भाग ११.
अंतरा एका ठिकाणी गाडी पार्क करते. ती गाडीच्या बाहेर पडत गाडी लॉक करून चालतच एका रो बंगलो जवळ जाते. ती आपला मोबाईल काढून अड्रेस आणि त्या बंगल्या बाहेर दारावर लटकवलेली नेम प्लेट चेक करत असते. खात्री पटल्यावर ती त्या बंगल्याची बेल वाजवते. बेल वाजताच एक व्यक्ती दरवाजा उघडून तिला पाहतो.
"निखिल जोशी तुम्हीच का?",अंतरा त्याच्या कडे पाहत विचारते. चांगला चोवीस, पंचवीस वर्षाचा तो तरुण होता.
"हो.",तो गोंधळून बोलतो. पुढे असणाऱ्या अनोळखी मुलीला त्याच नाव कसे माहीत झाले? हा प्रश्न त्याला पडला होता.
"युवराज पाटील यांचे असिस्टंट आहात ना तुम्ही? त्यांच्या कडून मी आले आहे. तुम्ही माझ्यासोबत सध्या चला. एक महत्त्वाचे काम आहे तुमच्याकडे. मॅरेज कागदपत्र आहेत ते ही घेऊन चला.",अंतरा तिला जितके तिच्या बहिणीने सांगितले होते, तितके बोलून मोकळी होते.
"माफ करा. सर तर कोमात आहे. मग मी तुमच्यावर विश्वास कसा ठेऊ?",निखिल प्रामाणिक होता त्याच्या बॉस सोबत. त्यामुळे तो सरळ विचारतो.
"तुम्हाला तिथं आल्यावर समजेल. प्लीज, लवकर चला. इतर ही युवराज पाटील यांच्याशी संबंधित कागदपत्र घ्या!",अंतरा रिक्वेस्ट करत म्हणाली. तसा तो थोडा विचार करतो आणि ओके बोलून आत जातो. तो पर्यंत अंतरा बाहेर उभी राहते. काहीच वेळात निखिल ब्ल्यू रंगाचा शर्ट अंगावर चढवून त्याला मॅच होणारी जीन्स घालून तयार होऊन तिच्यासमोर उभा राहतो. हातात एक छोटी फाईल बॅग ही असते.
"चला.",तो अंतराला म्हणाला. तशी अंतरा त्याला आपल्या गाडीत बसायला लावते. तो बसताच गाडीत ती गाडी स्टार्ट करून त्याला घेऊन जाते.
गायत्री आपल्या नर्स, बॉय कडून युवराजच्या शरीराला आपल्या बेडरूम मध्ये ठेवत. त्याला मशीन लावून ठेवत असते. सगळी काही तयारी तिने केली होती. तिच्या रूमला तिने सध्या छोट हॉस्पिटल रूम बनवली होती. टेडी सोफ्यावर बसून तिला पाहत असतो.
"ही आधी का नाही मिळाली मला? किती भारी आहे ही! मी त्या शरीरात नाही आहे तरीही मला अगदी जपून सगळ काही करत आहे. ते ही काही अपेक्षा न ठेवता. हिच्यात ना दयाळू पणा जास्तच आहे. मला माहित नाही पुढे काय होईल? पण मला तू माझ्या आयुष्यात हवी आहे.", टेडी मनातच बोलत असतो. सगळ काही सेट झाल्यावर नर्स आणि इतर जण तिथून निघून जातात. आता ती थकलेली असते. ती जाऊन टेडीच्या बाजूला बसते. हलक आपल्या ओढणीने आपला चेहरा पुसत असते.
"तू थकली आहे डॉक्टर. तुला भूक लागली असेल? मी आणू तुझ्यासाठी काही?",टेडी क्यूट फेस करत तिला विचारतो. जसा काय तो लगेच आणणारच होता! गायत्री त्याची काळजी पाहून समाधानाने हसते.
"तुझे सिक्रेट सगळ्यांना कळू दे म्हणजे!",गायत्री.
"अरे, डॉक्टर तसे मी काय आणायला जाणार नव्हतो. मी तिथं घेईन हातात पण ते तुला खायला नाही मिळणार. जमीन मात्र पोट भरून घेईल.", टेडी आपल्या केसांवर हात फिरवत म्हणाला. या ही क्षणी गायत्रीला त्याच हसू येते.
"तू वेडा आहेस खरच मिस्टर. टेडी.",गायत्री हलके त्याला हाताने मारत म्हणाली.
"डॉक्टर, अस मारू नको. लागत मला.", टेडी बाजूला होत म्हणाला.
"ओके. सॉरी.",गायत्री प्रेमाने म्हणाली.
"तुझा असिस्टंट येईल आता. माझी बहिण देखील. आधी बघू त्याच आणि मग जेवायला बसू.",गायत्री तिच्या हातातील वॉच मध्ये पाहत म्हणाली.
दोघे आता त्या रूम मधून बाहेर येतात. गायत्री त्याला हॉल मध्ये घेऊन बसलेली असते. तो पर्यंत टेडी टिव्ही लावून बसलेला असतो. पण रिमोटचे बटन काही दाबत नव्हते. एक साथ चार पाच बटणे त्या रिमोट मधील त्याच्या हातून दाबत असायची. कारण त्याला हात होता. पण बोट नव्हती. त्याच मुळे अस होत होते.
शेवटी, तो दोन्ही हाताच्या साहाय्याने रिमोट उचलतो आणि गायत्रीच्या जवळ जाऊन तिच्या अंगावर टाकतो.
"बिझनेस चॅनल लाव जरा. आजचे न्यूज पाहायचे आहे.", टेडी तिच्या बाजूला बसत रिक्वेस्ट करत म्हणाला.
"थांब लावते.",अस बोलून गायत्री चॅनल लावून देते. मग मात्र तो शांत ते पाहत असतो. रिमोट आपल्या हातात धरून बसलेला असतो. मध्येच पुन्हा चुकून त्याच्या हातून काहीतरी लागत असायचे आणि मग पुन्हा तो गायत्रीला बोलवत असायचा.
थोड्याच वेळात अंतरा आपल्या घरी येते. निखिलला तर काही समजत नसते. पण तो काहीही न बोलता तिच्या सोबत चालत असतो. हॉल मध्ये येताच टेडीची नजर त्याच्या वर जाते. तसे त्याचे ते काळे डोळे चमकतात.
"दीदी दीदी.",अंतरा आवाज देते. तिच्या आवाजाने गायत्री हॉल मध्ये येते. गायत्री पाहते तर तिच्यासोबत निखिल उभा असतो. पण गायत्रीला पाहून अंतरा शॉक होते. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहून.
"दीदी, तू लग्न केलं?",अंतरा धक्क्यात तिच्या जवळ येत विचारते.
"हो. तुला नंतर सांगेन सगळ. निखिल तुम्ही मॅरेज कागदपत्र आणले आहेत का?",गायत्री तिला इग्नोर करत त्याला विचारते.
"हा...हो...एक मिनिट तुम्हाला का हवे आहे?", निखिल विचारतो.
"कारण मी युवराज पाटील यांची बायको आहे. मला लिग्ली सगळ करायचं आहे म्हणून मी कागदपत्र मागत आहे. युवराज यांनी सांगितले होते तुमच्याकडे आहेत पेपर.",गायत्री बोलते तसे अंतरा आणि निखिल तिला पाहू लागतात. तिला तर काहीच कल्पना नव्हती. निखिलला तर सुशीला त्याच प्रेम आहे. हेच माहित होत. मग मध्येच ही कोण आली होती? हा प्रश्न पडला होता. काही वेळासाठी शांतता तिथं पसरते.
"प्लीज, तुम्ही मला देतात का?", शांततेचा भंग करत ती विचारते.
"नाही! मी तुम्हाला असच देऊ शकत नाही. मला तुमच्याबद्दल काही माहिती नाही आहे. युवराज सर आणि तुम्ही भेटला कधी? हे झालं कधी तुमच्यात? सरांचे प्रेम फक्त सुशीला मॅडम वर होते. मी त्यांना एकत्र पाहिले होते. तुम्हाला नाही!",निखिल सरळ बोलतो.
"आमचं लव्ह होत एकमेकांवर म्हणून लग्न केलं. आता तरी द्या पेपर.", गायत्री चिडून म्हणाली. सुशीला बद्दल ऐकून तिला रागच येत होता. पण तरी काय निखिल तिला पेपर देत नाही. शेवटी, शांत बसलेला टेडी आपल्या पायावर उभं राहत चालत निखिल जवळ येऊ लागतो. ते दृष्य पाहून अंतरा ही घाबरते.
"दे म्हटले तिने तर देता येत नाही का निखिल तुला? जास्त वागला ना तर कामावरून काढून टाकेन आणि नवीन असिस्टंट लावेन तुझ्या जागी. मग बस ओरडत.",टेडी रागात बोलत त्याच्या अंगावर चढत जोरात त्याच्या तोंडावर पंच करतो. पण त्याचा हात काही त्याला बसत नाही. कारण शेवटी कापूस होता. हात नाही बसला तरीही निखिल आणि अंतरा बेशुद्ध होऊन जमिनीवर पडतात. टेडी एकदा आपल्या हाताला आणि एकदा निखिलला पाहतो.
"एवढी ताकद आहे माझ्यात? ह्याला मारले तर डॉक्टरची बहिण ही बेशुद्ध पडली.", टेडी निखिलच्या तोंडावर हात फिरवत बडबडत असतो. ते ऐकून गायत्री नकारार्थी मान हलवते. तिला समजल होत. निखिल त्याच्या मारण्याने नाही तर धक्क्याने बेशुद्ध झाला होता. असा टेडी त्याच्या समोर चालत जाऊन, बोलून त्याला मारतो म्हटल्यावर चांगलाच शॉक बसला होता. अंतराला ही ते दृश्य पाहून शॉक बसला होता. हे नॉर्मल नव्हते त्या दोघांसाठी! गायत्रीला टेडी जेव्हा तिच्या आयुष्यात आला होता, ते क्षण आठवतात. त्यावेळी तिची ही स्थिती अशीच काहीशी झाली होती.
"डॉक्टर, उठव याला.", निखिलच्या छातीवर बसत तो निखिलला हात लावत उठवत म्हणाला. निखिलला हळू हळू शुद्ध येते. पण जेव्हा तो मान वर करून पाहतो. तर टेडी त्याला छातीवर बसलेला दिसतो. तसा शुध्दीवर आलेला तो पुन्हा बेशुद्ध होतो.
"तू उठ आधी त्याच्या छातीवरून. मग येईल तो शुध्दीवर. तू असा बसून उठवायला लागलास तर तुलाच घाबरून ते बेशुद्ध होतील!",गायत्री शेवटी त्याला निखिलच्या अंगावरून उठवत म्हणाली. तसा टेडी शांत होत सोफ्यावर जाऊन बसतो. गायत्री ग्लास भरून पाणी आणत हलक अंतराच्या तोंडावर शिंपडते. तशी तिला शुद्ध येते. तसेच ती निखिलला करते. पण त्याला काही शुद्ध येत नाही.
"पूर्ण ग्लास खाली कर त्याच्यावर!",टेडी बोलतो. तशी गायत्री पाणी सगळ ओतून टाकते. तेव्हा कुठे निखिलला शुद्ध येते. अंतरा मात्र थोडी गायत्रीच्या मागे जाते. भीती त्याची वाटत होती. निखिल कडे पाहून टेडी फक्त स्माईल करतो. या वेळी निखिल घाबरलेला असतो.
क्रमशः
********