Reunion - Part 21 in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पुनर्मिलन - भाग 21

Featured Books
Categories
Share

पुनर्मिलन - भाग 21

मोहनच्या या बोलण्यावर सतीश म्हणाला .तु मला ऊमाचा नंबर देऊन ठेव पण खरे सांगू का .. मला आता तिच्यासोबत इतक्यात नाही बोलायचेमला कबुल आहे मी तिचा दोषी आहे पण ती मला माफ करेल का हे माहित नाही मला .. त्याच्या बोलण्यावर मी त्याला म्हणालो ,मग मला सांग आता तु काय करायचे ठरवले आहेस तुला खरेतर ऊमाची माफी मागायला हवी  तु मला फोन कशासाठी केला आहेस ?आणि मला भेटून तू काय करणार आहेस ?यावर सतीश म्हणाला कोणताही माणूस कितीही अपराधी असो त्याला पुन्हा सुधारायची एक तरी संधी दिली जाते .हे तर तुला माहित आहेच .. “ठीक आहे समजले मला प्रत्येकाला संधी मिळायला हवी काय ठरवले आहेस तु पुढे आता असे विचारताच सतीश बोलू लागला ,“मला ऊमाला तर भेटायचे आहेच  तिची माफी पण मागायची आहे .माझ्या प्रिन्सेसला भेटायचे आहे ..मी आता स्वतःमध्ये खूप सुधारणा केली आहे मला परत नवीन चांगले आयुष्य जगायची इच्छा आहे .आणि तु आमचे पुनर्मिलन घडवून आणावेस अशी माझी इच्छा आहे . एवढे उपकार माझ्यावर कर प्लीज करशील ?अहो वहिनी सतीशची ती अजिजीची भाषा ऐकून मलाही वाईट वाटले हो कसाही असला तरी पूर्वीचा जुना मित्र होता तो माझा त्याच्या चांगल्या वाईटात मी त्याची साथ दिलीय .हे ऐकून ऊमा म्हणाली ..मोहन अहो मला समजते ते ..तुम्ही तर माझ्या सुद्धा वाईट प्रसंगात उभे आहात कायम ..मग काय म्हणाला तो पुढे फोनवर ..मग मीच त्याला विचारले बोल काय करू आता तुझ्यासाठी ..त्यावर तो म्हणाला ..“दोन दिवसानंतर नयनाचा वाढदिवस आहे तेव्हा मला भेटायचे आहे तिला. वाढदिवसाची गिफ्ट पण द्यायची आहे तेव्हाच मी ऊमाशी मी बोलेन .तिची माफी मागेन माझा स्वीकार कर अशी तिला विनंती करेन ”मग मीच सांगितले त्याला ‘अरे पण वहिनी आता या गावात रहात नाहीत   ..काय..? मग कुठे आहेत दोघी?आणि काका काकु कुठे आहेत ..?असे त्याने अधिरतेने विचारलेमग मी त्याला सांगितले ,“तु गेल्यानंतर काही मागे वळून पाहिले नाहीस .का कधीच त्यांची चौकशी केली नाहीस तुझ्या माघारी त्या दोघींचे फार हाल झाले .काका काकु तर कधीच वारले .त्या दोघींना हे गाव सोडून जावे लागले “ हे ऐकल्यावर तो रडायलाच लागला ..मोहन कुठे असतील त्या दोघी आता ..?काय झाले असेल माझ्या प्रीन्सेसचे ...?कुठे शोधू आता त्या दोघींना ....?मग मी त्याला म्हणलो ...हे बघ त्यांची काळजी नको करूस तु .दोघी सुरक्षित आहेत मी त्यांची चांगली सोय करून दिली आहे  .त्या दोघी आता पुण्याजवळ राहतात ..हे ऐकल्यावर तो म्हणाला ...काय सांगतोस तु..? त्यांना इतकी मदत केलीस .?खरेच खूप उपकार झाले तुझे ..तूच त्यांना आधार दिलास म्हणजे तुला माहित आहे त्या कुठे आहेत .मला भेटायचे आहे त्यांना ..मला माझ्या प्रीन्सेसच्या वाढदिवसाला जायचे आहे ..मला घेऊन जा त्यांच्याकडे ...हे ऐकल्यावर मी म्हणलो ..,“ठीक आहे तु ये इकडे आपण दोघे मिळुन जाऊ त्यांच्याकडे ..मी पण जातोय नयनाच्या वाढदिवसाला पण त्याने मला थांबवले ..म्हणाला नाही नाही ..मोहन आता मी त्या गावात नाही येऊ शकत .तिथे येण्यात मला धोका आहे .तिथे मला बरेच लोक ओळखतात माझ्याविषयी बरेच काही सर्वांना माहित आहेत्यात तो पैशाचा झोल झाला ना ...त्यापेक्षा तु केव्हा जाणार आहेस ?तेव्हा मी तुला तुझ्यासोबत जॉईन होतो . हे ऐकून ऊमाला वाटलयाचा अर्थ हा माणूस अगदी हेतुपुरस्पर ऑफिसचे पैसे घेऊन गायब झाला आहे  मग आपल्या माघारी काहीही घडो त्याला परवाच नाही ..एकदा हा म्हणतो मी याला काहीच सहकार्य करीत नव्हते आणि परत माझ्याशी अशा प्रकारे वागला म्हणून पश्चात्ताप पण होतो आहे याला  आम्हा दोघी मायलेकींची काळजी पण वाटते .आहे .मोहन फोनवर ऊमाशी बोलतच होता मग मी त्याला सांगितले मी त्या दिवशी सकाळी नऊ वाजता नाक्यावर आहे तु तिथे ये .मग त्याने आनंदाने होकार दिला आणि परत परत माझे आभार मानून फोन ठेवला.  खर सांगू वाहिनी तुम्हाला न विचारतातुमची परवानगी न घेता मी त्याला माझ्यासोबत येऊन तुम्हाला भेटायची परवानगी देऊन टाकली ..पण खरेतर त्या वेळेस सतीशची अगतिकता पाहून माझ्यापुढे दुसरा पर्याय नव्हता .दुसरे म्हणजे मी हा विचार केला कीइतके वर्ष सतीश कुठे होता आता त्याचा काय बेत आहे हे सगळे तर त्याला भेटल्याशिवाय समजणे शक्यच नव्हते ..आणि वाढदिवसाला तर आता दोनच दिवस राहिलेत ..सांगा बरे वहिनी माझे कांही चुकले नाही न ?हे ऐकून ऊमा म्हणाली .“मोहन तुम्हाला माझी सर्वात जास्त काळजी आहे आणि तुम्ही जे कराल ते माझ्या भल्यासाठीच असणार आहे .बरे झाले त्याला तुम्ही सोबत यायचे आमंत्रण दिले.कसाही वागला तरी तो माझा नवरा आहे .आणि खरेच जर तो सुधारला असेल आणि एक चांगले नवीन आयुष्य जर त्याला जगायची इच्छा असेल तर ती संधी आपण त्याला देणे हे तर आपले कामच आहे .मला तर वाटते नयनाच्या या सहाव्या वाढदिवसाला तिचा बाबा येणे ही तिच्यासाठी एक मोठीच गिफ्ट असेल आणि ती तुम्ही तिला देत आहात.तिच्या आयुष्यात तिला आतापर्यंत तरी वडिलांचे प्रेम नाही मिळाले आता जर मिळत असेल तर चांगले आहे ना ..पित्याच्या प्रेमावर तिचाही हक्क आहेच की !!त्यामुळे यासाठी माझी काहीच हरकत नसणार आहे .आता परत माझ्यासाठी जरा बरे दिवस येणार असतील कदाचित ..होप फॉर दि बेस्ट ...मला सांगा आता काय काय करूया आपण ?”ऊमाचे हे बोलणे ऐकून ..मोहनला बरे वाटले तो म्हणाल ,वहिनी मी त्याला परवा दिवशी नयनाच्या वाढदिवसाला घेऊन येईन ..पण मला वाटते ही गोष्ट आपण इतक्यात हे नयनाला नको सांगायला एकतर गेले दोन तीन वर्षात तिने तिच्या बाबाचे नावही घेतले नाहीय ती इतकी लहान आहे की खरेच तिच्या मनात तिच्या बाबाविषयी काय भावना आहेत हे आपल्याला नाही समजू शकत .लहान मुलांचे मन फार संवेदनशील असते ..त्यात तिचे आणि बाबाचे पूर्वी अगदी प्रेमाचे संबंध होतेच ..तो पण गायब झाला  तिच्या आजी आबांचा मृत्यू घडलेल्या अनेक चित्र विचित्र घटना तिला बिचारीला लहान वयात पाहायला लागल्या.तिच्या नाजूक मनाचा आपण विचार करायला हवा .. “मोहनचे बोलणे ऐकून ऊमाला भरून आले .ती म्हणाली .‘ मोहन काय बोलू तुमच्याविषयी ..नयनाची इतकी काळजी तर तिच्या बाबाला सुद्धा नाहीये बघा .अगदी खरेखुरे प्रेम करता तुम्ही नयनावर ..भाग्यवान आहे माझी लेक ...तिच्या आयुष्यात तुमच्या सारखा मामा आहे ....मोहन म्हणाला ...“वहिनी फार निष्पाप अजाण आणि गोड पोर आहे ती ..कोणालाही आवडेल अशीच शहाणी समजूतदार ...मी तर तिला लहानपणा पासून पाहिले आहे …ऐका आता मी कसे प्लान करतो ते ..ऊमा मन लावून ऐकू लागली ..क्रमशः