"तुला तर चांगलंच माहीत आहे की मी तुझ्याशी का लग्न केलं?" त्याने तिला उद्धटपणे विचारले.
तिने आपल्या अश्रूवर नियंत्रण ठेवत उत्तर दिले, "हो, तुमच्या मुलांसाठी."
तो ओरडुन म्हणाला, "माझ्या मुलांबाबत तुझ्याकडून काही ही निष्काळजीपणा दिसला तर माझ्यावर विश्वास ठेव तुला माझी सर्वात वाईट बाजू दिसेल."
त्याच्या ओरडण्याला घबरून तिच्या तोंडातून हडबडत फक्त एवढेच शब्द बाहेर पडले, "ह... होय, मी तुम्हाला तक्रार करण्याची एकही संधी देणार नाही."
त्याच्या ओठांवर मात्र तिच्या घाबरलेल्या तोंडाकडे पाहुन समाधानी हसू उमटले आणि आधीच घायाळ झालेल्या तिच्या हृदयावर वार करत तो पुन्हा म्हणाला, "माझ्या बायकोने माझ्या हृदयात जी जागा मिळवली आहे ती मी तुला कधीच देऊ शकत नाही. तू फक्त तिचा पर्याय आहेस."
_______________
(कथेतील मुख्य पात्र)
अंशिका आकाश पाटील
वय वर्षे २२
अनमॅरीड
उंची ५.७ इंच
शरिराचा रंग गोरा, डोळ्यांचा रंग ब्राऊनिष, केसांचा रंग हल्का काला आणि ब्राऊन जी सध्या कॉल सेंटरमध्ये काम करत आहे.
जन्म स्थळ- गोरेगाव मुंबई.
__________
रूद्रांश अभिमन्यू म्हात्रे
वय वर्षे ३०
मॅरीडउंची
५.९ इंच
शरिराचा रंग गोरा, केसांचा रंग काळा, डोळ्यांचा रंग ब्राऊनिष शरिराला शोभेल इतकीच बॉडी. जो गोवा शहरातील सर्वात श्रीमंत बिझनेस मॅन पैंकी एक आहे.
जन्म स्थळ खारघर नवी मुंबई.
___________
अभिरा रूद्रांश म्हात्रे
वय वर्षे २७.
मॅरिड
उंची 4.9 इंच
शरीराचा रंग गोरा, डोळ्याचा रंग गडद तपकिरी, केसांचा रंग हलका तपकिरी जी सध्या हाऊस वाईफ आहे.
जन्म स्थळ - गोरेगाव मुंबई.
___________
अंश रूद्रांश म्हात्रे
अडीच वर्षांचा.
वडील- रूद्रांश अभिमन्यू म्हात्रे
आई- अभिरा रूद्रांश म्हात्रे.
____________
मायरा रूद्रांश म्हात्रे
वय 3 महिने
वडील- रुद्रांश अभिमन्यू म्हात्रे.
आई- अभिरा रुद्रांश म्हात्रे.
____________
"तू तुझ्या पालकांना आपल्या बद्दल कधी सांगणार आहेस?" त्याने चिडून उठत असताना विचारलं.
"लवकरच. मी फक्त त्यांना सगळं काही सांगण्याची संधी शोधत आहे." तिने मान खाली घालून लगेच उत्तर दिलं.
"चान्स ! हं... मी असं थांबू शकत नाही. खूप उशीर झाला आहे. तुला माझ्याशी लग्न करायचं नाही का?" तो तिच्या चेहऱ्यावर ओरडुन म्हणाला.
त्याचा संयम सुटण्यापूर्वी ती त्याला शांत करण्यासाठी पटकन उठून उभी राहिली. आणि तिने त्याचा हात धरून हळूवारपणे उत्तर दिले, "वर्धन, प्लीज. समजून घेण्याचा प्रयत्न कर. माझी फॅमिली किती रूढिवादी आहे हे तर तुला चांगलच माहीत आहे. त्यांना लव्ह मॅरेज ही कल्पना अजिबात आवडणार नाही. खरं तर माझे भाऊ आणि पप्पा लव्ह मॅरेजच्या पूर्णपणे विरोधात आहेत. त्यात त्यांना कन्व्हेन्स करण्यासाठी मला थोडासा वेळ हवा आहे. प्लीज... प्लीज... मला आणखी काही दिवस दे."
"ओके, तुला जे करायचं ते कर," वर्धन चिडून म्हणाला आणि तलावाच्या अगदी जवळ असलेल्या बाकावर बसला.
__________________
वर्धन सहदेव भोईर
वय वर्षे २५.
उंची ५ फुट ९ इंच.
शरिराचा रंग गोरा, डोळ्यांचा रंग ब्राऊनिष, केसांचा रंग काळा आणि शरीराला शोभून दिसेल इतकीच बॉडी.
जन्म स्थळ - गोरेगाव मुंबई.
___________________
जो अंशिकाचा बॉयफ्रेंड आहे आणि ते दोघे हायस्कूल पासून रिलेशनशिप मध्ये होते आणि अलीकडेच पदवीनंतर तो त्याच्या वडिलांच्या बिझनेसमध्ये सामील झाला होता.
अंशिका ने पदवी घेतल्यानंतर ती येथील मुंबई मधील कॉल सेंटरमध्ये काम करू लागली. तिच्या शैक्षणिक निकालाच्या आधारे तिला यापेक्षा चांगली जॉब मिळाली असती पण ती ते करू शकली नाही.
"अंशु, मी तुझ्यासाठी सर्व काही सोडायला तयार आहे. मला तुझ्याशिवाय कशाचीही गरज नाहीये. मला माझ्या वडिलांच्या अब्जावधी पैशांच्या बिझनेसची ही गरज नाही. मला फक्त तू आणि तुच हवी आहेस. चल इथून पळून जाऊ आणि एक नवीन प्रवास सुरू करू. "वर्धन भावनिकपणे अंशिकाचा हात धरून म्हणाला.
"वर्धन, प्लीज. माझ्यावर थोडा विश्वास ठेव. मी कसेही करून माझ्या फॅमिलीला कन्व्हेन्स करेन. पळून गेल्याने आपल्याला आपल्या कुटुंबाच्या निराशेशिवाय काहीही मिळणार नाही. आपण आपल्या पालकांना कधीही नाराज करू शकत नाही. मी तुला खात्री देते की मी काही ना काही तरी मार्ग शोधून काढेनच." अंशिकाने वर्धनच्या गालाला हात लावून उत्तर दिलं.
"बस लवकर कर, अंशु. मी आता तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मला आता तुला असे भेटायचे नाही. मला तू माझ्या घरात, माझ्या मिठीत माझी बायको म्हणून हवी आहेस. मी खुप वाट पाहिलेली आहे, "वर्धन अंशिकाला त्याच्या जवळ ओढून म्हणाला.
अंशिका ने तिचे डोके त्याच्या खांद्यावर ठेवले. तसं वर्धन ने अंशिकाचा हात हातात घेऊन त्यांचे चुंबन घेतले आणि अंशिकाच्या तोंडातून एक खळखळ उडाली. तो फक्त तिच्यावरच खूप प्रेम करत होता. जसे ती त्याच्यावर प्रेम करत होती. ती त्याच्याशिवाय तिच्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नव्हती. त्याच्यासारखा व्यक्ती तिच्या आयुष्यात आला म्हणून अंशिका स्वतःला भाग्यवान समजत होती. काहीवेळा तो तिच्याशी खूप उद्धटपणे वागला तरी ती बरी होती.
वर्धनशी काही वेळ बोलून झाल्यावर अंशिका तिच्या घरी परतली आणि तिच्या अपेक्षेप्रमाणे घडलं. तिच्या मोठ्या वहिनी तिला लेक्चर देऊ लागल्या. ती लवकरात लवकर लग्न करावे अशी तिच्या कुटुंबाची इच्छा आहे पण ती अजून सहमत नाही. कारण की तिने ठरवलं होतं की ती लग्न करेल तर वर्धनशीच करेल. इतर कुणाशीही नाही.
अंशिकाच्या कुटुंबात ऐकुन 12 सदस्य आहेत. तिचे आई- वडील तीन भाऊ आणि त्यांच्या बायका आणि तिच्यासह चार बहिणी. तिच्या मोठ्या बहिणीप्रमाणेच तिचे भाऊही मॅरिड होते. फक्त ती आणि तिच्या दोन बहिणी अजून अनमॅरीड आहेत.
तिचे वडील आधी सिडकोत मॅनेजरच्या पदावर होते. कारण तिच्या भावांचा एकत्रित व्यवसाय होता म्हणून तिच्या वडिलांनी ती नोकरी सोडली. ती मध्यमवर्गीय कुटुंबातली असली तरी गोरेगावात त्यांचा स्वतःचा बंगला होता आणि काही जमीन आणि इमारतीही होत्या.
"ही बघा... आली महाराणी, 22 वर्षांची झाली. आता तरी या महाराणीचे लग्न लावून द्या. अजून किती दिवस इथे फुकटची भाकरी तोडणार?" अंशिकाच्या वहिनीने अंशिकाला लिव्हिंग रूम मध्ये येत असल्याचे पाहून टोमणे मारले.
नुकत्याच लिव्हिंग रूममध्ये मध्ये पाऊल ठेवलेल्या अंशिकाने आपल्या वहिनीचे टोमणे गपचूप गिळुन घेतले. कारण तिचा अपमान करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. म्हणून तिने तिच्या वहिनीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि पायऱ्यांकडे जाऊ लागली. तेवढ्यातच...
तिच्या दुसऱ्या वहिनीने चेष्टा केली, "भावांच्या कमाईवर अवलंबून राहणे चांगले वाटते, नाही का अंशिका?"
अंशिकाने डोळे बंद केले आणि तिचे ओठ चावुन स्वतः ला शांत केले आणि त्यांना एकही शब्द न बोलता ती पायऱ्या चढून वरच्या मजल्यावर तिच्या बेडरूमकडे गेली. कारण तिला माहित होतं की त्या दोन्ही अशिक्षित कुत्र्यांशी वाद घालण्यात काही फायदा नाही? एक 10वी पास आणि दुसरी 12वी फेल. दोघींनाही तिच्या तिसऱ्या वहिनीपेक्षा प्रत्येक बाबतीत ढवळाढवळ करायला आवडत असे. तिची तिसरी वहिनी जी एक छान व्यक्ती आहे आणि अंशिकाला ती खूप आवडते.
काही वेळातच अंशिका फ्रेश झाली आणि कपडे बदलून तिच्या बेडरूमच्या बाहेर पडली. तेव्हाच तिची नजर तिच्या तिसऱ्या वहिनी आस्था वर पडली जी गेस्ट रूमची साफ सफाई करत होती." वहिनी ही रूम का साफ करत आहे? कोणी आम्हाला भेटायला येत आहे का? अंशिका मनातल्या मनात विचार करत गेस्ट रूमजवळ पोहोचली आणि तिने उत्साहाने विचारले,"कोणी येत आहे का वहिनी? अचानक तुम्ही गेस्ट रूम का साफ करताय?"
"अरे अंशु तुला माहित नाही का? अभिरा आणि तिची फॅमिली आपल्याला भेटायला येत आहेत."आस्था ने हसत उत्तर दिले.
"खरंच! अभिरा दि ! कधी?" अंशिकाने उत्साहाने विचारले.
"या आठवड्यात," आस्था ने आरसा साफ करताना उत्तर दिले!
"हे देवा! दि येत आहे! काही वेळानंतर. माझ्या दी ला भेटण्यासाठी मी किती उत्साहित आहे हे मी व्यक्त करू शकत नाही," अंशिका ने आंनदी होऊन मनातल्या मनात विचार केला.
________________________
गोवा...
"मम्मा, मला उचलुन घे," अंशने त्याची मम्मा अभिरासमोर उडी मारली जी सध्या तिच्या 3 महिन्याची मुलगी मायरा हिला थोपटण्यात व्यस्त होती.
"बस काही मिनिट, बाळा. मम्माला ना आधी तुझ्या बहिणीला पाळण्यात ठेवू दे. मग, फक्त मम्मा आणि मुलगा, ओके?" अभिरा ने प्रेमाने उत्तर दिले.
"लवकर कर, मम्मा," अंश त्याच्या मम्माचा ड्रेस घट्ट पकडून म्हणाला.
काही क्षणांनंतर, मायरा तिच्या मम्माच्या खांद्यावर झोपली आणि अभिराने तिला पाळण्यात झोपवले. ज्या क्षणी मायराला समजले की ती आता तिच्या मम्माच्या मिठीत नाही, ती जोराने रडू लागली.
"श्श........श्श..... बेबी, मम्मा इथेच आहे रडू नकोस आणि घाबरू नकोस," अभिराने मायराच्या कानात कुजबुज केली पण चिडलेली मुलगी रडतच राहिली.
जेव्हा अंशने त्याच्या मम्माला आणखी कठीण वेळ देण्याचे ठरवले तेव्हा अभिरा आधीच मायराला हाताळण्यासाठी धडपडत करत होती.
"मम्मा मला उचल. तू मला प्रॉमिस केलं आहेस." अंश रागाने म्हणाला.
"बाळा, मला अजून काही मिनिटे दे," अभिराने प्रेमाने उत्तर दिले पण तिच्या हट्टी मुलाला त्याच्या मम्माची परिस्थिती समजत नव्हती.
तिचा ड्रेस ओढताना तोही जोरजोरात रडू लागला. मोलकरणींनी ही त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
"ऑ.... स्वीटु, प्लीज रडू नकोस. मम्माला माफ कर" अभिराने विनंती केली पण रागाच्या भरात अंशने तिचा हात चावला.
अभिरा तिच्या मुलांना हाताळण्यासाठी धडपड करतच होती तेव्हाच 30 - ३१ च्या आसपासितील एक माणूस बेडरूम मध्ये आला. त्याने काळ्या रंगाचा हाई नेक स्वेटर टाईप टीशर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातली होती ज्यांने त्याचे ५ फुट ९ इंच मोठे शरीर उत्तम प्रकारे झाकत होता. समोरचे दृश्य पाहून त्याचे डोळे आपुलकीने चमकले. त्याच्या आवडत्या त्रिकुटाकडे पाहून तो हसला.
अभिराने आपल्या नवऱ्याकडे बघितलं आणि तिचे ओठ हळवुन ती म्हणाली,"तुम्ही हसत आहात ! मदत करण्याऐवजी हसत आहात ! सिरियसली, रुद्रांश."
"सॉरी माझ्या राणी. पण मला पुन्हा शिव्या घालू नकोस प्लीज," रूद्रांश म्हणाला आणि अजूनही रडत असलेल्या अंशला त्याने उचलून घेतलं आणि अंशचे अश्रू पुसून तो म्हणाला, "शु.., डॅडी आहेत ना तुझ्या जवळ. सांग बरं तू का रडत होतास? तुझ्यावर कुणी ओरडत होता का, हं!! श्श्श श्श...."
काही वेळाने मुले त्यांच्या पालकांच्या खांद्यावर झोपी गेली तेव्हाच रूद्रांशने अभिरा त्याच्या मिठीत ओढले आणि तिच्या खांद्यावर डोके ठेवले त्यावर अभिरा हसली.
"मी तुम्हाला आधीच म्हटली होती की एक पुरेसं आहे, पण नाही, तुम्हाला दुसरं देखिल हवं होतं मग आता करा त्यांचा सामना. "माझे तुमच्यावर नीट प्रेम करून खुप दिवस झाले. तुम्हाला माहित आहे मला तुमची किती आठवण येते," अभिरा ने तिचे ओठ हलवत तक्रार केली.
"हम्म.... तु मला मिस करत होतीस. बरं सांग तू कोणता भाग मिस करत होतीस?" रुद्रांशने खोडकर हसत विचारले.
"तुम्ही दोन मुलांचे बाप झाला आहात पण वासना अजून तशीच आहे," अभिराने खेळकरपणे रूद्रांशच्या खांद्यावर थाप मारत उत्तर दिले.
"तू आत्ता काय बोललीस ते मला कळत नाही. मी अजूनही तुझी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहे." रूद्रांश मान हलवत म्हणाला.
"अरे अरे, तुम्ही दोन मुलांचे बाप नक्कीच आहात, पण याचा अर्थ तुम्ही दूध पिणारे बाळ नाहीत ज्याला माझी भाषा कळत नाही." अभिरा तोंड फुगवून म्हणाली.
"ओके. बरं तू अजून सामान पॅक केला नाहीस? आपली फ्लाइट २ दिवसांनी आहे," रूद्रांशने अभिराचा सामान शोधत विचारले.
अभिराने ज्वलंत नजरेनं रूद्रांशकडे पाहिलं.
"हो, मी समजू शकतो. मुलांना हाताळल्यानंतर तुला पॅक करायला वेळ मिळाला नाही. मी फक्त विचारत होतो. या गरीब माणसाला तुझ्या जळत्या डोळ्यांनी घाबरवू नको प्लीज "रुद्रांश भुंकी गिळताना म्हणाला.
"आहा... आलात ना तुम्ही तुमच्या लाईनवर. बरं यावेळी मी ना माझी बहिण अंशिकाला माझ्यासोबत आणण्याचा विचार करत आहे. ती मला खूप मदत करेल कारण मुलांना मोलकरणीसोबत राहायला आवडत नाही," अधिरा म्हणाली आणि तिने मायराला पाळण्यात बसवले आणि रूद्रांश ने होकारार्थी मान हलवून अंशला बेडवर झोपवले.
अभिरा काहीतरी बोलणार होती... तितक्यातच....
रुद्रांश तिला आपल्या मिठीत ओढत कुजबुजला. "तू मला सांगितले नाहीस की माझ्यात काय कमी होती?"
"ओ असं आहे का? मग तुमच्यात काय कमी आहे आणि काय नाही हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहीत आहे नाही का? अभिरा मान खाली घालत लाजून म्हणाली आणि बेडरूम मधुन बाहेर जाऊ लागली. तितक्यातच...
रुदांशने तिचा हात धरुन तिला त्याच्या कडे ओढलं आणि तिला आपल्या बाहूत उचलून बेडजवळ नेले.
_______________________
क्रमशः ©️
'By'vivan'