Taddy - 6 in Marathi Fiction Stories by Bhavana Sawant books and stories PDF | टेडी(अ स्ट्रेंज लव्हस्टोरी)–भाग ६

Featured Books
Categories
Share

टेडी(अ स्ट्रेंज लव्हस्टोरी)–भाग ६

भाग ६.


"डॉक्टर, तू खूप चांगली आहेस.",टेडी तिला पाहत म्हणाला.



"तू मस्का मारत जाऊ नको.",गायत्री ही समोर पाहत सरळ म्हणाली.



"ओके. तू मला आता मदत केली तेवढी बस झाली. आता मला नाही वाटत माझं पुढे काही होऊ शकत असे? माझं सगळ वैभव गेलं आहे. तू ऑपरेशन कस करशील माझं? माझ्याकडे इतके पैसे ही नाहीत!",एक हताश नजरेने तो म्हणाला. सुशीलाने सगळ त्याच घेऊन टाकले होते. त्याच ऐकून गायत्री विचार करते.



"मी माझा पैसा लावू शकते. तसेही मी ज्यांना ऑपरेशन करता येत नाही पैसा अभावी अश्या लोकांना मदत करत असते. तसच तुला करेन. त्या सुशीलासाठी काही प्लॅन असेल तर बघ. तुझ्या घरचे आता कुठे राहतील?",गायत्री शेवटी काही काळजीत प्रश्न त्याला करते. 



"हा तो विचारच नाही केला मी. माझे आई बाबा, आजी आणि लहान बहीण आहे. बाकी काका, काकी आणि त्यांची मुल आहेत. एक मामा, मामी पण आहेत. आम्ही असे एकत्र राहत होतो. आज मला फक्त आई, बाबा आणि आजी दिसले. बाकी कोणीच नाही! कुठे असतील बर ती लोक? मी अश्या अवस्थेत आहे हे त्यांना समजले की नाही? हा प्रश्न येत आहे.",टेडी आपल्या परिवार बद्दल चिंताग्रस्त झाला होता. 



"तू एवढं वैभव कमावलं आहेस. मग तुझ्याकडे बुध्दी होतीच ना? की तू मूर्ख आहेस?",गायत्री त्याला प्रश्न करते. 



"काय झालं?"



"तू इतके कमवत होता तर त्याची तरतूद करायला हवी होती. आई वडिलांसाठी वेगळे अस काही केलं नाही का? काहीतरी केलं असशील ना? मी गेली असती त्यांच्याकडे पण ते मदत घेतील का नाही हा मोठा प्रश्न उभा राहतो.",गायत्री हळू आवाजात बोलत असते. तिचे बोलणे ऐकून टेडी गहन विचार करतो. अगदी आपला एक हात डोक्याला लावून. त्याला विचार करताना पाहून ती नकारार्थी मान हलवते.



"हेय....हे तर माझ्या लक्षातच नाही आले. डॉक्टर तू खरच कमाल आहेस. आता तूच मला यातून बाहेर काढ! माझ्या कुटुंबाला तूच मदत करू शकते. माझ्या असिस्टंट निखिलला आपल्याला भेटायला हवे.",खूप काही मिळाल्यासारखे टेडी आनंदी होत नाचू लागतो. आता खरच गायत्रीला तो कोणी पागल आहे अस वाटत होत. 



"तूच सांगितले कोणाला सांगू नको. आता तू स्वतः जाणार आहे का?",गायत्री हाताची घडी घालून विचारते.



"पर्याय नाही आहे. सुशीला सोबत मी कधीही लग्न करण्यासाठी तयार होतो. एकदा मी माझ्या असिस्टंट सोबत बोलून मॅरेज कागदपत्र तयार करून तिथं साईन केल्या होत्या. आजोबांनी माझ्या त्यांच्या मृत्यूपत्रात लिहले होते पाटलांची सर्व प्रॉपर्टी युवराज म्हणजे माझ्या पत्नीच्या नावावर होईल असे. जर असिस्टंटने मदत केली तर तू तिथं साईन कर आणि हे जाऊन वकिलांना सादर कर म्हणजे माझी सर्व प्रॉपर्टी तुझी होऊन जाईल. तेव्हा तू माझ्या घरच्या लोकांना दे सगळ! जाताना लोटस ज्वेलरी शॉप मध्ये जाऊन "युवराज पाटील यांनी दागिने सांगितले, ते द्या!", अस सांगून ते दागिने ही घेऊन जा! बायकोसाठीचे दागिने आहेत ते माझ्या. मग सगळ्यांचा विश्वास बसेल तुझ्यावर! कारण हे सगळ फक्त मलाच माहीत होत बाकी कोणाला ही नाही!",टेडी सगळ बोलून दाखवत मोठा श्वास घेतो. ते सगळ ऐकून तर गायत्री चांगलीच धक्क्यात जाते. 



"तू..... वेडा आहेस का? मी एक डॉक्टर आहे. तू मला तुझी बायको बनवत आहेस! ते ही तुझ्या प्रॉपर्टीसाठी. नंतर माझी ओळख तुझी बायको म्हणून सगळीकडे लागणार आहे. त्या नंतर मला तुझ्या बिझनेस मध्ये यावं लागेल. हे तुला कळत का? मला त्यातील ज्ञान ही जास्त नाही आहे. माझं हॉस्पिटल आणि मी बरी आहे. मला तुझ्या अश्या गोष्टीत फसायच नाही आहे.",गायत्री रागातच त्याला बोलत असते. तसा टेडी शांत होत असतो. 



"डॉक्टर, मला माझी काळजी नाही आहे. मला काहीच नको आहे. माझ्या आई वडिलांना मी असा हतबल नाही पाहू शकत. दारोदारी भटकताना तर नाहीच नाही. माझी आजीची ट्रीटमेंट चालू आहे. बहिण देखील वयात आलेली  आहे. लोक तिचा गैरफायदा घेतील. तुला माहित आहे मुलीबद्दल. यावर मी काही बोलू शकत नाही. यासाठी मला तुझी मदत हवी आहे. बाकी तूच ठरव! तुला नाही वाटत तर मी फोर्स नाही करणार तुला. या नंतर तुला त्रास द्यायला बघणार नाही!",अस बोलून टेडी शांतच गॅलरी मध्ये निघून जातो. त्याच बोलणे ऐकून तर गायत्रीला खरच वाईट वाटले होते. तो होता तर त्याच परिवार सुरक्षित या समाजात राहू शकत होते. आता त्याच्यासोबत इतके घडले होते की, परिवाराची काळजी त्याला लागून राहिली होती. गायत्री ही त्याचा विचार करत असते. ती मनाशी काहीतरी ठरवते आणि एक निर्णय घेऊन ती त्याच्याजवळ जाते. टेडी अजूनही बाहेर पाहत असतो. गायत्री त्याच्या जवळ उभी राहते.



"मी लहान होती. तेव्हा मला ही माझ्या बहिणीची चिंता लागून राहायची असायची. त्याच मुळे मी मेहनत घेतली एवढी. हे सगळ उभ केल. माझ्या बहिणीला मला सगळ काही बेस्ट द्यायच आहे. मी जे आयुष्य जगले नाही ते तिला द्यायच आहे. आज मी तुला माझ्या जागी पाहत आहे. सगळा विचार करून मी तयार आहे तुला मदत करायला. पण तू छातीवर बसून अजिबात मला रात्री ३ वाजता त्रास द्यायचा नाही. त्या आधी आपण थोडी रिसर्च करूया तुझ्याबद्दल. आपल्या समजेल हे अस तू टेडीत कसा आला वगैरे?",गायत्री बोलते. तसा त्याला बर वाटत तो हसून तिला पाहतो.



"नाही त्रास देणारं! तू सांगशील तसेच वागणार मी. थँक्यू.",सगळ काही एकदाच बोलून मोकळा होतो. 



"आज आपण रात्री डिनरसाठी बाहेर जाऊ या! तिथं पॅरानॉर्मल एक्स्पर्ट श्री. श्रीवर्धन भेटायला येतील. त्यांच्यासोबत बोलून बघू. काय भेटत का नाही ते?",गायत्री त्याला सांगते. 



"डॉक्टर, मी चांगला झालो तर तू माझा स्वीकार करशील का? अपंग म्हणून सोडून देणार का?",टेडी विचारतो. का कोण जाणे त्याचा प्रश्न ऐकून तिचं मन हळहळते.



"अस काहीच होणार नाही आहे. जर तू मला त्रास आता कमी दिला तर मी त्या बदल्यात तुझ्यासोबत राहून तुझी काळजी घेईन! हे प्रॉमिस करते मी.",गायत्री पुन्हा एकदा त्याला आठवण करून देत म्हणाली. भीती वाटत होती त्याची कधी कधी. 



"मग ओके आहे. मी त्रास तुला देणारं नाही. एकदम गुड टेडी सारखं राहणार आहे मी! तू माझ्या पायासाठी बघ ना काही सॉक्स मिळतात का नाही ते? मी असा चालत राहिलो तर घाण होईल.",विषय बदलत तो आपले पाय पाहत म्हणाला. त्याचे ते पांढरे पाय थोडे खराब झाले होते. ते पाहून गायत्री नाही मध्ये मान हलवते.



"थांब, आपण तुला इथच असलेल्या दुसऱ्या टेडीचा शूज घालू.",गायत्री अस बोलून एका वॉर्डरोब कडे जाते. त्या वॉर्डरोबला उघडुन ती त्यातील टेडी बाहेर काढू लागते. एवढे टेडी पाहून तो तर तिला पाहत असतो.



"डॉक्टर, तू एवढ्या टेडीला आत मध्ये बंद केलं आहे. तर त्यांना ऑक्सिजन कस मिळेल? त्यांचा जीव गेला तर ते रात्रीच येतील ना आत्मा बनून....",आपल्या मोड मध्ये येत तो बोलत असतो. ते सगळ ऐकून आता ती टेडीला पाहते त्या सर्व आणि घाबरून मागे होते. तसा टेडी खळखळून पोटावर हात ठेवत हसू लागतो. तेव्हा मात्र त्याने आपल्याला भीती वाटावी म्हणून अस केलं, हे लक्षात येताच ती त्याच्या जवळ जाऊन त्याला मारू लागते. टेडी तिचा मार चुकवत पळत असतो. तो पुढे आणि गायत्री त्याच्या मागे असते. थोड दमून ती बेडवर पडते आणि तसा टेडी ही तिथच पडुन तिला पाहतो. 



"डॉक्टर, मी या पूर्वी इतका कधी हसलो नाही आहे. आज या अवतारात आल्यावर आणि तुझ्यासोबत राहून हसलो बघ. सतत ते अँग्री लूक घेऊन फिरत असतो. पण या टेडीत आल्यापासून माझी भाषा सगळ काही चेंज झालं आहे.", टेडी वर पाहत म्हणाला.



"राहून राहून हसायला शिकत जाशील. हसणे चांगले असते आपल्यासाठी. हे लक्षात असू द्या मिस्टर. टेडी! थांब, मी तुला बूट देते आणि मग तयार होते.",अस बोलून गायत्री उठते आणि त्या इतक्या साऱ्या टेडी मधून एकाचा बूट काढून घेत त्या टेडीच्या पायात घालते. तसा तो टेडी चालून बघत तिला "ओके" करतो. मग मात्र तो शांत बसून राहतो. ती आपली तयारी करत असते. यावेळी ती तिच्या इतर टेडीला वॉर्डरोब मध्ये ठेवून टाकत नाही. तर एका मोकळ्या जागेत गॅलरीच्या सोफ्यावर काहींना ठेवते, तर थोड्यांना स्टडी रूम मध्ये ठेवते. भीती होती बाकी काहीच नाही. एक टेडीचे उदाहरण समोर पाहत असताना, इतर टेडीचा विचार करवत नव्हता!




क्रमशः
********
आपले आपले टेडी नक्कीच चांगल्या जागेत ठेवले आहेत ना? बघा वर टेडी बोलला तस काही होईल म्हणून विचारलं.