भाग ९.
"ते ज्वेलरी शॉप कुठे आहे?",एका ठिकाणी आपली कार पार्क करत ती टेडीला विचारते.
"इथून एक मिनिटांवर आहे. आपण चालत जाऊ. पण डॉक्टर तुझ्याकडे प्रुफ काहीतरी असल पाहिजे म्हणजे बायको आहेस याच?", टेडी आपल्या कपाळाला हात लावत बोलून विचार करतो.
"तुला जर माझी आयडिया पटत असेल तर बघ.",गायत्री बोलते.
"सांग तर आधी आयडिया.",टेडी सीट ब्लेट काढण्याचा प्रयत्न करत म्हणाला.
"तुझे संवाद असतील माझ्याकडे तर ते आपल्या विश्वास ठेवतील. थांब आपण व्हॉट्सॲप द्वारे पाहू. मी तुझं एक अकाऊंट बनवते. तिथं नाव युवी(हबी) असे टाकते. तुझ्या अकाऊंट ने मला मेसेज करते. मी च उत्तर देते. मग आपले संवाद त्यांना दाखवून दागिने मिळू शकतात. ड्यूअल सिस्टिम वापरू!",गायत्री आपल डोकं वापरत म्हणाली. आता तिचे डोकं पाहून टेडी खुश होतो. गायत्री जितकी सुंदर दिसायला होती, त्याहून स्मार्ट देखील होती. अस त्याला वाटते. तो टाळ्या वाजवत तिला करायला लावतो. स्वतः काही मेसेज सांगत असतो तिला टाईप करायला आणि उत्तर ही तसेच टाकायला सांगत असतो. त्यांना हवे तसे उत्तर मिळतात. गायत्री आपल्या मोबाईलची डेट सेटिंग चेंज करून स्क्रीन शॉट काढून घेते. युवराजचा फोटो नेटवरून घेत फेक प्रोफाईल बनवते. जणू एखाद्याला ते चॅटिंग वाचून ते खरच नवरा बायको आहेत असच वाटत असेल!
"डॉक्टर, तू जिनियस आहेस! तू डॉक्टर नसायला हवी होती. आता चल जावून लवकर दागिने घेऊन ये.", टेडी तिला ऑर्डर देतो. तशी ती स्माईल करत टेडीला तिथच ठेवून गाडी लॉक करत शोधत शोधत जाते. तिला एका ठिकाणी ते ज्वेलरी शॉप मिळते. तसे ती आत जे तिला टेडीने सांगितले होते ते सांगते आणि नंतर स्क्रीन शॉट केलेलं मेसेज ही दाखवते. त्यात एक मेसेज असा असतो, "माझी होणारी बायको गायत्री दागिने घ्यायला येणार आहे. तिला ते दागिने द्यावे!"
तो मेसेज वाचून त्यांना खात्री पटते आणि डेट ही अपघात होण्याच्या आधीची दिसत होती. जे पाहून ते तिला सगळे दागिने देतात. ती पे करणार असते. पण ते लोक "आधीच पे केलेलं आहे",असे सांगून मोकळे होतात. तिला खरोखरच यावेळी सुशीलाचा हेवा वाटत होता. कारण इतका विचार करणारा मुलगा तिच्या आयुष्यात होता. शेवटी, ती सगळ घेऊन गाडीत येऊन बसते.
टेडी सगळ्या काचा तिला बंद करून सांगायला आपला स्वतःच बॉक्स उघडत असतो. येत हातात ते मोठ सात पदरी काळया मण्यांचे आणि सोन्याच्या मण्यांचे मंगळसूत्र जे पाहून गायत्री पाहत राहते.
"वीस टोळ्यांचे आहे डॉक्टर हे. आता यावेळी तू घाल माझ्यासमोर. तुझ्या गळ्यात हे सुंदर दिसेल.", टेडी मंगळसूत्र हातात धरत म्हणाला. वीस टोळे ऐकून तर ती चांगलीच उडते.
"काय? तुला खरच वाटत हे मी घालावे?",त्याने सुशीलासाठी केलं होत म्हणून तिला खरच ये घालावे की नाही? हा प्रश्न होताच.
"डॉक्टर, घाल. तुझ्या गळ्यात खूप छान दिसेल.",अस बोलून तो तिच्या हातात देतो. गायत्री ते हातात धरते आणि घालते. तसा टेडी खुश होतो. खरच गायत्रीला ते शोभून दिसत होते. तिच्या उंचीला देखील ते परफेक्ट होत. गायत्री मात्र मंगळसूत्र पाहून थोडी संभ्रमात असते. नंतर टेडी तिला इतर ही दागिने घालायला सांगतो. पायात जोडवी, हातात सोन्याच्या बांगड्या अस सगळ काही ती घालत असते. नंतर ती आधी हॉस्पिटलला निघून येते. तिथं असलेल्या युवराज पाटीलच्या शरीर कडे ती जाते. टेडी ही त्याच्या छातीवर येऊन बसतो.
"लवकर लवकर बर कर डॉक्टर. आता मी तुझा पती झालो आहे. हा आता ती कुंकवाची डब्बी दे माझ्याकडे! मी कुंकू लावतो तुझ्या कपाळाला. मग सगळ्यांना खात्री होईल.",अस बोलताच गायत्री डब्बीतील कुंकू काढून आपल्या हातावर धरते. खर तर ती हे करताना घाबरत होती. पण त्याला न्याय देण्यासाठी हे करणे गरजेचे होते. याचा विचार करून ती शांत होत होती. टेडी युवराज पाटीलच्या बोटाला कुंकू लावतो आणि तो हात गायत्रीच्या भांगेत नेतो. कुंकू भांगेत पडताच ती डोळे बंद करते. अश्या प्रकारे तिचं लग्न होईल असे तिला वाटले नव्हते. टेडी मात्र खुश होत उठून तिला मिठी मारतो. बसल्या जागी अशी मिठी मारल्याने गायत्रीला कसतरी होत. आता ती त्या टेडीत असलेल्या युवराज पाटीलची बायको झाली होती. हेच आठवून तिला कसतरी होत होते.
"अभिनंदन डॉक्टर. तू मला कधीच सोडून जाऊ नको. माझ्या आत्म्यासोबत तू जोडली गेली आहेस. हा विचार लक्षात ठेवून माझ्या शरीराने तुला त्रास दिला तरी ही सोडून जाऊ नको. मी एकटा होईन.", टेडी तिला बोलत असतो. यावेळी तिला भरून येत. ती त्याला बाजूला करत हसून पाहते.
"कधीच नाही जाणार! तसा तू दिसायला खरंच भारी आहेस.",गायत्री या वेळी त्याच्या शरीराकडे पाहत म्हणाली.
"बघ तू ही माझं कौतुक करायला शिकली? डॉक्टर मी या अवतारात खूप खराब दिसतो ना?", टेडी बाजूला होत आपले डोळे मोठे करत विचारतो.
"नाही. क्यूट दिसतो. आता तुला जायचं नाही आहे का?",गायत्री विचारते.
"हो. अजून काम बाकी आहेत. डॉक्टर पण त्या आधी तू इकडच्या नर्सला आणि डॉक्टरला सांग ना?",टेडी.
"काय सांगू?",गायत्री.
"मी तुझा नवरा आहे. तू माझी बायको आहेस. मग माझ्या नवऱ्याची काळजी घेत जावा. अगदी चांगल्याप्रकारे. म्हणजे डॉक्टरचा नवरा आहे म्हणून चांगल्याप्रकारे लोक काळजी माझी घेतील. त्या सुशीला आणि इतर कोणाला हात लावू नका म्हणून सांग हा! मला नाही आवडत कोणी हात लावलेला.",टेडी भोळा चेहरा करत म्हणाला. यावेळी गायत्रीला हसावे की रडावे? हे कळत नाही.
"तुझी ही इच्छा पूर्ण होईल. सांगते आता सगळ्यांना. युवराज पाटील साहेबांना हात कोणी लावू नका!",गायत्री उठत कंबरेवर हात ठेवत म्हणाली.
ती त्या रूम मधील बेल वाजवून नर्सला बोलावते ,"या रूम मध्ये कोणत्याही बाहेरच्या मुलीला किंवा ज्यांचा पाटील घरा सोबत संबंध नाही. अश्याना पाठवू नका असे सांगून मोकळी होते."
या बोलण्यावर टेडी खुश होतो. तिला कारण विचारले जाते. तेव्हा ती, "नवरा आहे माझा" हे देखील बोलून मोकळी होते. नर्स भयंकर शॉक होते. गायत्री युवराजला चेक करत असते. यावेळी ती पर्सनली त्याची काळजी घेऊन चेक करते. आता तो तिचा नवरा होता. टेडी तिला आठवण करून देत होता ही गोष्ट. ती तिथून उठून आपल्या केबिनला येते.
"असिस्टंटचा नंबर सांग मला.",गायत्री आपला मोबाईल हातात धरत म्हणाली. तिला हे सगळ खूप लवकरात लवकर करायचं होत.
"मला काय माहीत!",टेडी तिच्या समोरच्या डेस्कवर पाय हलवत बसत म्हणाला. खरच आता त्याच्या डोक्यात काही घालावे असे तिचे एक्स्प्रेशन होते. एवढं सगळ केलं आणि आता हा सांगतो नंबर माहीत नाही.
"तुझा गळा दाबू का?",गायत्री मोबाईल बाजूला ठेवत त्याचा गळा धरत म्हणाली. तसा तो तिला अडवतो.
"डॉक्टर, आपल्या पतीचा खून करते का?पाप लागेल हा.", टेडी बारीक आवाजात म्हणाला. ती त्याला सोडते.
"मग मला आधीच का सांगितल नाही तू? नंबर नाही तर बोलणार कस त्याच्यासोबत?",गायत्री या वेळी चिडत म्हणाली.
"नंबर माझ्या मोबाईल मध्ये असतो. तो मोबाईल अपघात झाला तेव्हा फुटून गेला. मोबाईल हातात असताना नंबर कोण पाठ करत असते? काहीही डॉक्टर तुझं असते. इसवी सन मधले लॉजिक वापरत असते तू. जरा तुझं कौतुक केलं की, येतेच आपली जुन्या काळात. नही चलेगा ये हमका!",टेडी आपली मानेचा व्यायाम करत म्हणाला.
"पागल....",हा च शब्द निघतो तिच्या तोंडून. ती आता रागात काही करणार हे पाहून घाबरून तो मागे होतो.
"मी तुझा पती परमेश्वर आहे. हे विसरू नको! मला त्याच घर माहीत आहे. आपण घरी जाऊ त्याच्या. त्याने जर विश्वास नाही ठेवला. तर जे रागात मला मारणार ते त्याला मार. कारण त्याला सवय आहे माझ्याकडुन पंच खायची! याने तुझा राग ही शांत होईल आणि त्याला मारले तू याचा आनंद मला होईल. याला म्हणतात, एक दगडात दोन पक्षी मारणे!", टेडी शेवटचं बोलताना स्वतःशी गूढ हसतो. तिचा चेहरा आता थोडा शांत होतो.
हॉस्पिटल मध्ये मात्र गायत्रीच्या नवऱ्याची बातमी वाऱ्यासारखी पसरते. काही जण आनंदी होते. तर काही जण दुःखी होते. तर काहींना प्रश्न पडलेले असतात?
क्रमशः
**********