"come.... "ऋग्वेद प्रणितीला घेऊन रूम मध्ये आला ..VIP रूम असल्याने ती खूप मोठी होती... तीच लक्ष समोरच्या काचेच्या खिडकीच्या बाहेर असणाऱ्या मोकळ्या lawn कडे गेलं.... आणि ती धावतच गेली....
वरती उघड आकाश आजूबाजूने खेळणारा गार वारा ... ती चेहऱ्यावर हास्य ठेऊन वरती बघत होती.... तेवढयात पोटाभोवती त्याच्या गरम .... राकट .... मर्दानी हाताचा विळखा पडला...
त्या हसऱ्या चेहऱ्यावर लागोपाठ लाजेचा पदर चढला ....
"अ ...हो....."तिने त्याच्या हातावर हात ठेवला....
"ह्म्म्म..."त्याने तिच्या मानेवर चेहरा घुसळत दीर्घ श्वास घेतला.....
"कोणी ,,,, बघेल...."प्रणिती
"हा private area आहे .... इथे आपल्या दोघांशिवाय कोणीच नाहीय .."त्याचा आवाज आणि ते गरम श्वास कानात गेले... आणि तिच्या अंगातून वीज सळसळत गेली...
त्याचा तो स्पर्श वेड लावत होता तील... त्याच तिच्यासोबत असं हीच फिलिंग तिच्या पोटात गुदगुदल्या करून देत होती....
ऋग्वेद ने तिला फिरवत सरळ केलं.... ती लाल झालेला चेहरा लपवत खाली मान घालून होती... त्यांनी बोटांनी तिची हनुवटी वर केली... तस तिने डोळे बंद करून घेतले .... त्याच्याकडे बघायला तिला लाज वाटत होती....
"प्रणिती...."त्याने तिच्या चेहऱ्यावर फुकर मार्ट हाक मारली .... तस डोळे अजूनच आवळले ... ओठ आत घेतले...
त्याला एक क्षण वाटून गेलं ते दबलेले ओठ आपण सोडवावे .... पण त्याने तो विचार झटकला....
"डोळे उघड ना ...." त्याने तिच्या गालावरून हात फिरवला.... त्याचा तो अलवार स्पर्श तिला मोरपीस फिरवल्यासारखा वाटत होता... गुदगुदल्या होत होत्या... बिचकत तिने डोळे उघडले ... तर त्याचा चार्मिंग handsome चेहरा नजरेत आला.....
"किती लाजतेस तू..."त्याचे ओठ थोडे रुंदावले.....
प्रणिती ने नजर झुकवली....
"इथे बसुया....?"त्याने खाली असलेल्या त्या मोकळ्या हिरव्या गवंताकडे बघत विचारलं.... तिने मान हलवली....
दोघेही पाय सोडून रिलॅक्स खाली बसले .... त्याने एका हाताने तिला जवळ घेतलं होत...
"तुला कधी वाटलं नाही मला कारण विचारावं .... मी तुझा राग एवढा का करतो....??.."ऋग्वेद
प्रणिती ने नाही म्हणून मान हलवली ....
"कॉलेज मध्ये असताना ना आमच्या तीन जणांचा ग्रुप होता... मी .... प्रदीप.... आणि प्रिया... खूप मस्ती करायचो आम्ही ... lecture बंक करून बाहेर फिरायला जाणे.... शिक्षकांबरोबर खोड्या करणे .... सगळं करायचो... कॉलेज मध्ये मुलांना हळूहळू समजलं मी कोण आहे.... तस पैशामुळे खूप मुली जवळ यायला बघायला लागल्या ... मला नाही आवडयच ते.... प्रिया माझ्यासोबत लहानापासून होती... आमची मैत्रीण निखळ होती.... आता पण आहे..."त्याने असं सांगितल्यावर प्रणिती ने त्याच्या डोळ्यात बघितलं... तर प्रिया साठी एक वेगळा विश्वास दिसत होता....
"प्रदीप ला एक मुलगी आवडली ... त्या मुलींत सुद्धा त्याला स्वतःच्या जाळ्यात फसवलं.... पण ती त्याच्यासोबत फक्त पैशासाठी होती .... मला जेव्हा समजलं तेव्हा मी खूप प्रयत्न केला त्याला समजावण्याचा .... पण तो तर तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता.... त्याच अभ्यासावर पण दुर्लक्ष व्हायला लागलं .... एक दिवस त्याने त्या मुलीला दुसऱ्या मुलासोबत नको त्या अवस्थेत बघितलं ... आणि त्याने .... sucide ....."ऋग्वेद च्या डोळ्यात पाणी भरलं होत.....
प्रणिती त्याच्या पाठीवरून हात फिरवायला लागली.... आज तिला समजत होत तो नक्की का राग करत होता.. त्याच rude arrogant बाण्यामागचं कारण समजलं होत ....
"माझ्यासमोर त्याने प्राण सोडला... त्या आदिवसापासून तो वेद गायब झाला... "ऋग्वेद तिला मिठी मारून रडायला लागला... आजपर्यंत तिने फक्त त्याला रंगवताना किंवा स्ट्रॉंग अश्याच नजरेने बघितलं होत.... पण त्याची हि बाजू बघून तिचा त्याच्यावर असलेला सगळा राग आपोआप च उडून गेला....
आयुष्यात आपलं जवळच मनीस गमावल्यावर असं होणं स्वाभाविकच होत.....
"अ..हो.. शांत व्हा.... जे झालं ते आपण बदलू नाही ना शकत ... पण आता त्यांनी तुम्हाला रडताना बघितलं तर आवडेल का...???.."प्रणिती
"नीती .... एवढ्या वर्षांनी मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय ... मला सोडून तर नाही ना जाणार तू....??.."नकळत त्याच्या तोडून प्रणिती ऐवजी नीती बाहेर पडलं.... त्याला जाणवलं नाही पण तिला नक्कीच समजल....
"नाही...."तिने त्याच्या गालावरचे पाणी पुसलं .... तस वेद ने पुन्हा तिला मिठी मारली.... ह्यावेळी प्रणिती ने पण त्याच्या पाठीवर हात घट्ट केले ... तस ऋग्वेद ने मिठी अजूनच घट्ट केली....
थोडावेळ तसेच बसल्यावर प्रणिती च्या पोटातून आवाज यायला लागले ...
"तुला भूक लागली ना... सांगायचं ना..."ऋग्वेद उठला .... आणि तिला हात दिला.... दोघेही रूममध्ये आले.... तिथे टेबल वर आधीच सगळं जेवण ठवलेलं होत....
त्याने प्रणिती साठी मागे केली ... ती बसली... तस त्याने दोघांसाठी जेवण वाढलं... आणि तो पुढच्या चेअर वर जाऊन बसला...
प्रणिती ने मान खाली घालत जेवायला सुरु केलं... घाऊक तर तिला खूप लागली होती.... त्यामुळे वेड पण जेवताना काही बोलला नाही...
गाडीत ती एकटक त्याच्याकडे बघत होती... मनात खूप काही येत होत... नकळत त्याच्यावर प्रेम कधी झालं हे तिला पण समजला नव्हतं ... पण ती फिलिंग खूप छान होती.. खिडकीतून गार वारा येत होता... आणि त्यावर केस टाळीत उडत होते.... अचानक त्याचा हात समोर आला आणि ती दचकली ....
त्याने तिचे चेहऱ्यावर येणारे केस कानामागे केले...
"आता बघ.... मी नीट दिसणार..."त्याने डोळा मारला... तस प्रणिती ने लाजून नजर फिरवली.....
आशियाना मेरा साथ तेरे है ना .....
ढुढते तरी गळी मुझको घर मिला ...
आबोदाना मेरा , हाथ तेरे है ना ....
ढुंढतें तेरा खुदा मुझको रब मिला ....
तू जो मिला ... लो हो गया मै काबिल ...
तू जो मिल .. तो हो गया सब हासील....
हां मुश्किल सही.. आसा हुई मंजिल ...
क्यूकी तू धडकन , मै दिल......
***************************
प्रणिती आणि वेद रूम मध्ये गेल्यापासून ते बाहेर येईपर्यंत प्रिया तिथेच लपून उभी होती.... जाणारा प्रत्येक क्षण ती मोजत होती.... मनात प्रणिती विरुद्ध न जाणे किती कट रचून झाले असतील....
जेव्हा ते दोघे बाहेर येताना दिसले.... त्यावेळी ती रंगात पुढे जाणारच होती .. कि लक्ष वेड ने प्रणितीच्या घट्ट पकडलेल्या हाताकडे गेलं...
दात ओठ खात ती तशीच थांबली... नि काही अंतर ठेऊन त्याच्या पाठलाग करत पार्किंग मध्ये आली.... ऋग्वेद ने प्रणिती साठी दरवाजा उघडला.... ती बसली... आणि त्यानंतर दोघेही निघून गेले.... प्रियाने रागातच तिथल्या गाडीवर पाय मारला.....
"प्रणिती ... वाटत होत तितक्या हल्ल्यात घेऊन नाही चालणार तुला ... लग्न झालय ना तुझा.... तरीपण माझ्या वेद ला जाळ्यात फसवलं..."प्रिया रागाने हात आवळत होती... आता प्रणिती समोर असती तर नक्कीच तिने तिचा गळा आवळला असता....
"जास्त वेळ नाही... आतापर्यन्त तर तुला ऑफिसमधून बाहेर काढायची स्वप्न बघत होते.... पण आता तुला मी जिवंत सोडणार नाही.... ज्या हाताने वेडाने तुला धरलेलं ना त्याच हाताने तो तुला स्वतःच्या आयुष्यातून काढणार ... बघत राहा...." ती गाडीत बसली.... आणि सुसाट निघाली....
***********************
वेद आणि प्रणिती घरी आले... आज तर दोघांनीही हवेत तरंगला सारखंच वाटत होत... चेहऱ्यावर आनंद दिसतच होता....
वेद change करून आला तर प्रणिती बेड च्या टोकाला एका कुशीत झोपली होती....
त्याने हसतच तिच्या पोटावर विळखा घालत जवळ उठले... त्याच्या थंड बोटाचा स्पर्श तिला त्या सिल्कीनायटी च्या आत जाणवत होता... त्याने जवळ उठले तस त्याच्या फ्रेश बॉडी विष चा सुगंध तिच्या नाकात गेला...
ऋग्वेद ने मागून तिचे सगळे केस एकाबाजूला केले ... आणि त्या गोऱ्या नाजूक मानेवर ओठ टेकवले .... तिच्या शरीरावर ताठ झालेले केस त्यालाही जाणवले ... त्याचे ओठ हळुवार आजूबाजूला रेंगाळू लागले तस ती वळली ...
ऋग्वेद ने तिच्या डोळ्यात बघितलं .... तस तिने लाजत त्याच्या छातीवर मान ठेवली.... त्यानेही हसत तिच्या केसावर ओठ टेकवले....
"good night ...."तो हळूच तिच्या कानात बोलला .... आणि समाधानाने डोळे मिटले.....
त्याच्या गरम श्वासाचा स्पर्श तिला कानावरून मानेवर जाणवत होता... उशिरा कधीतरी ती पण त्या उबदार मिठीत झोपी गेली....
समीक्षा आणि स्टिकर्स हल्ली कमी झालाय ...... वाचल्यावर भाग कसा वाटला नक्की कळवा मला...... नाहीतर समजत नाही तुम्हाला कथा आवडतेय कि नाही ते.....
क्रमशः
"where is the charge sheet of upcoming deals ....? त्याचा आवाज आला .... तस तिथे असलेल्या सगळ्या इम्प्लॉयी च्या कानामागून घामाची धार खाली आली...
"सर , ती file मिसेस प्रणिती कडे दिलेली... पण त्यांनी पूर्ण करून दिली नाही...."श्रुती
ऋग्वेद ची नजर प्रणिती कडे गेली.... पण तिच्या चेहऱ्यावर गोधळ दिसत होता श्रुती आणि प्रिया एकमेकांकडे बघून हसल्या .... आता पुढे काय होणार ते दोघांनाही माहित होत... "मिसेस प्रणिती ...?.."ऋग्वेद चा रंगीत आवाज आला ....
काय करेल प्रणिती आता....???ऋग्वेद ला स्वतःची बाजू पटवून देऊ शकेल का ती ...???ऑफिस मधील हा राग त्याच्या वैवाहिक जीवनावर फरक पडू देईल का...???