मोहन म्हणाला मला माहित आहे नयना माझ्या फोनची वाट पाहत असणार उद्या मी नयनाला फोन करणार आहेच तिच्या वाढदिवसाला मी नक्की येणार आहे असे सांगायला आणि शिवाय तिला गिफ्ट काय हवे आहे ते सुद्धा विचारायच आहे मला ..तेव्हा मी तिला सांगेन मी तुझ्यासाठी आणखी एक खास गिफ्ट आणणार आहे ते तुला खूप खूप आवडेल असे ..आणि मग ऐनवेळी मी माझ्यासोबत सतीशला घेऊन आल्यावर तिची आणि तिच्या बाबाची भेट होईल वाढदिवसाला ती खूप आनंदात असणार अशावेळी बाबाची भेट झाल्यावर तिला नक्कीच आनंद होईल .निदान त्या दिवशी तरी तिची नाराजी जरी असेल तरी दाखवू शकणार नाही .सतीशला पण मी त्या दिवशी फोनवर सांगितले आहे की तु सुद्धा अगदी चांगल्या इस्त्रीच्या कपड्यात ये ..म्हणजे नयनाही आनंदाने तुझा स्वीकार करेल ..मी त्याला पाहिले नाही पण एकंदर बोलण्यावरून त्याची स्थिती फारशी ठीक असेल असे वाटत नाही अशा परिस्थितीत हे सांगणे मला योग्य वाटले .”मोहनचा इतका समर्पक विचार ऐकून ऊमा पण निश्चिंत झाली .ती म्हणाली ,“मोहन अगदी परफेक्ट प्लानिंग आहे तुमचे.असेच करूया तुम्ही फक्त त्या दिवशी माझ्या संपर्कात रहा सतीश भेटला की लगेच मला मेसेज करा आणि कळवा कारण आपल्याला सतीशविषयी फोनवर नाही बोलता येणार नयना सतत त्यादिवशी माझ्या सोबत असेल “असे दोघांचे बोलणे झाल्यावर ऊमा आपल्या कामाकडे वळली त्यानंतर तिच्या मनात अनेक विचारांची नुसती गर्दी झाली होती .फोनवर इतका वेळ बोलणे झाल्याने तिचे कामही बरेच पेंडिंग राहिले होते .ते सर्व आज पुरे करूनच जायला लागणार होते कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तिने रजा मागितली होती तिला नयनाच्या वाढदिवसाची तयारी करायला लागणार होती .शनिवारी दुकानाला सुट्टीच असायची त्या दिवशीच नयनाचा वाढदिवस होता .मनातल्या विचारासकटच तिने एक एक काम आवरायला सुरवात केली .तसेच शेजारच्या आजींकडे खेळणाऱ्या नयनाला उशीर होईल असा निरोप दिला रोज सहा वाजेपर्यंत उरकणारे तिचे काम आठ वाजले तेव्हा आटोपले .दुकानातील एक सहकारी रोज नऊ वाजता दुकान बंद करीत असे .सकाळी बँकेत पैसे भरायची जबाबदारीही त्याचीच असे .त्याला उद्याच्या सर्व सुचना सांगून पैसे असलेल्या पेटीची किल्ली त्याच्याकडे देऊन ती बाहेर पडली .दुसऱ्या दिवशी मोहनने खास नयनासाठी फोन केला होता .“हेलो नयना काय झाले का वाढदिवसाचे प्लांनिंग ?मामाचा आवाज फोनवर ऐकून नयना आनंदित झाली .“हो मामा चालू आहे ..मला तर वाटले तु विसरलास की काय माझा वाढदिवस ?मोहन लाडाने तिला कधीकधी बच्चू म्हणते असे ..“काय हे बोलणे बच्चू ?हा मोहनमामा काय इतका विसराळू आहे की काय ?मी येणार आहे की त्या दिवशी आणि अगदी लवकर येणार आहे .दुपारी तु आई आणि मी एकत्रच जेवणार आहोत बर का ..आईला सांग मामाला श्रीखंड पुरी आणि आईचे खास बटाटेवडे हवेत.हे ऐकून नयना म्हणाली ..“मामा तुझा स्पेशल बेत तर आईने आधीच ठरवला आहे .आणि बटाटेवडे तरआपल्या दोघांचेही फेवरेट आहेत ना ..संध्याकाळच्या पार्टीचा तोच मेन्यू आहे .पण मामा तु मला गिफ्ट काय आणणार आहेस ?.”काय पाहिजे आमच्या बच्चूला ?आणि आईने काय घेतले आहे तुला गिफ्ट .?”मोहनने विचारले मला न आईने एक मस्त गुलाबी फ्रॉक घेतला आहे अगदी माझ्या आवडीचा .मामा तु मला एक बुद्धिबळ पट गिफ्ट दे ..मला शिकायचे आहे बुद्धिबळ खेळायला आणि तेही तुझ्याकडून ..आईने मला सांगितले आहे तु खूप छान खेळतोस म्हणून ..”नयनाच्या बोलण्यावर मोहन म्हणाला ,“नक्की आणणार बुद्धिबळ पट आणि आपण दोघे नक्की खेळूया मी शिकवेन तुला अगदी सोपे असते ते खेळायलापण तुला सांगू का ..मी तुझ्यासाठी आणखी एक अगदी स्पेशल गिफ्ट पण आणणार आहे ते बघून तर तु खूशच होशिल,,”काय रे मामा काय आणणार आहेस ..?नयनाने एकदम उत्साहित होऊन विचारले ...त्यावर मोहन म्हणाला ...“ते तर सिक्रेट असणार आहे माझे ..तुला आत्ता नाही सांगणार मी..अगदी तुझ्या आईला सुद्धा नाही सांगणार ..”हे ऐकून नयनाला हसू आले..मग मोहनने परत तिला येण्याचे पक्के प्रोमीस करून फोन बंद केला.फोन ठेवून नाचत नाचतनयनाने आईला फोनवरचे बोलणे सांगितले .तिच्या खुललेल्या चेहेऱ्याकडे ऊमा पहातच राहिली ..वा मज्जा आहे बुवा एका मुलीची !!!असे म्हणाली ..नयना बाहेर खेळायला गेली ती आपल्या मित्र मैत्रीणीना आमंत्रण देऊन परत आली .आता मध्ये एकच दिवस मग शनिवार येणार होता .आणि त्या दिवशी संध्याकाळी हा वाढदिवसाचा कार्यक्रम होता . ऊमाने दुसऱ्या दिवशी वाड्यातल्या काही बायकांना पण आमंत्रणे केली .मोहनच्या मित्राला म्हणजे तिच्या दुकान मालकांना पण तिने वाढदिवसाचे आमंत्रण दिले होतेवाड्यात मध्यभागी एक मोठा चौक होता .तिथे टेबल सजवले जाई ,खुर्च्या ठेवल्या जात ,मुलांसाठी मोठी सतरंजी अंथरली जात असे .तिथेच वाड्यातील सगळ्या मुलांचे वाढदिवस होत असत . वाढदिवसाच्या संध्याकाळच्या पार्टीचा मेन्यू नयनाने फिक्स केला होता .बटाटेवडा चटणी ,वेफर्स ,खोबऱ्याच्या वड्या आणि कैरीचे पन्हे असा भरगच्च बेत होता .शुक्रवारी दुपारीच ऊमाने वड्या आणि वेफर्स घरी करून ठेवले .कैरीचे पन्हे करण्यासाठी त्या उकडून त्याचा गर काढून त्यात वेलदोडा घालून ठेवला . ऊमा खूप सुगरण होती .तिने केलेला प्रत्येक पदार्थ चविष्ट होत असे . तिचा कामाचा उरक पण दांडगा होताशनिवारी दुपारी मोहन जेवायलाच येणार होता .त्याच्यासाठी तिने श्रीखंड पुरीचा बेत ठरवला होता .मोहनला खूप आवडायची श्रीखंड पुरी आणि बटाटेवडा तर मोहन आणि नयना दोघांचाही आवडता होता .शिवाय नयनाने पण मोहनमामाने फोनवर केलेली फर्माईश सांगितली होतीच .ऊमाने घरीच तयार केलेला चक्का काढून त्याचे श्रीखंड तयार करून फ्रीजला टाकले .इतर बारीक सारीक तयारी करताना रात्री अकरा वाजले .नयना केव्हाच जेवून झोपली होती .उद्याची वाढदिवसाची स्वप्ने आणि बेत झोपताना तिच्या डोळ्यात उमाने पाहिले होते .तिची लाडकी लेक खूप खूष होती . त्यात मोहनमामा काय गिफ्ट देणार आहे याची पण नयनाला अतिशय उत्सुकता लागून राहिलीहोती .गुलाबी हा तर नयनाचा अतिशय आवडता रंग होता .म्हणून ऊमाने तिच्यासाठी तिच्या आवडीचा, तिच्या पसंतीचा गुलाबी रंगाचा फ्रॉक आधीच घेतला होता .सगळे झाल्यावर आता पाठ टेकावी म्हणून नयनाशेजारी झोपणार इतक्यात फोन वाजला .आता इतक्या रात्री कोणाचा फोन? ..असा विचार करून तिने फोन पाहिला .तर फोन मोहनचा होता .तिने फोन उचलला आणि फोन घेऊन आत गेली .बाहेर ऐकू जाऊ नये म्हणून नयना झोपलेल्या बाहेरच्या खोलीचे दार तिने बंद करून घेतले .“बोला मोहन ..?असे बोलताच मोहनने बोलायला सुरवात केली “वहिनी एकट्याच आहात ना ?का नयना आहे सोबत ?नाही हो ती तर कधीच झोपली आहे ....ते ऐकून मोहन म्हणाला ..वहिनी झाले बर का माझे बोलणे नयना सोबत .सांगितले तिला सरप्राईजचे ....खुश झाली अगदी ..ती पण या सरप्राईजची वाट बघते आहे .क्रमशः