पुढचा आठवडा खूप गडबडीत गेला .सतीशने काकूंना साडी आणि काकांना कपडे घेतले .ऊमाला चार साड्या ,एक छोटे मंगळसूत्र आणि चार बांगड्या घेतल्या .सध्या हे लहान मंगळसूत्र चालवून घे ,हळूहळू तुला आणखी दागिने करीन .असेही त्याने ऊमाला सांगितले . ऊमा खुष होती ,सतीशच्या अशा बोलण्याने ती आणखीन आनंदी झाली .अखेर हे लग्न पार पडले .सतीशचा ऑफिसमधला मित्र मोहन, रमाच्या वाड्यातील चार पाच माणसे इतकेच लोक उपस्थित होते लग्नाला .लग्नानंतर सतीशचे दोन खोल्याचे चांगले सजवलेले घर पाहून ऊमाला खुपच आनंद झाला.सतीशला थोडीच रजा मंजूर झाली होती म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी ऊमा आणि सतीश हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेले .चार दिवस चांगल्या हॉटेलमध्ये त्याने बुकिंग केले होते .महाबळेश्वर ते चार दिवस ऊमा अतिशय खुष होती .जगातले अत्त्युच्च सुख जणु तिच्या पायाशी होते .सतीशने ऊमावर प्रेमाचा वर्षाव केला होता,जणु ते दोघे स्वर्गात विहरत होते .चार दिवसांनी मात्र दोघांनाही जमिनीवर परत यावे लागेल .आणि ते आपल्या घरी परतले .ते परतल्यावर काका आणि काकु पण ऊमाच्या घरी येऊन गेले . तिचा तो दोन खोल्यात मांडलेला आटोपशीर संसार पाहून त्याना बरे वाटले .ऊमाच्या घराच्या आसपास मात्र फारशी घरे नव्हती .गावाच्या थोडेसे एका टोकाला होते ते घर .म्हणून शेजार पाजार नव्हता . पण एकंदर असे सुंदर सजवलेले ऊमाचे घर पाहून काका काकु समाधानी झाले .हळूहळू त्यांच्या संसाराचा गाडा सुरु झाला .ऊमाने नोकरी सोडली नव्हती .सध्या चालू आहे तर असू दे मग पाहू असा तिचा विचार होता .सतीशची तर काहीच आडकाठी नव्हती कोणत्याच गोष्टीला .रोज दोघे एकदम डबे घेऊन बाहेर पडत आणि संध्याकाळी एकत्रच परत येत.दिवस असे अगदी कापरासारखे उडत होते .ऊमाला तर वाटत होते जणु आता आपल्या आयुष्यात फक्त सुखच सुख आहे .एकमेकांच्या सहवासात जगाची फिकीरच उरली नव्हती दोघांना.बेलचा आवाज ऐकुन ऊमा एकदम भानावर आली आणि भूतकाळातून परतली ..घड्याळ पाहिले तर चार वाजले होते .तिने दरवाजा उघडला कामवाली बाई आली होती .आणि तिला रितुची आठवण आली ,अरेच्या फोन करायचा आहे नाही का तिला ..मग लगेच तिने रितूला फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .रितुशी फोन वर बोलणे सुरु झाल्यावर रितू म्हणाली,”मावशी तुम्ही आला असता तर जास्त बरे वाटले असते .तुमच्या पाया पडून तुमचे आशीर्वाद घेतले असते ““माझे आशीर्वाद तर कायमच आहेतच ग तुझ्या पाठीशी .खुप शिक आणि खुप खुप मोठी हो .“ “धन्यवाद मावशी ...तुम्ही दिलेले लाडू खाल्ले ,किती छान झालेत मला तर जाम आवडतात तुमच्या हातचे लाडू आणि चिवडा तर खमंग होताच ..सर्वांनाच आवडले फराळाचे .तुमच्यासाठी काय काय पाठवू मी डब्यात ?”“जास्त काही नको ग ,रात्रीचे फारसे खात नाही मी .पण केक नक्की खाणार तुझ्या वाढदिवसाचा ..तेवढा मात्र पाठव बरे .. असे म्हणून आणखी थोडे किरकोळ बोलून ऊमाने फोन ठेवला .नेहेमीच्या वेळेला ऊमाने जेवून घेतले .स्वयंपाकघरातले सर्व आवरून ती टीवी पाहत बसली .नयना रितूकडून परत घरी आली तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते .आली तेव्हा खुपच खुशीत होती ती !!आल्याआल्या तिची बडबड सुरु झाली .“आई अग इतकी मजा आली न रितुकडे .आणि जेवण सुद्धा मस्त केले होते मावशींनी, वेगवेगळे खूप पदार्थ केले होते .संध्याकाळी पण आम्हा मुलींसाठी बाहेरून पिझा ,केक, पास्ता असे पण मागवले होते .अगदी पोट फुटेपर्यंत खाल्ले बघ आम्ही .आणि खुप दंगा आणि धमाल केली बघ..कसला जबरदस्त वाढदिवस साजरा झाला रितूचा ..!!आईच्या शेजारी बसून तिच्या खांद्यावर हात टाकत नयनाने विचारले “आई तु जेवलीस का ? पर्समधून एक डबा काढून तिने ऊमाकडे दिला हा केक दिलाय बघ तुझ्यासाठी डब्यात रितुनेरितुच्या आई तर बरेच पदार्थ देत होत्या पण तु फक्त केक दे म्हणलीस न ”नयनाचा आनंद बघून ऊमाला खूप बरे वाटले “हो ग झाले माझे जेवण झालेय आत्ताच ,पण खाते मी आत्ता थोडासा .... उरलेला उद्या खाईन ठेवून दे ”असे म्हणून ऊमाने थोडा केक खाल्ला आणि नयना तो डबा घेऊन आत गेली .कपडे बदलून परत नयना बाहेर आली आणि आईच्या शेजारी बसून तिच्या गळ्यात हात टाकत तिने विचारले .“आई तुझ्या लक्षात आहे का पुढल्या शनिवारी माझा पण वाढदिवस आहे ते “? “म्हणजे काय नयन?ही का विसरायची गोष्ट आहे ?काय हवेय तुला या वर्षी गिफ्ट सांग बरे माझ्याकडुन ?”ऊमाने विचारले .. “खास काही नको ग ,एखादा चांगला ड्रेस घेईन फक्त पण माझ्या मैत्रीणी मला पार्टी मागत आहेत ग ..खुप दिवस झाले त्या माझ्या मागे लागल्या आहेत .त्याचे कसे काय करायचे याचा विचार करतेय “तिचे हे बोलणे ऐकल्यावर नयना म्हणाली “पार्टी करता येईल ग मस्त ....खर्चाची पण तशी फारशी चिंता नाही पण आपल्या या लहान घरात अशी पार्टी करणे कसे जमेल ?”ऊमाच्या स्वरात थोडी काळजी होती .लेकीने कधी नव्हे तो प्रकट केलेली ही इच्छा आपल्याकडून पुरी होत नाही याचे वाईट वाटत होते तिला “मला समजते आहे ग हे आई, म्हणूनच मी त्यांना अजुन होकार नकार काहीच नाही सांगितले .पुढील वर्षी बारावी झाल्यावर आमचे सगळ्यांचेच मार्ग वेगळे होतील ना म्हणून ही शेवटची पार्टी त्या माझ्याकडे मागत आहेत ,आणि मलाही पार्टी त्यांना द्यावी असे वाटते आहे .मलाही वाटते आहे सर्व मैत्रिणी सोबत हा माझा वाढदिवस साजरा करावा“नयना म्हणाली.आता ऊमाला एक छान युक्ती सुचली ती म्हणाली .“ हे बघ नयन तु नाराज नको होऊ ,आपल्या घरी तर नाही करू शकत आपण पार्टी पण तु एखाद्या चांगल्या हॉटेलात घेऊन जा त्यांना आणि तिथे करू पार्टी .. खर्चाची तु अजिबात काळजी करू नको .एकदम दणदणीत झाली पाहिजे पार्टी अगदी तुला हवी तशी “आईच्या या बोलण्यावर नयना म्हणाली,“खुप खर्च होईल ग आई हॉटेलमध्ये अशा पार्टीला ...माहित आहे न तुला ..आणि खरेतर घरी तु सर्व पदार्थ इतके छान करतेस माग बाहेर कशाला बरे पैसे घालवायचे असे वाटते “तिचे असे शहाण्यासारखे बोलणे ऐकुन ऊमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला .“किती शहाणी आहे ग माझी बाळ..!!!नयन बाळा तुझ्यापुढे पैशाचे काय मोल ग ?कर जोरदार प्लानिंग पार्टीचे .तुझी आई काही कमी पडू द्यायची नाही बरे आहेत पैसे भरपूर माझ्याकडे अगदी दणक्यात साजरा करूया आपण तुझा वा