Taddy - 1 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories PDF | टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग १

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

टेडी (अ स्ट्रेंज लव्हस्टोरी) - भाग १

टेडी( अ स्ट्रेंज लव्हस्टोरी):भाग १

कथेचं नाव वाचून थोड वेगळे वाटत आहे ना? तर ही कथाच थोडी वेगळी असणार आहे. फॅन फिक्शन या प्रकारातील ही स्टोरी आहे. फॅन फिक्शन म्हंटले, की एखाद्या स्टोरी चा किंवा मूव्हीचा विचार करून अगदी आपल्या पद्धतीने मांडणे. ते ही कथा स्वरूपात. तर आज मी ही टेडी या साऊथ इंडियन मुवी चा संदर्भ घेऊन स्टोरी मांडत आहे. पण स्टोरी माझी तशी अजिबात नाही आहे. खूपच वेगळी आहे. ती सुध्दा थोडी प्रेमकहाणी टाईप. पूर्णतः काल्पनिकच म्हणा! चला तर वळूया स्टोरी कडे.

**********

आज संजीवनी हॉस्पिटल मध्ये गंभीर अपघात झालेल्या पेशंटला आणण्यात आले होते. स्थिती ही त्याची खूपच खालावली होती. रक्त प्रवाह जास्त वाहून गेला होता. डॉक्टर थोडे घाबरून त्याच्या वर उपचार करत होते. कारण ती व्यक्ती कोणी साधी सुधी नव्हती! बाहेर असलेले त्याचे नातेवाईक खूपच ओरडुन डॉक्टरांना धमकी देऊन ऑपरेशन करायला लावत होते.

"डॉक्टर रक्त जास्त वाहून गेलं आहे. यामुळे मला नाही वाटत हा वाचेल असा? पण बाहेर कस सांगणार ना? त्यापेक्षा उपचार करा.",एक डॉक्टर दुसऱ्या व्यक्तीला म्हणाला.

"सर, आपले काम आहे पेशंटला वाचवणे, तर आपण ते काम करू. जर चांगला विचार केला तर नक्कीच पेशंट आपला वाचेल.",महिला डॉक्टर थोडी चिडून आपल काम करत म्हणाली. तसे तिथं काहीवेळ शांतता पसरते. सगळे रूम मध्ये असलेले डॉक्टर आपले प्रयत्न करतात. पण सगळ काही निष्फळ ठरते.

"कोमा मध्ये गेले आहे ते.",डॉक्टर घाबरून बाहेर येत म्हणाले. कोमा मध्ये गेला तो व्यक्ती हे ऐकून त्याच्या नातेवाईक लोकांना वाईट वाटते. ती आपले काम करून बाहेर येते. थोडा चेहरा उतरला होता तिचा. ऑपरेशन रूम मधून बाहेर पडत ती डायरेक्ट फ्रेश व्हायला आपल्या केबिन मध्ये जाते. केबिन आतून लॉक करून ती आतील बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला जाते. मोठी डॉक्टर होती ती. अपघात प्रकरण तिचं चांगल्या प्रकारे हॅण्डल करत असायची. थोडीशी गोरी आणि उंच होती. पण सुंदर असली तरीही कडक वागत असायची. त्यामुळे स्टाफ तिला थोडा घाबरून आपले काम करत असायचा. हॉस्पिटल तिचे स्वतःचे होते. आईवडील नव्हते. तिच्या बारावीच्या वेळी वडील तिचे वारले. आई लहान असताना वारली. आई नंतर वडिलांनी तिला सांभाळले होते; त्यामुळे कमी काही वाटत नव्हती आईची. पण वडील सोडून गेल्यावर मात्र जबाबदारीची जाणिव तिला कळली. वडिलांना ती डॉक्टर व्हावी, अशी इच्छा होती. त्यांनी तशी तयारी ही केली होती. पण कदाचित देवाच्या मनात काही वेगळे होते म्हणून त्यांना आपल्या मुलीची प्रगती पाहायला मिळाली नाही. तिच्या पाठीवर एक बहिण होती तिला छोटी. तिचीही जबाबदारी अगदी छान प्रकारे सांभाळली होती तिने. वडील सोडून गेले म्हणून खचली नाही तर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले तिने. आज सगळ काही जे वैभव तिच्याकडे होते. ते फक्त तिच्या प्रयत्नांनी आले होते. सगळ असले तरीही ती गर्व करत नव्हती. अगदी डाऊन टू अर्थ होती.

फ्रेश होऊन आपले कपडे बदलून ती बाहेर येते. तिथच एका कोपऱ्यात असलेल्या एका चार फूट टेडीला ती उचलून घेऊन आपल्या घरी घेऊन जायला लागते.

"गायत्रीऽऽऽ",एक आवाज तिच्या कानी पडतो. तशी ती मागे वळते.

"काय आहे पायल? आज मला थोडा उशीर झाला आहे. चल लवकर बोल काय आहे ते?", ती काहीशी घाईतच म्हणाली.

"हा एवढा मोठा टेडी बेयर कुठे घेऊन जात आहे?", पायल हसून विचारते. चार फूट उंचीचा मोठा असा सॉफ्ट स्काय ब्लू कलरचा टेडी होता तो. गळ्यात छोटीशी टाय होती. डोळे काळे असे गोल गोल मोठे. एकदम सॉफ्ट आणि उचलायला हलका असा होता.

"घरी घेऊन जात आहे. मी माझ्या पगाराने घेणार होती तेव्हा. पण त्यावेळी असे घ्यावे वाटले नाही. पण आता सकाळी या टेडीला पाहिले आणि मग आठवण झाली मला. मग मी घेतला सकाळी. खूपच मस्त दिसतो ना हां?", गायत्री टेडी कडे पाहत म्हणाली. तिचं बोलणे ऐकुन पायल हसते.

"लग्न करायचं वय आहे तुझं आणि तू असले काही करत असते. बट हा टेडी खूपच मस्त आहे.",पायल टेडीला हात लावत म्हणाली.

"लग्न नको ग बाई! आधी लग्न माझ्या अंतराच करायचं आहे मला. त्या नंतर बघू पुढचं काही तरी.",गायत्री हसून म्हणाली. लग्न करून संसार करण्यात सध्या तिला असा फारसा इंटरेस्ट नव्हता. बहिणीला मार्गी लावले की, मग पाहू पुढे काय? असे विचार होते तिचे.

"तिचं तर होईल. पण तुझं काय राणी? आजकाल नाही ग कोणी बहिणीचा विचार करत एवढा.", पायल तिला समजावत म्हणाली. गायत्री तिला काहीही उत्तर न देता तिथून जाणे पसंत करते. खूप तिच्या मैत्रिणी समजावत असायच्या. पण ती काही ऐकत नसायची कोणाचे.

"तुला तुझ्यासारखाच भेटायला हवा. मग कळेल आयुष्य कसे असते? प्रेम काय असते ते? जो पर्यंत तुझ्या आयुष्यात असा व्यक्ती येत नाही. तो पर्यंत तुला आम्ही काहीही सांगितलेलं कळणार नाही. आयुष्याच्या एका क्षणाला आपल्या जोडीदाराची गरज असतेच.", पायल एकवार तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत म्हणाली. ती तशीच मग आपल्या कामाला निघून जाते.

पायल खूपच जवळची मैत्रीण होती गायत्रीची. दिसायला थोडी सावळी आणि उंचीने कमीच होती. पण मनाने मात्र खूपच छान होती. गायत्रीला जास्त करून तिची साथ असायची. तिची मेहनत, जिद्द सगळ काही पायलने स्वतःच्या डोळ्याने पाहिले होते. मध्यम वर्गीय घरातून श्रीमंत होणे! हा प्रवास कठीण होता गायत्रीचा. पण ती हरून बसली नाही. आपली जिद्द घेऊन ती आज इथपर्यंत पोहचली होती. एक मुलगी असून देखील तिने असे स्वप्न तिचे पूर्ण केले होते. जे खरच तिच्यासाठी एखाद्या मोठ्या महागड्या वस्तू एवढे होते. पण म्हणतात ना? मेहनत आणि स्वतःवर असलेला ठाम विश्वासच तुम्हाला तुमच्या स्वप्नांकडे न्यायला मदत करतो. तसेच काहीसे घडले होते इथे ही.

"ही पायल पण काहीही बोलत असते. मला नाही बाबाऽऽऽ लग्न करायचे एवढ्यात. टेडी तू आज माझ्या घरी येणार आहेस. खूपच क्यूट दिसतो तू. थांब तुला नीट बसवते.",गायत्री आपला सीट बेल्ट लावून झाल्यावर टेडी बिअर ला बाजूच्या सीटवर बसवत म्हणाली. टेडी आवडत होते तिला. तिच्या वडिलांनी लहान लहान घेऊन दिले होते तिला. पण मोठा असा नाही. श्रीमंत झाल्यावर घेऊ एखादा मोठा टेडी. अशी इच्छा मनाशी ठेवून ती आहे त्यात समाधानी मानत होती. टेडी ला सीट बेल्ट लावत ती एकवार हसून त्याला पाहत आपली गाडी चालू करते आणि तिथून निघून जाते. गाडीत असलेली म्युझिक सिस्टीम ऑन करत ती कार ड्राईव्ह करत असते. गान असते 'तेरी दुल्हन सजाऊंगी'.

हजारो मंजिलें होगी, हजारो कारवां होंगे
निगाहें हमको ढूंढेगी, न जाने हम कहाँ होंगे

साजन साजन साजन मेरे साजन मेरे साजन
तेरी दुल्हन सजाऊंगी
तेरी दुल्हन सजाऊंगी
तेरी दुल्हन सजाऊंगी
तेरी दुल्हन सजाऊंगी

वादा दिया तुझे जो भी, वादा दिया तुझे
मैं वो वादा निभाऊँगी
मैं वो वादा निभाऊँगी

साजन साजन साजन मेरे साजन मेरे साजन
तेरी दुल्हन सजाऊंगी
तेरी दुल्हन सजाऊंगी
तेरी दुल्हन सजाऊंगी
तेरी दुल्हन सजाऊंगी..

गाण्याचे कडवे ऐकून ती काहीशी वैतागत म्युझिक सिस्टीम बंद करते.

"या लोकांना चांगली गाणी मिळतच नाही बहुतेक. नुसते रडकी गाणे लावत असतात. तुमचे ब्रेकअप झाले म्हणजे सगळ्यांचे नाही झाले. हे कधी कळणार काय माहिती या लोकांना. ज्याचे खरच झाले आहे, तो तर दुःखी होऊन या गाण्याने आणखीन देवदास बनून बसेल. अश्या लोकांना काहीतरी इन्स्पिरेशन गाणं ऐकवायचे हे कळतच नाही. मेंटल लोक.",ती गाडी ड्राईव्ह करत बडबडत असते. रडणारे साँग तिला आवडत नव्हते.

"लोक प्रेमात जाम येडी होतात हे कळल यावरून. प्रेम आई वडील, बहीण , भाऊ यांच्यावर ही करता येत. ही लोक नेहमी आपल्या सोबत उभी राहतात. जग आपल्याशी वैरी असेल तरीही आपले लोक नसतात. हे यांना कळतच नाही. आजकालची तरुण पिढी सगळ्या गोष्टीला खेळच समजतात. करियर करायचं सोडून असले धंदे करत बसतात. मग नकार दिला की, कर आत्महत्या. ज्या आईवडिलांनी आपल्याला मोठ केलं याचं काहीच वाटत नाही. आय हेट धिस टाईप पिपल. हुं हुं.",नाक मुरडत गाडी थांबवत ती म्हणाली.

"आईस्क्रीम घेते. नाहीतर अंतरा नाराज होईल.",ती आपला सीट बेल्ट काढत म्हणाली. हातात आपली पर्स घेऊन गाडीच्या बाहेर उतरून गाडी बाहेरून चावीने लॉक करत ती जवळच्या आईस्क्रीम पार्लर मध्ये जायला लागते. थोड चालत जाऊन ती हातात आईसक्रीम चा एक टब घेऊन येते. तो नीट मागच्या सीट वर ठेवून आपली पर्स ही ठेवते.

"काय को बकबक करली है रे तू?? शांती नामक चीज भि होती कुछ।",एक आवाज तिच्या कानावर पडतो. कारण गायत्री स्वतःशी बडबडत असते.

"कोण बोलले?",ती आसपास पाहत विचारते. आपली गाडी आतून लॉक करत सीट बेल्ट लावत आसपास पाहत असते.

"कोण बोले रा? ये तू सोच मत। थोबडा बंद कर ले। मेरे को शांती से रहने दे!",पुन्हा आवाज येतो. आता तिने तो आवाज कुठून येतो हे पाहिले होते. ते पाहून तिला विश्वासच बसत नाही. ती स्टिरिंग वरचे हात काढत डोळे चोळत पाहत असते. तर आता टेडी आपले हात डोक्याच्या मागे घेऊन शांत बसला होता. जे की थोड तिला विचित्र वाटत होते.

"काहीही विचार करते गायत्री तू. तो थोडीच बोलेल? भासच झाला आहे. चल घरी जाऊ.",थोडी घाबरून मनातच म्हणाली. तिला एका क्षणाला वाटले टेडी बोलत आहे. पण नंतर स्वतःच भास समजून स्वतःला शांत करत असते. गाडी कशीबशी सुरू करून ती तिथून निघून जाते.

क्रमशः
©® भावना सावंत
***************
नवीन लव्हस्टोरी खास तुमच्यासाठी. जी की फॅन फिक्शन प्रकारातील आहे. भेटू पुढील भागात लवकरच.