Sending.. a memory in Marathi Philosophy by Shabdbhramar books and stories PDF | पाठवणी.. एक आठवण

Featured Books
Categories
Share

पाठवणी.. एक आठवण

" Yeah Mike!! Yeah.. Yeah.. Right.. That memory of incident is still as fresh as a dew drop man.. "

....

Give my regards to Kevin and Martha.
And Happy new year to you guys.. Enjoy the party !!..take care.. C ya!!"

एवढं बोलून मी call कट केला. आम्ही जवळजवळ पंधरा मिनिटे बोलत होतो. मला Mike ने त्याच्या कामाबद्दल फॅमिली बद्दल..आत्ताच होऊन गेलेल्या ख्रिसमसबद्दल भरपूर अपडेट्स सांगितले. दोन मिनिटे त्याची बायको मार्था आणि विशितला मुलगा केविनसुद्धा माझ्याशी बोलले. 

" कोण होतं? " गॅलरीत येत बायकोने विचारलं.

"Mike!" मी म्हणालो.

" तो अमेरिकन ? अरे हो !! आज 31 डिसेंबर नाही का? दर वर्षी आज call करतोच Mike." ती म्हणाली.

" हो.. न विसरता." मी म्हणालो.

अमेरिकेमध्ये राहणारा एक बँकर आणि भारतात महाराष्ट्रातल्या पुण्यात राहणारा एक इंजिनीअर, यांची एकेमकांना वर्षातून एकदा call करण्याची ही रीत का पडली त्याबद्दलचीच ही कथा आहे. हा गेल्या बारा वर्षातला बारावा call होता. दर वर्षी एक याप्रमाणे...

🍁🍁🍁🍁🍁

बारा वर्षांपूर्वी...

28-29-30-31 तारखाना उरलेल्या चार पगारी सुट्ट्याचा खुर्दा गोव्याला अर्पण करायचा आणि विंग्रजी सालाबादप्रमाणे येणारा वर्षाखेरीचा सण गोव्यात जाऊन साजरा करायचा प्लॅन माझ्या मित्तुरड्यानी ठरवल्यावर,
"आता जो माघार घेईल, त्याला दोन बाप. 🫤" अशी तिखट अट घालत तो प्लॅन सिलबंद करण्यात आला.

पहिला दिवस नुसतं दगड खाऊन पळत सुटलेल्या श्वानासारखे आम्ही बुंगाट गाडी पळवत हिंडत होतो. 🥴 नंतर जरा निवांत झाल्यावर आम्ही एक दिवस आरम्बोल, एक दिवस दिवार आयलंड आणि एक दिवस कॅन्डोलीम बीच करुन वर्षाखेरीच्या दिव्यसणाला सकाळी श्री क्षेत्र बागा बीच येथे "पुष्पांजली" वाहायला किंवा तळी भरायला पोहोचलो.

सकाळ ते दुपार पाण्यात यथेच्छ धुडघूस घालत आम्ही मस्ती जिरवली. कयाकिंग आणि मोटर rides करुन जीव आनंदला होता. शॅक मध्यें बसून टुना फिशच्या समर्पनाला अभिवादन देतं तृप्ततेचे ढेकर देऊन आडवे झालो होतो. संध्याकाळ होत चालली होती. दिवेलागणीला अगदी अर्धातास बाकी असावा. तेवढ्यात माझा एक मित्र बंट्या मला काही दाखवू लागला. पस्तीशी चाळीशीतलं एक फॉरेनर जोडपं भांडत होतं. बघे बघून निघत होते. भांडणाचा विषय लांबून काही कळत नव्हता, पण दोघेही रागावल्यापेक्षा जास्त दुःखी जाणवत होते. तिथे एक कॉनस्टेबल पण आला होता. त्याच्याशी बोलत ते एकमेकांशी वाद घालत होते.

मला नळावरची भांडणं बघायला लहानपणापासून आवडायचं.🤭
तेव्हा इथतर नवरा बायकोचं भांडणं.. 😬 ते ऐकायला मी सरसावलोच. 😬
" कशाला मरायला जातंय तिकडं... इथं हे बघायला आलोय का?? " 🫤 वैगरे एक दोघे जणं ग्रुपमधले मला म्हणाले. 
पण कसंय ना, "निरीक्षणावीन अनुभव आणि अनुभवाविना कथेला मटेरियल मिळत नाही." 
असं कोणी तरी... कोणी नाही.. मीच आत्ता म्हणालोय. त्यामुळं कायतरी मटेरिअल मिळेल अशा आशेने मी तिथे गेलो.

त्या नवरा बायकोमध्ये उभा असणारा कॉनस्टेबल गांगरला होता. ती बाई रडत होती आणि तो पुरुष ही रडकुंडीला आला होता. पण त्यांचे एकमेकांना आरोप लावनेही सुरु होते.
त्यांच्या मध्यें पडायला कोणी तयार नव्हते. जो तो आपल्या new year पार्टीच्या जल्लोषात रममान असल्यामुळे त्या दुःखी जीवांचा कळवळा त्यांना आकर्षित करू शकत नव्हता. त्यांच्या त्या वादावादीवरून कळले की त्यांचा दहा वर्षांचा मुलगा सापडत नाहीये. नवी जागा.. त्यात ते लेकरू गर्दीत कुठेतरी हरवलं. मला गलबलल्या सारखं झालं. एकतर लहान मुलगा, परक्या देशात, आई बापाविना किती घाबरला असेल. पण यांनाही डोकं नसावं का? एकुलता एक पोरगा, त्याला सांभाळायला असमर्थ असणाऱ्या त्या दोघांचा मला जरा रागच आला. त्या मुलासाठी मला त्यांना मदत करावी वाटली.

त्या मुलाच्या डॅडला त्याचे फोटो दाखवायला सांगत मी त्याला त्याने आत्ता अंगात काय घातलंय ते विचारलं? तेवढ्यात तिथे बंट्यापण आला. मी कॉनस्टेबलला तुमचे आणखी एकदोन जणं घेऊन मुलाला शोधू असं म्हणाल्यावर तो हलला.. "ठीके!" एवढंच बोलून, "एकतर गर्दी एवढी आणि कुठून शोधायचं या पोराला" असा अविर्भाव तोंडावर आणत तो गेला. त्या रडकुंडीला आलेल्या आईवडिलांना बागाच्या एका दिशेच्या टोकाकडे शोधायला सांगत मी आणि बंट्या दुसऱ्या टोकाकडे जायचं ठरवलं. एका तासाने परत इथंच भेटायचं असं ठरवून आम्ही सगळे निघालो.

बंट्या आणि मी समांतर चालत होतो. पाण्याच्या कडेने मी, तर शॅक्सच्या साइडणे बंट्या चालला होता. त्या मुलाला ज्याचं नाव "केविन" असं मला कळलं होतं त्याला मधूनच आवाजही देत होतो. साधारण किलोमीटर भर बागा बीचवर चालल्यावर अगदी शेवटाला अंजुना नदी लागली. बंट्या आणि मला काही केविन दिसला नाही. नदीकाठी तर गर्दी पाण्यापेक्षाही जास्त होती. नजरेच्या आवाक्यात येईल तेवढं पिंजत आम्ही शोध घेतला होता. पण फलीत शून्य होतं.

" त्यांना मिळाला असेल का रे?? " बंट्या ने विचारलं.

"मिळाला तर बरं होईल. जरा वेळ आणखी शोधू. मग परत जाऊ.. बघू पुढं." मी म्हणालो.

" साले human trafficking वाले पण पोरं उचलतात. आपल्या इथं अशी घटना घडून समाजाला बट्टा नको लागायला." असं तो म्हणाला.

" नाय.. नाय.. तसं काही नसेल.. शुभ बोल. मिळेल तो. " मी सकरात्मकता आणत बोललो. 

पण काळजी वाटत होती. अंधार पडायच्या आत ते पोर मिळणं आवश्यक होतं. नंतर अवघड होणार होतं. तिथल्या एका शॅक मध्यें  DJ जोरात गाणी सोडत होता. बंट्या त्या DJ कडे गेला. Mike वर त्याने तीन वेळा केविन ला आवाज देण्यासाठी विनंती केली. अनोउंसमेंट करुन तिथे आम्ही दहा बारा मिनिटे वाट बघितली. पण आशा फोल ठरली. वाटत होतं की केविन त्याच्या आईबापाला तरी सापडायला हवा.

अजून त्याला भेटलोही नव्हतो पण त्याच्याबद्दल एक आपलेपणा वाटू लागलेला. जणू तो माझा कोणीतरी आहे अशी ओढ मी अनुभवत होतो. बराच वेळ त्याचा ध्यास घेतला म्हणून असेल कदाचित.. 

आम्ही परतीला निघालो. मनातली भीती खोटी ठरो आणि केविन सुखरूप त्याच्या आईवडिलांना मिळो. बस इतकंच मनात चाललेलं. बन्ट्याचीही तिचं अवस्था होती. त्याने डोळे पुसलेले बघितले आणि मी थांबून त्याच्याकडे पाहिले.

"साल्या प्रेशर आलंय मनावर. नसतो आलो तुझ्यामागे तर बरं झालं असतं.. चल आता नको बघू माझ्याकडे. शोध त्याला." तो चिडून मला म्हणाला. मला खरंच अपराधी वाटलं.

केविन मिळणं गरजेचं होतं. अचानक कुठूनतरी त्या गदारोळात घंटेचा नाद किणकीणलेला कानावर आला.. माझ्यासाठी आशा पुन्हा उत्पन्न करायला खूप महत्वाचं साधन.
"तळेश्वर मंदिर" अगदी काहीच मीटर वर होतं. मन, बुद्धी, शरीर यांची शक्ती खर्चून आम्ही ते पोर शोधत होतो. पण आता कळलं की त्या शक्तीला आणखी कशाचीतरी जोड हवी होती. मनाला उभारीची गरज होती. दोन क्षण त्या देव्हाऱ्यासमोर उभा राहिलो तर परत प्रयत्नांसाठी बळ येईल असं मला वाटलं. 

"बंट्या तू शोध मी 2 मिनिटात परत येतो. मिळाला तर call करशील आणि मला दिसला तर मी करतो." असं म्हणून मी मंदिराकडे गर्दीतून वाट काढत गेलो. मंदिराच्या आवारात अगदी नावालाही माणूस नव्हतं. संपूर्ण शुकशूकाट... अंधार पडत चालला होता. मी नमस्कारासाठी हात जोडले. मनापासून प्रयत्नांना यश दे म्हणून विनंती केली आणि मागे वळून चालू लागलो. अचानक डोक्यात काही चमकलं.

मंदिरात असणाऱ्या त्या दिपस्तंभापाशी कोणीतरी उभे असलेले मी बघितलेले. 
पिवळा टीशर्ट आणि नारंगी थ्री फोर्थ घातलेला पाठमोरा मुलगा. 
उलट्या पावली वळत मी धावत तिथे गेलो.

" केविन!!" मी आवाज दिला. तो वळला. गौरवर्णी, सोनेरी केसांचं ते पोर अनोळखी असलेल्या माझ्याकडे निर्वीकारपणे बघत होतं.

" Are you Kevin?? " मी विचारले.

" yeah! Do I know you mister? " त्याने विचारले.

" I have been sent by your parents to find you... You should be with them.. How did you lost Kevin? " मी विचारलं.

त्याने जे सांगितलं त्यावरून मला समजलं की कसा विचार करुन तो मुलगा तिथे पोहोचला होता. फार धक्कादायक होतं हे.

" मुळात तो हरवला नव्हता. आई वडिलांच्या बेबनावाला कंटाळून पळाला होता. अमेरिकेहून गोव्यात येईपर्यंत ठीक असणारे त्याचे आईवडील तिथे येऊनही भांडत होते. एकमेकांना सोडण्याचा सतत उच्चार केला जात होता. ती ट्रिप खरंतर त्याला मनापासून enjoy करायची होती. पण आईवडिलांच्या भांडणामुळे त्याला त्रास होतं होता.

" They both wants to leave eachother without thinking of me.. So I desided to leave them.. Now let them do what ever they want. . have divorce or kill each other.. I am done with their presence in my life.. I dont care now." केविन चिडून सांगत होता. 

त्यांच्या तिथून सटकल्यावर त्यांना दिसणार नाही अशा बेताने तो फिरत राहिला. पण सगळीकडे माणसे असल्यामुळे तो गर्दीला वैतागून त्या देवळात तिथल्या निर्जनतेमूळे येऊन बसला. त्याला तिथं शांत वाटलं. पण काही वेळाने अंधार पडू लागल्यावर त्याला भीतीही वाटू लागली.

" Kevin what do you think.. They really want to hurt you.. Fact is that, they dont know how you feel about their disputes ...They dont mean to hurt you... I have seen them crying thinking of loosing you.. You must tell them what do you think about their desputes.. Tell them.. They will realise. But this is not the way.. Dont put your life in danger. " मी त्याला समजवत आणला. माझ्या बोलण्याने तो जरा शांत झाला. त्यालाही पटलं की अशा परक्या जागी असं वागणं चूक आहे.

बंट्याला call करुन त्या स्पॉटला जा म्हणालो. Kevin सापडल्याच ऐकून त्याला खूप आनंद झाला. 

मी केविनशी संवाद साधत त्याला ही गॅरेंटी दिली की त्याच्या आईवडिलांशी बोलून मी त्यांना तसं न वागण्याबद्दल समजवेन. पण प्रॉमिसही घेतले की परत तो कधीही असं करणार नाही.

आम्ही दोघे तिथे पोहोचलो तेव्हा बंट्या, माईक आणि मार्था शिवाय दोन कॉनस्टेबल तिथे होते. केविनला पाहून त्याचे आईवडील रडत त्याच्याकडे धावले. प्रसंग खूपच हळवा झाला. 

बंट्या, मी आणि ते कुटुंब डिनरला गेलो. 
ते दोघे आम्हा दोघांचे खूप आभार मानत होते.. पण मी आणि बंट्याने केविन समोर त्यांची खरपूस कानउघडणी केली. त्यांच्या अहमगन्डी वागण्यामुळं त्या पोराचं आयुष्य बरबाद व्हायला बसलंय. हे सांगितलं. तो हरवला नसून तुम्हाला वैतागून निघून गेला होता हे सांगितल्यावर ते दाम्पत्य ढसा ढसा रडू लागलं. 
वेळीच स्वतःला सावरा नाहीतर सुंदर कुटुंबाचा सत्यानाश व्हायला काहीच वेळ उरणार नाही असाही सल्ला त्यांना दिला.

केविनच्या आईवडिलांना ते पटलं. किमान ते तसं म्हणाले की "आमचे कुटुंब आणि केविनसाठी आम्ही हे नक्की करु." 

ती रात्र वर्ष बदलून नव्या वर्षात पदार्पण करायला दार उघडून देणार होती. त्यांनी आमच्यासमोर शपथ घेतली की,
"केविन आणि कुटुंबाची एकी यापुढे आमच्यासाठी इतर सारं गौण असणारं."

केविन समाधानाने हसत होता...
" It is the best night I have spent in my life. " असं मला म्हणतानाचा केविनचा निरागस चेहरा मला अजून आठवतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी निरोप घेताना दर वर्षी 31st डिसेंबरला call करण्याचे प्रॉमिस Mike आजही पाळत आलाय.
तर केविनची त्याच्या हसत्या खेळत्या कुटुंबासोबत केलेली पाठवणी माझ्या मनाला आजही शांती देत आलेलीये. 

- शब्दभ्रमर 🍁🍁