Samarth Aani Bhoote - 1 in Marathi Horror Stories by jayesh zomate books and stories PDF | समर्थ आणि भुते - भाग 1

Featured Books
  • મેઘાર્યન - 10

    આર્યવર્ધને પોતાની વાત પૂરી કરીને તલવાર નીચે ફેંકી દીધી અને જ...

  • RUH - The Adventure Boy.. - 8

    પ્રકરણ 8  ધીંગામસ્તીની દુનિયા....!!સાતમાં ધોરણમાં આવ્યો ને પ...

  • પરીક્ષા

    પરીક્ષા એક એવી વ્યવસ્થા છે, જેમાંથી સૌએ ક્યાંક ને ક્યાંક આ વ...

  • ટ્રેન ની મુસાફરી - ભાગ 2

    સાત વર્ષ વીતી ગયા હતા.આરવ હવે જાણીતા કવિ બની ગયા હતા. તેમનું...

  • The Glory of Life - 5

    પ્રકરણ 5 : એક વખત એક માણસ પોતે પોતાના જીવન માં સર્વસ્વ ત્યાગ...

Categories
Share

समर्थ आणि भुते - भाग 1

निशाचर ही रात त्यांची आहे..

स्थळ : मुंबई  
ठिकाण : भारत सिनेप्लेक्स थीटर
  
     रात्री 12:30 am    

        
समोरुन पाहता एक भलीमोठ्ठी निळ्या रंगाच पेंट दिलेली उंचीने पंधरा फुट - लांबीने सत्तर फुट अशी एक भिंत दिसत होती.  

        भिंतीच्या मधोमध अकराफुटांवर तपकीरी रंगाच्या लहान बल्बसचा वापर करुन - त्याच लाईटमार्फत मराठी अक्षरांत एक नाव लिहिल होत ..( भारत सिनेप्लेक्स थीटर )

   त्या नावात लाईटबल्बसचा वापर गेला होता- ज्याने अवतीभवती खाली तपकीरी रंगाचा प्रकाश पडला होता. 

त्या नावाखाली दोन झापांचा काळ्या रंगाचा काचेचा बंद दरवाजा दिसत होता . 

        दरवाज्याच्या उजव्याबाजुला तिकिट बॉक्सची बंद खिडकी होती ! ( ह्याचा अर्थ नक्कीच थीटर मध्ये सुरु असलेला पिक्चर हा शेवटचा शो होता.) तसंच झाल सूद्धा ! 

     काळ्या रंगाचा तो बंद झापांचा दरवाजा उघड़ला गेला , आणी एक तरुण व तरुणी चर्चा करतच बाहेर आले. 

        " वाव खुप छान मुवी होती नाही ड्रेक्युला.. चाप्टर 1 !" 
तो तरुण आपल्या बाजुला असलेल्या तरुणीकडे पाहत म्हंटला. 

      "हो ना , खुप मज्जा आली!" ती तरुणी त्या तरुणाच्या वाक्याला प्रोत्साहन देत म्हंणाली. 

       " तू ती हिरोइन पाहिलीस ईशा , काय मस्त एक्टींग केलीये तिने , नाही?" त्याच्या चेह-यावर हे बोलतांना एक वेगळंच आनंद झळकत होत. 

       

       " हो ना ! पुर्णत मुवीभर तू फक्त तिलाच पाहत होतास ना ? म्हंणूनच तुला तो ड्रेक्युला सुद्धा दिसला नाही !" ईशाच्या वाक्यावर त्या तरुणाच्या चेह-यावर चोरी पकडल्यासारखे भाव पसरले , त्याच हसू झटकन विरल गेल , व जरासा गांगरल्यासारख करत तो म्हंणाला . 

      " व..व..व्हॉट..! अ..अ...अस काहीच नाहीये, तो ड्रेक्युला सुद्धा खुप डेंजरस होता. !" 
बोलतांना त्याची जरा बोबडीच वळाली होती. 

       " ओ मिस्टर धवल, तुमची ही नाटक माझ्या समोर नाही चालणार हं !" तीने हाताचा एक पंजा त्याच्या चेह-यासमोर धरला व ठसक्यात म्हंणाली. 

        तस ईशाला राग येण साहजिकच होत - 
  कारण धवल बोरे वय वर्ष ( 25 ), ईशा ईनामदार वय वर्ष (24 ) दोन वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध जे होते -
  गेल्या आठवड्यातच धवलला एका कंपनित नोकरी लागली होती, पगार चांगला तीसच्या आसपास होता..

        ज्याने ईशाचे वडील धवलला लेकीचा हात द्यायला तैयार झाले होते. - प्रेमाचा नात लवकरच नवरा -बायकोत बदलणार होत. 

        पण ईशाला सुद्धा डॉक्टर व्हायचं असल्याने- सध्या तिच शिक्षण सुरु असल्याने लग्नगाठ जरा दूर ढकल्ली गेली होती. आणी ईश्याच्या ह्या निर्णयाला धवलसहित त्याच्या कुटूंबियांचाही बिल्कुल विरोध नव्हता.! 

        बर त्यांच खासगी आयुष्याच प्रवचन पुरे आता !
पुढे पाहूयात.
 

    तर आज शनिवार असल्याने दोघांनाही उद्या रविवारची सुट्टी होती - म्हंणूनच दोघेही लास्ट शो मुवी पहायला आले होते.  

        आणी आताला मुवी पाहून दोघेही पुन्हा घरी जायला निघालेही होते. 

        परंतू मध्येच ते रुसण- फुगण्याची केमिस्ट्री सुरु झाली होती.   

        ईशाचा राग तसा लटका होता , धवल नेहमीचंच तिला राग आला की गोड गोड बोलत मनवायला जायचा , ज्याने तिला रागवायला रुसायला फार आवडायचं - सांगायचं झालं तर हेच , जर मनवणारा असेल , तर रुसायलाही आवडत ! 

        आजही तसंच झालं!

       " ए ईशा , अंग काय तू पण! यार ती फिल्म आहे ना ! "  

        " हो ना , ती फिल्मच आहे , मग जा त्या हिरोईनकडेच , माझ्याकडे नको येऊस ..!" 
  ईशाने हाताची घडी घातली- गाल फुगवले. 

        " ए ईशा , तिच्याकडे कस जाऊ ? " धवलने डोक चोळल ." ती तर स्क्रीनमध्ये राहते ना ? आणी तसंही माझी खरी हिरोईन तर तू आहेस ! मला एक किस हव असेल तर ती थोडी ना देईल..! " धवलने तिचा एक हात धरला - व एका झटक्यात ईशाला आपल्या बाहूपाषात ओढल.  

        त्याच्या ह्या कृतीने तीच सर्व अंग शहारल,
अंगावर सर्रकन काटा आला , पण हा काटा भीतीचा नव्हता , हे काहीतरी वेगळंच होत - रोमांटीक सेंस सारख!

        धवलच्या एका कृतीने तिच्या गाळांवर 
लाळी जमली होती, राग धुळीवर फुंकर मारावा तसा झटकन पळून गेला होता. 

     त्याची ती एकटक तिच्या ओठांकडे पाहणारी तहानलेली नजर तीने ओळखली होती.  

        " धवल , आजूबाजुला लोक आहेत !" 

        " हो मग असुदेत ना !" ( धवलने ईशाच्या कपाळावर आलेल्या केसांची बट हळकेच एक बोटाने दूर सारली " तसंही मी काही त्यांची बायको-गर्लफ्रेंड माझ्या मिठीत घेतली नाहीये , माझ हक्क आहे तुझ्यावर - आणी माझ्या हक्काची आहेस तू ! " 

       " धवल..!" तीने प्रथम धवलच्या मीठीतून स्वत:ला सोडवल. " हे बघ धवल , मी तुझीच आहे - पण माझी अट तुला ठावूक आहे ना ? जो पर्यंत मी डॉक्टर होत नाही तो पर्यंत लग्न करणार नाही ! आणी नाही तसं काही..!"   

         " ईशा, मला माहीतीये ! आणि मी तो पर्यंत थांबायला ही तैयार आहे !" धवल नेकमनाने म्हंटला. 

        त्याच्या त्या प्रांजळ स्वरात कसलाही खोटेपणा जाणवत नव्हता ,व ते सत्य ही होत.

     " अच्छा , तू थांबू शकतोस? मग हे काय होत !" 
तीने डोळे जरासे लहान केले. 

        " हे , ते तर मी अस्ंच - तू गाल फुगवून बेडकीसारखी उंम्म करुन बसली होतीस . मग तुला मनवण्यासाठी केल मी." ( त्याने गाल फुगवून तिला चिडवल)  

        " अं व्हॉट! मी बेडकी?" 

        " हह्ह्ह्ह्ह्ह हो ..हो , येस बेडकी बट क्यूट..वाली.. !" धवल तिला चिडवत पुढे पुढे धावू लागला ..आणी त्याला मारण्यासाठी ईशा त्याच्या मागे मागे धावू लागली.  

      
मध्यरात्रीची वेळ झाली होती , आकाशात चांगलच पौर्णिमेचा चंद्र उगवलेला दिसत होता. नाईट वॉचमनसारखी रातकिड्यांची किरकिर गुणगुणत होती... 

        

       मुंबईतल्या सुनसान रस्त्यावरुन ती के:टी:एम 
धावत होती . के:टी:एमच्या ड्राईव्हसीटवर धवल बसला होता, दोन्ही हात स्टेरिंगवर - आणी डोक्यावर हेल्मेट होत !

         गाडीची चंदेरी हेडलाईट पेटली होती ..आणी ट्रेन्ड़ म्हंणून की काय दोन्ही बाजुच्या भगव्या साईड लाईटज टिम - टिम करत पेटत होत्या.  

    स्पीडोमीटर मध्ये (100) अंक दिसत होत.
 ह्याच अर्थ गाडी हवेला कापत जात होती. 

        " ईशा गच्च धरुन ठेव !" 
जरा मोठ्यानेच धवल उच्चारला.    

      तसा ईशाने दोन्ही हातांनी धवलच्या शरीराला गच्च पकडून धरल. 

        " एवढी फ़ास्ट चालवायची काही गरज आहे का ? रेस थोडी लागली आहे ईथे !" मागून ईशा म्हंणाली. 

        " येस डियर असंच समज की रेसच लागलीये !कारण आपल्याला लवकर घरी पोहचायचं, खुप वेळ झालीये ना !"  

        " हो ते तर आहेच !" मग काहीतरी लक्षात आल्यासारख ईशा खोडकर स्वरात म्हंणाली. " नक्की वेळच झालीये ना , की त्या झोमटे क्रीएशनच्या स्टोरीजमधल्या भुतांची भीती वाटतीये..!" ईशा दात काढत हसली. 
  धवलच्या मात्र थोबाडावर चांगलेच बारा वाजले होते.  
        
          तोच के:टी: एम रस्त्याबाजुला असलेल्या एका बंगल्याच्या फाटकापाशी थांबली. 
    गाडी थांबताच ईशा खाली उतरली.
 

              " धवल , तुझी सर्व फैमिली आठवड्यासाठी नेहमीप्रमाणे गावाला गेलीये ना ? मग आज वेळही जास्त झालीये सो तू आमच्या ईथेच का नाही स्टे करत..!" ईशा काळजीयुक्त स्वरात म्हंटली.

        " औह नो नो , जो पर्यंत आपल लग्न होत नाही ना , तो पर्यंत मी तुमच्या घरी झोपू नाही शकत !" 

       " का ?" ईशाने न समजून विचारल.

        " कारण, मी असतांना तुला कंट्रौल नाही होणार ,हिहिहिहिही!" धवल खिखिखिखी करत हसू लागला.. 

        त्याच्या त्या वाक्यावर ईशाला पुन्हा राग आला.. ती पून्हा त्याला मारायला जाणार तोच त्याने क्ल्च सोडल... व गाडी वेगान तिथून निघुन गेली.. 

       ईशा त्याच्या गाडीला पुढे पुढे जातांना पाहत होती -तिच्या चेह-यावर एक मंद स्मित हास्य होत , मग तीने नाही- नाही अशी स्वत:शीच मान होकारार्थी हळवली..   
     व फाटक उघडून आत निघुन गेली. 

  xxxxxxxxxxxxxx  

        
तीस मजल्याची उंच बिल्डींग दिसत होती. बिल्डींगच्या भिंतीना पिवळसर रंग दिला होता.        
रात्रीची वेळ असल्याने बिल्डींगमधल्या सर्व रुमच्या लाईटस ऑफ होत्या ! नक्की रात्र असल्यानेच ऑफ होत्या ? की आणखी काही झ्ंजाट होत ? नाही म्हंणजे शहरातली लोक लवकर झोपत नाहीत ना ! बरोबर ना ?

       त्या तीस मजली बिल्डींगला चारही बाजुंनी सुरक्षेखातर दहा फुट उंचीच भक्कम बांधणीच कंपाउंड होत.   

        कंपाउंड मधोमध एक दोन झापांच भलमोठ्ठ बंद गेट दिसत होत - 

        गेटपासून पुढे दहा पावलांवर डांबरी रस्ता होता , त्याच रस्त्यावरुन एक के:टी: एम आली, पुढच्या हेडलाईटचा चंदेरी प्रकाश काळ्याशार गेटला चांदीसारखा चमकवून गेला.. 

        धवल ह्याच बिल्डींगमध्ये राहत होता - 
त्याची गाडी गेटबाहेर थांबली होती.

        'पि..पिं...पिप..!' धवलने दोन तीन वेळा हॉर्न वाजवल . 

        एनवेळेस एका हॉर्नने वॉचमन धावत गेट उघडायला यायचा , पण आज मात्र तीनदा हॉर्न वाजवून सुद्धा , वॉचमन काही आला नव्हता. 

         " ए बाबू..? ए बाबूराव?" धवलने वॉचमनच नाव घेत त्याला हाक दिली. 

         " कुठे गेला हा बाबू? " धवलने गेटमधून आत पाहिल , गेटबाजुला बाबू बसायचा ती लाल रंगाची रिकामी खुर्ची तिथेच होती.  

        " खुर्ची तर ईथेच आहे , नक्कीच हा बेवडा बाबू आज पण बागेत दारु ढोसत बसला असेल! असो मी तरी कुठे अंबानीचा जावई आहे , एक दिवस गेट उघड़ल तर माझी काही पंचाईत होणार नाही ! चलो धवलभाई गेट उघडो..!" धवल.स्वत:शीच म्हंटला ..
 गाडीवरुन उतरला.. गेटपाशी आला..!   

        गेट सळ्यांच होत , त्याचा पातळसर हात जाईल ईतकी फट नक्कीच होती.. ! 

        गेटच्या सळ्यांमधून आत हात घालत त्याने , गेटची कडी उघडली - व हळूच गेट गाडी आत जाईल तेवढच उघड़ल..  

        गेट उघडून धवल पुन्हा गाडीपाशी आला, की स्टार्ट वरुन गाडी स्टार्ट केली ..! 

        पण हे काय? गाडी स्टार्ट होतीये कुठे ? 

        " शट! आता या गाडीला काय झालं ? हे देवा नक्की कसली परिक्षा घेतोयस माझी! आधी हा बाबू? आता ही गाडी.? ठिक आहे , कीक मारतो..!" 

        धवलने अस म्हंणतच उजव्या पायाने गाडीची कीक मारली , पण नशीबाने साथ सोडली होती. 
गाडीच इंजिन काही केल्या सुरु होत नव्हत ! 

        
 कारण नियतीच्या मनात काहीतरी वेगळ होत ! 
काहीतरी विचीत्र, कृल्पती, वाईट घडण्याच्या मार्गावर
 होत , त्याची सुरुवात ही झाली होती ! 
   फक्त सावज अजाण होते - होय धवल पुढे घडणा-या घटनेपासून पुर्णत अजाण, अनभिज्ञ - होता.

        क्रमश : 

पुढील भाग लवकरच...