Mandodari - 9 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | मंदोदरी - भाग 9

Featured Books
  • फिर से रिस्टार्ट - 1

    फिर से रिस्टार्ट (भाग 1: टूटा हुआ घर)रात का सन्नाटा था।आसमान...

  • Maharaksak Arjun

    चमकदार रोशनी से भरा राजमहल बेहद शानदार और प्रभावशाली दिख रहा...

  • मेरे शब्द ( संग्रह )

    1- ££ काश काश मैं तेरे शहर का होता, इक चाय के सहारे ही सही प...

  • एक समझौता

    कभी-कभी एक नजारा बीती हुई जिंदगी को ऐसे सामने लाकर खड़ा कर द...

  • Mafiya ki Secret Love - 1

    कॉलेज के एक कोने में एक लड़का खड़ा था…हुडी पहने, लंबाई 6’2”,...

Categories
Share

मंदोदरी - भाग 9

***********९*********************
 
          दिवसामागून दिवस जावू लागले होते. विवाहाचा प्रश्न तसाच्या तसाच होता. तशी लंकेतील जनता ही राक्षस प्रजातीची होती. ती विभीषणाला राजा मानत नव्हती. तशी राज्यात अराजकताच निर्माण झाली होती. एक मंदोदरीच होती की जी त्या राक्षस प्रजातीला न्याय देवू शकेल. परंतु तिनं तर स्वतःला कोंडूनच ठेवलं होतं त्या कक्षात. आता आपल्या जीवनाचं काहीच होवू शकत नाही असा विचार करुन. 
         राज्यात निर्माण झालेली अराजकता. ती दिवसेंदिवस वाढतच चालली होती. तसं पाहिल्यास विभीषण राज्यकारभार चांगलाच चालवत होता. परंतु चांगल्या गोष्टी राक्षसप्रजातीला खपत नव्हत्या. शिवाय विभीषणाला राज्यातील लोकांना बरोबर समजाविणंही जमत नव्हतं. त्यातच त्याचेसमोर प्रश्न उपस्थित झाला होता राज्याचा. राज्य चालवायचं कसं. ही अराजकता दूर करायची कशी? अशातच विभीषणाला आठवले ते रामाचे शब्द. रामानं म्हटलं होतं की तिच्याशी त्यानं विवाह करावा.
           अचानक विभीषणाला आठवले ते रामाचे शब्द. ते शब्द होते, मंदोदरीशी संधी मिळताच विवाह करावा. त्यातच आता अशी नामी संधी चालून आली होती. ती नामी संधी होती राज्यातील अराजकता. विभीषणाला वाटत होतं की त्याच बहाण्यानं मंदोदरीला विचारता येईल. विचारता येईल की राज्यात अराजकता निर्माण झाली आहे. ती निस्तरायची आहे आणि त्यात तिची मदत हवी. राज्यातील माजलेली अराजकता दूर होवू शकेल. त्यासाठी संपर्क करावा लागेल तिच्याशी. तिला विवाहासाठी तयार करावं लागेल. अन् तिच्याशी विवाह करावा लागेल. तिला पट्टराणी बनवावं लागेल. तेव्हाच ही माजलेली अराजकता दूर होईल. तो तिचा विचार. त्यातच त्याला तसं वाटल्यानं त्यानं आपला एक दूत तिच्या कक्षात पाठवला. जो त्याचा संदेश देणार होता मंदोदरीला.
         मंदोदरी तशी सात्विकच होती. त्यातच तिनं आपल्या पतीच्या सहयोगानं लंकेचा राज्यकारभारही सांभाळला होता. ती प्रत्यक्षात आपल्या पतीच्या कारभारात सहभागी होत असे. त्यातच ती अगदी जवळून पाहात असे पतीचा कारभार. अन् जेव्हा जेव्हा तिचा पती रावण काही कामानिमित्त बाहेर जात असे. तेव्हा तीच प्रत्यक्षात राज्यकारभार पाहात असे. त्यातच प्रजेला कुठं रिझवायचं याचं बाळकडू तिला रावणानं जीवंत असतांनाच शिकवून ठेवलं होतं. तिला प्रजेच्या कमजोऱ्या माहीत होत्या. त्यातच माजलेली अराजकताही ती दूर करु शकणार होती. परंतु ती चिंताग्रस्त होती.
           दासीकडून जेव्हा तिनं दुसऱ्या दिवशी ऐकलं की राम व सीता निघून अयोध्येत परतले आहेत. तेव्हा तिचा अपेक्षाभंग झाला. वाटलं की एक रामच होता की जो आपला विवाह विभीषणाशी लावू शकत होता. परंतु आता राम नसल्यानं त्या सर्व अपेक्षावर पाणी फेरलं गेलं आहे. त्यातच त्या दिवसापासून तिनं स्वतःला बंदिस्त करुन टाकलं होतं एका कमऱ्यात. तिला वाटत होतं की जर मी बाहेर निघाले, तर ही प्रजा आपल्याला सन्मान देणार नाही. आपल्याला आपल्या पतीवरुन दुषणेच देईल. 
          तो तिचा विचार होता. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच होती. प्रत्यक्षात लंकेतील प्रजेला रावणाबद्दल व त्याची पत्नी मंदोदरीबद्दल आदरच होता. कारण त्यात सन्मान होता. ज्याला आत्मसन्मान म्हणतात. ते रावणावर प्रेम करीत होते व रावण त्यांच्यावर प्रेम करीत होता. त्यामुळंच ते रामाविरोधात रावणाच्या बाजूनं लढले होते. त्यांचा रावणामुळं मंदोदरीवरही विश्वास होता. म्हणूनच मंदोदरीच एकमेव अशी स्री होती की जी राज्यातील अराजकता दूर करु शकणार होती.
          विभीषणानं दूताला सांगितल्यानुसार दूत विभीषणाचा पुरता निरोप घेऊन मंदोदरीच्या कक्षात दाखल झाला. त्यानं विभीषणाचा निरोप मंदोदरीला सांगीतला व म्हटलं की महाराज विभीषणानं तिला भेटायला बोलावलंय. त्यातच तिनं त्याला जाण्यास सांगीतलं.
        विभीषणाचा दूत आला तसा निघून गेला. त्यानं विभीषणाचा निरोप मंदोदरीला सांगीतला. तसे मंदोदरीच्या मनात प्रश्न उभे राहिले. वाटलं की मी असा कोणता अपराध केला की विभीषणानं मला भेटायला बोलावलंय. कदाचित मी स्वतःला कोंडून ठेवल्यानं तर नसेल ना.
           तो तिच्या मनात आलेला विचार. परंतु ती राजाची आज्ञा. ती मोडता येणं शक्य नाही. आपण प्रजा. आपण आज महाराणी नाही. अन् आज स्वतःला महाराणीही समजू नये. समजावं की आपण एक प्रजेचाच घटक आहोत. अन् एक प्रजेचाच घटक म्हणून विभीषणाला भेटायला जावं.
         तिचा तो विचार. तिनं त्यावर बराच विचार केला व लागलीच ती विभीषणाला भेटायला त्याच्या कक्षात हजर झाली. जिथं विभीषणाची महाराणी सरमा बसली नव्हती.
          मंदोदरी विभीषणाच्या कक्षात पोहोचली होती. तोच महाराज विभीषणानं तिला पाहिलं. तसा तो म्हणाला,
         "या महाराणीसाहेब. या विभीषणाच्या महालात आपलं स्वागतच आहे." 
         ते विभीषणाचे शब्द. ते ऐकून तिला स्वतःचे कान फाटल्यागत वाटले. वाटलं की हे महाराज विभीषणही तिला महाराणी म्हणून चिडवीत आहेत. तिला त्याचं क्षणभर वाईट वाटलं. तसा थोड्याच वेळाचा अवकाश. थोड्याच वेळात तिनं तो राग गिळला व म्हटलं,
          "आज्ञा करावी महाराज. आज्ञा करावी की मी आपल्या कोणत्या कामात पडावे. तसं आता आपल्या थोरल्या भावाच्या निधनानं मी काही कामाचीच उरलेली नाही."
          "महाराणीसाहेबा, आपण असं बोलू नका. माझा थोरला भाऊ हा मरण पावला म्हणून काय झालं. आपलाही मान तेवढाच आहे या राज्याला. जेवढा माझ्या थोरल्या भावाचा होता."
          "हो का. मग आदेश करा आपण."
          "महाराणीसाहेब, मी जे काही बोलणार आहे. तो माझा आदेशच समजा. अन् तो आदेश काय आहे. हे जाणून घ्या. त्यावर विचार करा. मगच पावलं उचला. तत्पुर्वी मी आपणाला राज्याच्या परिस्थितीची जाणीव करुन देतो."
         असं म्हणत महाराज बनलेल्या विभीषणानं एक आवंढा गिळला. तसे ते पुन्हा बोलते झाले.
           "महाराणीसाहेब, सध्या मी जरी राजा असलो तरी राज्याची परिस्थिती काही उत्तम नाही. राज्यात अराजकता माजलेली आहे व मी जरी राजपद स्विकारलं असलं तरी ती अराजकता मला दूर करता येत नाही. त्यासाठी आपलं सहकार्य हवं."
          "महाराज, मी अभागन अशी काय करु शकणार? माझं कोण ऐकणार? मला उलट दुषणेच देणार ही प्रजा. म्हणणार की आमचा राजा मरण पावला. अन् ही करंटी आजपर्यंत जीवंत आहे."
         "महाराणीसाहेब, तसं नाहीच म्हणणार ही प्रजा. या प्रजेला माझ्या थोरल्या भावाबद्दल आदर आहे. अन् आदर आपल्याबद्दलही आहेच तर......"
           "महाराज, ते सगळं बरोबर आहे. परंतु राज्यात विधवांना मान नसतोच. मान असतो तो पती असलेल्या स्रिला. मला पती नाही व माझा पती हा मरण पावलेला आहे. जो आज अस्तित्वात नाही व हेच सत्य आहे. आपल्या थोरल्या भावाचा काल आदर होता. जेव्हा ते जीवंत होते. तेव्हा तर त्यांना त्रिलोकही घाबरत होता. आज तसं होणं शक्य नाही. अन् ते शक्य तरी आहे काय?"
          "ते सगळं बरोबर आहे राणीसरकार. अन् तसं जर आहे तर मी आपलं गेलेलं वैभव परत आणून देणार."
          "ते कसं काय शक्य आहे? कसं काय शक्य आहे गेलेलं वैभव परत आणणं? महाराज, गेलेलं वैभव कधीच परत येत नाही. येवूही शकत नाही. मला सांगा, एकदा मरण पावलेला जीव परत येवू शकतो काय? ते शक्य आहे काय? नाही ना. मग माझं गेलेलं वैभव कसं परत येणार आहे?"
           "येणार परत ते वैभव. ते शक्य आहेच."
           "कसं येणार ते तर सांगा?"
          "माझ्याशी विवाह करुन. कराल ना माझ्याशी विवाह? मी आपणास आपली पट्टराणी बनविणार. स्विकार आहे ना माझा प्रस्ताव?"
           विभीषण थेट बोलून गेला. तशी मंदोदरी थोडी चूप बसली. क्षणभर विभीषण हिंमत करुन जे बोलला. त्याबद्दल कौतूक वाटलं व हेही वाटलं की त्याला ताबडतोब होकारच देवून टाकावा. परंतु ती विचार करु लागली. विचार करु लागली की एवढ्या लवकर आपण होकार देवू नये. लवकर होकार देणं म्हणजे आपल्या स्वतःवरच आपत्ती ओढवून घेणं होय. कदाचित विभीषण विषय आसक्तीनं आपल्याशी विवाह करायला तयार असेल. हे नाकारता येत नाही.
         ती विचारच करीत होती. तोच विभीषण म्हणाला, 
         "काय झालं महाराणीसाहेब? माझा विचार पटला नाही काय? मला राज्यातील अराजकता दूर करायची आहे. जी आपल्याशिवाय अशक्यप्राय गोष्ट आहे. शिवाय तशी रामाची इच्छा होती आणि तीच माझ्या थोरल्या भावाचीही. रामानं सगळं सांगीतलंय मला आणि हेही सांगीतलंय की मंदोदरीला अंतर देवू नकोस. न्यायीक राज्य कर. राज्यात अराजकता पसरु देवू नकोस. आता सांगा महाराणीसाहेब, आपल्या राज्यातील निर्माण झालेली अराजकता जर दूर करायची असेल तर ती कशी करावी? त्यासाठी आपणासोबत विवाहच करावा लागेल ना. यावर आपलं मत काय ? जरा आपण तरी यावर उपाय सुचवावा म्हणजे झालं."
          "ठीक आहे आपला प्रस्ताव आणि मी कदाचित विवाह करायलाही तयार होईल. परंतु आपण ही गोष्ट आपल्या पत्नीला म्हणजेच सरमाला विचारली काय?"
           "नाही."
           "मग आधी त्या स्वरुपाची गोष्ट सरमाला विचारा. ती तयार झाली तरच मी तुमच्याशी विवाह करणार. त्याआधी नाही."
          "ठीक आहे. जशी आपली इच्छा. मी लवकरच त्याबद्दल कळवतो आपणास. आता तर झालं. परंतु एक. सरमा तयार झाल्यावर आपण नाही म्हणू नका."
           "महाराज, ते नंतर पाहू." मंदोदरी म्हणाली व तेथून तिनं प्रस्थान केलं. वाटेत तिच्या मनात बरेच विचार आले होते.
            मंदोदरी घरी आली. विचार करु लागली. विभीषण म्हणतो ते खरं असेल काय? राज्यात खरंच अराजकता पसरली असेल काय? विभीषणाचा तसा स्वभाव तर चांगला आहे. तो न्यायी आहे. मग ही अराजकता पसरायचं कारण काय?
             मंदोदरीच्या मनात असंख्य प्रश्न होते. ज्याचं उत्तर तिच्याजवळ नव्हतं. शेवटी तिनं ठरवलं. आपण प्रजेत जायचं. साक्षात प्रत्यक्षात जावून भेटायचं. त्यांचे हालहवाल विचारायचे.
          मंदोदरीचा तो विचार. ती दुसर्‍याच दिवशी प्रजेत गेली, त्या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी. खरंच राज्यात अराजकताच पसरली आहे काय याची पडताळणी करण्यासाठी. तेव्हा तिनं लोकांना विचारलं असता एक व्यक्ती म्हणाला,
           "राणीसरकार, महाराज रावण स्वाभिमानी होते. महाराज विभीषण हे स्वाभिमानी नाहीत. ते पळपुटे व देशद्रोही आहेत. वेळ होती त्यांनी आपल्या भावाला मदत करण्याची. जशी मदत कुंभकर्णानं केली आपल्या भावाला. विभीषणानं तर अशा जोखमीच्या वेळेस लंकेला संकटात टाकून पळ काढला. मग आम्ही त्यांना राजा कसे मानू? शिवाय आमचे महाराजही त्याच विभीषणाच्या शत्रूला मिळल्यानं मरण पावले. कारण आमच्या राज्याचे आणि आमच्या राज्याचे गुणदोष सांगीतले त्या विभीषणानं शत्रूला. म्हणूनच तो राम महाराज रावणाला मारु शकला. जर विभीषण महाराज शत्रूच्या गोटात गेले नसते तर कदाचित आमचे रावण महाराजही आज जीवंत राहू शकले असते."
           मंदोदरीनं ते ऐकलं. तिला त्या प्रजेतील एका व्यक्तीचं बोलणं आवडलं. तो स्पष्ट शब्दात मंदोदरीलाही न घाबरता बोलत होता. तोच ते संपुर्ण बोलणं ऐकल्यावर ती म्हणाली,
          "जर मी राज्यकारभार चालवेल तर आपण मला स्विकार कराल?"
            "होय, राणीसरकार. ते आम्हाला स्विकार आहे."
            "परंतु आज ते कसं शक्य आहे?"
            तिचा तो प्रजेला प्रश्न. तो प्रश्न बाहेर येताच प्रजा एकमेकांच्या तोंडाकडं पाहू लागली. त्यांना समजेना की काय उत्तर द्यावं. त्यातच त्यावर मंदोदरी म्हणाली,
           "एक उपाय आहे. सांगू."
           तिच्या त्या बोलण्यावर सर्वांनी सहमती दर्शवली. तशी ती म्हणाली,
          "एक उपाय आहे, तो म्हणजे विभीषणाशी विवाह करणं. मंजूर आहे आपणास? नसेल तर विभीषणच बरा आपल्यासाठी. यावर विचार करा."
           ती भोळीभाबडी प्रजा. ती प्रजा विचार करु लागली की जर विभीषणाशी आपल्या महाराणी मंदोदरीचा विवाह झाला नाही तर ती महाराणी बनणं शक्य नाही अन् तिनं राज्यकारभारात ढवळाढवळ करणंही शक्य नाही. तेव्हा त्यात तिला होकार देणं वा मंजूरी प्रदान करणं ठीक राहील. 
         तो प्रजेचा विचार. त्यावर प्रजेनं होकार दिला व लागलीच प्रजेच्या कल्याणार्थ मंदोदरी विभीषणाशी विवाह करण्यासाठी तयार झाली. फक्त आता एक कार्य बाकी होतं. तो म्हणजे सरमाचा होकार येणं. जी विभीषणाची पत्नी होती. तिला वाटत होतं की सरमाचा नकार आल्यास हे कार्य सिद्धीस जाणार नाही. त्याची ती आता आतुरतेनं वाट पाहात होती.
            सायंकाळ झाली होती. तसा विभीषण आपली राणी सरमा सोबत बसला होता. त्यातच सरमेला विचारायचं होतं मंदोदरीबद्दल की त्याला मंदोदरीसोबत विवाह करायचा आहे. त्यावर तिची संमती आहे काय? परंतु त्याचं मन चल बिचल होतं व आपल्या पत्नीला ती गोष्ट कशी विचारायची. याची हिंमतही होत नव्हती. तशी हिंमत एकवटून तो म्हणाला,
         "राणीसाहेब, मला आपणाला काही विचारायचंय. एका महत्वपुर्ण विषयावर चर्चा करायची आहे. बऱ्याच दिवसांपासून विचार करतोय. परंतु हिंमत होत नाही. आपण रागवाल अशी भीती वाटते. तसा प्रश्न राज्याचा आहे व राज्यात सध्याच्या घडीला अराजकताच पसरली आहे."
           "विचारा ना. मी कशाला रागावणार आहे आपणावर. आपण माझे पती आहात. अन् आता तुम्ही माझे पती जरी असले तरी राजे आहात. त्यामुळंच जे काही कराल, ते राज्यासाठीच कराल. त्यासाठी पत्नीचा सल्ला घेतला तर त्यात काय गैर आहे."
          "होय, काही गैर नाही. परंतु हा प्रश्न तुझ्याशीच संबंधीत आहे."
           "आधी प्रश्न तर येवू द्या. मग त्यावर विचार करु."
           "मला मंदोदरीशी विवाह करायचाय. रागावू नका राणीसाहेब. परंतु हा प्रश्न सोडविणं भाग आहे. यातून दोन प्रश्न सुटणार आहेत. पहिला म्हणजे स्वतःला कमऱ्यात बंदिस्त करुन ठेवलेल्या मंदोदरींना न्याय मिळेल आणि दुसरा प्रश्न म्हणजे राज्यात निर्माण झालेली अराजकता दूर करता येईल. यावर आपलं मत कळवा. आपण नाही म्हटलं तर मी आपला निर्णय बदलवेल. जे काही करायचंय मला. ते आपल्या खुशीसाठीच तर ना. आपली खुशी त्यात माझीही खुशी. आपण हवं तर यात नकार देवू शकता. जरा विचार करा यावर."
         ते विभीषणाचे शब्द. ते शब्द भात्यातून निघाले होते व सरमेच्या कानाला चिरुन गेले होते. क्षणभर तिलाही वाटलं की विभीषण तिला काहीतरी वात्रट बोलत आहेत. त्यावर ती विचार करु लागली. तसा विभीषणच म्हणाला,
         "काय झालंय राणीसाहेब. आपण प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. कदाचित आपल्याला राज्यातील अराजकता दिसत नसावी वा सवतीवरुन प्रश्न निर्माण झाला असावा. वाटत असावं की मंदोदरी सवत म्हणून घरी येणार. ती पट्टराणी बनणार. तीच राज्यकारभार पाहणार. तर तसं काही समजू नका. ती सवत नक्कीच असेल. पट्टराणी नक्कीच असेल. परंतु राज्य चालविण्यासाठी. ती राज्याच्या नियमानुसार पट्टराणी असेल. परंतु खरी राणी तूच असेल माझी. शिवाय यातून मंदोदरीचीही चिंता मिटेलच. हे आपण विसरु नये. अन् सरमा हे राज्य आपलं नाहीच. जरी मी राजा बनलो तरी. हे राज्य आहे माझ्या थोरल्या भावाचंच. अन् त्या मंदोदरीचं. जी माझ्याच थोरल्या भावाची भार्या होती. तशीच ही राक्षस जात. यांना तीच योग्यप्रकारे सांभाळू शकते. दुसरं कोणीच सांभाळू शकत नाही त्यांना. मी आज राजा जरी असलो या राक्षसजातीचा. तरी जनतेनं मला राजा म्हणून स्विकारलेलं नाही. त्यामुळंच आपल्याला राजा म्हणून एक कर्तव्य बनतं की प्रजेला न्याय देणं. मग जो राजा प्रजेला न्याय देवू शकेल. तोच राजा बनण्यास योग्य आहे. मी तरी त्याला मानतोच. यावरही आपण विचार करावा."
         "महाराज, एक सांगू. प्रत्येक स्रिलाच वाटतं की तिची सवत घरात येवू नये. त्याबाबत द्वेष प्रत्येकच स्रिच्या मनात निर्माण होतो. आपण तर सांगीतलात की मला मंदोदरीशी विवाह करायचा आहे. काही पुरुषवर्ग असाही आहे आज जगात की तो सांगत नाही. सांगत नाही की मला पत्नी करायची आहे. थेट विवाह करुन घरात घेवून येतात. अशावेळेस स्री जातीला त्या इच्छा नसलेल्या, परंतु पतीनं पत्नी करुन आणलेल्या सवतीला झेलावंच लागतं ना. शिवाय हा राज्याचा प्रश्न आहे. राज्यात अराजकताही पसरली आहे ना. तोही प्रश्न सोडवायचा आहे. आता मी आपली राणीच नाही तर या लंकेची महाराणी आहे. पट्टराणी नाही असली तर काय झालं. माझंही एक कर्तव्य बनतं. ते कर्तव्य आहे राज्याची विस्कटलेली घडी बसवणं. ते मलाही कळतंय की हे राज्य आपल्या थोरल्या बंधूंचं आहे. त्यातच हे राज्य मंदोदरीचं आहे. जी आज एका कमऱ्यात बंदिस्त आहे. मलाही तिचं दुःख पाहावत नाही. सहन होत नाही. तेव्हा आपण जो काही निर्णय घेतला. तो योग्यच आहे. आपण करावा तिच्याशी विवाह. अन् तिला आणि राज्यालाही न्याय मिळवून द्यावा म्हणजे झालं."
          सरमानं विभीषणाला संमती दिली होती, मंदोदरीशी विवाह करण्याची. त्यासाठी तिनं स्वतःच्या मनावर दगड ठेवला होता. तिलाही वाटत होतं की विभीषणाची माझ्याशिवाय दुसरी पत्नी नसावी. परंतु लंकेत उपाय नव्हता व परिस्थिती तशाच स्वरुपाची निर्माण झाली होती. ज्यातून मंदोदरी व विभीषणाचा विवाह होणं क्रमप्राप्त होतं. शेवटी सरमानं विभीषणाला परवानगी देताच विभीषण तयार झाला मंदोदरीशी विवाह करण्यासाठी व त्यानं तिलाच मंदोदरीला विवाहासाठी तयार करायला लावलं.
             सरमाला म्हटल्यानुसार ती आपल्या पतीचा म्हणजेच विभीषणाचा विवाह मंदोदरीशी करण्यासाठी मंदोदरीच्या कक्षात गेली. जिथं मंदोदरीनं स्वतःला बंदिस्त करुन ठेवलं होतं. तशी ती जाताच तिनं आपलं प्रयोजन मंदोदरीला सांगीतलं व हेही सांगीतलं की मंदोदरी हा राज्याचा प्रश्न आहे. राज्यासाठी तुम्हाला माझ्या पतीशी म्हणजेच विभीषणाशी विवाह करावाच लागेल. यावर आपली सहमती हवी व आपण विवाह करण्यासाठी तयार व्हावं म्हणजे झालं.
         सरमानं आपल्या मनावर दगड ठेवून मंदोदरीसमोर निवेदन केलं. त्यानंतर ती परत आपल्या कक्षाकडे रवाना झाली. तिच्या मनातही दोन विचार होते. पहिला विचार होता की मंदोदरीचा आपल्या पतीशी विवाह होवू नये तर दुसरा विचार होता, मंदोदरीचा त्याचेशी विवाह व्हावा. दुसऱ्या विचारात काहीसं तथ्य होतं. ते तथ्य म्हणजे राज्याची घडी आणि मंदोदरीच्या विरहाचा म्हणजेच एकांतवासाचा प्रश्न सोडवणे. त्यासाठी तिनं आपल्या मनावर व भावनेवर दगड ठेवला होता.
         सरमानं म्हटलेले शब्द. त्यावर मंदोदरी फक्त मी उद्याला सांगते एवढंच बोलली. त्यानंतर तिनं पुन्हा स्वतःला तिच्या कमऱ्यात बंदिस्त करुन टाकलं होतं.
         आज मंदोदरीसमोर वेगवेगळे विचार होते. ती विचारांच्या चक्रव्यूहात फसली होती. त्यातच आज तिला निर्णय घ्यायचा होता. काय करायचं त्यावर. 
          ती विचारांची रात्र. ही दुसरी रात्र होती की तिला झोप आली नव्हती. ती संपूर्ण रात्र तिनं जागरणातच काढली होती. त्यातच ती आजही सकाळ होण्याचीच वाट पाहात होती. अशातच मागच्यावेळसारखीच पक्षांची किलबिल सुरु झाली. अन् तो अंधकार जावून उजेड आला. तसा तोच उजेड तिच्याही जीवनात येणार होता. ज्याची ती वाट पाहात होती.
         आजची सकाळ ही मंदोदरीसाठी सुवर्णयोग घेवून आली होती. तशी ती सकाळीच तयार झाली व तिनं लागलीच एका दासीकरवी सरमाला निरोप पाठवला व सांगीतलं की ती विभीषणाशी विवाह करायला तयार आहे. त्यातच सरमाद्वारे विभीषणाच्या कानावर बातमी गेली व त्याने संपुर्ण राज्यात दवंडी पिटवली की विभीषण व मंदोदरीचा विवाह होणार आहे. कुणाचं काही दुमत असेल तर कळवावं.
         ती विभीषणानं राज्यात दिलेली दवंडी. त्या दवंडीचा परिणाम एवढा झाला की संपुर्ण राज्यात आनंदीआनंद पसरला होता. पुढं रितीरिवाजानुसार मंदोदरी व विभीषणाचा विवाह थाटामाटात पार पडला. ठरल्याप्रमाणं मंदोदरीला विभीषणानं राज्याची पट्टराणी बनवलं व तीच राज्यकारभार पाहू लागली. आता लंकेची प्रजाही खुश झाली होती व खुशीनं मंदोदरीचा विवाह त्यांनी स्विकार केला होता. तसा विभीषणही खुश झाला होता. परंतु ज्या जाणीवेनं मंदोदरीनं विवाह केला होता विभीषणाशी. ती मंदोदरी आजही खुश नव्हती. आजही तिला आठवत होत्या गतकाळातील गोष्टी. त्या गोष्टी. ज्या गोष्टी तिच्यासोबत घडल्या होत्या व तिला वैधव्याचे काही दिवस कापावे लागले होते.