Operation Sindoor - 6 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | ऑपरेशन सिंदूर - भाग 6

Featured Books
Categories
Share

ऑपरेशन सिंदूर - भाग 6

             
           रुकसार व सपना या दोन महिला की ज्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्वाची भुमिका साकारली होती. तरीही लोकं स्रियांना कमजोरच समजत होते. त्यांच्याबाबत भुमिका संभ्रमाचीच ठेवत होते. त्यामुळं सपनाला वाटत होतं की आज स्रिया जागतिक स्तरावर उत्तुंग भरारी घेतांना दिसत आहेत. त्या अवकाशात जात आहेत. शिवाय त्यांचा आजच्या परिस्थितीबाबत विचार केल्यास आज स्रियांनी जमीन, पाणी व अवकाश, ही तिन्ही क्षेत्र पादाक्रांत केलेली आहेत. आमच्या निमित्यांनं ऑपरेशन सिंदूरही केलेले आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी काही स्रियांची आजची परिस्थिती पाहता स्रियांबाबत आज नेहमीच संभ्रम वाटतो व वादाची स्थिती निर्माण होते. आज संविधान बनलं असलं तरी त्या स्थितीवरुन वाटतं की खरंच स्री खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाली काय? वाटतं की स्रियांना जे दुय्यम स्थान होतं. ते स्थान आजही अबाधित आहे तर कधीकधी वाटतं की ते स्थान अबाधित नाही.
           स्री..... स्रियांना काल दुय्यम स्थान होतं. त्यांना दुय्यम स्थान देण्याची सुक्ते मनुस्मृती, भाला, संग्राम सारख्या इतर पुस्तकात लिहिलेली होती. मनुस्मृतीनं तर त्यांचे संपूर्ण हक्कं आणि अधिकार हिरावून घेतले होते. म्हटलं होतं की स्रियांना संपत्ती कमविण्याचा काहीच अधिकार नाही आणि कममविलेही स्रीधन, तर त्यावर अधिकार पुरुषांचाच असेल. शिवाय कामाच्या पद्धतीतही तिलाच जास्त काम करावे लागायचे. 
         स्रियांचा विवाह करण्याचाही अधिकार पुरुष नावाच्या व्यक्तीपासून नाकारला होता. हे देखील प्रावधान त्या काळातील धार्मिक ग्रंथांनी लेखनीबद्ध केलं होतं. पुरुष मात्र अनेक विवाह करुन मोकळे होत आणि सवतपणाचे दुःख तिला नाईलाजास्तव सहन करावं लागायचं. कारण सवत आली की पुरुषांचा समान लेखन्याचा अधिकार नष्ट व्हावा. पुरुष सवतीवरच जास्त प्रेम करीत असत. ज्यातून अतिशय वेदना स्रिजातीला सहन कराव्या लागायच्या.
         वैधव्यात तर स्रिजातीची दमछाकच होत असे. एखादी स्री विधवा झालीच तर तिला लोकं दुषण्यानंच बोलत असत. म्हणत असत की ही कुलथा आहे व हिच्यामुळंच वैधव्य आलं. ज्यात तिचा अजिबात दोष नसायचा. याचं कारण होतं, तिचा विवाह. ती बाल्यावस्थेत असतांना कधीकधी एखाद्या पन्नास वर्षाच्या पुरुषांसोबत तिला विवाह करावा लागायचा. ज्यातून म्हातारपणानं तिचा पती मरण पावायचा. त्यानंतर तिला विद्रुप केलं जायचं. त्याचंही एक कारण होतं. ते म्हणजे इतर बाहेरील पुरुषांची ती शिकार होवू नये. मात्र घरचे तिला छळत असत. तिच्यावर बलात्कार देखील करत असत. हे सगळं अतिशय गुप्तपणे चालायचं. 
         कामाच्या बाबतीत तर तिला मोकळीकच नव्हती. तिला सकाळीच उठून घरची सगळी कामं करावी लागायची. ज्यात सडा सारवण, स्वयंपाक ही कामं पाचवीला पुजलेली असायची. त्यातच मुलाबाळांची अंघोळ, तयारी हे सगळं नित्याचंच होतं. तिला कोणीही आयतं शिजवून जेवन देत नसत वा कोणताही व्यक्ती तिला तिच्या कामात मदत करीत नसे. त्यानंतर दुपार होताच तिला कामावरही जावे लागायचे. दिवसभर पतीच्या खांद्याला खांदा लावून त्याच्याच बरोबरीनं कामंही करावे लागायचे. त्यानंतर पुन्हा घरी येवून स्वयंपाकात शिरावंच लागायचं. ही क्रिया सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत चालायची. तिला एवढीशीही उसंत मिळत नसे. मात्र पुरुष सकाळी मस्त आरामात झोपेतून उठायचा. बसल्या ठिकाणी त्याला नाश्ता व जेवन मिळत असे. अंघोळीचं पाणीही तो स्वतः घेत नसे. ते देखील तिला टाकूनच द्यावे लागायचे. जेवन ताटात वाढून तेही त्याच्या समोर द्यावे लागायचे. पाणी वैगेरे सर्व काही. एवढंच नाही तर अंथरुणही त्याचं करुन द्यावं लागायचं. जणू त्याचे त्या स्रीवर भरपूर उपकार असावेत, असा तो आयत्या बिळातील नागोबासारखाच वागायचा. 
         स्री ही कौमार्यपणातही सुखी नव्हतीच. तिला कौमार्यपणातही कधीकधी कौमार्य चाचणीला समोर जावं लागायचं. कौमार्य पणातही तिला कोणत्याच पुरुषांकडे पाहण्याचा अधिकार नव्हता. व्याभिचार तर दूरच आणि एखाद्या स्रीनं असा व्याभीचार केलाच तर ही पुरुषजात तिला यमसदनीच पाठवायची. कधीकधी एखादी सुंदर स्री राजा वा मंत्र्यांना आवडलीच. परंतु तिच्याशी विवाह करायचा नसेल तर तिला जाणूनबुजून नगरवधू बनवले जाई. ती संपुर्ण नगराची वेश्याच असे. ज्या स्रीवर राजा, त्याचे मंत्री व त्याचे संपुर्ण नातेवाईक आळीपाळीनं बलात्कार करीत असत. हीच प्रक्रिया गावात घडत असे. यात स्वतः मायबापच आपल्या मुलीला वेश्यापणाच्या दलदलीत ढकलत असत. त्याचं कारण असायचं, त्यांना संतती न होणं. जर एखाद्यावेळेस एखाद्या दांपत्यांना संतती झाली नाही तर ते एखाद्या गावच्या मंदिरात नवश बोलत की जर त्यांना पहिली मुलगी झालीच तर ते तिला देवाची दासी म्हणून सोडतील. अशावेळेस मुलगी झाल्यास तिला कधीकधी तिच्या जन्मापासूनच मंदिरात दान देण्याची पद्धती होती. अशा मंदिरात दान आलेल्या मुलीवर ती वयात येताच मंदिरातील मंहत व महंतांचे नातेवाईक आळीपाळीनं बलात्कार करीत. ज्यात गावही सहभागी होत असे. 
          स्रियांचे हक्कं व अधिकार नाकारलेला हा समाज. या समाजानं राजांनाही सोडलं नाही. एखादा राजा मरण पावल्यास त्या राजाचे पुत्र जरी लहान असतील तरी त्या राजगादीवर त्या राजाच्या राणीला बसण्याचा अधिकार नव्हता तर पुरुष म्हणून त्या राजाचं मुल जरी दोन वर्षाचं असेल तरी त्यालाच बसवावे लागत असे. 
         काळ बदलला व स्त्रियांची स्थिती थोडीफार बदलली. कालची नगरवधू बनविण्यात आलेली आम्रपाली बदलली. आज कोणत्याही स्रिला जाणूनबुजून नगरवधू बनवले जात नाही. आज कोणत्याच स्रिला देवदासीही बनवलं जात नाही. स्रियांना आज पुनर्विवाहही करता येतो. त्यांनाही संपत्ती जमविण्याचा अधिकार आहे व ती संपत्ती आपल्या इच्छेप्रमाणे खर्च करण्याचाही अधिकारही आहे. आज कोणतीच स्री का असेना, तिला वैधव्यानंतर साजशृंगारानं जीवन जगता येतं. बहुतःश ठिकाणी तिला विद्रूप केले जात नाही. तसेच वैधव्यानंतरही तिला सन्मानानं वागवलं जातं. आज कोणत्याच स्रिची कौमार्य चाचणी होत नाही. स्रियांना बऱ्याच ठिकाणी दुय्यम दर्जानं वागवलं जात नाही. एकंदरीत सांगायचं झाल्यास स्रियाही पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून जीवन जगत आहेत नव्हे तर आज तिला तिनं कमविलेल्या संपत्तीत मानाचं स्थान आहे. ती आपली संपत्ती स्वतः कोणाला दान देवू शकते. हे जरी खरं असलं तरी आजही स्त्रियांकडे काही समाजकंटक दुय्यम नजरेनंच पाहतो. त्यांच्या संपत्तीतील अधिकार नाकारतो. त्यांच्या कामातही भेदभाव करतो. ती आजही सकाळी झोपेतून उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कामच करीत असते आणि पुरुष नावाचा हा व्यक्ती सकाळी आरामात उठतो. त्याला अंघोळीचं पाणीही गरम करुन द्यावं लागतं. त्याला जेवनही आयतं ताट बनवून द्यावं लागतं. जसा तो त्या स्रीवर उपकारच करीत असतो. आजही काही समाजातील पुरुष अकाली मरण पावताच तिला दुसरा विवाह करण्याचा अधिकार नाही. काही ठिकाणी आजही पती निधनानंतर तिला विद्रूप केले जाते. पती निधनानंतर तिच्या भांगातील कुंकू, हातातील बांगड्या, पायातील पैंजण व बोटातील जोडवे काढले जातात. आजही तिच्या संपत्तीवर काही ठिकाणी पुरुष जात हक्कं सांगतो. अन् घरात उगाचा वाद नको म्हणून ती देखील आपल्या संपत्तीवर पुरुष जातीचा हक्कं स्विकारते. कारण त्यात तिचा नाईलाज असतो. विशेष सांगायचं झाल्यास आज देश स्वतंत्र आहे व या देशात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संविधान आहे. कायद्यानुसार तिचा हक्कं व अधिकार संविधान नाकारत नाही की ज्यामुळं ती विचारांच्या अवकाशात उड्डाण करु शकेल नव्हे तर ती उड्डाण करते. परंतु हे सर्व काही दोनचारच कुटूंबात घडतं. ही स्थिती अपवादात्मकच असते. बऱ्याचशा कुटूंबात हे सगळं घडत नाही. स्त्रियांना दुय्यमच समजलं जातं आणि तिला दुय्यमच वागणूक दिली जाते. तिला रात्री अपरात्री बाहेर फिरता येत नाही. काही हिंस्र बलात्कारी श्वापदाची भीती असते. महत्वपुर्ण बाब ही की स्त्रियांना आजतरी असं दुय्यम स्थान कोणत्याच कुटूंबात मिळू नये. तिची कौमार्य चाचणी होवू नये. तिला रात्री अपरात्री निर्भयपणे फिरता यावं. तिची सर्वांगीण स्थिती सुधारावी. जेणेकरुन तिला स्वतंत्र्यपणे जीवन जगता यावं. ती अर्धांगीणीच बनावी. पती, पुत्र, पिता वा इतर कोणत्याच पुरुषांची गुलाम बनू नये. तरच स्री स्वतंत्र झाली असं म्हणता येईल, मानताही येईल. हे जेव्हा घडेल, तेव्हाच खऱ्या अर्थानं देशही सुजलाम सुफलाम झाल्यासारखा वाटेल यात शंका नाही.                    
            सपनाला आठवत होत्या, स्रियांच्या कामाबद्दलच्या गोष्टी. ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूरचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळेस चर्चा झाली होती व चर्चेत तिचीच मैत्रीण असलेल्या रुकसारवर शंका उचलली गेली होती. पहिली शंका होती, ती म्हणजे तिचं मुस्लीम असणं आणि दुसरी शंका होती, ती एक महिला असणं. सर्व पुरुषी बोल. त्यातच तिला आठवत होतं कुणीतरी बोललेली गोष्ट. ती गोष्ट होती स्रियांचं अंतराळात जाणं. कोणीतरी म्हणालं होतं की एक स्री अंतराळात जावू शकते. मग ती स्री युद्धाचं प्रतिनिधित्व का करु शकत नाही. त्यावर तिला वाटत होतं की एक स्री घरात किती काम करते. तीच कामं देशासाठीही करते. तरीही देश तिला कमजोरच समजत असतो. 
         स्रियांची कामं व त्यावरुन सपनाच्या मनात निर्माण झालेले प्रश्न. त्यावरुन तिच्याही विचार करण्यावर प्रश्न चिन्हं निर्माण झाले होते व तिला वाटत होतं की आम्ही खरंच दयावान आहोत का? स्रियांचा आजचा काळ पाहिल्यास आपल्याला दिसतं की आजची स्री घरी बरीच कामं करते. ती सकाळी उठते व उठल्याबरोबर सडा सारवण करते. त्यानंतर मुलांची सकाळी शाळा असेल तर त्यांच्या शाळेची तयारी करुन देते. त्यामध्ये मुलांची अंघोळ, त्यांची केशसज्जा, त्यांना कपडे घालून देणे, त्यांना नाश्ता करवणे व सोबत आपलं मुल शाळेत उपाशी राहू नये यासाठी त्याला जेवनाचा डबा देणे. इत्यादी कामं करते. मुल शाळेत गेलं की ती दात घासते. त्यानंतर अंघोळ करुन पुन्हा ती स्वयंपाक करते. ती जेव्हा स्वयंपाकाला बसते. तेव्हा तिचा पती उठलेला असतो व त्याचं दातवन झालेलं असतं. तेव्हा ती लगेच त्याच्या पुढ्यात चहा ठेवते व पुन्हा घरात जावून स्वयंपाक तयार करते. हे करीत असतांना त्यादरम्यान ती आपल्या पतीच्या अंघोळीसाठी पाणीही टाकते व ते पाणी स्नानगृहात नेवून देते. साधी निकर आणि बनियान सुद्धा काही काही घरातील पती घेत नाहीत. तेही देते. त्यासोबत टॉवेलही. लगेच पतीची अंघोळ झाली की त्यांच्यासमोर जेवनाचा ताट देते. त्यातच ती स्वतःही जेवन घेते. त्यानंतर ती पतीचा डबा तयार करुन त्यांना बांधून देते. आपलाही डबा बांधते व कामाला जाते. सायंकाळी घरी येताच पुन्हा ती तीच कामं करते. फक्त अंघोळ आणि सडा सारवण सोडलं तर. 
          महिलांची कामं..... केवळ सडा सारवण करणं एवढीच नाहीत तर त्यासोबत भांडे घासणे, कपडे धुणे, फरशी पुसणे, झाडांना पाणी देणे. वरुन कामाला जाणे. त्यातच मुलांच्या शाळेची तयारी करणे. त्यांचा अभ्यासही घेणे. ही कामं करीत असतांना नाकी नव येत असतं आणि अशी कामं करुन तिला आपल्या पतीची नेहमीचीच वटवट ऐकावी लागते. कधीकधी आपली ननद, सासू सासरे, भासरे वा दीर यांचीही ग्राऱ्हाणी ऐकावी लागतात. मग विचार येतो. विचार येतो की काय हे आयुष्य! इश्वरानं स्रियांना यासाठीच जन्माला घातलं की काय? अशा किळसवाण्या वातावरणात आजची स्री जगत असते. काही काही घरातील लोकं समजदार असतात. ते आपल्या पत्नींना कामात मदत करतात. कधीकधी तेच आपल्या पत्नींची कामं करीत असतात. त्यांनाही कळतं की आपल्या पत्नीला किती त्रास होतो ते. परंतु काही काही घरचे पती हे आपल्या पत्नींचे कामाच्या बाबींतून रक्तच पिण्याचे काम करतात. जसे ते ढेकुणच लागले. 
          स्रियांच्या कामाच्या बाबतीतील शहराची स्थिती थोडीशी बरी आहे. शहरात पती पत्नी दोघंही कामाला जातात व दोघंही घरची कामं करीत असतात. पत्नी जर स्वयंपाक बनवीत असेल तर पती कांदे, मिरचे वा भाजीपाला कापून देतो. पत्नी जर भाजीपाला कापत असेल तर पती स्वयंपाक बनवतो. त्याचं कारण असतं, त्यांच्याजवळ मायबाप नसणं. शहरात बऱ्याचशा घरी म्हातारी मंडळी व ननद, दीर नसतात. बऱ्याचशा घरी सासू सासरे हे वृद्धाश्रमातच असतात. त्यातच पत्नी नोकरी करीत असल्यानं, तिला कवेत ठेवू की डोक्यावर ठेवू , असं शहरातील तरुणांना वाटत असतं. तसं पाहिल्यास मायबापाच्या सेवेचे संस्कार आजुबाजूला पाहून तुटलेलेच असतात. ते पती पत्नी शिकलेले असतात. औपचारिक शिक्षण अर्थात चाकोरीबद्ध शिक्षण हे उच्चप्रतीचे घेतलेले असते. परंतु संस्कारी शिक्षण त्यांना बालपणापासून मिळालेले नसते. ही स्थिती ग्रामीण भागात नसते. ग्रामीण भागातील स्रियांना कामाचा ताण जास्त असतो.
           ग्रामीण भागातील स्रियांवर संस्कार असतो. सासू सासरे हे वृद्धाश्रमात नसतात. कारण तसे सासूसासरे वृद्धाश्रमात ठेवल्यास समाज त्यांना दुषणे देत असतो. कधीकधी गावातील माणसं मुलांनी असं केल्यावर त्यांना वाळीत टाकत असतात. ज्यातून गावातील मुलं आपल्या आईवडीलांना वृद्धाश्रमात टाकत नाहीत. ते घरीच ठेवतात. मात्र काम करतांना त्यांच्या पत्नीची सतत तारांबळ उडत असते. कारण गावात संस्कार असतात की पतीनं काम न करणे. पतीला गावात परमेश्वराचा दर्जा असतो. जो शहरात नसतो. त्यामुळं पतीची सेवा म्हणजे इश्वरसेवा असं मानलं जातं. विशेष म्हणजे महिला ही शहरातील असो की ग्रामीण भागातील. महिलांना दुय्यमच दर्जा असतो. तीच जास्त काम करते. घरी आणि कार्यालयातही. तरीही तिचा छळच होत असतो. तिला घरी आणि कार्यालयातही जास्तच राबवलं जातं. राबवतो कोण? तर तोच पुरातन विचारांचा पुरुषसत्ताक समाज. तेच ते पुरुषसत्ताक विचार. जे कधीच बदलणारे नाहीत. आता लोकं म्हणतील की आम्ही महिलांना कामात मदत करतो. परंतु मदत करणं वेगळं आणि कामं करणं वेगळी. आपण महिलांना अर्धांगीणी समजतो ना. मग कामंही अर्धीच करावी ना. परंतु आपण आपलं वागणं मनात एक व ओठावर एक ठेवत आपण तिची गळचेपी करतो. कामाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास स्वतः सुख भोगतो आणि तिला दुःख देतो. आपण ऐतभाऊ भुमिका ठेवतो व तिला कामाला जुंपतो. वरुन जगात आपल्यासारखा दयावान कोणी नाही असा कांगावा करतो. परंतु हे आपले वागणे बरोबर नाही. आपण खरं तर स्रियांची दया घेतलीच पाहिजे. आपण दयावान असलेच पाहिजे. गोष्टी सांगण्याऐवजी घरची अर्धी कामं केलीच पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थानं स्री सुखी होईल व तिचाही खऱ्या अर्थानं सन्मान झाला असं मानता येईल हे तेवढंच खरं.
         स्रियांना पुरुषांचे कमजोर समजण्यावरुन जे प्रश्न सपनाच्या मनात निर्माण झाले होते. ते प्रश्न वाखाणण्याजोगेच होते. त्यातच आता तिला वाटत होतं की हेच कर्म परत येत असतात. या जन्मात नाही तर पुढील जन्मात. अन् जेव्हा हेच कर्म जेव्हा फिरुन येईल. स्रियांचा पुरुष बनेल व पुरुषांची जेव्हा स्री बनेल. तेव्हा या पुरुषांना कळेल की स्रियांना कमजोर समजू नये. नाही तर इश्वर त्याचा व्यवस्थीत न्यायनिवाडा करतोच. 
         एक स्री. तिला संसार करतांना बऱ्याच अडचणी येतात. घरं सांभाळतांना नाकीनव येत असतं. त्यातच नोकरीही करावी लागते. तरीही तिच्या नशिबी दुषणंच असतात. परंतु तिनं घाबरण्याचं कारण नाही. कारण कर्म फिरुन येत असतं.
        सपनाचा तो विचार तसं कर्म फिरुन येत असतं? हा काय प्रकार आहे? नक्कीच हा प्रकार कुणालाही विचीत्र वाटत असेलच. कारण कर्म हे कधीच फिरुन येत नाही आणि ते कुणीही आजमावले सुद्धा नाही. परंतु ती विचारी होती व त्याचे ती दाखलेही देत होती. सपना याच कर्माबद्दल कधीकधी लोकांना सांगत असे. 
          कर्म फिरुन येत असतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे एखादा पक्षी. हा रानपक्षी किडे खात असतो. परंतु ते जेव्हा मरण पावतं. त्याला किडे खात असतात. याचाच अर्थ असा की त्या पक्षाचे कर्म हे फिरुन आलेले असतात. त्या पक्षानं जीवनभर किड्यांना खाण्याचं काम केलेलं असतं आणि आता मृत्यूनंतर तेच किडे त्याला खात असतात. हे झालं त्या पक्षाच्या मृत्यूनंतरचं जीवन. मरणानंतर कोण पाहात असतं की आपल्या या नश्वर शरीराचं काय होणार आहे. परंतु कधीकधी जेव्हा हेच कर्म त्या पक्षाच्या जीवंतपणी परत येत असतील तर...... आहे ना विचित्र कल्पना. खरंच ही स्थिती, त्या पक्षाच्या जीवंतपणी निर्माण होवू शकेल काय? होय, ही स्थिती पक्षांच्या जीवंपणी निर्माण होवू शकते. जेव्हा तो पक्षी घायाळ वा जखमी होवून खाली जमीनीवर पडतो. तेव्हा हेच किडे त्याच जखमी अवस्थेत त्याला खात असतात. हे झालं पक्षांचं. ज्याला आपण जंगलाचा राजा समजतो. त्याची स्थितीही अशीच असते. तो शेकडो प्राण्यांना खात असतो व ते शेकडो प्राणी मरण पावून त्यांचा किड्यातच जन्म झालेला असतो. तेच किडे जंगलाचा राजा म्हातारा झाल्यावर वा तो असहाय्य जखमी अवस्थेत असल्यावर त्याला खात असतात. तसा पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. परंतु कधीकधी पुनर्जन्मावरही विश्वास ठेवावा लागतो. असंच कधीकधी घरात वा परीसरात घडतं. आपल्याला दिवंगत व्यक्तींसारखी दिसणारी व्यक्ती दिसते. त्यावरुन मेलेल्या माणसांची आठवण येते. कधीकधी त्यांचे हावभाव मेलेल्या माणसांसारखे असतात. कधीकधी वर्तमानपत्रात छापून येतं की अमूक व्यक्ती जन्माला आला व त्याला, तो जिथे जन्मला. तेथील परीसर आठवला. त्यानंतर त्याला तिथं नेलं असता ते सत्य होतं. 
          कर्म परत येत असतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बेडूक व सापाचं उदाहरण. साप बेडकाला खातं. हे आपण नेहमी अनुभवलं. परंतु कधीकधी बेडूकही सापाला खातं. याचेही उदाहरण फेसबुकवर येत असतात आणि वास्तविक सत्य आहे. आपण नेहमी ऐकलं आहे की साप उंदराला खात असतं. परंतु कधी उंदीर सापाला खातं का? हे ऐकलं नाही. परंतु उंदीरही सापाला खात असते.
            कर्म फिरुन येतं. ही गोष्ट माणसाच्याही जीवनात लागू आहे. माणूसही जेव्हा तरुण असतो. तेव्हा तरुणाईचा जोश दाखवत असतो. असं वाटत असतं की तो किती बलवान आहे. तो त्या बलवानपणाचा अघोरीपणानं वापर करीत असतो. त्यावेळेस तो कुणावरही अत्याचार करीत असतो. परंतु जेव्हा तोच व्यक्ती म्हातारा होतो व असहाय्य होतो. त्याचे खांदे थरथरतात. हात करकर कापतात. तेव्हा मात्र तो असहाय्य समजू शकतो स्वतःला. त्या वयात त्याला लहान लहान आजुबाजूची मुलं चिडवीत असतात. त्यांची नातवंड त्याला त्रास देत असतात. त्याची स्नुषा त्याला खायला प्यायला देत नाही. असं का होतं? असं होतं, कारण त्या व्यक्तीनं आपल्या तरुणपणात ज्या व्यक्तीवर अत्याचार केला होता. तो व्यक्ती आपला बदला घेण्यासाठी त्याच व्यक्तीच्या आजुबाजूला जन्म घेवून आलेला असतो व तो व्यक्ती त्याला त्या व्यक्तीकडून जो जो त्रास झाला, त्याचा बदला घेण्यासाठी आलेला असतो.
            स्रियांच्या जीवनातही तसंच होत असतं. म्हणतात की चार दिवस सासूचे व चार दिवस सुनेचे असतात. जेव्हा सासू तरुण असते व ती सुन असते. तेव्हा ती आपल्या सासूवर अत्याचार करीत असते. परंतु तीच सासू मरण पावते. ती मेल्यानंतर अशा ठिकाणी जन्म घेते व ती सुन म्हणून तिच्या घरी येते. त्यानंतर काय घडते हे आपल्याला माहितच आहे. विशेष म्हणजे आपले कर्म नेहमी परत येत असतात. जर आपण कोणावर आज अत्याचार करीत असेल तर तोच व्यक्ती आपल्यावर तद्नंतर अत्याचार करीत असतो. कधी दुसरा जन्म घेवून. ज्याला आपण पुनर्जन्म म्हणतो. कधी त्याच्या यातना त्याच जन्मात जीवंतपणीच भोगाव्या लागतात. ते आपल्याला दिसतं. कधीकधी आपण अशा यातना भोगणाऱ्या व्यक्तीमत्वाकडे पाहून हळहळत असतो. आपल्याला दया येत असते व आपण विचार करीत असतो की किती ह्या बिचाऱ्यांना यातना. या यातना सहन होणाऱ्या नाहीत. हे आपलं खरं असलं तरी आपल्याला हे माहित नसतं की त्या व्यक्तीचे कर्म हे परत आलेले असते. ज्या तरुण किंवा बालपणात त्यानं आपल्या अक्कलहुशारीनं कुणाला दुखावलेलं असतं. ज्यामध्ये केवळ मानवच नाही तर पशुपक्षी, प्राणी, किटक वा सुक्ष्म जीव असू शकतात. हेच आपण अनवधानानं त्रास दिलेले संबंधीत सृष्टीतील जीव पुनर्जन्म घेवून आपल्या अवतीभवती जन्माला आलेले असतात. आपल्याला त्रास देत असतात. कधी एखादा डास बनून ते चावत असतात तर कधीकधी एखादा ढेकुण बनून. कधी सुन बनून आपल्याला त्रास देत असते तर कधी एखादा वात्रट मुलगा बनून. मग आपण म्हणतो, की मी काय असं वाईट केलंय. महत्वपूर्ण बाब ही की आपण केलेले चांगले कर्म तेवढेच आपल्याला दिसतात. वाईट कर्म कधीच आपल्याला दिसत नाहीत. याबाबत एक उदाहरण आहे. शय्येवर पडलेला भीष्म पितामहा क्रिष्णाला विचारतात.
         " प्रभू, मी असं कोणतं पाप केलं की मला ही शय्या भोगावी लागत आहे?"
           क्रिष्णानं ते ऐकलं व म्हटलं,
          "ही शय्या म्हणजे तुझ्या हातून घडलेलं पाप आहे."
           "ते कसं काय?"
           "तुला आठवत नसेल तर मी सांगतो." असं म्हणत क्रिष्ण सांगू लागला. 
           "तू तरुण असतांना जेव्हा आपल्या रथावर चालला होता. तेव्हा अचानक घोडे थांबले. त्यावर तू विचारलं, काय झालं. तुला उत्तर मिळालं, एक मोठा साप रस्त्यावर आडवा आलाय. त्यावर तू उत्तर दिलंय की त्या सापाला उचलून बाजूला करा. परंतु त्या शिपायांनी त्या सापाला उचलून बाजूला केलं नाही. त्याला फेकून दिलं. त्यानंतर तो साप एका काटेरी बाभळीच्या फांदीवर पडला. त्याला असंख्य काटे बोचले व तो तडफडून मरण पावला. आज तोच साप अर्जून रुपानं बदला घेण्यासाठी जन्माला आलाय व त्यानं तुला त्याच बाभळीच्या काट्यासारखे बाण मारलेय."
          भीष्माला क्रिष्णानं सांगितलेला सारिपाट. आज भीष्माला ते माहित होताच पश्चाताप होत होता. परंतु आता पश्चाताप करुन काहीच उपयोग नव्हता. कारण जे कर्म केले होते. ते परत आले होते. 
         माणसानं चांगलेच कर्म करावे. वाईट कर्म करु नये. कारण चांगल्या कर्माचा परिणाम हा चांगलाच होतो व वाईट कर्माचा परिणाम वाईटच होतो. कालांतरानं का होईना, कर्म परत येतंच. जे कर्म आपल्याच नाशाला कारणीभूत ठरत असतं. आपण जेव्हा वाईट कर्म करीत असतो. तेव्हा आपल्याला आनंद वाटत असतो. परंतु हेच कर्म जेव्हा आपला काळ बनून येत असते. तेव्हा मात्र अतीव वेदनादायक त्रास होत असतो. म्हणूनच कोणतेही वाईट कर्म का असेना, ते करतांना दहावेळा विचार करावा. मगच पावलं टाकावीत. कारण कर्म हे कधीतरी आयुष्यात परत येत असतात. आपण जर चांगले कर्म केले असतील तर त्याचे परिणाम चांगले निपजतात. आपण जर वाईट कर्म केले असतील तर त्याचे परिणाम वाईट निपजतात. आपले वाईट कर्म असतील व त्यातून वाईट परिणाम दिसत असतील तर लोकं हळहळतात. परंतु मदतीला कोणीही येत नाही. अन् वाईट कर्मासोबत चांगल्या कर्माची जोड असेल तर लोकं हळहळतच नाहीत. मदतही करतात. म्हणूनच कर्म करतांना चांगलेच कर्म करावे. कारण अनवधानानं घडणाऱ्या वाईट कर्माला आपले चांगले कर्म संरक्षक कवच म्हणून लाभदायक ठरत असतात. हे तेवढंच खरं.
            सपनाला वाटत होतं की जर पुरुषी मानसिकतेला स्री कमजोर असल्याचं समजत असेल तर हे लक्षण ठीक नाही आणि त्यानं स्रिची दया घ्यायलाच पाहिजे. कारण ती घरादारात व घराबाहेरही जास्तच कामं करीत असते. ती जास्त कामं करते. असे ज्या पुरुषाला वाटते. त्यानं घरकामात मदत करायला हवी. त्यानं जसं बाहेर दयावान दिसावं, तसंच दयावान घरातही व्हावं. मात्र काही लोकं असे असतात की ते दिखावा करीत असतात. कारण सध्या दिखाव्याचं जग आहे. या जगात काही लोकांना दिखावा केल्याशिवाय जमतच नाही. 
        सपना कधीकधी लोकांना सांगत असे. 'महिला..... महिलांबाबत काही लोकं अशीच भुमिका ठेवणारे आहेत. ते बाहेरमध्ये महिलांच्या बाबतीत दया दाखवतात. त्यांना पाहून अससं वाटतं की त्यांच्याएवढं दयावान जगात कुणीच नाही. एवढा दयावानपणा ते दाखवीत असतात. तो दयावानपणा त्यांच्या कृतीतही असतोच. परंतु प्रत्यक्षात घरात त्यांचा दयावानपणा पाहायला मिळत नाही. घरात मात्र त्यांचा स्रिजातीवर अर्थात घरच्या पत्नीवर, मुलींवर, बहिणीवर वा त्याच्या स्वतःच्या आईवर अत्याचार सुरु असतो.
        पत्नी, मुलगी, आई व बहिण. या चार घरातील महिला सदस्य. पुरुष नावाचा तो व्यक्ती. या चार महिलांचे घरात रक्तच पीत असतो. शोषण करीत असतो. ज्या घरात या चार महिला असतील, त्या घरचा पुरुष व्यक्ती कधीच घरातील एखादी पडलेली काडीही उचलून ठेवत नाही. ती पडलेली पडलीच राहते. एखादाच अपवाद असतो. याबाबतीत एक उदाहरण आहे. एक असाच व्यक्ती. तो व्यक्ती घरात आपल्या पत्नीला मारझोड करीत असे. अन् बाहेर मात्र तो तसा नाही असा कांगावा करीत असे. एक दिवस मारता मारता त्याच्या पत्नीच्या डोळ्याला लागलं. त्यानंतर डोळ्यावर सुज आली. पट्ट्ट्यानं तिला लागलीच डॉक्टरकडे नेलं. त्यानं तिला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरांनी लागलीच ओळखलं की ही कुठंही पडलेली नाही. तिला घरात मारझोड झालेली आहे. त्यानंतर ते तिला विचारु लागले. कसं लागलंय. त्यावर तिनंही खरं सांगीतलं नाही. कारण तिला संसार करायचा होता. ती मारहाणीची गोष्ट डॉक्टर तिला खोदू खोदू विचारत होते. परंतु ती खोटीच बोलली शेवटपर्यंत. त्यानंतर तो सुधरला. 
        जगात असे बरेच महाभाग आहेत की जे घरी असेच आपल्या पत्नीला मारतात. परंतु त्यांच्या पत्नी आपला संसार टिकावा म्हणून कोणत्याच स्वरुपाची कुरकुर करीत नाही. तो अत्याचार असला तरी अगदी निमूटपणे तो अत्याचार सहन करतात. अन् हीच मंडळी बाहेर भाषणात सांगत फिरतात की पत्नींना कोणीही मारु नये. तिच्यावर अत्याचार करु नये. त्यातच दयावानपणा दाखवतात. 
          मध्यंतरीच्या काळात एक लेख एका ग्रुपवर एका व्यक्तीनं पोष्ट केला. लेख आईसंदर्भात होता. त्यात आईचे गोडवे गायले होते. परंतु तो लेख पोष्ट करणे एका व्यक्तीला आवडले नाही. त्या व्यक्तीनं त्या लेखांवर प्रतिक्रिया दिली की असल्या प्रकारचे लेख ग्रुपवर पोष्ट करु नये. 
          तो लेख चांगला होता व तो लेख चांगला असल्यानं, तो लेख पोष्ट करु नये असं ग्रुपवर लिहून येताच लेखक महोदयांना थोडा राग आला व त्यांनी त्या प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तीचा इतिहास जाणून घेतला. तेव्हा कळलं की ज्या व्यक्तीनं तशी उलटसुलट प्रतिक्रिया दिली होती. तो व्यक्ती, माहिती काढल्यावर एक मोठा अधिकारी असल्याचं कळलं. तसाच तो व्यक्ती आपल्या आईवडिलांची सेवा करीत नसून घरात फालतूची कटकट नको म्हणून त्यानं आपल्या आईवडीलांना वृद्धाश्रमात ठेवले असल्याचं कळलं. मात्र हे गुपीत होतं व तोच अधिकारी ज्यांना माहित नाही, त्यांना आईवडीलांच्या सेवेचे किस्से सांगायचा. 
         लोकं असेच असतात. आपलं अंतर्मन झाकून पाहात नाहीत. दुसऱ्याचंच पाहतात. स्वतः शेंबडी असतात आणि दुसऱ्याच्या नाकातलं शेंबूड बघतात. अशी लोकं पाहिली की किळस येतो. परंतु किळस करुन काही उपयोग नसतो. कारण आजची संस्कृती त्यांनाच चांगलं म्हणते व जो आईवडीलांची सेवा करीत असतो. त्यांना वाईट म्हणत असते. 
         लोकांच्या वाईट स्वभावावर काही औषध नाही. लोकं आजच्या काळात एवढे मतलबी झाले आहेत की ते अगदी सरड्यासारखे रंगही बदलत असतात. एका शाळेत एका मुख्याध्यापकाच्या कार्यकाळात एका संस्थाचालकाची नातेवाईक असलेली शिक्षिका अगदी विरोधात होती. ती त्या मुख्याध्यापकाला कोणत्याच बाबतीत सहकार्य करीत नव्हती. कारण होतं, तिला मुख्याध्यापक बनायचं होतं. वाटत होतं की आपण त्या मुख्याध्यापकाला कामात मदत केल्यास आपल्याला आपलाच नातेवाईक असलेला संस्थाचालक मुख्याध्यापक बनवणार नाही. त्यातच काळ बदलला व ती पर्यायानं नातेवाईक असल्यानं मुख्याध्यापिका बनली. त्यातच ती सरड्यासारखी बदलली व एक सभा घेवून म्हणाली, "झाले गेले विसरुन जा. आपल्याला शाळा चालवायचीय. आपल्याला शाळा चालविण्यासाठी मदत करावीच लागणार. पैसेही द्यावेच लागणार."
         ती मुख्याध्यापिका व तिनं ऐनवेळेस बदलविलेला रंग. त्याचा गत मुख्याध्यापकाला विचार येत होता. तिच्या रंग बदलविण्यावर निर्णय कसा आणि कोणता घ्यावा याचा प्रश्न त्याला पडला होता. 
          हे झालं रंग बदलणं. लोकं आपली वेळ चांगली असते. तेव्हा असे अहंकारानं वागत असतात की ज्यांच्याबाबत सांगणं कठीण होवून जातं. अन् आपल्यावर वेळ आल्यास असे वागत असतात की जशी गरज त्यांनाच आहे व तेच जणू यातना भोगत असावेत वा त्यांनाच मदत करावी, इतरांना करु नये. शिवाय त्यांच्या चेहऱ्यावर असा भाव असतो की जणू त्यांचे चांगले दिवस असतांना त्यांनी इतरांना मदत केली.
        आज अशा मदतीच्या गोष्टी अजिबात दिसत नाहीत. सेवेच्या बाबतीत सांगतो की आज घराघरातून घरपण निघून गेलेलं आहे. पुर्वी प्रत्येक घरात संस्कार होता. कारण संसार होता. आज घराघरातून संसारच हद्दपार झालेला आहे. पती पत्नींमध्ये सतत वाद होत आहेत. त्याचा परिणाम हा घटस्फोटात होत आहे. मग जिथं संसारच दिसत नाही. तिथं संस्कार तरी कुठून दिसणार! आज जागतिक विश्व व जगाचं रहनसहन बदललं आहे. पाश्चात्यीकरणाची लोकांना हवा लागलेली आहे. संसार टिकत नाही आणि एखाद्या घरी टिकलाच तर लोकांना हम दो, हमारे दो अशी स्थिती आवडते व मार्गदर्शन करणारे मायबाप सहजच नकळत वृद्धाश्रमात पडतात. कारण संस्कार नसतोच. आजच्या काळात जे स्वतःला मोठमोठे साहेब समजतात. त्यांच्या घरचे हाल बघण्यासारखेच असतात. बऱ्याचशा लोकांकडे त्यांचे मायबाप राहात नसतात. ते मायबाप वृद्धाश्रमातच असतात आणि हे साहेब असतात. हेच साहेब आपल्या मायबापाला वृद्धाश्रमात ठेवून मोठमोठ्या व्याख्यानमालेत मातृपितृदिनावर भाषण ठोकत असतात. मुलांनी आपल्या मायबापासाठी अमूक करावं, तमूक करावं. अशी स्पष्टोक्ती झाडत असतात. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या व्याख्यानाच्या दिव्याखाली अंधारच असतो. हे काही खोटं नाही. महत्वाचं सांगायचं झाल्यास जेव्हा मातृदिन असतो. या मातृदिनावर भरपूर असे महाभाग व्याख्यान देतात. ज्यातील काही मंडळी अधिकारीही असतातच. ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं भाषणं ठोकतात. परंतु प्रत्यक्ष स्थिती वेगळीच असते. मात्र आपल्याला त्यांचं काहीच करायचं नाही. करायचं आहे, सेवेचं. ज्या मायबापांनी आपल्याला जन्म दिलाय. त्या मायबापाची सेवा आपल्यानं आजपर्यंत जरी झाली नसेल. तरी ज्या दिवशी मातृदिन असतो, त्यादिवशी तरी प्रतिज्ञा करावी व आपल्या मायबापांची सेवा करण्याचा मनात निर्धार करावा. सेवा करावी. अन् ज्यांच्यानं त्यांचे मायबाप जीवंत असतांना तशी सेवा झाली नसेल, त्यांनी वृद्धाश्रमातील दोन तरी म्हातारी माणसं दत्तक घ्यावीत. त्यांचीच सेवा करावी. म्हणजे मातृपितृ ऋण फेडल्याचा आनंद तुम्हाला होईल. जो तुम्हाला झालेला आनंद गगनात मावणारा नसेल यात शंका नाही. तशी शपथ मातृदिनानिमित्य घ्यायला काहीच हरकत नाही. विशेष म्हणजे तुम्ही बाहेर जसा दयावानपणा दाखवता. तसाच दयावानपणा घरातही दाखवत जा. आपली पत्नी, मुलगी, बहिण वा आई यांच्याबाबतही दयावानपणा दाखवा. कारण हेच घटक तुमच्या जीवनातील खरे आधारस्तंभ आहेत हे तेवढंच खरं.'
         सपनाला याच आईवडीलांनी बनवलं होतं. तिला शिकवलं होतं. लहानाचं मोठं केलं होतं. ती मुलगी आहे म्हणून तिचा कधी भेदभाव केला नव्हता. तशी ती घरात एकटीच होती. तिच्या मायबापानं तिच्यासाठी त्याग केला होता. दुसरं अपत्य होवूच दिलं नव्हतं. शिवाय ती एकटी असली तली देशसेवेसाठी तिला सैन्यात टाकलं होतं. हे जरी खरं असलं तरी ती देशसेवा करीत होती. त्याचबरोबर मायबापाचीही सेवा करीत होती.