Mandodari - 8 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | मंदोदरी - भाग 8

Featured Books
Categories
Share

मंदोदरी - भाग 8

******८***********************

            मंदोदरी घरी आली होती. तसा तिला विचार आला होता तिच्या विवाहाचा. तोच तिनं आपल्या कमऱ्याचा दरवाजा आतमधून लावून घेतला व स्वतःला दाराच्या आत कोंडून टाकलं नेहमीसारखं व विचार करु लागली विवाहाचा. एक मन म्हणत होतं,
          'मी विवाह करावा. तोही माझ्या पतीचा हत्यारा त्या विभीषणाशी. तो विभीषण की ज्यानं ऐन वेळेस माझ्या पतीचा साथ सोडला. तो जावून भेटला त्या रामास की ज्यानं माझ्या प्रिय पतीची हत्या केली. जर तो माझ्या पतीकडून असता तर रामाला मारताच आलं नसतं माझ्या पतीला. कारण माझे पती हे अमर होते. त्यांच्यात विचारांचं आत्मबळ होतं. ते ज्ञान होतं की ज्या ज्ञानानं ते अमर झाले होते. ते खचले त्याच गोष्टीनं. जी गोष्ट विभीषण त्यांना सोडून गेल्यानं घडली. ते खचले आपला भाऊ, तोही लाडका भाऊ सोडून जाण्यानं. ते मनोमन त्याच गोष्टीचा विचार करीत होते. त्यांना मुलांचं मरण पाहिजे त्या प्रमाणात अवघड वाटलं नाही. परंतु त्यांना अवघड वाटलं भाऊ विभीषणाचं जाणं. अन् तो रामही आमचा शत्रूच. मग कसं ऐकणार रामाचं अन् कसा करणार विभीषणाशी विवाह?'
        तो तिचा एक विचार. तिच्याच मनात आलेला. तोच दुसरा विचार आला. 
          'आपल्या पतीचीच इच्छा. आपला पती आपल्याला म्हणत होता की त्यांच्या मृत्यूनंतर मी विभीषणाशी विवाह करावा. मी लंकेची पार्वती म्हणून जगावं. जीवंत राहावं मी. त्या गोष्टीसाठी की जी गोष्ट त्यांना त्यावेळेस ऐन मृत्युसमयी प्राप्त झाली होती. म्हणत होते की तीच गोष्ट मी समाजाला द्यावी. समाजाला त्या गोष्टीची गरज आहे. म्हणत होते की ज्ञान हे जास्त मिळूच नये माणसाला. जास्त ज्ञान मिळालं की त्याचीही मातीच होते. अति तिथं माती सारखी. त्यांनीच म्हटलं होतं की राम आदर्श आहे. जे माझ्या प्रारब्धात लिहिलं होतं. तेच घडलं. शिवाय हेही म्हटलं होतं की राम जे काही करेल, ते चांगलंच करेल. तू विभीषणाशी विवाह कर व एक पट्टराणी म्हणून जग.'
          मंदोदरी विचार करीत होती. विचार करीत होती, 'ही वेळ चांगली आली आहे नव्हे तर संधीच. विभीषणाशी विवाह करण्याची आणि लंकेची पार्वती म्हणून नाव मिळविण्याची. कदाचित विभीषणाशी विवाह करताच मी लंकेची पट्टराणी म्हणून राज करु शकेल. स्वतःचा माझ्या पतीच्या मृत्यूनंतर धुळीस मिळालेला सन्मान विभीषणाशी विवाह केल्यानंतर परत मिळवू शकेल. अन् ती सीता तरी काय वाईट बोलली. तशी ती माझ्या स्नुषेच्या बहिणीचीच मुलगी. सुनयनाची ती दत्तक मुलगी. अन् माझीही अज्ञात मुलगीच. तिनंच तिला लहानाचं मोठं केलंय. बिचारी तिही अनाथच. राजा जनकाला त्याच्या नांगराच्या फाळात सापडलेली. तसं पाहिल्यास माझे पती वाईटच. कोणाचं न ऐकणारे. ऐकलं जर असतं तर मरण पावले नसते. मरणानं शिवलं नसतं त्यांना. परंतु अभिमानी मोठे. मारले गेले आपल्या अभिमानानंच.'
          मंदोदरी दिवसभर विचित्र असा विचार करीत होती. तिच्या मनात दिवसभर चित्र विचित्र विचार येत होते. शेवटी त्यातून मार्ग निघाला. मार्ग असा की आपण विभीषणाशी विवाह करावा. मग त्यानंतर काहीही होवो. येणाऱ्या परिस्थितीचा स्विकार करावा. त्याच विचारांच्या चक्रव्यूहात दिवसभर विचार करता करता रात्रही झाली. ते तिला कळलं नाही. 
          बरीच रात्र झाली होती. लामणदिवे लागले होते. कितीतरी वेळा तिच्या दासीनं तिला आवाज दिलेत. परंतु सकाळी त्यांना एकांत म्हणून तिनं सांगीतलं होतं. त्यामुळंच आता त्यांनी जास्तवेळेस तिला आवाज देण्याचं टाळलं. 
          ती शेवटची वेळ होती. रात्र बरीच झाली होती व तिच्या पोटात कावळेही ओरडू लागले होते. तशी ती होशात आली. तो सकाळपासून करीत असलेला विचार गळून पडला. तोच ती अन्नाच्या शोधार्थ दासीला आवाज देवू लागली. अन् त्या अंधाऱ्या रात्री भुकेच्या कोलाहलानं तिची दासी धावतच तिच्या कक्षात आली. म्हणाली,
           "काय राणीसाहेबा."
           "दासी, मला भूक फार लागलीय. जरा जेवन तयार कर."
            "जेवन तयार आहे राणीसाहेबा."
            "अन् मी कसली राणी अन् कसली राणीसाहेब. मला राणीसाहेब म्हणू नकोस. नाव घे नाव. मंदोदरी म्हण."
           "जी." दासी म्हणाली व निघून गेली.
             मंदोदरीनं जेवनावर आज बर्‍याच दिवसांनी खमंग ताव मारला. तशी ती बाहेर निघाली. बाहेर चंद्राचा लख्खं प्रकाश पडला होता. आज पौर्णिमाच होती की ज्या चंद्राचा शितल प्रकाश स्पष्टपणे जाणवत होता. तसा तिच्या मनात विचार आला. आपण विभीषणाशी विवाह करावा. अन् ती गोष्ट आपण रामाच्याच कानावर टाकावी.
           मंदोदरीनं लवकरच जेवन आटोपवलं होतं आणि ती अंथरुणावर आडवी झाली होती. तोच तिला वाटायला लागलं होतं की रामाला आपण केव्हा भेटतो व केव्हा नाही. तसाच विभीषणाशी विवाह करण्याची गोष्ट आपण रामाला केव्हा सांगतो आणि केव्हा नाही. तशी ती रात्र जाण्याची वाट पाहात होती. तिला झोप येत नव्हती व ती इकडून तिकडं व तिकडून इकडं अशी सारखी कुस बदलवीत होती.
            रात्र जात होती. तसतसे मंदोदरीच्या मनात विचार येत होते. तसे तिच्या मनात विचार आलेत. तिच्या पहिल्यावेळेस मिलनाचा. ज्या दिवशी तिला रावण भेटला. त्यावेळचे विचार तिच्या मनात आले होते. ती जेव्हा आपल्या आईवडिलांच्या घरी राहात होती. 
           ती हेमा नावाच्या अप्सरेची मुलगी होती. ज्या अप्सरेवर1 तिचे वडील मय नावाचे राक्षस मोहीत झाले होते व त्यांनी विवाह केला होता. त्याच दोघांच्या मिलनातून ती आली होती व त्यामागे तिच्या जन्माची कथा थोडी वेगळीच होती.
         मय व हेमाला दोन मुलं होती. मुलगी नव्हती. तसं पाहिल्यास मंदोदरीला आठवत होता तिचा गतकाळ. त्यातच तिला तिचा पुनर्जन्मही आठवायला लागला होता. पुर्वजन्मात ती मधुरा नावाची अप्सरा होती व ती देवी पार्वतीची भक्त होती. त्याच भक्तीपोटी एकदा ती कैलास पर्वतावर पार्वतीला भेटायला गेली असता तिथं पार्वती नव्हती. फक्त शिव भगवान होते. त्यातच तिनं शिव भगवानाचे संमोहन रुप पाहिले व ती त्यांच्याकडे आकर्षित झाली. परंतु ज्यावेळेस पार्वती तेथे परतली. तेव्हा तिनं ते पाहिलं. तेव्हा तिला भयंकर राग आला व तिनं मंदोदरीला शाप दिला की तू बारा वर्षपर्यंत बेडकीच्या रुपात राहशील. 
           तो शाप....... तो शाप शिवभगवानाला माहीत झाला. त्यांना वाटलं की यात तिची काहीच चूक नाही. एक शुल्लकशी घटना आहे. ज्यात एवढा मोठा शाप बरा नाही. म्हणूनच त्यांनी पार्वतीला म्हटलं की त्यात तिची पाहिजे त्या प्रमाणात चूक नाही. मग एवढा मोठा शाप कशाला? तू आपला शाप परत घे. त्यावर प्रतिक्रिया देतांना पार्वती म्हणाली,
           "भगवन ज्याप्रमाणे भात्यातून निघालेला तीर परत भात्यात जात नाही. तसाच तोंडातून निघालेला शाप आहे. तो कसा काय परत जावू शकेल तोंडात. हं, एक होवू शकते. दिलेल्या शापाची कालमर्यादा नक्कीच कमी होवू शकते."
          तिनं मंदोदरीला दिलेल्या शापाची कालमर्यादा कमी करुन ती एक वर्षाची केली. ज्यातून ती एक वर्षासाठी बेडकी बनून विहिरीत राहिली. 
           एक वर्ष पुर्ण होत आला होता. त्यातच तिचं बेडकीचं रुप बदलून तिचं रुपांतरण एका कन्येत होणार होतं. त्यात एक वर्ष पूर्ण होताच तिचं रुपांतरण एका कन्येत झालं व ती लहानशी मुलगी विहिरीत रडत बसली होती.
           मय महर्षी कश्यप व त्याची पत्नी दितीचा पुत्र. एकदा स्वर्गलोकातून कामकाज आटोपून तो आपली पत्नी हेमाला घेवून त्याच रस्त्याने येत होता. त्यांना तहान लागली होती. त्या कारणानं ते दोघंही त्याच विहिरीजवळ थांबले. त्यातच त्यांना ती कन्या विहिरीत रडतांना दिसली. तसे त्यांना दोन पुत्रच होते. मुलगी नव्हती. तशी त्यांना मुलगी जास्त प्रमाणात आवडत होती. वाटलं की ही मुलगी आपली आवडनिवड पाहून आपल्याला मिळालेली आहे. त्यांनी लगेच तिला वर काढलं व लहानाची मोठी केलं. मंदोदरी त्यांना विहिरीत सापडल्यानंतर कुंभीनी झाली. 
         मंदोदरीला सगळं आठवायला लागलं होतं. तिचा जन्म आणि त्यातच आता तिला आठवत होता तो रावण मिलनाचा काळ. मयनं मन्दोर इथं राजधानी स्थापन केली होती. त्यानं त्या विहिरीतून मिळालेल्या कन्येला आपल्या घरी आणलं आणि मन्दोरच्या नावावरुन मंदोदरी नाव दिलं. एकदा रावण मय राक्षस नात्यातीलच असल्याने त्यांच्या घरी आला. त्यानं तिचं रुप पाहिलं. जे अप्रतिम होतं. तशी ती जुन्या जन्मात अप्सराच होती. त्यातही ती आता तरुण होती व तिचं सौंदर्य खुललं होतं. त्यांनी तिचं सौंदर्य पाहताच जबरदस्तीनं तिचा हात मयला मागून घेतला व ठरल्याप्रमाणे तिला लंकेची पट्टराणी बनवलं. 
         मंदोदरीला आठवत होता तो काळ. तिला रावणानं जेव्हा मागणी घातली होती. तेव्हा तो तिला आवडला नव्हता. कारण तिला आठवत होतं की ती सात्विक होती. परंतु रावण सात्विक नव्हता. तो मारलेल्या निरपराध पशू पक्षाचं रक्त गोळा करीत असे. 
          मंदोदरीला आठवत होती ती सीता जन्माची गोष्ट. तिनं रावणाशी विवाह केल्यानंतर तिला रावण जरी सुखात ठेवत असला तरी तो तिला काही काळ आवडला नाही. त्यातच तिला वाटायचं की मी एवढी सुंदर आणि मजबुरीनं माझी व माझ्या वडिलांची इच्छाही नसतांना त्याच्या घरी पडले. ते पाहून तिनं एकदा रागाच्या भरात तेच निरपराध साधू संत व पशुपक्षांचं रक्तबीज प्राशन केलं. ज्यातून तिनं एका पुत्रीला जन्म दिला. तीच सीता होती. जिला धाकानं तिनं त्यागलं. तिला आज आठवत होतं की ती सीता, त्याच निरपराध पशूपक्षांच्या शापातून निर्माण झालेली असून ती ज्यानं त्यांची हत्या केली होती. त्याचाच बदला घेण्यासाठी आली होती जन्मास. तिनंच रावणाच्या हत्येसाठी कदाचित जन्म घेतला होता. मग अनर्थ कसा टळणार. अन् ज्यावेळेस तिनं सीतेला जन्म दिला होता. त्यावेळेस ती मुलगी ज्याठिकाणी तिनं ठेवली होती. त्याच ठिकाणाहून राजा जनकाला मिळताच ती आपलीच मुलगी असल्याचं तिला माहीतही झालं होतं. त्यातच तिच्या प्रत्येक, हालचालीवर लक्ष ठेवून असणारी मंदोदरी. तिला हेही माहीत होतं की तिचा रामाशी विवाह झालेला आहे.
           आज तिला फार वाईट वाटत होतं. वाईट वाटत होतं की ज्या मुलीला आपली एक कन्या म्हणून सुनयनानं वाढवलं. ती आपलीच कन्या आहे. अन् त्याचा प्रत्यय तिनं जेव्हा पहिल्यांदाच सीतेला पाहिलं होतं. तेव्हा आला होता. आज तेच ते तिला आठवत होतं. शिवाय हेही आठवत होतं, तिचा पतीसोबत एवढ्या दिवसाचा असलेला सहवास. तिचा विवाह जरी रावणासोबत जबरदस्तीनं झाला असला वा तिनं जरी आपला विवाह जबरदस्तीनं रावणासोबत केला असला तरी तो विवाह आज तिला आवडत होता. त्याचं कारण होतं रावणाचं तिच्यावर प्रेम असणं. रावण प्रसंगी बाहेरच्या जगतात काहीही करो. तो तिच्यावर प्रेम करायचा. तसंच त्यानं कितीही बाहेर पत्नी केल्या असल्या तरी राज्यात तिच्याशिवाय दुसरी राणी नव्हती व तिलाच त्यानं पट्टराणीचा दर्जा दिला होता. दुसरीला नाही. तिला आठवत होतं, त्याचं तिच्यावर निरतिशय प्रेम असणं. आज एकीकडे तिचीच मुलगी सीता होती तर दुसरीकडे तिचाच पती रावण होता. शिवाय आज रावण जीवंत नव्हता. त्यातच त्या रात्री तेही तिला आठवलं की ती सीता. जी सीता तिची मुलगी आहे. ती सीता तिचं दुःख पाहू शकत नाही. तीच सीता तिला आपला विवाह करायला सांगतेय. आपलं सुख बघतेय. काय करावं. शेवटी विचार करुन तिनं ठरवलं. आपण विभीषणाशी विवाह करावा. तो विवाह उद्याच करावा व आपण विवाह करतोय हे राम आणि सीतेला सांगावं. 
          तो तिचा अंतरीम निर्णय. त्यावर तिला आता वाटायला लागलं होतं की रात्र केव्हा केव्हा संपते. 
           ती रात्र....... त्या रात्रीला तिला झोपच आली नाही. अशातच पक्षांची चिलबिल सुरु झाली व वाटलं की सकाळ झाली आहे. तसा तिला आनंद झाला. ती लगेच अंथरुणावरुन मोकळी झाली.
          आज तिच्या आनंदाचा दिवस होता. सगळं जुनं पुराणं विसरुन ती विभीषणाशी विवाह करणार होती. त्यासाठी ती राम व सीतेची मदत घेणार होती. त्याच क्षणाची वाट पाहात पाहात अंधार नाहिसा झाला व उजेड आसमंतात पसरला. तशी ती लवकरच तयार झाली. अन् तिनं दासीला आवाज दिला. म्हटलं की दासी आपल्याला राम आणि सीतेला भेटायला जायचंय. जरा चालशील का?
           ते तिचं बोलणं. दासी तिला म्हणाली,
           "महाराणीसाहेब, राम आणि सीता निघून गेले अयोध्येत."
            "केव्हा?"
            "कालच."
            ते दासीच्या तोंडचे शब्द. तसे शब्द ऐकताच ती चूप बसली. तसाच मनोमन विचार करु लागली. विचार होता तोच विवाहाचा. आता आपला विवाह कसा होणार विभीषणाशी? आता आपल्याला विवाह करतांना कोण मदत करणार? आपला खरंच विभीषणाशी विवाह होणार का? आपण खरंच लंकेची पट्टराणी बनणार काय?
         मंदोदरीच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. वाटत होतं की ती मंदोदरी काल एका राज्याची पट्टराणी होती. जिचं पट्टराणीपद आज रावणाच्या मृत्यूनं उतरलं आहे. ते तेव्हाच मिळू शकते, जेव्हा आपला, रावणाचा भाऊ विभीषणाशी विवाह होईल.