Pair in Marathi Moral Stories by Shabdbhramar books and stories PDF | जोडे

Featured Books
  • That Woman

    That Woman [Short Story]A woman who had married a few years...

  • Coralhaven - 1

    Season 1 — The Glow Beyond the Reef Deep beneath the rolling...

  • Unexpected Meeting - 1

    Hey everyone  I'm new to this platform and would like sh...

  • The Inner Conflict Of The Soul

    𝗧𝗵𝗲 𝗜𝗻𝗻𝗲𝗿 𝗖𝗼𝗻𝗳𝗹𝗶𝗰𝘁 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗦𝗼𝘂𝗹𝘓𝘪𝘧𝘦 𝘪𝘴, 𝘪𝘯𝘥𝘦𝘦𝘥, 𝘢 𝘱𝘦𝘤𝘶𝘭𝘪𝘢𝘳 𝘵𝘩...

  • The Disturbed Ecosystems

    Chapter 1 – The Silent Warning The town of Dharvati rested q...

Categories
Share

जोडे

मिलिंद गाडीतून उतरले. त्यांनी हातात एक box असलेली पिशवी घेतली होती. पलीकडून स्वाती त्यांच्या पत्नी देखील उतरल्या. दिक्षा त्यांची धाकटी मुलगी कार पार्क करुन त्यांच्याकडे आली. मिलिंद आणि स्वातीताईंना आणखी एक मुलगी होती जी सिंगापूरला होती. लग्न केल्यावर आणि जॉबमुळे ती आणि तिचा नवरा तिकडेच स्थायिक झालेले. दिक्षाचं शिक्षण संपून ती नुकतीच नोकरीला लागली होती.

समोर जे लग्न लागणार होते त्या कार्यालयाच्या समोर ते आले होते. दोघा नवरा बायकोच्या मनात प्रश्नचिन्ह होते. आत गेलो तर....? दिक्षा स्थिर होती कारण तीला इतकं भावनिक आंदोलन जाणवत नव्हतं. आई वडिलांसोबत यायचे एवढेच तिने पाळले होते. तिथे काय होणारं होतं याचा अंदाज तिलाही नव्हता.

आलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करुन दोघेही तिथं पोहोचले तर खरं. तिसेक वर्षांपूर्वी उलटलेल्या "त्या" गोष्टीचा दाह तर कधीच संपला होता. उरला होता तो फक्त स्वस्त अभिमानाचा कमकुवत थर. जो मनाला मुक्त करत नव्हता. मिलिंद तोच विचार करत होते. की समोरच्या परिस्थितीला सामोरे जाणार कसे?

पलीकडून एक संधी तर मिळाली होती.
तिकडून सर्व विसरून (?) एक पाऊल उचलण्यात आलंय असं दिसत होतं. मग आपण एका जागेवर कोडग्यागत बसून राहणं मिलिंदना सुद्धा बरं वाटेना. स्वाती ताईंना त्यांनी विचारलं तसं त्याही म्हणाल्या. 
" किती काळ आपण तरी मनात आढी धरून बसायचं. जाऊयात. आमंत्रण आहे. शिवाय ते आपल्याच घरातलं कार्य."

तर तिघे तिथे उभे होते. मनात संभ्रम ठेऊनच त्यांनी कार्यालयाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली.

" मिलिंद काका!!" एक आवाज त्यांच्या दिशेने आला. सोबतच एक किशोरवयीन, दिक्षापेक्षा पाच सहा वर्ष लहान मुलगा त्यांच्याकडे लगबगीने.. जवळजवळ धावतच येऊ लागला. "चेहरेपट्टीवरून तर.. मुकुंदाच!" मिलिंद मनात म्हणाले.

झरकन मन चाळीस पन्नास वर्षांचा प्रवास करत मागे गेलं.

****

" भाऊ!!" मिलिंद मागे बघू लागला. मुकुंदा हाक मारत होता. सोबत दोन मित्र होते. मिलिंद अकरावीला होता ज्युनिअर कॉलेजला. तो कॉलेजला निघाला होता. रस्त्यावर असतानाच मागून मुकुंदा पळत येऊ लागला. त्याच्या काय ते लक्षात आले.

"तुम्ही जा पुढे. मी येतो. " असं म्हणत मिलिंदणे दोघांना पुढे धाडले.

" काय रे!!" धावतं जवळ आलेल्या मुकुंदाला मिलिंद म्हणाला.

" भाऊ आज ड्रिल आहे.. तीन वाजता...गायकवाड सर असतील रे.." तो धापा टाकत म्हणाला. मुकुंदा नववीला होता. त्याने NCC मध्यें भाग घेतलेला. त्याची आज ड्रिल होती. 

" बरं... चल घरी.. " मिलिंद म्हणाला.

" भाऊ.. पण तुझा सुद्धा घालण्याच्या लायकीचा नाहीये.. खालून दगड टोचतील." तो म्हणाला.

" असू दे. मी स्लीपर घालतो आज." मिलिंद म्हणाला.

" अरे भाऊ कॉलेजमध्यें बरं पण नाही दिसणार. तू असं कर ना.. तू अडीचला सुटतो ना तर मग तीन पर्यंत माझ्या शाळेत ये आणि मला दे." तो म्हणाला. 

" अरे आज माझं सबमिशन आहे. उशीर झाला तर तूला शिक्षा होईल. असू दे चल घरी बदलू आपण. " तो म्हणाला.

" अरे नाही होत. येशील तू वेळेत. मी वाट बघीन." असं म्हणून मुकुंदा आल्या पावली पळत घरी गेला.

मुकुंदाचा NCC चा जोडा मिलिंद कॉलेजला जाताना घालायचा. तो मुकुंदला शाळेतून मिळाला होता. मिलिंदचा बुट फाटला होता. वडील नसलेल्या मुलांची घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे हट्ट करणं दोघांच्या स्वभावात नव्हतं. जे असेल त्यात शक्य तितकी तडजोड करत ते भाऊ एकमेकांच्या गरजाना काही प्रमाणात समजून घेत होते. मिलिंदला कॉलेजमध्ये शिवलेली चप्पल घालून जायला लागू नये म्हणून मुकुंदणे ही शक्कल लढवलेली.

पण त्या दिवशी प्रॅक्टिकलच्या जरनल्स चेक करुन घ्यायच्या कामात मिलिंदला निघायला उशीर झालाच. मिलिंद धावत तिनेक किलोमीटर अंतरावरच्या मुकुंदच्या शाळेत पोहोचला. घड्याळ तर नव्हतं सोबत पण उशीर झाल्याचं जाणवतं होतं. शक्य तितक्या जोरात धावत घामाघूम मिलिंद शाळेच्या ग्राउंडसमोर असणाऱ्या गेटवर आला. समोर पाहिलं तर ड्रिल सुरु झालेली. गायकवाड सर शिट्टीच्या आणि ड्रम च्या तालावर मार्च घेतं होते. 

मिलिंदला त्या ग्रुपमध्ये मुकुंदा दिसला नाही. गायकवाड सरांच्या पाठीमागे त्याचं लक्ष गेलं तर तिथे भर उन्हात अंगठे धरून मुकुंदा वाकलेला त्याला दिसला. मिलिंदच्या चेहऱ्यावरच्या आता घामात अश्रूही मिसळत होते. त्याने ते जोडे काढले आणि मैदानाच्या कडेकडेने चालत भाजल्या पायानी तो मुकुंदाकडे पोहोचला. पटकन त्याने मुकुंदाला हाक मारून जोडे दिले. त्याचा चेहरा पाहिला आणि त्याला आणखीनच रडू आलं. 

"मला उशीर झाला मुकुंदा.. माफ कर.. खूप मारलं का रे सरांनी?" त्याने विचारलं.

" अरे नाही.. एवढं नाही. आता आलेत ना बूट.. करतो ड्रिल.." तो म्हणाला. आणि पायात बूट चढवू लागला. ते करताना त्याचे थरथरणारे हात मिलिंदला दिसत होते. मिलिंदणे मुकुंदाची ती चप्पल घातली.

संध्याकाळी शाळा सुटे पर्यंत मिलिंद मुकुंदासाठी तिथेच मैदानाजवळ झाडाखाली बसून राहिला. शाळा सुटली तसा तो बाहेर आलेल्या मुकुंदाकडे पळत गेला. पहिले त्याने त्याचे हात बघितले. हातांवर छडीचे चांगलेच ठळक वळ होते. पायाच्या पोटऱ्यांवर सुद्धा होते.

" मुकुंदा!!" मिलिंदने त्याला मिठी मारली.
"माझ्यामुळं किती सोसलं रे " तो रडवेला होत म्हणाला.

" अरे भाऊ.. काही नाही झालं एवढं.. सोड.." मुकुंदा म्हणाला.

" मी परत नाही वापरणार तुझे हे जोडे.. परत नको तूला असली शिक्षा." तो म्हणाला.

" भाऊ तू मोठा झाला की एकदा मला असेच काळे चमकदार जोडे घेऊन दे." तो अतिशय निरागसपणे म्हणाला.

" नक्की रे नक्की!!" मिलिंद त्याच्या त्या निरागस चेहऱ्याला बघून म्हणाला.

**** 

पाया पडायला वाकलेलं ते पोर बघून मिलिंदना मुकुंदच दिसला.
"मुकुंदा!!" ते म्हणाले.
"मी निशांत.. बाबा आत आहेत चला. ताई आणि आईपण वाट बघत आहेत..काका काकू तुम्ही आल्याशिवाय लग्न लागणार नाही असं बाबांनी सांगून ठेवलंय. मला म्हणून इथेच मेन डोअर वर उभं केलं होतं त्यांनी. तू दिक्षा ताई ना गं.." त्यांची अस्थेने विचारपूस करत निशांत त्यांना आत घेउन गेला. मुकुंद आणि प्रमिला त्यांची पत्नी दोघांना सामोरे गेले. तसे चोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मुकुंदाने आपण होऊन मोठ्या भावाला घट्ट मिठी मारली. 

जोवर दोघे भाऊ होते तोवर सर्व ठीक होतं. पण दोघांच्या लग्नानंतर त्याचं लहान घरात एकत्र राहण्याच्या खटाटोपात, गैरसमजातून सुरु झालेले वाद विकोपाला जाऊ लागले. परिस्थिती आणि काही बाहेरच्या विघ्नसंतोषी नातेवाईकांच्या कान भरणीमुळे भावाभावात फूट पडली. त्यातच त्यांच्या आईचेपण हृदयविकाराने निधन झाले. 

वादामुळे दोघांच्यातला प्रेमाचा बंध सैल झालाच होता. पण आई हा शेवटचा दुवा निखळल्यामुले एकत्र राहण्याची शक्यता दोघांनी संपवली. जूने घर विकून टाकत दोघांनी आपला आपला रस्ता धरला. संपर्क उरला नाही. गैरसमज मनावर अहमभावाचे लेप चढवत गेला. एकमेकांना दिलेली दुषणे.. त्याचे लावत गेलेले अर्थ यामुळे मनात विष भिनत गेलं. एकेमेकांची काळजी वाहणारे प्रेमळ भाऊ दुरावले. गेल्या पंचवीस वर्षात एकमेकांना तोंडही न दाखवलेले एके काळचे तेच प्रेमळ भाऊ आत्ता एकत्र आले होते. मुकुंद आणि प्रमिलाताईंची थोरली मुलगी निशाचं लग्न..

"मुकुंदा ये इकडे.. " मिलिंद म्हणाले.

मुकुंदाला खुर्चीवर बसवत त्यांनी पिशवीतून box काढला. त्यातून चांगले महागडे काळे शूज काढत त्यांनी मुकुंदसमोर ठेवले. तितक्यात तिथे नवरी मुलगी निशापण आली स्वातीताईंनी आणि दिक्षाने तीला प्रेमळ अलिंगन दिले.

" आज घालणारे का बाबा तुम्ही? मी कितीदा म्हणालो शूज वापरा.. नेहमी चप्पल किंवा सॅन्डल वापरत आलात.. आणि आज काकांनी आणले तेव्हा घालताय. " निशांत आश्चर्य करत म्हणाला. निशा आणि प्रमिला ताईंनी पण सर्वांदेखत दुजोरा दिला. पण त्या मागचं कारण मात्र दोघं भाऊ जाणत होते. 

" तुझ्या लक्षात आहे भाऊ? तू दिल्याशिवाय मला इच्छाच होत नव्हती.. किमान एवढं तुझ्याकडून घ्यावं असं मनोमन वाटायचं." डोळे पुसत मुकुंद म्हणाले. 

"लक्षात होतं रे.. पण नेहमीसारखा उशीर केला. मला माफ कर मुकुंदा..आता शिक्षा नको.. कोणालाच नको." निशांत आणि निशाला जवळ घेतं मुकुंदकडे बघत मिलिंद साश्रू डोळ्यांनी म्हणाले.

****
परत येणं बघितलं तर सोपं,
नात्यातला दुरावा मग असो कितीही.
सहज कोवळ्या प्रकाशाने सगळं निवतं,
मनावर असू दे गैरसमजाचं धुकं कितीही...🍁🍁

- शब्दभ्रमर 🍁🍁