नाही. म्हणूनच मला आव्हान दिलं व मीही ते आव्हान स्विकारलं व ते लवकरच पुर्ण करणार."
"म्हणजे तुला माझ्या वडिलांचं बोलणं वाईट वाटलं नाही तर......."
"नाही, अजिबात नाही."
"परंतु ते आव्हान तू कसं पुर्ण करणार?"
"काढणार त्यात काहीतरी मार्ग. त्यांनी फक्त दोन एकर शेती घे म्हटलं. कुठं घे, हे नाही म्हटलं. तेव्हा मीही अशा ठिकाणी शेती घेणार. जिथं शेतीचे दर कमी आहेत."
त्याचं ते बोलणं. ते बोलणं ऐकून स्नेहल भारावून गेली होती. तिला त्याच्यात चमत्कारिक गुण दिसला होता. ज्या गुणानं त्याचे विचार चमकून निघाले होते. आज तो तिला जास्तच आवडू लागला होता. तशी ती म्हणाली,
"You are great swanand. तू खरंच महान आहेस. म्हणजे माझी निवड योग्यच आहे. खरंच तू माझ्या लायकीचा आहेस. मी तुला मदत करणार तुझी आतापासूनच जोडीदार बनून. साथ देण्यासाठी जोडीदार बनावंच लागेल मला आणि जोडीदार बनण्यासाठी केवळ विवाहच करावा लागेल असं मला वाटत नाही. मी विना विवाहानंच तुझी पत्नी बनायला तयार आहे. असं समज की मी आजपासूनच तुझी पत्नी आहे. मला आता ना हळदीची, ना विवाहसंस्काराची गरज आहे. अन् तशीही मी पुर्वीपासूनच विवाह संस्कार मानत नाही. आता यानंतर तू मला एक मित्र म्हणून नाही तर एक पती म्हणून भेट. हा देह आजपर्यंत मी कोणाच्या स्वाधीन केला नव्हता. परंतु आजपासून हा देह मी तुझ्या स्वाधीन करीत आहे विवाह न करता व विवाहाचा विचार न करता. कदाचित आपली शेतीही होईल. माझा विश्वास आहे की तू शेती घेशीलच. परंतु ती शेती बघायला माझे वडील तरी जीवंत राहतात का? हे मला माहित नाही. मात्र ही शेती आपण दोघं मिळून घेवूया. तुर्तास आपलं मिलन म्हणून तू माझा आजपासून पत्नी म्हणून स्विकार करं. ही माझी जबरदस्ती नाही. जशी तुझी इच्छा. तुला जसं आवडेल, वाटेल. तसं कर. आता आणखी जास्त दिवस तुझ्याविना राहवत नाही माझ्याच्यानं. मला आणखी दोन वर्ष प्रतिक्षा नाही करायची शेती घेईपर्यंत. अन् दोन वर्षच सोड. आज शेतीचे दर तगडे आहेत. शेती नाही झाली तर आपण विवाहच करु नये काय?"
"वेडी गं वेडी तू. तुला दोन वर्ष राहाणं होत नाही."
"नाही. आता एक क्षणही राहाणं होत नाही मला."
"आतापर्यंत जशी राहिली तशी राहा."
"परंतु कशी? एवढे दिवस राहिले. ते पुरे झाले. आता मी तर म्हटलं की विवाहाची गरज नाही. आपण राहू असेच दिवसभर एकत्र पती पत्नी म्हणून व रातच्याला मी माझ्या वडिलांकडे."
"तसं नाही होत गं. विवाह हा एक संस्कार आहे ना. तो पाळायलाच हवा की नाही. त्याशिवाय आपण पती पत्नी कसले? तो एक आपल्या देशाचा दागिणा आहे."
"तर त्यावर एक उपाय आहे."
"कोणता?"
"आपण गांधर्व विवाह करायचा."
"म्हणजे?"
"लपूनछपून केलेला विवाह. जसे पुर्वीच्या काळात व्हायचे. ज्याला फक्त देव साक्षीदार असायचा व ती पर्णझाडी साक्षीदार राहायची. तसा माणूस बेईमान व स्वार्थी आहे. तो फक्त खाण्यापुरताच गोडगोड बोलतो. माझा त्यांच्यावर विश्वास नाही. आपण असाच गांधर्व विवाह करुया. हे मंजूर आहे का तुला?"
"ठीक आहे. तू म्हणते तशी. तुला जर मंजूर आहे तर मला का नाही."
"अन् विवाह झाल्यानंतर माझ्या नोकरीसाठी जे पैसे लागतात. ते भरु. ज्यातून नोकरी पक्की झाल्यावर आपण दोघंही आपल्या खात्यातून कर्ज काढू व शेती घेवू. जी शेती माझ्या वडिलांना दाखवता येईल व त्यानंतर ते शेती पाहून आपल्या विवाहाला परवानगी देतील. तद्नंतर आपण राजरोषपणे विवाह करु. आता सांग, माझी कल्पना तुला पटली की नाही."
तो तिचा सल्ला. तो सल्ला त्यालाही आवडला होता. तसा तो म्हणाला,
"तुझी कल्पना फारच चांगली आहे. मला पटलीय. आपण तू विचार केल्याप्रमाणेच करु. आपण गांधर्व विवाहच करु. त्यानंतर माझ्याकडे गोळा असलेले पैसे तुझ्या नोकरीसाठी भरु. नोकरी पक्की झाल्यावर कर्ज काढू व शेती घेवू. या सर्व प्रक्रियेला दोन वर्ष लागतीलच. त्यानंतर ती शेती तुझ्या वडिलांना दाखवू. ज्यातून तुझ्या वडिलांची परवानगी मिळेल. मग आपण राजरोषपणे थाटामाटात विवाह करु. चांगली कल्पना आहे तुझी. आपण तसंच करु."
स्नेहनलं मांडलेली कल्पना. त्यानंतर त्या कल्पनेला तिनं दिलेली मंजूरी. त्यानंतर त्या दोघांनीही गांधर्व विवाह केला. त्यानंतर स्वानंद जवळ जो पैसा होता. तो पैसा त्यानं तिची नोकरी पक्की करण्यासाठी भरला. नंतर दोघांनीही आपल्याआपल्या नोकरीवरुन कर्ज काढलं व शेती घेतली. ज्या शेतीचे कागदपत्र स्वानंदन स्नेहलच्या वडिलांना दाखवले व रितसर परवानगी मिळवून त्यानं राजरोषपणे व अगदी थाटामाटात आपला विवाह साजरा करण्याचा प्रयत्न केला. परंतु विपरीत घडलं होतं. ज्या स्नेहलला नोकरी लावून तिच्याशी राजरोषपणानं विवाह करण्याची व संसार थाटण्याची स्वप्न जो स्वानंद दिवसरात्र पाहात होता. ती स्नेहल आज नोकरी लागताच आपला विवाह करुन रफूचक्कर झाली होती.