Mandodari - 7 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | मंदोदरी - भाग 7

Featured Books
Categories
Share

मंदोदरी - भाग 7

**७*********************** मंदोदरी घरातल्या घरात होती. तिनं बंदिस्त करुन ठेवलं होतं चार भिंतीत. तिला आठवत होता तिचा पती. पती परमेश्वर जरी नसला तरी तिचा पती तिच्यासाठी परमेश्वरच होता. तशी स्री जरी वंशवाढीची देवी जरी असली तरी त्याही काळात स्रियांना दुय्यम दर्जा मिळत होता. ते पाहून तिच्याही मनात कलह निर्माण झाले होते. असंख्य विचार तिच्या मनात येत होते. तशी ती एकाकी असल्यानं असंख्य विचार तिच्या मनात चालायचेच. ज्यातून ती अतिशय दुःखीच होत होती. वाटत असायचं की असं कुढत कुढत जगण्याऐवजी पती शरणावरच मरण पावली असती तर बरं झालं असतं. आज सतीप्रथा राहिली नाही. आज पती मरण ही तेवढी दुःखाची बाब मानली जात नाही. आजचा पती मरण पावल्यानंतर लोकं स्वतःला कोंडून घेत नाहीत मंधोदरीसारखं. आजची मंडळी नवरात्र म्हटला की फॅशन समजतात. त्यातच वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करणं मानतात. अंगावर वेगवेगळ्या स्वरुपाचे दागीणे वापरणं समजतात. त्याला आध्यात्म्याची जोड देतात. ज्यातून श्रीमंतांचं ठीक आहे. परंतु गरीबांची वाट लागत असते. त्यानं देवी पावत नाही. देवी काही आपल्याला तसं करायला सांगत नाही. तसं आपल्याला करायला लावतो व्यापारी. ज्याचा त्यात फायदाच असतो. नुकसान नाही. आपलं मात्र नुकसानच होतं. फायदा कधीच नाही. कधी कर्ज रुपानं तर कधी अंगावरील दागीणे चोरी जाण्यानं. आज नवरात्र उत्सव सुरु होतो व नवरात्र उत्सवात काही दिवसांपासून एक फॅशन आलेली आहे. ती म्हणजे रंगाची. अमूक दिवशी अमूक रंगाचा वापर केला तर त्याचा फायदा होतो. म्हणजेच रंगालाही आधात्म जोडून व्यापारी कसा व्यापार करतात. याचं हे ज्वलंत उदाहरण अस्तित्वात आल्याचं दिसत आहे. त्यातच अगदी गरीबातील गरीब स्रियाही नवरात्राच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या वा वस्रे परिधान करु लागलेले आहेत. साहजिकच घरातील पैसे विनाकारण वस्रासाठी खर्च जरी होत असले तरी साड्या विकणाऱ्या व्यापारी लोकांची दुकानं खुप चालू लागली आहेत. नवरात्रात सोनार, दुकानदार आणि इतर तत्सम प्रकारच्या व्यापारी वर्गाचा फायदा होत असतो. दुसऱ्या प्रकारची फॅशन आली आहे दागदागीण्यांची. तसं पाहिल्यास गर्दीत सोन्याचे दागीणे घालून जावू नये असं म्हटलं जाते आणि जावूही नये. कारण चोरापासून सोन्याला लपवता येत नाही. शिवाय देवीच्या मंदिरात गर्दी असते व महिलांचं लक्ष देवी दर्शनात असते. त्यातच चोरांचं लक्ष देवी दर्शनात नसतं. ते लक्ष असतं वस्तू चोरण्यात. अशातच घात होतो व दागीणे चोरले जातात. मात्र तरीही महिला नवरात्रात देवीच्या दर्शनाला जातांना या गोष्टीचा विचार न करता पतीच्या मागं तकादा लावून सोनं खरेदी करायला लावतात व ते देवीच्या मंदिरात अंगावर घालून जातात. विचार असतो की तिथं महिला वेगवेगळे दागीणे घालून येतात ना. मग मीच का जावं रिकाम्या गळ्यानं. अर्थातच कमी सोनं घालून. परंतु आपल्या हे लक्षात येत नाही की काही काही महिला या बेन्टेक्सचे नकलीही दागीणे घालून जातात. जे सोन्यासारखेच वाटतात. परंतु जे असली सोनं घालून जातात. ते घेण्यासाठी याच काळात सोनारांच्या दुकानात गर्दी असते व त्याचा फायदा होत असतो. नवरात्राच्या काळात हार बनविण्यासाठी फुलं लागतात. त्यातच याच काळात फुलांचा व्यवसाय वाढतो व दरही वाढतात. त्यातच नवरात्री उत्सवाच्या निमित्यानं आधात्म जरी आणलं असलं तरी सर्वांचं पोट भरत असतं. ज्यात फुल पिकविणारे शेतकरी अर्थात माळी. वेगवेगळ्या रंगातील वेगवेगळ्या प्रकारची कापडं शिवणारे शिंपी, मुर्ती बनविणारे कुंभार, त्यातच वेगवेगळ्या स्वरुपाचे सामान विकणारे वेगवेगळ्या जातीधर्मातील दुकानदार. या सर्वांचा फायदा होत असतो. जे व्यापारी असतात. अन् फायदा व्हायलाच हवा. परंतु काही लोकं वेडेही असतात की ज्या नवरात्राला ती मंडळी आध्यात्म समजतात. तो नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी कर्जही करतात. जे कर्ज वर्षानुवर्ष चुकतं करता येत नाही. उदाहरणार्थ जसं नवरात्रात साजरा होणारा गौराई उत्सव. ज्यात एक विशिष्ट घर नवश कबूलीच्या नावावर आपल्या घरी गौराई मांडते. काही लोकं आपल्याच स्वतःच्या घरी ज्योत लावण्याचं काम करतात. म्हणतात की फायदा होतो. काहीजण नवश म्हणून ज्योत लावतात. म्हणतात की आमची मन्नत होती. काहीजण महागड्या साड्या घरी पैसे नसतांनाही घेतात. काहीजण हे सर्व करण्यासाठी त्रेधातिरपीट करतात. शेवटी काय मिळतं? नैराश्य येतं आणि हे नैराश्य तेव्हा येतं. जेव्हा आपल्या इच्छा पुर्ण होत नाहीत. जेव्हा आपल्या घराभोवती बँकवाले हेटा घालतात. जेव्हा आपल्या अंगावरील दागीणे चोरीला जातात. म्हणूनच देवीच्या नावानं महागडे दागीणे घेवून ते देवीच्या मंदिरातून चोरीला गेल्यास देवीला दोष देवू नये. कारण देवी काही आपल्याला दागीणेच तेही महागडे घालून दर्शनाला ये म्हणत नाही. तशीच देवी काही दररोज माझा आजचा रंग अमूक आहे असं म्हणत कपडे वा साड्या बदलवा म्हणत नाही वा देवी कोणालाच चांगली वेशभुषा करुन वा नटूनसजून दर्शनाला ये म्हणत नाही. तशीच देवी ही महागडा हार वा पुजेचं महागडं सामान घेवून ये म्हणत नाही. देवी तर हे सांगते की तुमच्या मनात माझ्याबद्दल भाव व करुणा आहे ना. मग माझ्या दर्शनाला नाही आले तरी चालेल. फक्त चांगले विचार ठेवा म्हणजे झालं. मी तुम्हाला पावेल. अन् ती त्याला पावतेही. जरी तो मंदिरात तिच्या दर्शनाला गेला नाही तरी. जर तो सात्विक विचारांचा असेल तर...... अलिकडे एक फॅशन आली आहे की वेगवेगळ्या साड्या परिधान करणे. त्यात आध्यात्म्य आणलेला असून आध्यात्म्याच्या नावावर व्यापारी वर्ग आपला व्यापार करीत आहेत आणि त्यांचं ते बरोबरही आहे. कारण त्यांनी तसं केलंच नाही वा करु शकले नाही तर ते व्यापार कसा काय करु शकतील? त्यामुळंच त्यांचं दररोज वेगवेगळ्या रंगाची कापडं वापरा म्हणणं साहजिकच आहे. परंतु आपण विचार करायला हवा आणि कल्पना करायला हवी की ज्या वेळेस ती देवी महिषासूर नावाच्या राक्षसाशी लढत होती. तेव्हा तिच्या अंगावर कापडं असतील. ती रानावनातील जनावरांची कातडं किंवा झाडांची साल वा पानं आणि आजच्या काळानुसार कपड्याची आपण कल्पना केल्यास जी साडी असेल. ती साडी महिषासूर राक्षसाच्या रक्तानं लाल वा कथ्थ्या रंगाची झालेली असेल. साहजिकच तोच रंग प्रत्येक दिवशी तिच्या अंगावर असेल. मग कुठं आला दररोज बदलणारा वेगळाच रंग. तशीच ती जेव्हा महिषासूराशी लढली असेल, तेव्हा कुठं आलं होतं तिचं सजणं व वेगवेगळ्या प्रकारचे दागीणे घालणं. तशीच रुपसज्जा करणं. ती साध्या रुपातच व वेशभुषा न करता वा कोणतंही सौंदर्य प्रसाधने न लावता लढली असेल. तसाच आज आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केल्यास ती आपल्यालाही तेच सांगते की माझ्या मंदिरात या व खिसे कातरुपासून सावध राहा. ती आपल्याला नित्य सांगत असते की माझी भक्ती करा. परंतु वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घेण्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून वा कर्जबाजारी होवून नाही, तर एक फाटकीतुटकी साडी असलेली चालेल. फक्त मनात चांगूल भक्तीचं गाठोडं असायला हवं. परंतु आपल्याला काय की आपण ते ऐकणार. आपल्याला वाटते की चांगले सजलो, धजलो वा वा अंगात दागीणे घातले. दररोज वेगवेगळ्या रंगाच्या साड्या बदलवल्या की देवी प्रसन्न होणार. परंतु असं होत नाही. होतं, ते आपल्या मनातील चांगल्या विचारसरणीनं. जी विचारसरणी आपल्याला परमोच्च पदापर्यंत पोहोचवू शकते. आपल्याला परमोच्च आनंद देवू शकते. विशेष म्हणजे आजची देवीच्या नावानं दररोज वेगवेगळ्या साड्या बदलविण्याची प्रथा ही व्यापारी दृष्टिकोनातून आलेली प्रथा असून ती व्यापारी वर्गांनी आपल्या फायद्यासाठी आणलेली आहे. ती फॅशन विशेषकरुन लक्षात घ्यावी. त्यात फसू नये. हं, आपण कदाचित श्रीमंत असाल तर त्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल. परंतु गरीबांनी तरी विनाकारण त्याला अवास्तव महत्व देवून कर्ज करु नये. सुखी व समाधानी राहावे. कारण देवी आध्यात्मिक विचार करतांना आपल्याकडून दररोज परिधान केलेल्या साड्या पाहात नाही. पाहते तो आपल्या मनातील भक्तिभाव. जो आपल्याजवळ असायला हवा. तो बाळगावा व तसे वागावे, म्हणजे पावलं. मंदोदरी रावण मरण पावल्यानंतर उदास राहायची. तिला करमायचं नाही घरी. त्यातच सतत आठवण यायची तिच्या पतीची. तिचं दुःख हे सागराएवढं विशाल होतं. हे सर्व राम पाहात होते. ज्याला ते पाहून तिच्याबद्दल दुःख वाटत होतं. तसा विचार यायचा आणि आठवायचे ते रावणाचे शब्द. जणू त्यांनी रावणाला मृत्यूवेळेस वचनच दिलं होतं. आज रावण जीवंत नव्हता. परंतु जीवंत होते ते त्याचे विचार. जे विचार आज जगाची गरज बनली होती. त्यासाठीच रावणानं मंदोदरीलाही जीवंत ठेवलं होतं. सती जाण्यापासून वाचवलं होतं. विचार केला होता की तीच ते अनमोल विचार जगाला सांगेल. त्याच विचाराच्या अनुषंगानं रामही विचार करीत होते. विचार करीत होते की तिच्याही जीवनात सुख यावं. रावणाच्या म्हणण्यानुसार तिचा विवाह विभीषणाशी लावून द्यावा. तसं पाहिल्यास त्यावेळेस अनेक पत्नी करण्याच्या गोष्टीला प्राधान्य दिलं जात होतं. तसे राम विचार करीत होते की तो विवाहाचा विचार ते विभीषणाजवळ काढतील. परंतु तशी संधी येत नव्हती. अशातच ती एक वेळ उगवली. ती सकाळची वेळ होती. असाच तो एक दिवस उजळला. ती सकाळची वेळ उजळली. राम फेरफटका मारायला अशोकवाटिकेत आला. राम ज्यावेळेस अशोकवाटिकेत आला. त्यावेळेस झुळझूळ वारा सुटला होता. अंगाला गारवा जाणवत होता. पक्षी झाडावर किलबिल करीत होते. ते पाहून त्याचं मन मोहून गेलं होतं. राम अशोकवाटिकेत आले होते व ती अशोकवाटिकाही रामाच्या पदस्पर्शानं धन्य झाली होती. तसं पाहिल्यास ती अशोकवाटिका राम येण्याची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहात होती. अशातच राम आले. ती अशोकवाटिका....... ज्या अशोकवाटिकेनं त्यांच्या पत्नीला छळलं. बऱ्याच दिवसांपासून तिथंच तिला बंदी बनवून ठेवलं होतं रावणानं. जी सीता नजरकैदेत होती रावणाच्या. ती याच अशोकवाटिकेत होती. ज्या अशोकवाटिकेचा त्यात दोष नव्हता. ती तर रावणाचे सीतेवर होत असलेले अत्याचार अगदी निमुटपणानं सहन करीत होती. तीच अशोकवाटिका आज रामाच्या पदस्पर्शानं धन्यता अनुभवत होती. राम अशोकवाटिकेत विहरत होते. तशी त्याच्या सोबत त्याची भार्या सीताही होती. दोघंही फिरत होते, त्याच अशोकवाटिकेत. अशातच तिथं अचानक विभीषणाची स्वारी आली. विभीषणही फिरण्यासाठी अशोकवाटिकेत आले होते. ती अशोकवाटिका...... त्या अशोकवाटिकेत अनेक प्रकारची झाडं होती. परंतु सर्वात जास्त झाडं ही अशोकाचीच असल्यानं त्या वाटिकेला अशोकवाटिका हेच नाव देण्यात आलं होतं. त्या अशोकवाटिकेत एकेकाळी देवदेवता विहरत असत. त्यांना अतिशय आनंद वाटत असे. परंतु कालांतरानं जेव्हा तेथे रावणाचं राज्य स्थापन झालं. तेव्हा त्याच अशोकवाटिकेनं अनुभवलं की त्या ठिकाणी राक्षसलोकंच विहारतात. देवांना जराशीही जागा शिल्लक नाही. परंतु आज रावण मरण पावल्यानंतर राम नावाच्या पतीतपावनाच्या पदस्पर्शानं पावन होताच तेथील विचारही पावन होणार होते. विभीषण अशोकवाटिकेत आले होते. जिथं राम आधीच उपस्थित होते. विभीषणाची अचानक स्वारी व त्यातच रामाची उपस्थिती. तसं चर्चेला गुऱ्हाळ फुटलं. आधी इकडल्या तिकडल्या चर्चा झाल्या. त्यातच रामाला आठवलं ते रावणाला दिलेलं वचन. ते वचन होतं मंदोदरीचा विवाह. वचन होतं की रावण मरण पावताच मंदोदरीचा विवाह विभीषणाशी लावून द्यावा. तसं त्यांनी तिचं दुःख पाहिलंच होतं. तोच ते विभीषणाला म्हणाले, "विभीषणा, आता तुम्ही राजे बनलात. आम्हालाही लंकेतून अयोध्येत जायचं आहे. आज चौदा वर्ष पुर्ण झाले आहेत. तसे अयोध्यावासीही माझ्या येण्याची चौदा वर्षापासून वाट पाहात आहेत. सर्व कार्य संपन्न झाले आहेत. मात्र एक कार्य अपुर्ण राहिलेलं आहे. ते पुर्ण झालं की मगच सुखानं आम्ही प्रस्थान करु शकू अयोध्येत." ते रामाचे बोल. ते रामाचे बोल आश्चर्यात टाकणारे होते. काय बोलत होते ते. ते काही समजत नव्हतंच. त्यात उलगडा नव्हता. ते पाहून विभीषणानं म्हटलं, "भगवन, आपण काय बोललात ते काही समजलं नाही. आपले बोल हे आश्चर्यात टाकणारे आहेत. कदाचीत आपण काहीतरी वेगळं बोलत असावे असं वाटतंय. तसं पाहिल्यास लंकेतील सर्वच तर कार्य पुर्ण झाली आहेत. आता कोणतंच कार्य बाकी राहिलेलं मला तरी दिसत नाही." विभीषण बोलून गेला. त्यावर लगेच राम म्हणाले, "विभीषणा, आणखी एक कार्य बाकी आहे." "कोणतं कार्य करायचं बाकी आहे भगवन?" "ते कार्य आहे तुमच्यात हातात." "कोणतं कार्य आहे भगवन. आपला आदेश आम्ही ताबडतोब पुर्ण करु." "नाही विभीषणा, त्यासाठी आपलं वचन हवं मला. वचन द्या की आपण ते कार्य अवश्य पुर्ण कराल." विभीषण विचार करीत होते. विचार करीत होते की असं कोणतं कार्य असेल की जे कार्य आतापर्यंत झालं नाही. तोच ते काही वेळ बोलले नाहीत. ते पाहून राम म्हणाले, "काय झालं विभीषण? कुठं आहात आपण?" "भगवन, आपण आज्ञा करावी. आपण आता जर म्हणत असाल की एखाद्याचं शिर उडवा, तर मी तेही करणार. आपण फक्त आज्ञा करावी. असं कोड्यात बोलू नये. स्पष्ट स्पष्ट बोलून टाका भगवन." "स्पष्ट स्पष्ट बोलू, तर ऐका." राम म्हणाले. तसा टक लावून त्यांचं बोलंणं विभीषण ऐकू लागले. तसे राम म्हणाले, "हे बघ, विभीषणा, आता एक कार्य बाकी राहिलं आहे. ते म्हणजे मंदोदरीचा विवाह. तो करायचा आहे. तेच एक कार्य बाकी आहे." "मंदोदरीचा विवाह! भगवन मंदोदरीचा विवाह? कोण करणार भगवन तिच्याशी विवाह? अन् ती विधवा आहे रावणाची. त्या त्रैलोक्यस्वामींची की ज्यांना संपुर्ण ब्रम्हांड घाबरत होतं." "कोण करणार म्हणजे? आपणच करणार तिच्याशी विवाह. मी आपला विवाह लावून देणार. साक्षदार बनणार आपल्या विवाहाचा." "पण भगवन, हे शक्य तरी आहे काय? ती माझ्या वडीलबंधूची भार्या. लोकं काय म्हणतील. अन् ते तिला मान्य तरी होईल काय? शिवाय वडीलबंधूंची भार्या ही आईसमान असते." "होय, पण?" "पण काय भगवन?" "ही तुमच्याच वडीलबंधूंची इच्छा होती. इच्छा होती की तिनं विभीषणाशी विवाह करावा माझ्या मृत्यूनंतर. तुम्ही आपल्या वडील बंधूंची आज्ञा मोडणार काय? तसं असेल तर आपलीही गणती त्याच राक्षकुलात होईल. ज्या गणतीत आपलाच भाऊ रावण मोडत होता. जरा विचार करा. ही माझी आज्ञा नाही तर आदेश आहे आपल्याला. तसं पाहिल्यास ही लंका आपण जरी राजे बनले असाल तरी आपली नाही. ही लंका आहे त्या रावणाचीच. अन् आता त्याची पत्नी मंदोदरीची. आपण तिच्याशी विवाह करा आणि सन्मान द्या तिला. आम्ही तर आज ना उद्या जाणार. परंतु आम्हाला तिचं दुःख सहन होत नाही. शिवाय ते रावणाला दिलेलं वचनही छळतं आम्हाला. आम्हाला रात्र रात्र झोप येवू देत नाही ते वचन. आज माझी भार्या आणि मी, एवढ्या वर्षानंतर एकत्र आलो. त्यातही असा विचार आमच्या मध्ये असला तर आम्हाला झोप तरी लागणार काय? आपण यावर थोडासा तरी विचार करावा. विचार करावा की आम्ही आपल्या फायद्याचीच गोष्ट करीत आहोत. नुकसानाची गोष्ट करीत नाही. आपण जर असा विवाह करीत नसाल तिच्यासोबत तर आम्ही तिला असं एकाकी सोडणार नाही आपल्या राज्यात. आम्ही तिला आमच्या राज्यात घेवून जावू. त्यातच तिला सन्मान देवू. जो सन्मान आम्ही आमच्या राज्यात एका स्रीजातीला देत असतो." राम बोलत होते व विभीषण रामाचे खडे बोल ऐकत होते. ते पाहून विभीषणाचे डोळे खाड्कन उघडले व ते रामाला म्हणाले, "भगवन, आपण जे बोलता आहात. ते कदाचित चांगल्यासाठीच बोलत असावेत. तसंही हे राज्य माझ्याच वडीलबंधूचं आहे. त्यांच्यानंतर ते त्यांच्या पत्नीचे. परंतु आमच्याकडे जी प्रथा आहे की पुरुषच राज्य चालवतो. त्यानुसार मला हे राज्य चालविण्यासाठी हाती घ्यावे लागले. त्यांचे उपकारच आहेत आमच्यावर. राहिला विवाहाचा प्रश्न. तोही मंदोदरीसोबत. परंतु ते त्यांना तरी मान्य आहे काय की आपणच गोष्टी करतोय विवाह प्रस्तावाच्या." "विभीषणा, ते सर्व माझ्यावर सोडा. फक्त तुमचा विचार सांगा. तुम्हाला मान्य आहे काय हा विवाह? तुम्ही तिच्याशी विवाह करायला तयार आहात काय?" "भगवन, आपण म्हणत असाल तर ठीक आहे. आम्ही तिच्याशी विवाह करायला तयार आहोत. परंतु ती तयार असायला हवं. बळजबरी नको." "ठीक आहे तर. आम्ही तयार करतोय मंदोदरीला. तेच एक कार्य बाकी राहिलंय आमच्यासाठी. ते कार्य संपन्न झालं की आम्ही खुशाल जावू अयोध्येला. अन् खुशाल निवांत राहू." राम बोलून गेले व विभीषणही तयार झाले होते मंदोदरीशी विवाह करण्यासाठी. जी गतकाळात एका राज्याची पट्टराणी होती. रामानं विभीषणाशी वार्तालाप करुन त्याचं मन मंदोदरीशी विवाहाबद्दल तयार केलं होतं. आता राहिला होता प्रश्न मंदोदरीचा. तर तोही प्रश्न त्यांना सोडवायचा होता. त्याची संधी ते पाहात होते. तसं पाहिल्यास मंदोदरी ही रावणाच्या मृत्यूनंतर बाहेरच निघत नव्हती. तिनं राजमहलाच्या चार भिंतीत स्वतःला कैद करुन टाकलं होतं. अशातच एक दिवस रामानं मंदोदरीला आपल्या भेटीचं आमंत्रण एका दुताकरवी पाठवलं. बहाणा बनवला व म्हटलं की त्यांना अयोध्येत आजच जायचं आहे. तेव्हा आपल्या भेटीची आसक्ती आहे. आपण जर भेटले तर बरं होईल. रामानं पाठविलेला दूत. तो दूत मंदोदरीच्या कक्षात आला. त्यानं रामानं सांगीतलेला निरोप जसाच्या तसा मंदोदरीजवळ कथन केला. तोच मंदोदरीनं त्याला मनोमन पाठवलं. परंतु ती रामाला भेटणार की नाही हे तिनं सांगीतलं नाही. तसं पाहिल्यास ती रामाला आदर्श मानत होतीच. तिचा राग निवळला होता. ती रामाला दिलेला शापही विसरली होती. रामाकडून आलेलं भेटीचं आमंत्रण. ते आमंत्रण ऐकताच ती मनोमन खुश झाली. तसं तिला आठवलं, तिच्या पतीनं तिला म्हटलेल्या गोष्टी. म्हटलं होती की तिनं त्यांच्या मृत्यूनंतर विभीषणाशी विवाह करावा. राम आदर्श आहे. तेच लावून देणार तिचा विवाह विभीषणासोबत. परंतु क्षणात तिला दुःख झालं. दुःख झालं आपला पती गेल्याचं. रावण वाईट होता. परंतु तो लोकांसाठी वाईट होता. तो आपल्या पत्नीसाठी वाईट नव्हता. तो आपल्या पत्नीवर निरतिशय प्रेम करीत होता आणि त्या प्रेमासाठीच तो तिला आपल्या मरणानंतरही दुःखात पाहू शकत नव्हता. म्हणूनच त्यानं तिला परामर्श दिला होता की तिनं त्याच्या मृत्यूनंतर आपला विवाह विभीषणाशी करावा. रामानं भेटीचं आमंत्रण पाठवताच मंदोदरी तयार झाली रामाच्या भेटीला. कदाचित त्यातून तिच्या दुःखाचा मार्ग निघू शकणार होता. तिनं त्यावर परिपूर्ण विचार केला व ती रामाच्या भेटीस निघाली. तसा थोड्याच वेळात रामाचा कक्ष आला. जिथं सीताही प्रामुख्यानं बसली होती. मंदोदरी रामकक्षात आली. तेव्हा तिला प्रत्यक्ष तिथं सीता दिसली. आठवलं की ही तीच सीता. जी आपली मुलगी आहे गतकाळात जन्माला घातलेली. ही आपली मुलगीच आहे की जी रक्तबीज प्राशनातून निर्माण झालेली आहे. माझ्या पतीनं मारलेल्या साधूसंतांचं व निरपराध पशु पक्षांचं जे रक्तबीज आपण प्राशन केलं होतं. तेच रक्तबीज म्हणून सीता जन्मास आली आहे. म्हणजे साक्षात निरपराध माणसांची हत्या करणाऱ्या रावणाचा बळी घ्यायला ही अवतरली होती तर...... हे रक्तच आहे साधुसंतांचं व त्या पशुपक्षांचं. सीता ही प्रत्यक्ष यम व राम हा यमाचा दूत. सीता ही साध्य तर राम हे साधन. सीता ही साध्य तर राम हे माध्यम. माझ्या पतीला ठार करण्याचं. जे माझ्याच पोटातून उत्पन्न झालं. म्हणतात की स्वतःची मुलं हीच आपल्या पित्याचा उद्धार करतात. पुत्र जेव्हापर्यंत आपल्या वडील, आईच्या टिकोरीला पाय मारत नाही. तेव्हापर्यंत जळत्या चितेलाही मोक्ष मिळत नाही. तेच घडलं इथंही. सुरपंखाही तशी निमित्तच ठरली. सीता ही माझ्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारच होती, जरी सुरपंखेचं नाक कापलं गेलं नसतं तरीही. तशी ती त्याच गोष्टीवर विचार करु लागली होती. ती विचारच करीत होती. तोच तिच्या मनात दुसरा विचार आला व आठवलं. 'सीता ही माझीच पुत्री. त्या साधुसंतांचं रक्त प्राशनातून झालेली. मला राग आला होता भयंकर माझ्या पतीचा. मी त्यांना सुधरविण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु ते सुधरत नव्हते. ते पाहून मला भयंकर राग आला. अन् तसा राग कुणालाही आला असता. वाटलं असतं आपण मरुन जावं. तसं मलाही वाटलं. या जगात जीवंत असू नये. या जगतातून कायमची मुक्ती मिळवावी. म्हणूनच मरणाच्या निमित्यानं व इच्छेनं मी ते रक्तबीज प्राशन केलं. परंतु घडलं उलट. एक विलक्षण शक्ती माझ्यात संचारली व मी गरोदर राहिली. मी सीतेच्या वेळेस गरोदर होती. परंतु ते प्रत्यक्ष माझ्या पतीलाही सांगू शकली नाही. अन् कशी सांगणार. सांगणार की त्यांनी मारलेल्या निरपराध लोकांचे रक्त मी प्राशन केले. ज्यातून मी गरोदर आहे. ते मी त्यांना सांगूच शकत नव्हती. अन् ते त्यांना माहीतही होवू दिलं नाही मी.' मंदोदरी विचारच करीत होती. तोच रामाने तिला प्रश्न केला. "मी एका महत्वाच्या विषयावर वार्तालाप करायला बोलायलंय तुम्हास." "कोणता विषय आहे?" "आहे एक अति महत्वाचा विषय." "सांगावा. अशी विनंती आहे आपणास." "विनंती नाही आज्ञा म्हणा. कारण आजही आपण महाराणी आहात. महाराणी या लंकेची." "ती कशी काय? लंकेचा राजा तर केव्हाच मरण पावलाय. आपण अशी थट्टा करु नका. ही थट्टा राजशिष्टाचाराला शोभत नाही राम." मंदोदरी जशी रामकक्षात आली. तशी सीताही तेच बोलणं ऐकत होती व विचार करीत होती की तिचं तिथं थांबणं बरोबर नाही. तोच तिनं एक आस व्यक्त केली व ती तेथून जावू लागली. तोच रामानं तिला थांबवलं व त्यांनी तिच्याशी थेट बोलणं सुरु केलं. ज्यात तोच तिच्या विवाहाचा प्रस्ताव होता. राम व मंदोदरीचा तो वार्तालाप. तसे राम तिला गोष्टीगोष्टीत म्हणाले, "मी आपणाला विवाहासाठी बोलावलं आहे. माझा विचार आहे की आपण विभीषणाशी विवाह करावा. हे मी म्हणत नाही तर ही आपल्याच पतीची इच्छा होती. आपण विवाह करावा व लंकेची पट्टराणी बनावं. आपण यावर विचार करावा व सांगावं की आपणाला माझा हा प्रस्ताव स्विकार आहे काय?" ते रामानं म्हटलेले शब्द. तसा राम आदर्शच. जे ते करतील. ते तो योग्यच करेल. तशी ती त्यावर विचारच करीत होती. तोच सीता म्हणाली, "आईसाहेब, आपण माझी आईच आहात. मी लहानपणीच माहेर सोडलंय. आज चौदा वर्ष झाले माझ्या आईची भेट नाही. आपणच मला आईची माया दिली. आपणच माझं लाड केलं सुलोचनेसारखं. आपली इच्छाही होती की आपल्या पतीनं मला सोडावं. कैदेत ठेवू नये. परंतु आपण तरी काय करणार? आपल्या पतीच्या इच्छेपुढं आपलं तरी कुठं चालत होतं. आपणही अभागीच होता. परंतु आता मागचं ते सगळं जावू द्या. नवीन पाहा. राज्याची घडी बसवा. लंका आपल्याविना पोरकी आहे. लंकावासी विभीषणाला मानत नाहीत आजही. मानतात आपल्यालाच. तेव्हा आपण करुन टाका ना विभीषणाशी विवाह. विभीषणजी चांगले आहेत. चांगल्या विचारांचे आहेत. ते आपला सन्मानच करतील. आपला सन्मान राहील लंकेत. आपल्याला कुणी एवढंसंही दुःख देणार नाहीत लंकेत. आपल्यासाठी कोणी ब्र ही काढू शकणार नाहीत. जर आपल्या पाठीमागं विभीषण असले तर...... हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा आपण विभीषणाशी विवाह कराल. शिवाय तोच दर्जा मिळेल आपणाला. जो आपल्या पतीच्या काळात आपणाला मिळत होता. झटकून टाका ना ते दुःख. जे आपणाला आपल्या पती निधनानंतर झालंय. असं समजा की मी आपलीच कन्या आहे." ती सीता. ती सीता बोलत होती तेजस्वी वाणीनं. ती सीता. जी तिचीच स्नुषा असलेल्या सुलोचनाच्या बहिणीची म्हणजेच सुनयनाची मुलगी होती. ज्या सुनयनानं राजा जनकाशी विवाह केला होता. जिचं नातंगोतं न पाहता तिच्या पतीनं तिला उचलून आणलं होतं लंकेत. नात्यानं ती त्यांची नातीनच झाली होती. ती नातीण आज मंदोदरीला आई संबोधीत होती. तसंच तिला माहीतच होतं की ती सीता तिचीच मुलगी आहे, रावणापासून आजतागायत लपवून ठेवलेली. ती मुलगी मंदोदरीनं रक्तबीज प्राशन करुन जन्मास घातली होती. नातीन की मुलगी? मंदोदरीच्याही मनात संभ्रमच निर्माण झाला होता. सीतेचे ते बोल. ते बोल ऐकून मंदोदरीचं ह्रृदय द्रवलं. क्षणभर तिला सुलोचनेचीच आठवण झाली. आठवलं की ती सुलोचना. जिला ती स्वतःची मुलगीच मानत होती. आठवलं की तीच सुलोचना, जिच्यावर ती प्रेमच करीत होती मुलीसारखंच. मुलगी नसल्याचं दुःख असल्यानं. जी सीता नावाची तिला मुलगी झाली होती. त्याही मुलीचा धाकानं तिनं त्यागच केला होता कायमचा. ती तिला आपली मुलगीही समजू शकत नव्हती. ना तिला मुलगी म्हणू शकत होती. मात्र ती मुलगी असल्याचं मंदोदरीलाच माहीत होतं, सीतेला नाही. तसे तिचे आता सर्व मुलं मरण पावले होते. एकही उरला नव्हता आता वंशाला वारस. अट्टाहासानं व आपल्याच पतीच्या जिद्दीनं तिच्या मुलांनाही तिला दावणीला लावावं लागलं. बिचारी तिच्याच गर्भातून जन्मलेली मुलं एकापाठोपाठ एक अशी सीतेसाठीच मरण पावली. हवं तर ती शत्रूच. परंतु मंदोदरी आदर्शवान स्री होती. तिला सीतेवर राग नव्हताच. तिच्या पतीवर राग होता. त्यांनी तिचा पती हिरावला होता. ज्यावर ती प्रेम करीत होती निरतिशय. आता तिचा रागही निवळला होता. थोडासा शिल्लक होता. अन् तो थोडासा रागही असला तरी तो तिनं मनोमन आवळला व विचार करु लागली. तसे तिला काहीच विचार सूचत नव्हते. तोच ती म्हणाली, "राम, जी गोष्ट शक्य नाही. आपण तीच बोललात. मला हा विवाह मान्य नाही व मी तसं करु शकणारही नाही. माझं मनही तसा विवाह करायला मंजूरी देणार नाही. आपण हा विचार तुर्तास त्यागून द्यावा." ती म्हणाली व तेथून ती निघून गेली. तसं निघून जातांना तिच्या मनात असंख्य विचार होते. अन् असंख्य अशा वेदनाही होत्या. ज्या वेदना रक्ताळलेल्याच होत्या. ज्यातून तिनं आपला पतीच नाही तर लंकेतील आपल्या मुलांसह सर्वच जीव खोवले होते. ज्यातून लंकेनं आपलं अस्तित्व खोवलं आहे. असं तिला वाटत होतं. ज्या वेदना तिला स्पष्टपणे जाणवत होत्या. राम व सीतेनं मंदोदरीचं बोलणं व त्या विवाहाबद्दलचं उत्तर स्पष्टपणे ऐकलं. त्यानंतर त्यांना वाटलं की तिचा विभीषणाशी विवाह होवू शकत नाही. ही अशक्य अशी बाब आहे. त्यामुळंच ती साकार करण्याऐवजी आपण येथून निघून अयोध्येत गेलेलं बरं. तसा विचार करताच आज सांजच्यालाच येथून निघून जावं असा त्या दोघांनीही विचार केला व त्यांनी तसं प्रयोजन विभीषणालाही सांगीतलं. विभीषण त्याच दिवशी त्यांना पाठवायला तयार नव्हता. परंतु रामानं त्याच गोष्टीवर जोर दिला व शेवटी म्हटलं की ते अयोध्येत जाणारच आहेत. परंतु जेव्हा संधी चालून येईल. तेव्हा त्यानं मंदोदरीशी विवाह करावा. तिला अंतर देवू नये म्हणजे झालं. ठरल्याप्रमाणे आज संध्याकाळ झाली होती व राम आणि सीता अयोध्येला परत जाण्यास निघाले होते. परत जातांना त्यांच्या मनात असंख्य अशा आठवणी होत्या. त्या आठवणी की ज्या आठवणी लंकेत राहतांना त्यांना अनुभावयास मिळाल्या होत्या.