Paryai Patni - 2 in Marathi Drama by Vivan Patil books and stories PDF | पर्यायी पत्नी - भाग 2

Featured Books
Categories
Share

पर्यायी पत्नी - भाग 2


"कोण आहे ही सुंदर बेबी? दी ही मायु आहे का? तुला माहित आहे बेबी तुझ्या मम्माला माझ्या मांजरीचे पिल्लू खूप आवडतात,"अंशिका मायराच्या नाकाला प्रेमाने स्पर्श करून म्हणाली.


तितक्यातच मायराने तिचे नाक चाटले आणि अंशिकाने तिच्या फुगड्या गालाचे चुंबन घेत कुडकुडले, "अव.... तू मावशी वर प्रेम करतेस, बरोबर. बेबी, मी पण तुझ्यावर प्रेम करते."

“हे जरा विचित्रच आहे की ती तुला हात लावू देत आहे. नाहीतर तिने मला आणि रुद्रांशशिवाय कोणालाही हात लावू दिला नसता,”अभिरा मायराच्या डोक्यावर थोपटत म्हणाली.

अंशिका अभिराचे बोलणे ऐकून हसली.

आज वर्षांनी अभिरा घरी परतुन दोन दिवस झाले होते. ती आपल्या पती आणि मुलांसह परतली होती आणि अंशिकाला त्यांना पाहून किती आनंद झाला आहे हे ती व्यक्त करू शकत नव्हती. प्रत्येकजण नाही. फक्त तिची दी आणि तिची मुलं.

अंशिका तिच्या बहिणीच्या नवऱ्यासमोर काही अज्ञात कारणाने का नाराज व्हायची ते तिला कळतच नव्हते. तो कट्टर आणि असभ्य होता. अनौपचारिकपणे हॅलो- हाय करण्याशिवाय तो तिच्याशी नीट बोललाही नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर असा भाव असायचा की तो लवकरच अंशिकाला शिव्या देऊ लागले. त्यामुळे ती त्याच्यापासून दूरच रहायची.

"ऑ....माझ्या बेबीला झोप येत आहे का? बेबी तु ना तुझ्या मासीच्या खांद्यावर झोप,"अंशिका मायराच्या कानात कुजबुजली आणि लवकरच ती अंशिकाच्या खांद्यावर गाढ झोपेत गेली.

"अंशू. हे बघ मी तुला आधी सांगते, तू ना एक उत्तम आई होशील."अभिरा हसुन म्हणाली.

अंशिकाने मायराला बेडवर झोपवले आणि तिच्याभोवती काही उशा ठेवून तिला शांत केले.

अभिरा काहीतरी बोलणार होती तितक्यातच...

अंशिका ने तिचा हात धरला आणि नम्रपणे म्हणाली, "दी, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे."

"काय झालं अंशु? सगळं काही ठीक आहे ना?" अंशिकाच्या आवाजातली अस्वस्थता ओळखून अभिराने तिला विचारले.

अंशिका ने अभिराला वर्धन आणि तिच्या नात्याबद्दल सर्व काही सांगितले. तिने सांगितले की तिचे वर्धनवर खूप प्रेम आहे आणि ती त्याच्याशिवाय इतर कोणाशीही लग्न करणार नाही. अंशिकने अभिरासोबत हे शेअर केले कारण फक्त अभिराकडेच तिच्या भावांना आणि वडिलांना पटवून देण्याची क्षमता होती.

"दी, मी वर्धनशिवाय राहू शकत नाही. माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे. प्लीज, पप्पा, अर्णव दादा, अर्जुन दादा आणि आदर्श दादांना पटवून दे. जर मी त्यांना माझ्या रिलेशनशिप बद्दल सांगितले तर ते मला जिवंत गाडतील. फक्त तुच आहेस जी माझी परिस्थिती त्यांना समजावून सांगू शकते. प्लीज, दी," अंशिकाने अभिराचा हात धरून विनंती केली.


"ठीक आहे. मी त्यांच्याशी बोलते. तु काळजी करू नकोस." अभिरा ने अंशिकाला आश्वासन देत उत्तर दिले.

"थॅंक्यु.... थॅंक्यु......दी.....उम्मा......आय लव्ह यू," अंशिकाने उत्साहाने अभिराच्या गालावर चुंबन घेतले.

अभिरा अंशिकाचा बालिश वागणं पाहून हसली.

अंशिका आणि अभिरा बोलतच होत्या तेव्हाच त्यांच्या वहिनी रूमच्या बाहेर येऊन उभ्या राहिल्या...

“बरं अंशु, या दोन सुंदरी कोण आहेत?"अभिराने त्यांच्याकडे बघून हसत विचारले.

"अरे देवा, आता मला या दोन कुत्र्यांचीही ओळख करून द्यावी लागेल का?"अंशिका मनातल्या मनात कुजबुजली आणि मग त्यांना बघून तिने डोळे मिटून चेहऱ्यावर खोटे हसू आणून म्हणाली, "एक अर्णव दादाची बायको अदिती वहिनी आणि दुसरी अर्जुन दादाची बायको आरोही आहे.

त्या दोघींनी ही होकारार्थी मान हलवली.

"वहिनी, प्लीज आत याना."अभिरा त्यांना नम्रपणे नमस्कार करत म्हणाली.

"अभिरा, खरंच तू खूप नशीबवान आहेस की तुला असा श्रीमंत नवरा मिळाला," अदिती अभिराच्या शेजारी बसून तिच्या रूपाकडे लोभस नजरेने पाहत म्हणाली.

आरोही अभिराच्या महागड्या नेकलेसला हात लावत म्हणाली, "खूप महागडा दिसतोय.असा हार माझ्या कडे ही असावा अशी माझी इच्छा आहे."

"का नाही वहिनी? चला शॉपिंगला जाऊया. मला नेमका तोच हार मिळणार नसला तरी मी तुम्हाला तसंच काहीतरी विकत घेऊन देईन,"अभिरा हसत हसत म्हणाली.

"भिक्कारड्या कुठल्या!"तुम्हाला पैशाशिवाय काहीच दिसत नाही, बरोबर' अंशिकाने टोमणा मारला आणि त्या दोघांनी तिच्याकडे मारेकरी नजरेने पाहिले पण अंशिकाने स्पष्टपणे त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.

त्यांच्यातल्या तणावाची जाणीव ठेऊन अभिरा उत्साहाने अंशिकाच्या खांद्याला हात लावत म्हणाली, "अंशु तु पण आमच्यासोबत का येत नाही? मी तुझ्यासोबत बाहेर जाऊन अनेक वर्षे झाली आहेत. चल शॉपिंगला जाऊ आणि मग एकत्र चित्रपट देखील पाहु. तुझ्या भाषेत इंग्लिश मध्ये म्हणायचे झाले तर,"Let's have some girl time together."

"हे देवा, आता दी ला कसं सांगू की मला या दोन कुत्र्यांसोबत कुठेही जायचं नाही? पण आता नाही सुध्दा म्हणता येणार नाही."अंशिकाने वर पाहिलं आणि मनातल्या मनात स्वतःशीच कुरकुरली. मग तिने तिच्या बहिणीच्या उत्तेजित डोळ्यांकडे पाहिलं, ज्यामुळे तिला विरोध करता आला नाही आणि तिने चेहऱ्यावर हसू आणून होकार दिला.

अभिराचा चेहरा अंशिकाने हो म्हणताच आनंदाने उजळला.

"चल मजा करूया आणि वर्धनला फिल्म थेटर मध्ये यायला सांगुया. बघूया तुझी निवड," अभिरा अंशिकाच्या कानात कुजबुजली.

अंशिका ने लाजून मान खाली घातली.

काहीच वेळाने त्या खरेदीला गेल्या !सर्व शॉपिंग करून अंशिका, अभिरा आणि त्यांच्या वहिनी चित्रपट पाहायला गेल्या.अंशिका तिच्या वहिनींच्या वागण्याने चिडली होती.कारण त्यांनी अक्षरशः अख्खा शॉपिंग मॉल विकत घेतला होता आणि अर्थातच त्यांनी हे सर्व अभिराच्या पैशाने खरेदी केली होती. जेव्हा जेव्हा तिच्या वहिनी अभिराकडे पैसे मागायच्या तेव्हा अंशिकाला लाज वाटायची. अंशिका तिच्या मनात विचार करत होती की कोणी एवढं वाईट कसं वागू शकतं!

तासाभराने थिएटरमधून बाहेर पडताना अभिरा अंशिकाच्या कानात कुजबुजली, "अंशु ऐक तु वर्धनला जवळच्या कॅफेत यायला सांग."

"हम्म... पण अदिती वहिनी आणि आरोही वहिनीचं काय? जर त्यांना माझ्या आणि वर्धनबद्दल कळले तर हे लोकलमध्ये पसरायला एक मिनिटे ही लागणार नाहीत. त्या ना बीबीसीच्या बातम्यांपेक्षा वाईट आहेत," अंशिकाने तिला उत्तर दिले.

अभिरा आणि अंशिका या गोष्टीवर जोर जोराने हसल्या आणि मग त्यांनी त्याच्या वहिनींकडे पाहिले ज्या कंटाळलेल्या दिसत होत्या आणि सध्या त्यांनी काही क्षणांपूर्वी विकत घेतलेल्या दागिन्याबद्दल बोलण्यात व्यस्त होत्या.

"अंशु काळजी करू नकोस. तू फक्त वर्धनला फोन कर. मी त्यांना सांभाळून घेईन."अभिराने अंशिकाला आश्वासक हसत उत्तर दिले.

अंशिकाने होकारार्थी मान हलवली आणि त्यांच्या पासुन थोडं लांब जाऊन तिने वर्धनला कॉल केला.अखेर काही रिंग झाल्यावर वर्धनने कॉल रिसिव्ह केला.

"बायको मला सांग. अचानक, तुला माझी आठवण कशी आली," वर्धनने त्याच्या खोडकर आवाजात विचारले.

"हे खुशामत करणारे शब्द थांबवा आणि माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका. उम्म...खरं तर माझी मोठी बहीण गोव्याहुन परतली आणि मी तिला पप्पा आणि माझ्या भावांना आमच्या नात्याबद्दल पटवून देण्याची विनंती केली आहे.पण, त्याआधी तिला तुला भेटायचे आहे."अंशिकाने गंभीर आवाजात उत्तर दिले.

"खरंच! तुझी मोठी बहीण! मग मला स्वतःला तिच्यासमोर नम्रपणे सादर करावं लागेल, बरोबर? उम्म.... मी कोणता शर्ट घालू? काळा किंवा निळा. तिला मी आवडलो नाही आणि नकार दिला तर काय? ...................." वर्धन अधीरतेने कुरकुर करू लागला.

अंशिकाला त्याचा घाबरलेला आवाज ऐकून आपले हसू आवरता आले नाही आणि तिने हसत हसत उत्तर दिले,"मिस्टर भोईर, तुम्ही ना निळ्या रंगाचा शर्ट घाला. त्यात तुम्ही खूप हॉट दिसता."

"इतकं हॉट आहे की तुझी सुंदरता विरघळून जाते.......... वर्धन तिच्याशी खोडकर बोलायचा प्रयत्न करतच होता तितक्यातच...

अंशिका वर्धनशी बोलण्यात इतकी मग्न झाली होती की ती कुठे चाललीय ते तिच्या लक्षातच आले नाही आणि ती जाऊन मुख्य रस्त्याच्या मधोमध चालू लागली.तेवढ्यात एक कार ज्याचे ब्रेक फेल झाले होते, ती तिच्या दिशेने भरधाव वेगाने येऊ लागली.अंशिकाने मागे वळून पाहिलं तर ड्रायव्हरने वारंवार हॉन वाजवायला सुरुवात केली.गाडी भरधाव वेगात आपल्याच दिशेने येत असल्याचे पाहून तिच्या चेहऱ्यावर एक भयानक भाव उमटले.

"अंशु!!!!! एक मोठा आवाज संपूर्ण परिसरात गुंजला आणि त्यानंतर सर्व काही संपलं.

अंशिकाने जमिनीवर पडून तिची कोपर आणि गुडघे खाजवले. अभिराने तिला दिलेल्या धक्क्यानंतर तिचा फोन कुठे उडून गेला हे ही तिला माहीत नाही. सर्व काही इतक्या लवकर घडले की अंशिका काही काळ गोंधळून गेली आणि तिने आपले डोके रस्त्याकडे वळवले तशी तिच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी निघाली. अंशिकाला तिची बहीण अभिरा स्वतःच्या रक्तात माखलेली दिसली. आपल्या बहिणीला असे पाहणे तिला सहन झाले नाही.

“दी….” बहिणीचे गतिहीन डोळे आणि निर्जीव शरीर पाहून अंशिकाच्या डोळ्यातुन पाणी आले आणि ती जोराने ओरडली.

_______________

अभिराच्या मृत्यूला आज दोन दिवस उलटून गेले होत आणि संपूर्ण पाटील कुटुंब दुःखात बुडालेले होते विशेषतः, अंशिका.

अंशिकाला वाचवताना अभिराचा मृत्यू झाल्याची माहिती अदिती आणि आरोहीने कुटुंबातील इतर सदस्यांना दिली.आता सर्वांनी अधिराच्या मृत्यूसाठी अंशिकाला जबाबदार ठरवायला सुरुवात केली होती. ते अंशिकाला वेळोवेळी टोमणे मारू लागे आणि नंतर तिला दोषी ठरवू लागले. तिने सर्वांना समजावण्याचा प्रयत्न केला की हा अपघात आहे पण कोणीही तिचे ऐकायला तयार नव्हते. सर्वांच्या आरोपामुळे तिने आपल्या बहिणीच्या मृत्यूला तीच जबाबदार असल्याचे मान्य केले.

अभिराच्या मृत्यूनंतर रूद्रांश पूर्णपणे वेडा झाला होता. अभिरा आता राहिली नाही ही बातमी त्याला कळताच त्याचा आपल्या कानावर विश्वास बसेनासा झाला होता. अभिराचा मृतदेह पाहून त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. गुडघ्यावर पडून तो एखाद्या मुलासारखा तिच्या निर्जीव शरीराला मिठी मारून ओरडत होता रडत होता. जगण्याची आशाच हरवून बसल्यासारखं त्याला वाटत होतं.त्याचे मन दुःखात इतके बुडाले होते की त्याला त्याच्या मुलांचाही विसर पडला होता.

रुद्रांश इतका दुःखी होता की तो अभिराच्या अंत्यसंस्कारानंतरही घरी परतला नाही.तो मागेच राहिला होता, तिच्या जळत्या मृतदेहाशेजारी! तो तिचे नाव रडत रडत घेत होता आणि त्याला असे एकटे सोडू नकोस अशी विनवणी करत होता.ती कधीच परत येणार नाही यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता.अभिराच्या भावांनी त्याला घरी आणण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने नकार दिला. अभिराच्या मृत्यूनंतर तो स्मशानभूमीजवळ पडून दिवस काढत होता.

या अचानक झालेल्या अपघाताचा सर्वात मोठा बळी दुसरा कोणी नसून अभिराची निरागस मुले झाली होती.आई कुठे गेली आणि प्रत्येकजण सतत का रडत असतो असा प्रश्न अंशाला पडला होता. त्याने त्याच्या वडिलांचा शोध घेतला पण रुद्रांश त्याच्याच दु:खात हरवला होता.मायरा बद्दल बोलायचं झालं तर गरीब मुलगी आईसाठी सतत रडायची! या गोष्टीशी नकळत की तिची आई या जगात कधीच परत येणार नाही.

आता समस्या वाढली होती. कारण अंश आणि मायराने कोणालाही हात लावू देण्यास नकार दिला होता. अंशिकाशिवाय ते कोणाच्याही जवळ जात नव्हते. अंश जवळ गेल्यावर तो सगळ्यांना चावत होता आणि मायरा फक्त तिला मिठी मारली की रडायची.

या क्षणी अंश इकडे तिकडे उड्या मारत त्याच्या आईसाठी रडत होता आणि आस्था त्याला खायला घालण्याचा खूप प्रयत्न करत होती पण तो तिला कठीण वेळ देत होता. जेवणाचे ताट घेऊन तिला त्याच्यामागे धावुन धावुन जवळपास एक तास झाला होता.

"बस माझं काम झालं. मी आता त्याला हाताळू शकत नाही.त्याच्या मागे धावून धावून मी दमली आहे," आस्था जेवणाचं ताट डायनिंग टेबलवर ठेवत ओरडली.तितक्यातच...

तिची सासू दयाळूपणे म्हणाली,"आस्था बाळा, रागावू नकोस. त्या गरीब मुलाच्याही भावना समजून घेण्याचा प्रयत्न कर."

"तुम्हाला एवढीच काळजी वाटत असेल ना तर जा आणि त्याला खायला द्या. माझं झालं," आस्थाने तिच्या सासूबाईंना निराश करत उद्धटपणे उत्तर दिलं आणि तिथुन निघुन गेली.

अंशिकाची आई रात्रीने जेवणाचे ताट घेतले आणि अभिरा आणि तिची मुले राहत असलेल्या रूमकडे निघाली.अंशचा त्रास सहन करण्यासाठी तिने स्वतःला तयार केले होते पण ती रूममध्ये येण्यापूर्वीच एका सुंदर आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या दृश्याने तिचे लक्ष वेधून घेतले.तिने पाहिले की अंश अंशिकाच्या मांडीवर बसून अन्न खात होता आणि ती त्याला जेवन खाऊ घालत होती.

"मावशी, मम्मा कुठे आहे?"अंश ने निरागसपणे अन्न चघळत अंशिकाला विचारले.

"ती देवदूतांना भेटायला गेली आहे."आपले अश्रू आवरत अंशिकाने प्रेमाने उत्तर दिले.

"मग मम्मा कधी परत येईल? मला तिची आठवण येत आहे," अंशने खाली बघत प्रश्न विचारले.

यावेळी अंशिकाच्या छातीवर अपराधीपणाने अक्षरशः वार केलं.

"ती लवकरच परत येईल पण तोपर्यंत तिने मला तुझी आणि मायुची काळजी घेण्यास सांगितले."अंशच्या डोक्याचे चुंबन घेत अंशिकाने हळूवारपणे उत्तर दिले."

"मावशी पण डॅडाची काळजी कोण घेणार? मम्मा म्हणायची की डॅडा पण आमच्यासारखेच आहेत. त्यांनाही त्यांची काळजी हवी आहे.डॅडाची काळजी घ्यायला मम्मा ने सांगितलं ना?"

अंशच्या प्रश्नांमुळे अंशिकाच्या छातीत धडधड जाणवली आणि आता त्याला काय उत्तर द्यावे हे तिला सुचेनासे झाले."तिची लाळ घबराटपणे गिळत, तिने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले की तिच्या पालकांनी त्यांचे संभाषण ऐकले आहे.

रात्री त्यांचे संभाषण ऐकतच होती तेव्हा अंशिकाचे वडील आकाशही तिथे आले आणि तिच्यात सामील झाले.

अचानक मायरा जोरजोरात रडू लागली आणि अंशिकाने एक सेकंदही वाया न घालवता अंशला खुर्चीवर बसवले आणि मायरा जवळ जाऊन तिला प्रेमाने उचलून घेतले आणि मायराला थिरकायला सुरुवात केली आणि प्रेमाने म्हणाली ,"श्श....श्श्....बेबी.... माझ्या मायुला काय झाले? मासी इथे आहे. तुला कोणीही इजा करणार नाही. तू घाबरलीस का? रडू नकोस....ऑ....श्श...श्श्श........

मायराचे डोके आपल्या खांद्यावर ठेवून ती इकडे तिकडे संपूर्ण रुम फिरू लागली तेव्हाच अंशने तिच्या कंबरेला पुढे येऊन मिठी मारली.तिने त्याला उचलले आणि तो माकडाच्या बाळासारखा तिला चिकटून राहिला. अंशिका त्यांची काळजी स्वतःची मुले असल्याप्रमाणे घेत होती.

हे मनोहारी दृश्य पाहून आकाशसोबतच रात्रीचे डोळे ही पाणावले.

"तुम्ही सुद्धा माझ्यासारखाच विचार करत आहात का?" रात्रीने अंशिकावर लक्ष ठेवून आकाशला प्रश्न विचारला.

"मी रूद्रांशशी बोलेन."आकाशने डोके हलवत उत्तर दिले.

******
क्रमशः 
By'vivan'