Taddy - 8 in Marathi Fiction Stories by Bhavana Sawant books and stories PDF | टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी)–भाग ८

Featured Books
Categories
Share

टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी)–भाग ८

भाग ८.


"डॉक्टर, मला अस एक साईड झोपायला मदत कर.",टेडी वैतागत म्हणाला. आता ते दोघे आपल्या आपल्या जागेवर झोपत होते. गायत्री सोफ्यावर होती आणि तो बेडवर. शरीर मोठ होत म्हणून बेडवर झोपत असायचा तो. आता पोट मोठ असल्याने, त्याला एक साईड अस झोपायला येत नव्हत. खूप प्रयत्न करून ही त्याला जमत नव्हते. जेव्हा जेव्हा तो हातावर झोपायचा प्रयत्न करत असायचा तेव्हा तेव्हा तो पुन्हा पाठीवर बेडवर पडत असायचा. त्याची कृती पाहून गायत्रीला हसू येत होत. 



"तू तसा झोपूच शकत नाही. तर तो विषय सोड आणि गप्प पडून रहा बघू.",गायत्री आपल हसू दाबत म्हणाली.



"का झोपू शकत नाही? हा हे गोल मोटुल पोट मुळे अस होत आहे. मला स्लिम व्हायला हव का डॉक्टर?", आपल्या मोठ्या अश्या पोटावर हात ठेवत तो बसत तिला विचारतो.



"त्याची गरज नाही आहे. तू आहेस तसा छान आहे. तू प्रयत्न केला तरीही बारीक नाही होऊ शकत. कारण तू एक टेडी आहे. टेडी स्लिम मध्ये अजिबात चांगला दिसत नाही. हे तुला माहीत नाही का?",गायत्री बोलते. 



"ठीक आहे. फिर मैं ऐसा ही सो जाता हूं भिड्डू!",अस बोलून तो पोटावर आपले दोन्ही हात ठेवत बेडवर पाठीवर झोपतो. त्याला अस पाहून तिला खूपच हसू येत असते. तितकाच तो क्यूट देखील भासत होता. 

    

      खूप वेळाने ती ही सोफ्यावर झोपते. आता टेडीने तिला सांगितलं होत तो त्रास देणारं नाही तर ती रिलॅक्स होती. आता तिला त्याच्यावर थोडा थोडा विश्वास ठेवावा वाटत होता. 

******


"दीदी, तू कोणाशी बोलत असतेस ग? म्हणजे काल घरात काम करणारी मेड बोलत होती.", अंतरा गायत्रीची बहिण तिच्या रुम मध्ये येते तिला विचारत असते. ते ही डोळे बारीक करून. गायत्री मुळात जास्त कोणाशी बोलत नसायची. अंतरा आली घरात की, तिच्यासोबत बोलून चौकशी करत असायची. बाकी इतर वेळी हॉस्पिटल आणि आपल्या स्टडी रूम मध्ये बसलेली असायची. पण टेडी घरात आल्यापासून ती जरा जास्तच खुलली होती. 



"स्वतः सोबत बोलत असते मी. आज सकाळ सकाळी माझ्याकडे कशी आली तू?",गायत्री खोटं हसू चेहऱ्यावर ठेवत विचारते. अजून ही टेडी झोपला होता. तो उठल्यावर आवाज करेल म्हणून भीतीने ती अंतराला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. 



"अरे, मी ज्या कामासाठी आली ते विसरूनच गेले. बाहेर डॉक्टर रेयांश तुला भेटायला आले आहेत.", अंतरा कपाळाला हात लावत हसत म्हणाली. टेडीला अंतराच्या आवाजाने जाग येते. पण तो काही हालचाल करत नाही. कान देऊन फक्त बोलणे ऐकत असतो.



"त्यांना सांग वेट करायला. मी फ्रेश होऊन येते. तू तुझ्या कॉलेजला जायची तयारी कर!",गायत्री थोडा विचार करत म्हणाली. आता तिचा चेहरा थोडा उतरला होता. अंतरा आपल्या दीदीचे बोलणे ऐकून तिथून निघून जाते. ती जाताच टेडी टुणकन उडी मारत उठून उभा राहत असतो. पण पोट मोठ असल्या कारणाने बेडवरून खाली अगदी तोंडावर पडतो. 



"आ....आई...ग.....",आपले हात हवेत करत बोलतो. उदास असलेली ती त्याच्या या कृतीने खळखळून हसते. 



"हसू नको डॉक्टर. मला उठायला मदत कर.",टेडी कसबस बोलतो. तशी गायत्री आपल्या हातातील कपडे बाजूला ठेवत त्याला उठायला मदत करते आणि बेडवर नीट बसवते. 



"तू सरळ उठत जा बघू! हे अस काही करून तुलाच त्रास होत असतो. मी म्हणते, गरज काय होती उठायची असे?",गायत्री आपल हसू बाजूला ठेवत विचारते.



"डॉक्टर, मी तर सरळ उठत होतो. पण माझे पाय नाही ना सरळ मदत करू शकले मला त्याच नादात उडी मारून उठण्याचा प्रयत्न केला आणि पडलो. कोणाला सांगू नको हा मी पडलो ते!", टेडी तोंड बारीक करत म्हणाला. 



"बर. तू तुझं आवर तो पर्यंत. मी जाऊन फ्रेश होते.",गायत्री आपले कपडे उचलत म्हणाली. ती हसून त्याला पाहून बाथरूम मध्ये निघून जाते. तो पर्यंत टेडी टाईमपास करत रूम मध्ये बसतो. गॅलरी मध्ये काही झाड फुलांची लावलेली होती. त्यामुळे पाच ते सहा फुलपाखर तिथं फिरत होती. जे पाहून टेडी खुश होतो. तो तिथं जमिनीवर वर बसत त्यांना पाहत असतो. हळूच हात आपला वर करत त्यांना पकडायच प्रयत्न करत असतो. पण ते त्याला पाहून परत बाहेर जात असायचे. तसा तो नाराज होत होता. एक फुलपाखरू त्याच्या बरोबर नाकावर येऊन बसते. तसा तो शांत राहतो. पण गुदगुल्या त्याला होत असल्याने, तो वैतागत त्याला आपल्या हाताने बाजूला करत असते. त्याच नादात स्वतःच्या चेहऱ्यावर त्याचा हात बसत असतो. 



       गायत्री आपले आवरून येऊन त्याला शोधू लागते तर तो तिला गॅलरीत पाठमोरा काहीतरी करताना दिसत असतो. स्वतःच स्वतःला मारत आहे अस तिला वाटते. तशी तिला काळजी वाटते. ती तशीच त्याच्या जवळ येते आणि पाहते तर त्याच्या नाकावर फुलपाखरू बसलेले असते.



"जा ना बाई....माझं नाक आहे ते.....तू....तुला आवडले तर दुसरे लावून घे....मला सोड फक्त...",टेडी बोलत असतो. ते फुलपाखरु ही उडायचं आणि पुन्हा नाकावर बसत असायचे. 



"तू खरच जोकर आहेस. थांब मी तुझा फोटो काढून घेते.",गायत्री हसून अस बोलून पटकन तिच्या हातातील मोबाईल मध्ये चार पाच फोटो त्याचे काढून घेते. नंतर हसत हसत त्या फुलपाखरूला बाजूला करत सोडून देते. तसा टेडी आपल्या पोटावर हात ठेवत स्वतःला शांत करत असतो. खूपच वैताग दिला होता त्या फुलपाखराने त्याला.  ते फुलपाखरे जाताच तो पटकन उभा राहतो.



"नाक आहे माझं ते....कुठच फुल नाही....",ओरडून तो त्या गॅलरीत म्हणाला. तशी गायत्री पटकन त्याला मागे ओढून घेते.



"ओरडू नको मोठ्याने. तू आवर तुझं लवकर. आपण आज तुझ्या असिस्टंटला भेटू.",गायत्री हसून त्याला म्हणाली. 



"माझं तर आवरले आहे. डॉक्टर, खाली तुला कोणी भेटायला आले आहे.",आठवण करून देत टेडी म्हणाला.



"हम्म.",गायत्री बस इतकंच म्हणाली. जणू तिला आवडत नव्हते त्या व्यक्तीला भेटायला. टेडी तिच्या चेहऱ्याचा अंदाज घेत असतो.



"डॉक्टर, आवडत नाही का भेटायला?",टेडी तिला तयारी करताना पाहून विचारतो.



"खाली आलेला व्यक्ती मला बायको बनवण्यासाठी येत असतो. मी त्याला होकार देईन या आशेवर तो माझ्या आवडत सगळ करत असतो. आता खाली नक्कीच आवडत खायला घेऊन आला असेल? किंवा आवडते गिफ्ट आणले असेल. नंतर कॉफीसाठी चल म्हणणार! मग तिथं घेऊन गेल्यावर स्वतःच कौतुक करणार. मी असे केस मधून पेशंटला वाचवलं, मी तसे केले. असे भरमसाठ गोष्टी सांगत बसणार. नंतर पुन्हा लग्न करण्यासाठी मला विचारणार?काय प्रॉब्लेम आहे याचा मलाच माहीत नाही! नुसता इंप्रेस करायला येत असतो.",गायत्री सगळा दिनक्रम त्याचा सांगून मोकळी होत असते. एवढं सगळ काही ऐकून तो आपले डोळे मोठे करतो. 



"आता यावेळी तर तू नकोच जाऊ. आपल्या कामाला उशीर होईल डॉक्टर! प्लीज प्लीज.",तिच्या आसपास फिरत टेडी हात पाठीमागे करत म्हणाला. 



"मी जाणारच नाही आहे. मला वैताग येतो. हॉस्पिटल मध्ये पार्टनर बनण्याचे स्वप्न पाहून तो अस करत आहे. आता ना मी त्याला दाखवतेच काय आहे मी ते?",गायत्री मनातच काहीतरी विचार करत त्याला बोलते. ती टेडीला नीट करतच उचलून घेत खाली येते. लिव्हिंग रूम मध्ये डॉक्टर रेयांश तिची वाट पाहत बसलेला असतो. ती येताच तो सोफ्यावरून उठून बसतो.



"गायत्री, आलीस तू? मी तुझी वाट पाहत होतो. तुझ्या आवडती चॉकलेट पेस्ट्री आणली मी!", डॉक्टर रेयांश चेहऱ्यावर हसू ठेवत म्हणाला. त्याच ऐकून टेडीला मगाशी गायत्री बोलली ते आठवत असतो. समोर असलेला व्यक्ती हा दिसायला चांगला होता. फक्त डोळ्यावर चौकोनी असा चष्मा त्याच्या होता. बॉडी नीट परफेक्ट होती. टेडी अंदाज घेत असतो. 



"मला.....",गायत्री काही बोलणार. तसा रेयांश पुन्हा बोलतो.



"हे बाजूला ठेऊ. आपण कॉफीला जाऊ.", तिचं काही ऐकून न घेता तो बोलून मोकळा होतो. आता खरच टेडीला हसू येत असते. काय व्यक्ती होता तो?



"डॉक्टर रेयांश मला काम आहेत. मला तुमच्या सोबत कॉफी पिण्यात इंटरेस्ट नाही आहे. मी माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत घेईन.",गायत्री यावेळी खूप स्पष्ट शब्दांत बोलून मोकळी होते. नवरा ऐकून तर त्याच्या हातून बॉक्स खाली पडतो. इतका जबरदस्त धक्का त्याला बसला होता. गायत्री ने काही शब्दांत त्याच्या सगळ्या मेहनतीवर यावेळी पाणी फिरवले होते. टेडी सगळ ऐकून खूपच खुश होत असतो.



"काय....नवरा?", रेयांश विचारतो.



"हो. त्यांना ना अस कोणत्याही पुरुषासोबत बोलले आवडत नाही. त्यामुळे प्लीज या पुढे माझ्या घरी येऊ नका. कसे आहे त्यांना कळले ना? तर तुमची अवस्था वाईट होईल. तेवढी काळजी मला आहे म्हणून आपले तुम्हाला वॉर्न करत आहे. येऊ शकतात तुम्ही!",गायत्री टेडी कडे पाहत म्हणाली. 



"सॉरी....मॅडम....",बस इतकंच बोलून तो तिथून निघून जातो. त्याला अस जाताना पाहून गायत्री खळखळून हसते. टेडी ही हसतो. 



"डॉक्टर तू कमाल आहेस. लव्ह यू डॉक्टर.", टेडी आनंदात बोलतो. त्याच बोलणे ऐकून वेगळच समाधान तिला होत. गायत्री अशी पटकन बोलणारी नव्हती. पण का कोण जाणे आज त्या रेयांशला पाहून तिला कडक बोलावे लागले होते. कदाचित, टेडी तिला पाहत होता म्हणून किंवा वेगळे काही तिच्या मनात सध्या होते. रेयांश सोबत आज तिला वेळ वाया घालवावे असे वाटले नाही. हाच बदल तिच्यात नवीन झाला होता. एरवी ती मनात असो किंवा नसो जाऊन बसत असायची. समोरच्याचे मन तोडणे तिला आवडत नव्हते. पण आज तिने टेडीसाठी कठोर मन केलं होत.



    दोघेही आनंदी होत पुढच्या कामासाठी गाडीत बसून निघून जातात.


क्रमशः
*******