Tu Havishi Mala - 11 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | तू हवीशी मला ....... भाग -11

The Author
Featured Books
Categories
Share

तू हवीशी मला ....... भाग -11

(प्रिया झाली बेशुद्ध ...)
    
  कबीर ला काम करून खूप वेळ झाला होता.... आता संध्याकाळचे ७ वाजले होते... राजतने कबीर च्या डोअरला नॉक केलं तेव्हा कबीर कम इन म्हणाला .... 

रजत आत आला आणि कबिरला गुड इव्हीनीग ग्रीट केलं... कबिरने मान हलवली आणिराजत कबिरच्या हातात फाईल देत म्हणलं "हि त्या मुलाची फाईल आहे जी तुम्ही मागवली होती....."


कबिरने फाईल घेतली आणि म्हणाला "तो कुठे आहे आता...?"


रजत म्हणाला "तो सध्या ब्लु नाईट क्लबमध्ये आहे..."


कबिरने फाईल उघडली ज्यात विवेकची माहिती होती.... कबीर ने फाईल वाचली आणि चेहऱ्यावर धोकादायक हास्य अंत म्हणाला "याला मुलीशी खेळायला खूप आवडत ना... पण यावेळी त्याने चुकीच्या मुलीला हात लावला...."

राजतने आपल्या बॉसच्या चेहऱ्याकडे पाहिलं.... कबिरच्या चेहऱ्यावर एक डेव्हील स्माईल होती... जे बघून राजतचा एक्सपीरियन्स सांगत होता कि आता काहीतरी मोठं होणार आहे.... 


कबीर म्हणाला "उचल त्याला ..."


त्यावर रजत म्हणाला "एस बॉस "आणि तो निघायला वळताच रजत आणि कबिरला काही जोरदार तुटल्याचा आवाज आला.... 

कबीर ने आवाजाच्या दिशेने पाहिलं तो आवाज जिथे प्रिया झोपली होती त्या खोलीतून येत होता.... कबीर ला काहीतरी अनुचित वाटलं आणि तो खोलीत धावला .... 

इकडे प्रिया झोपेतून उठली तेव्हा ती एका अंधाऱ्या अज्ञात खोलीत होती.... प्रियाला अंधाराची खूप भीती वाटत होती आणि ती पूर्णपणे एकटी होती... 


पास्ट ..... 


जेव्हा प्रिया ६ वर्षाची होती तिच्या घरात खेळत होती.... त्या दिवशी ती घरी एकटीच होती कारण आजी शेजारच्या काही कामासाठी गेली होती..... 


खेळता खेळता प्रिया स्टोअर रूममध्ये पोहोचली .... नंबर लोकने दरवाजा न लावता उघडण्याचा म्हणून नोकर सामान ठेवत होते नोकरांनी आपलं काम केलं आणि दरवाजा न लावता निघून गेले.... प्रिया आत गेल्यावर नकळत डोअर लोक झालं त्याकडे कोणीही लक्ष दिल नाही.... 


प्रिया खेळून थकली तेव्हा तिला बाहेर जायचं होत पण दार बंद होत... ती रूम साऊंड प्रूफ असल्याने तिचा आवाज बाहेर जाऊ शकला नाही... प्रिया तिथेच रडत बसली आणि पुन्हा आजी आजी म्हणत रडायला लागली .... आता अंधार पडू लागला होता आणि आता स्टोर रूममध्ये पूर्ण अंधार झाला होता.... प्रियाला येऊन ३ तास झाले होते .... आजीही अजून घरी आली नव्हती .... प्रियाची प्रकृती तशीच बिघडत चालली होती .... अंधारात भीतीने तीच लहान हृदय जोरात धडधडत होते... स्टोअर रूम फारशी स्वच्छ नव्हती आणि छोट्या खिडकीतून थोडासा प्रकाश आत येत होता... 

प्रियाने आजूबाजूला पाहिलं आणि सरडा तिच्या जवळ दिसला... आता भीतीमुळे प्रियात्रस्त झाली होती आणि रडत रडत बेशुद्ध झाली.... 

आजी घरी आल्यावर त्यांनी प्रियाचा शोध सुरु केला पण प्रिया कुठेच सापडली नाही... आजीने सव नोकरांना एकत्र बोलावलं आणि प्रियाबद्दल विचारू लाली.... पण कोणालाच काही कळलं नाही... 


आजीने रागाने सर्वाना प्रियाचा शोध घेण्यास सांगितलं.... मग नंतर cctv फुटेज बघण्यात आला तेव्हा त्यात प्रिया स्टोअर रुमध्ये गेल्याच दिसलं... आजीने पटकन प्रियाला बाहेर काढलं आणि ती बेशुद्ध पडल्याचं दिसलं.. त्या दिवसानंतर प्रियाला अंधाराची भीती वाटू लागली... 



प्रेसेंट ..... 



प्रिया अंधाराकडे बघत थरथरत होती.... ती उठली आणि घाबरून लाईटचा स्विच शोधू लागली पण चुकून एक फ्लॉवर पॉट खाली पडला.... प्रिया आधीच घाबरली होती... ती आणखीन घाबरली आणि त्याच कोपऱ्यात बसून प्रिया घाबरून घामाघूम झाली ... तिने गुडघ्यावर डोकं लपवून रडायला सुरुवात केली.... कोणाला हाक मारावी पण आवाज तिच्या तोंडातून निघत नव्हता.... 


इकडे कबीर धावत खोलीत आला आणि रजत त्याच्या मागे गेला आणि कबीर आत आला तेव्हा खोली पूर्ण अंधार होता.... त्याने पटकन लाईट लावली आणि बेडकडे पाहिलं तर राजतने कबिरला एका बाजूला नेलं जिथे प्रिया आपला चेहरा गुडघ्यात लपवत होती... 


कबीर तिच्याकडे धावत गेला आणि दोन्ही हातानी चेहऱ्यावर करून विचारलं "काय झाले बच्चा तू इथे का बसली आहेस....."


कबिरच्या स्पर्शाने प्रिया थोडी घाबरली पण कबिरला समोर पाहून तिने कबिरला घट्ट मिठी मारली आणि थरथरत म्हणाली"आम्हाला इथे राहायचं नाहीये... मला घरी जायचं आहे.... प्लिज मला घरी घेऊन जा .."

कबिरला तिची मिठी जाणवली आणि त्याने तिला आपल्या छातीत घट्ट लपवलं .... कबिरने तिच्या केसांना हात लावला ..... तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला.... काही वेळाने प्रिया अचानक शांत झाली.... 


कबिरने तिला त्याच्यापासून वेगळं केलं तेव्हा प्रिया बेशुद्ध झाल्याचं त्याला आढळलं .... कबीर घाबरला आणि तिच्या गालावर थोपटून तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण प्रियाने प्रतिसाद दिला नाही.... जवळच उभ्या असलेल्या रजतने ग्लासात पाणी आणून कबिरला दिल...

कबिरने प्रियाच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं पण प्रियला शुद्ध आली नाही.... कबीर अस्वस्थ वाटलं होत... त्याने प्रियाला आपल्या हातात उचललं आणि म्हणाला "डॉक्टरांना लवकरात लवकर मिशन मध्ये यायला सांग ...."


कबीर पटकन रियाला घेऊन घरी पोहोचला आणि तो त्याच्या खोलीकडे जाऊ लागला ... कबिरने आजीला आधीच सांगितलं होत कि प्रिया त्याच्यासोबत आहे तर तिची काळजी करू नको... आजीचा कबीरवर विश्व्स होता म्हणून त्यांनी काही प्रश्न विचारला नाही.... 



जेव्हा त्यांनी प्रियाला कबिरच्या हातात बेशुद्ध पाहिलं तेव्हा आजीने विचारलं "बेटा प्रियाला काय झालं आहे....?"

कबिरकडे काहीच उत्तर नव्हतं.... त्याच संपूर्ण लक्ष त्याच्या डॉलकडे होत जी त्याच्या हातात होती... 

कबीर पटकन तिला त्याच्या खोलीत घेऊन गेला आणि बेडवर झोपवलं... तिथे डॉक्टरची टीम आधीच हजर होती.... कबिरने पटकन डॉक्टरांना प्रियाला चेक करायला सांगितलं.... 


प्रियाला चेक जाण्यासाठी एक मेल डॉक्टर पुढे आला तेव्हा कबिरने त्याला थाबवल आणि म्हाला "तू नाही तू..."कबिरने एका फिमेल डॉक्टर ला सांगितलं.... 



रजत आजी आणि तिथे उभे असलेले डॉक्टर आश्चर्यचकित झाले.... कबिरला प्रियाबद्दल इतकं पझेसिव्ह पाहून राजतला समजलं कि प्रिया भविष्यात लेडी बॉस बनेल... आणि आजींना या गोष्टीच आश्चर्य वाटलंकी कबिरने आजपर्यंत कोणालाही आपल्या खोलीत येण्याची परवानगी दिली नाही आणि त्याच्या खोलीची साफसफाई देखील रोबोटद्वारे केली गेली ... पण आज प्रियाला त्याच्या खोलीत घेऊन आल्यावर आणि तिची इतकी पसेसिव्ह वागणूक पाहून आजीला समजलं कि तिचा नातू प्रेमात पडला आहे... आजी मनातल्या मनात हसली..... 


फिमेल डॉक्टरांनी प्रियाला तपासलं आणि म्हणाली "त्या भीतीमुळे बेशुद्ध पडल्या आहेत.... मी त्यांना एक इंजेक्शन दिल आहे... त्या १ किंवा २ तासात शुद्धीत येतील...."

प्रियाचा हात धरून बसलेल्या कबिरने डॉक्टरांकडे रागाने पाहिलं आणि म्हणाला "तिला आता शुद्धीवर आणा .... तुम्ही पैसे कशासाठी घेता...?"

त्याच्या आवाजाने डॉक्टर घाबरले आणि घाबरत म्हणाले "बॉस त्याच शरीर जास्त डोस हाताळू शकत नाही म्हणून थोडा वेळ थांबा ... अन्यथा त्याचे दुष्परिणाम हि होऊ शकतात..."

कबिरने हे ऐकून सर्वाना निघून जाण्यास सांगितलं ... डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.... आता खोलीत फक्त आजी रजत आणि कबीर प्रिया होत्या.... प्रियाच्या डोक्याला हात लावत असताना आजीने कबिरला विचारलं "तिला काय झालं आहे..."


खोलीत घडलेली घटना कबिरने आजीला सांगितल्यावर आजीने कबिरला सांगितलं "लहानपणापासूनच तिला अंधाराची भीती वाटते ..."

प्रियाच्या आजीने सांगितल्याप्रमाणे प्रियाच्या भीतीच कारण आजीने त्याला सांगितलं.... 


हे ऐकून कबिरला वाईट वाटलं... आजीने त्याचा हात पकडून तिच्याकडे पाहणाऱ्या कबिरकडे पाहिलं.... आजीने कबिरच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला लवकर शुद्ध येईल असं सांगितलं.... कबिरने मान हलवली ... आजी आणि रजत खोलीतून बाहेर आले.... 



*****************


हेय गाईज .... कसा वाटलं आजचा भाग ... काय वाटी काय होईल पुढे ... कळेल का प्रियाला कबिरच्या भावना.... ती सुद्धा करेल का त्याच्यावर प्रेम.... अजून पुढे बरच काही आहे.... सर्व काही जाणून घ्यायला वाचत राहा.... 


तू हवीशी मला .....❤️❤️❤️