हे ऐकून ऊमा म्हणाली हो ..तिच्या मनाची तयारी झाले हे मला समजले आहे .आता सगळे एकदा व्यवस्थित जुळून आले म्हणजे बरे होईल उद्या सकाळी नऊ वाजता सतीशला यायला सांगितले आहे चौकात तो भेटला की येतोय आम्ही साडेदहा अकरा पर्यंत “हो मोहन .. ऊमा म्हणाली सांगितले सगळे नयनाने मला फार खुश होती बघा ..या तुम्ही उद्या आणि मी सांगितले आहे तसे मला वेळोवेळी मेसेज करीत रहा बर का “ऊमाला होकार देऊन मोहनने फोन ठेवला .ऊमा परत बाहेरच्या खोलीत आली आणि नयनाशेजारी झोपून तिच्या अंगावर हलकेच हात टाकला.उद्या काय काय होईल ..कसा असेल सतीश ...?बाबाचे नाव घेणे सोडलेल्या नयनाला आवडेल का परत बाबाला भेटायला काय होईल तिची प्रतिक्रिया ?एक ना दोन ..शंभर प्रश्न मनात येत होते तिच्या लेक उगाच वाढदिवसाच्या दिवशी नाराज नको व्हायला मोहनला सतीश म्हणत होता त्याला माझी क्षमा मागायची आहे असे .क्षमा मागणे हा विषय जाऊदे ..पण नंतर मी आता चांगले वागेन हा दिलेला शब्द तरी निदान तो पाळेल ना ?तिच्या मनात उलट सुलट विचारांची एकाच गर्दी झाली होती .खरेच तो जर चांगले वागला तर आपल्या या लेकीला निदान पुढच्या आयुष्यात तरी बाबाची साथ मिळेल.आपल्यालाही हवी आहे पतीची सोबत पती कसाही असला तरीही बाईला त्याची सोबत आयुष्यात अतिशय आवश्यक असते .आणि .. मुलीला बापाचे छत्र हवेच,जे तिला खरेच आवश्यक आहे अशा विचारात उशिरा कधीतरी तिचा डोळा लागला .. सकाळी नेहेमीसारखीच जाग आली नुकतेच सहा वाजत होते नयना अजून झोपेत होती .झोपेत तिने ऊमाच्या गळ्यात हात टाकले होते .तिच्याकडे बघत बघत हळूच ऊमाने ते हात बाजूला केले .इतकी गोड दिसत होती नयना झोपेत..तिच्या गोऱ्या गोबऱ्या गालावरचा तीळ बघून सतीशची आठवण आलीच .आज भेट होणार होती आता सर्वांची .कदाचित या पुनर्मिलनाची इच्छा सतीशने मनापासून बाळगलेली असावी .म्हणूनच आज त्याला मूर्त स्वरूप येणार होते . ती उठली आणि दार लोटून आत आली.फ्रेश होऊन तिने स्वतःसाठी चहा टाकला .चहा पीत पीत आजच्या कामांची उजळणी केली .जवळ जवळ सर्व काम पुरे झालेच होते .किती तरी वर्षानंतर ..आज जेवायला सतीश असणार होता ..त्यालाही श्रीखंड खूप आवडते .बटाटेवडा मात्र नाही आवडत त्याला त्यापेक्षा भजीच आवडतात .ऊमाला आठवण झाली पूर्वी काकुकडे ती बटाटेवडे करीत असे तेव्हा सतीशसाठी वेगळी भजी नेहेमी करीत असे .खूप दिवसांनी सतीशच्या आवडी निवडीचे विचार तिच्या डोक्यात यायला लागले होते .आंघोळ करून ती पुढच्या कामाला लागली इतक्यात नयना उठून आत आली .तिला खुर्चीवर बसवत ऊमाने तिचा पापा घेतला आणि म्हणाली हैप्पी बर्थडे नयना....नयना खूप खुश झाली आणि आईच्या गळ्यात हात टाकून थ्यांक्यू म्हणाली ..चला ब्रश करून घ्या आता आणि बोर्नव्हिटा प्यायला या ..नयना हसत हसत बाथरूम कडे पळाली ..नयनाचे आवरल्यावर ऊमाने तिला आंघोळ घातली आणि आणलेला नवीन गुलाबी फ्रॉक घालायला दिला .“नयना आता मी तुला औक्षण करणार आहे बर का ..मग बाप्पाला नमस्कार करून काढून ठेवायचा हा फ्रॉक आणि दुसरा एक नवा फ्रॉक आहे ना तो घालायचा बर का .संध्याकाळी केक कापताना आणि कार्यक्रमाला परत हा फ्रॉक घालायचा आहे फोटो पण काढायचे आहेत न तुझे .“हो आई मी फक्त फ्रॉक घालून शेजारच्या आजीना नमस्कार करून येईन मग बदलेन फ्रॉक ..”शेजारच्या आजीकडे ती नेहेमी खेळायला जात असे .शिवाय ऊमाच्या अनुपस्थितीत ती आजीकडेच खेळत असे .त्यामुळे दोघींना एकमेकींचे खूप प्रेम होते .नवा फ्रॉक ,कानातले, गळ्यातले घातल्यावर नयनाला ऊमाने ओवाळलेनयना पण देवाच्या पाया पडली आणि तिने आईला पण नमस्कार केला .नयनाचा एक गोड पापा घेऊन ऊमाने तिला आशीर्वाद दिला .“खूप मोठी हो नयना आणि सुखी राहा”नयना शेजारच्या आजीकडे गेली तोवर ऊमाने बटाटेपोहे फोडणीला टाकले .नयना आजीकडून धावत धावत परत आली .“आई हे बघ आजीने मला काय दिले ते ..आजीने नयनाला एक छोटीशी . गळ्यात घालायची गुलाबी रंगाची पर्स दिली होती .नयनाने लगेच आईकडून पैसे मागितले .ऊमाने पण तिला शंभर रुपयाची नोट पर्समध्ये ठेवायला दिली .पर्समध्ये पैसे ठेवून ती गळ्यात घालून बराच वेळ नयना स्वतःकडे आरशात निरखून बघत होती .ऊमा पण कौतुकाने तिच्याकडे पाहत राहिली .“आई मोहन मामा आला की मला हाक मार ग ..त्याने मला सांगितले आहे तो लवकर येणार आहे असे ..”असे आईला सांगून कपडे बदलून,पोहे खाऊन नयना वाड्यातल्या मैत्रिणी सोबत खेळायला गेली.आता दहा वाजत आले ऊमा स्वयंपाकाच्या कामाला लागली होती .पण लक्ष तिचे मोहनच्या मेसेज कडे होते .फोन तिने जवळच ठेवला होता .परत अर्धा तास गेला आता मात्र तिने स्वतःच मोहनला मेसेज केला.निघाला का .?..कुठवर पोचला असा ...थोड्या वेळात त्याचे उत्तर आले सतीश अजून आला नाही त्याची वाट पहातो आहे असा .बापरे अजून सतीश तिथे पोचलाच नाही कधी येणार हा आणि कधी निघणार हे दोघे ऊमाच्या घरी पोचायला तिथून दोन तास लागणार होते ..आणि अजूनही मोहन आला नाही हे समजल्यावर नयनाच्या शंभर प्रश्नांना उत्तरे द्यायला लागतील ती वेगळीच ..आणखीन पंधरा वीस मिनिटे गेली आणि परत मोहनचा मेसेज आला .मला फोन करा असा ..आता काय झाले असेल बरे ?असा विचार करून ऊमाने फोन लावला .नयना अजूनही बाहेरच होती ते एक बरे होते .मोहन म्हणाला ,वहिनी अहो सकाळी नऊ वाजल्यापासून इथे येऊन थांबलो आहे .आता अकरा वाजून गेले तरीही मोहनचा पत्ता नाही बघा “फोन करून पाहिलात का त्याला ?ऊमाने विचारले “हो तेही केले ना पहिल्या दोन तीन वेळेस फोन बिझी येत होता ..नंतर लागतच नव्हता ..आणि आता मात्र फोन बंद येतो आहे .काय करावे ते समजेना झालेय .तिकडे नयना पण वाट पहात असेल न ...?मोहनने विचारले मोहन आत्ता ती गेलीय मैत्रिणीकडे ..पण आली की माझे डोके उठवेल ..बघा आता असे करता का? तुम्ही निघा तिथून रस्त्यात त्याला फोन लावलात किंवा त्याचा फोन आला तर त्याला पत्ता सांगून यायला सांगा ..पण आता थांबु नका साडेअकरा वाजायला आले जेवायची वेळ होत आली आहे तुम्ही खाल्ले तरी आहे का काही निघताना ?ऊमाने काळजीने विचारले “हो आईने पोहे केले होते ते खाऊनच निघालो आहे .पण आता या उन्हात वाट पाहून पाहून डोके दुखायला लागले आहे भूक पण लागायला लागली आहे .आता नाही थांबत निघतो मी तेथून ..नयनाने माझ्याविषयी विचारले तर गाडी खराब झाली आहे असे सांगा “मोहन म्हणाला ..“हो आता तेच सांगायला लागणार आहे असे म्हणून ऊमाने फोन ठेवला .आता स्वयंपाक सगळा पुरा झाला होता .मनात विचारांचे काहूर घेऊन ती वाट पाहत बसली क्रमशः