"हो मॉम... संध्याकाळी .... नक्कीच..."प्रणिती सकाळीच कॉफी करताना मॉम सोबत फोन वर बोलत होती.... कि पोटाभोवती त्याच्या हाताचा विळखा पडला....
तिचा श्वास घश्यातच अडकला.....
"अ...हो.."तिने फोन बंद करत त्याला हाक मारली....
"डोन्ट worry maid बाहेर गेल्यात..."त्याने तिच्या ओल्या केसातून येणारा सुगंध भरून घेतला....
"क ..कॉफी ...."ती कशीबशी त्याच्या पकडीतून सुटायचा प्रयत्न करत होती ..... पण त्याच्या त्या भल्यामोठ्या हट्टापुढे तीच काय चालणार होत....??
ऋग्वेद ने तिला फिरवत सरळ उभं केलं... तिची नजर लाजून खालीच होती ......
"बेस्ट लक ..."त्याने हनुवटी वर करत तिच्या डोळ्यात बघितलं... तस प्रणिती हसली...
आज ऑफिस मध्ये इंस्पेक्टिव होत... तो प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये जाऊन स्वतः सगळं काम चेक करायचा... ह्या दरम्यान बरेच एम्प्लॉई त्याने restricate पण केले होते.....
"thank you ..."प्रणिती...
"आह ... असं नकोय...."त्याने गाल पुढे केला....
"अ..हो ..."प्रणिती
"लवकर नीती... नाहीतर मग...."तो पुढे बोलेल त्याआधी च तिने पटकन त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि मागे झाली....
"असं...??..."त्याने भुवया वर केल्या....
"डोन्ट वरी.... मी शिकवेन तुला..."त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले ... तस प्रणतीने डोळे बंद करत .... त्याच्या पाठीवर हात रोवले ..... गालावर फिरणारे ओठ हळूहळू तिच्या मानेवर आले.... तस तिचे श्वास वाढले .... मानेवर जोरात किस करत तो मागे झाला.... पण ती अजून डोळे बंद करून उभीच होती......
"आपण उरलेलं रात्री continue करूया..."तिच्या कानात आवाज घुमला ... पटकन तिने डोळे उघडले.... तर तो कॉफी चा कप घेऊन बाहेर जाताना दिसला.....
तिने लाजत डोक्यावर हात मारला.... आजची रात्र त्याची bunglow वर शेवटची होती.... महिना कसा गेला ते दोघांनाही समजले नव्हते... दोघेही पूर्णपणे एकमेकात गुंतले होते... पण कोणी अजून तोंडाने मान्य केलं नव्हतं...
प्रणितने ड्रेस सरळ केला... आणि लवकरच बाहेर पडली.... ऑफिसमध्ये जाऊन तिला आधी सगळ्या फाईल्स वैगरे चेक करायच्या होत्या ...
"सगळ ठीक होईल ना प्रणिती ...??.."काव्या हाताची चुळबुळ करत होती..
"तू आधी शांत हो... एवढी घाबरू नको... आपण सगळं काम व्यवस्थित केली ..."प्रणिती ने तिला धीर दिला....
काव्या च्या फोन वर असलेल्या ऑफिस ग्रुप वर सगळ्याचे मेसेज पडत होते... ज्या ज्या डिपार्टमेंट मध्ये inspection झालं तिथले कमित्कमीत ४ एम्प्लॉयी तर फायर झालेच होते.....
पाच मिनिटांत लिफ्ट उघडली गेली.... आणि त्याच्या shoes चा आवाज त्या floor घुमला ... सगळे एम्प्लॉयी उभेच होते....
त्याच्या मागोंमाग प्रियाने श्रुतीकडे बघत काहीतरी इशारा केला.... दोघांनीही डोळे मिचकावले .....
फायनान्स डिपार्टमेंट च्या मिटिंग रम मध्ये सगळे एम्प्लॉयी जमले होते....
श्रुती उभी राहून महिन्याचा सगळं खर्च ... दिल मधून झालेलं प्रॉफिट लॉस ... सगळ्याच प्रेझेन्टेशन देत होती....
"where is the charge sheet of upcoming deals ....? त्याचा आवाज आला .... तस तिथे असलेल्या सगळ्या इम्प्लॉयी च्या कानामागून घामाची धार खाली आली...
"सर , ती file मिसेस प्रणिती कडे दिलेली... पण त्यांनी पूर्ण करून दिली नाही...."श्रुती
ऋग्वेद ची नजर प्रणिती कडे गेली.... पण तिच्या चेहऱ्यावर गोधळ दिसत होता श्रुती आणि प्रिया एकमेकांकडे बघून हसल्या .... आता पुढे काय होणार ते दोघांनाही माहित होत...
"मिसेस प्रणिती ...?.."ऋग्वेद चा रंगीट आवाज आला ....तस प्रणिती उभी राहिली ... तिला चंगळच आठवत तिने सगळी फाईल्स complete करून दिलेल्या....
"मी सगळ्या फाईल्स पूर्ण करून मॅनेजर श्रुती कडे दिलेल्या होत्या.... तुमि हवं तर CCTV चेक करू शकता सर...."प्रणिती ऋग्वेदाच्या नजरेला नजर देत बोलली ....
आणि तिथे असलेल्या सगळ्याच्या शरीरातून भीतीची लहर गेली.... बोस समोर बोलण्याची हिम्मत आतापर्यन्त कोणीही केली नव्हती....
श्रुती चा चेहऱ्यावर बारा वाजले होते... आतापर्यन्त ती स्वतः प्रणिती ला किती ओरडली होती .... पण तिच्या तोंडातून एक अक्षर सुद्धा निघत नव्हता.... आणि आता सरळ बॉसला challenge ....?... खर्च CCTV चेक केले गेले तर तिचा जॉब जाण पक्कच होत....
"सर ... ती खोट बोलतेय .... मी .... इथे चार वर्षांपासून काम करतेय .... आतापर्यन्त अशी चुकी माझ्याकडून झालेली नाहीय...."श्रुती
"I guess श्रुती खर बोलतेय ..."प्रियाने पण तिला दुजोरा दिला....
"CCTV फुटेज लावा ..."ऋग्वेद ने ऑर्डर दिली ... आणि श्रुती चे पाय कापायला लागले....
"फुटेज बघण्याआधी मी chargesheet तयार करून देऊ इच्छिते... जेणेकरून माझ्या कामावर कोणत्याही प्रकारची शंका येऊ नये .... मला फक्त १० मिनिट हवीत..."प्रणिती
"१० मिनिट...??.."तिथे असलेल्या सगळ्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होत.... ऋग्वेद सुद्धा ....
एका महिन्याचा सगळा डेटा एवढ्या लवकर कास कोण करू शकतो...??... तो स्वतः सुद्धा करायला बसला तर कमीतकमी अर्धा तास तरी नक्कीच लागला असता ....
आता सगळ्यांना प्रणिती वर द्या येत होती.... कारण तिने जर सांगितलेलं केलं नाही ... तर श्रुती सोबत तिला सुद्धा punish केलं जाऊ शकत होत....
"okay .... give her laptop ..."ऋग्वेद
प्रणितीने समोर लुप्तपो ठेवण्यात आला.... तस तिची बोट कि बोर्ड वर फिरायला लागली .... तिची स्पीड बघून तिथले सगळेच हैराण झाले .... पण तिला एवढं प्रोफेशनल बघून ऋग्वेद मनातच तिच्यावर खूप proud फील करत होता.. आता इथे कोणी नसत तर नक्कीच त्याने जाऊन तिला मिठीत घेतलं असत.....
प्रिया रंगात श्रुती कडे बघत होती... फक्त तिच्या भरवश्यावर ती एवढे दिवस शांत होती ... आणि आता समोरच दृश्य बघून तीच रक्त गरम होत होत....
"done ..."बरोबर दहाव्या मिनिटाला प्रणितने लॅपटॉप पुढे केला... श्रुती ने एवढा गिळला ....
"मला वाटत मिसेस प्रणितीने स्वतःच सगळं बनवलय तर प्रेझेन्टेशन पण त्यांनीच द्यावं..."प्रिया प्रणितील सगळ्यांसमोर बेइज्जत करण्याचा एक पण चान्स सोडत नव्हती....
"मिसेस प्रणिती ..??.."ऋग्वेद
"sure sir... "प्रणिती ने उठून लॅपटॉप प्रोजेक्टर ला कनेक्ट केला.... तिची प्रेझेन्टेशन देण्याची कला एकदम प्रोफेशनल होती......
तिथे असणारे सगळे मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे बघत होते... ऋग्वेद ला पण शोक लागलेला ... त्याच्या माहिती प्रमाणे प्रणिती ने काही महिन्यापूर्वी MBA complete केलेलं.... मग हे एवढं परफेक्ट ..??..त्याला स्वतःला एवढे स्किल्स यायला एक दोन वर्ष गेलेली ....
तीच प्रेसेंटेशन झालं तस सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या ... कोणाचं लक्ष नाही ते बघून ऋग्वेद पण तिच्याकडे बघत हसला... तस तिच्या चेहऱ्यावर मोठी smile आली...
"मला वाटत मिसेस प्रणिती ने त्याच काम खूप चागल्या पद्धतीने केलेलं आहे .... आता CCTV फुटेज दाखवा...."ऋग्वेद
श्रुतीने केविलवाणी नजर करून प्रिया कडे बघितलं ... पण तिने सुद्धा नाही म्हणून मान हलवली .... तिला चंगळच माहित होत कंपनी च्या कामात समोर कोणीही असूदेत ऋग्वेद कोणताही हलगर्जीपणा करणार नाही,.....
श्रुती च्या केबिन मधली फुटेज बघता बघता ऋग्वेद चा राग वाढत होता.... ती कितीतरी वेळा प्रणित ला ओरडताना दिसत होती... तरी आत आवाज नव्हता म्हणून श्रुती जीवंत होती....
चार दिवसांपूर्वीच्या फुटेज मध्ये श्रुती प्रणिती ने दिलेल्या एका file ला गपचूप purse मध्ये घालून बाहेर नेताना साफ दिसत होते... ते बघून नेताना साफ दिसत होती ... ते बघून सगळेच एम्प्लॉयी श्रुती कडे बघायला लागले....
"तुमाला ह्यावर काही बोलूच आहे का मिस श्रुती...??.."ऋग्वेद च्या वहात प्रचंड राग होता....
"स .... सॉरी सर.... चुकी झाली..... प्लिज मला ह्यावेळी माफ करा... मॅनेजर प्रिया तुम्ही तरी काहीतरी काहीतरी बोला..."श्रुती गयावया कार्याला लागली....
"श्रुती तू केलेलं हे वर्तन कंपनी च्या नियमाच्या विरोघात आहे..."प्रिया ....
"so मिस श्रुती तुम्हाला तुमचं resignantion लेटर मिळून जाईल.... उद्यापासून तुम्ही इथे यायची काही गरज नाही... पुढच्या तीन महिन्याच्या पगार तुमच्या अकाउंट मध्ये जमा होईल ...."ऋग्वेद
"सर नको...प्ली... पुन्हा अशी चुकी होणार नाही..."श्रुती आता त्याच्या पायाकडे बसलेली .... तिला चांगलाच माहित आता तिला दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी जॉब मिळणं कठीण होत...
पण ऋग्वेद चा निर्णय चा निर्णय आतापर्यन्त कधीही बदलला नव्हता.... त्याने गार्ड ला इशारा केला तस ते श्रुती ला बाहेर घेऊन गेले ....
आता पुन्हा तिथे असलेल्या सगळ्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते... नवीन मॅनेजर कोण असणार...??,.... तस तर श्रुती चा assistant म्हणून सागरची छाती मोठी झालेली....
"ह्या पुढे फायनान्स डिपार्टमेंट च्या मॅनेजर ह्या मिसेस प्रणिती असतील..."ऋग्वेद ब्लॅझर नीट करत उठला..... प्रणिती सोबत सगळेच शॉक झाले.... प्रिया ला पण विश्वास बसत नव्हता.... कि ऋग्वेद असा काहीतरी decision घेईल....
"I think तुमच्यापैकी कोणाला काही प्रॉब्लम नसेल..."त्याने सगळ्यावरून नजर फिरवली ... कोणीही काहीच बोलले नाही ... मनात एक राग होताच कि येऊन महिनाच झाला आणि तिला मॅनेजर केलं..??... पण मगाशी तिने केलेल्या कामावरून ती त्या खुर्चीच्या लायक आहे हे सुद्धा सगळ्यांना पटत होत.... सागर आणि प्रिया मात्र रागाने तिच्याकडे बघत होते....
ऋग्वेद बाहेर निघाला... जाता जाता कोणाचं लक्ष नाही ते.. बघून त्याने च्या गळ्यातील ओढणी नीट केली .... पण ते प्रियाने बघितलं च... आता तिच्या मनातल्या आगीने परिसीमा गाठली होती....
प्रणितील त्याचा स्पर्श जाणवला तस ती बावरली ... पण त्याने ओढणी का ओढली म्हणून बघितलं तर तिच्या मानेकडे लाल निशाण पडला होता... तिने लाजून ओढणी नीट केली...
वाचून समीक्षा आणि स्टिकर येउदेत सगळ्याचे
क्रमशः
"कारण मला माझ्या बायको सोबत वेळ घालवायचा होता... तुला काही प्रॉब्लेम ...??.."ऋग्वेद ने तिच्याकडे बघत डोळा मारला...
"म....मला .... भूक लागलीय... प्रणिती ने विषयच बदलला त्याच्या रोमँटिक मोड चालू झाला तर तिच्या पोटात खड्डा पडायचा... "तू बस जा टेबलवर ... आलोच मी घेऊन सगळं..."त्याने हसतच जेवण प्लेट्स मध्ये घ्यायला सुरवात केली प्रणितीमुळे ऋग्वेद आपल्या मूळ स्वभावात पुन्हा येतोय... त्याच्यातला हा बॅटल देईल का त्याच्या नात्याला सुखद वळण.....???.....