Operation Sindoor - 3 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | ऑपरेशन सिंदूर - भाग 3

Featured Books
Categories
Share

ऑपरेशन सिंदूर - भाग 3

         
           रुकसार तिचं नाव होतं. नावाप्रमाणेच ती लाजवंत होती लहानपणी. तिला कोणीही काही म्हटल्यास ती शरमत असे व घरात जावून मुसमुसून रडत असे. या तिच्या वागण्याबाबत तिचे आईवडील चिंतेत असायचे. त्यांना वाटायचं की ही अशीच मुसमुसून रडत बसली तर हिचं कसं होईल. आज ती वैमानिक बनली होती व ती केवळ वैमानिकच नाही तर विंग कमांडर बनली होती.
          रुकसार आज वैमानिक बनली होती. लहानपणची लाजीरवाणी, डरपोक रुकसार नव्हती आता ती. तिला भीती अजिबात वाटत नव्हती. ती विमान जेव्हा चालवायची. तेव्हा तिला अजिबात भीती वाटायची नाही. आकाशात दूर अंतरावर ती जात असे आणि तासन्‌तास तिला आकाशातच राहावसं वाटत असे. कधी ती जेव्हा आपल्या आईवडीलांकडे परत येत असे. तेव्हा तिला तिची आई म्हणत असे की तिनं तेवढ्या उंचीवर उडाण करु नये. विमान क्रश होईल. तेव्हा ती आपल्या जन्मदात्या आईलाच म्हणायची की आई, तू उगाचंच मला घाबरवू नको. मी असा काही पराक्रम करुन जाईल की त्या पराक्रमानं तुझी मान उंच होईल. आज रुकसारनं असं काही केलं होतं की आज ते पाहायला रुकसारची आईही जीवंत नव्हती. 
         भारत पाकिस्तान सतत युद्ध करीत असत. ते एकमेकांचे कट्टर वैरी होते. तसं पाहिल्यास पाकिस्तान भारतावरच अवलंबून होता. परंतु पाकिस्तानला ते दिसत नव्हतं. तो नेहमी भारतासोबत लढाया करीत असायचा. ज्यात कितीतरी भारतीय सैनिक शहीद झाले होते. पाकिस्तान असं युद्ध करुन कितीतरी भारतीय स्रियांचे कुंकू पुसत होता. रुकसारला ते अजिबात आवडत नव्हतं.
          रुकसारचे आईवडील हे जन्माने मुस्लीम होते. त्यांनी रुकसारला लहानपणापासूनच देशभक्ती शिकवली होती. तिला शिकविण्यात आली होती धर्मनिरपेक्षता. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे व आपल्याला हा भारत आपल्या देशात राहू देतो. हे त्याचं ऋण आहे. शिवाय राहायला घर, पोटाला अन्न आणि वापरायला कापड देतो. हे त्याचेच उपकार आहे व हे उपकार आपण कधीच विसरु नये. हे रुकसारला तिच्या वडिलानं शिकवलं होतं. तसं पाहिल्यास पाकिस्तानवर आपले उपकारच आहेत. हेही तिला तिच्या वडिलांनी सांगीतलं होतं. आपण भारतीय आहोत व आपल्यासाठी भारत देशच चांगला देश आहे. याचंही बाळकडू तिला तिच्या वडिलांकडून मिळालं होतं. तसे पाकिस्तानकडून भारतीयांवर होणारे हल्ले पाहून रुकसार विचार करीत होती की पाकिस्तान देशच मुळात नष्ट व्हावा. पाकिस्तानचही ऑपरेशन व्हावं. जे ऑपरेशन पाकिस्तान म्हणून ओळखलं जावं.
           दूरवर आकाशात विमान चालविणारी रुकसार. तिनं पहलगाम घटना ऐकली होती. त्या घटनेत कितीतरी महिलांचे कुंकू पुसले गेले होते. ज्यात तिचीच मैत्रीण होती. जिचा नुकताच विवाह झाला होता व ती फिरण्याच्या उद्देशानं पहलगामला आली होती. तिला काय माहित होतं की पहलगामात आतंकवादी येतील. ते हिंदू आहात की नाही विचारतील. कलमा पढायला लावतील व हिंदू आढळून आल्यास गोळी घालून मारुनही टाकतील. 
          आज पहलगाम घटना घडली होती व चारपाच आतंकवांद्यांनी पहलगामात फिरायला आलेल्या काही चारशे पाचशे लोकांना एकत्र केलं. त्यांना बंधूकीच्या धाकावर एकत्र केलं व विचारलं की तुम्ही हिंदू आहात काय? होय म्हटल्यावर ताबडतोब गोळी चालवून कुंकू पुसल्या गेलं. त्यातच काहींनी धाकानं हिंदू नसल्याचं सांगीतलं. त्यांना वाटलं की अशानं तरी आपला जीव वाचेल. अशांना कलमा पठन करायला लावल्या. त्या कलमा ते मुस्लीम नसल्यानं पठन करता आल्या नाहीत. मग काय, त्यांनाही मारुन टाकण्यात आलं. ही चित्रविचित्र घटना अगदीच मोजक्या वेळात घडली व ताबडतोब डोळ्याची पापणी लवते न लवते आतंकवादी पसार झाले. मात्र घटना जशी घडली. तशी ती घटना तेवढ्याच वेगानं परीसरात पसरली व सत्ताधीशांच्या कारभारावर गालबोट लागलं. 
          ती घटना सत्ताधिशांना माहित झाली होती. मग काय, सत्ताधीश खवळून उठले होते. परंतु शांतता बाळगणं गरजेचं होतं. कारण शांतता जर बाळगली नाही तर आपल्या हातून काहीही होवू शकतं. असं सत्ताधीशांना वाटत होतं. ते तरी काय करणार होते. 
         दोन चार दिवस गेले. सत्ताधीश गुप्तपणे सभा घेत होते. चर्चा करीत होते. कुंकू पुसल्याचं गांभीर्य चेहर्‍यावर होतं. शिवाय बदल्याचीही भावना ती होती. नाचक्की केली होती आतंकवाद्यांनी. अखंड देशाची आणि त्या देशाची सत्ता चालविणाऱ्या सत्ताधीशांची. त्या सत्ताधीशाला पाकिस्तानचा राग येत होता. राग येत होता, त्यांच्यातील धर्मांध विचारांचा. वाटत होतं की या पाकिस्तानला हिंदू समाप्त करायचे आहेत की काय? हिंदूच मारले. पुरुषसत्ताक असलेला विचारच मारला. अन् जीवंत ठेवली स्री. जिच्या मनात धर्मविचारांचा विचार नसेल. असं त्यांना वाटलं असेल. कदाचीत जीवंत असणाऱ्या या स्रीनं कदाचीत क्रोधाग्नीनं मुस्लीम युवकांशी विवाह केला तर त्यांचा होणारा वंश हा मुस्लीम होईल. आपल्याला संपुर्ण भारत मुस्लीममय करता येईल. 
         तो सत्ताधीश व त्या सत्ताधीशांना रागच येत होता पाकिस्तानचा. जो आपल्या देशात अशाच आतंकवाद्यांना आश्रय देत होता. जे आतंकवादी धर्माच्या नावावर कुंकू पुसत होते. त्यासाठीच गंभीर सल्लामसलत करीत होते. कदाचीत त्यातून चांगलं फलीत काढण्याचा विचार सुरु होता.
          सत्ताधीश विचार करीत होते. आपण ऑपरेशन सिंदूर करावं. स्रियांनाच पुढं करावं. कुंकवाचा बदला कुंकवानंच घ्यावा. त्यासाठी सरकारनं ठरवलं. या कामासाठी महिलांचीच निवड करावी आणि त्यातही मुस्लीम महिला. 
          तो विषय व तो सरकारचा सत्ताधिशांच्या माध्यमातून झालेला विचार. अशी महिला कोण आणि तिही मुस्लीम महिला की जी आपल्या कामात येवू शकेल. ऑपरेशन सिंदूर करु शकेल. कुंकवाचा बदला घेवू शकेल. त्यावर विचार विमर्श करण्यात आला व त्यात रुकसारचं नाव सुचविण्यात आलं. परंतु रुकसार मुस्लीम. ती आपलं काम करु शकेल काय? कारण पाकिस्तान हा मुस्लीम देश आहे. अन् मुस्लिमांवर विश्वास तरी कसा ठेवायचा? त्यावर कोणीतरी म्हणालं, 'सर्वच मुस्लीम वाईट नसतातच. काही काही मुस्लीम हे आपल्या देशाशी कट्टर असतात. रुकसार त्यातीलच. तिचे वडीलही यापुर्वी सैन्यात होते व त्यांनी आपली सैन्यातील नोकरी इमानदारीनं केली. तेच संस्कार आहेत रुकसारमध्ये. आपण तिच्यावर विश्वास करुया. विश्वास करायला काय हरकत आहे.'
         'अन् विश्वासाचा अविश्वास झाला तर?' सत्ताधीश म्हणाले.
         'ती एकटीच मोहिमेतील महिला नसेल की अविश्वास होणार. बाकिच्याही तिच्यासोबत आपल्या इतर धर्मीय महिला आणि पुरुष असणारच.'
           तो सुचविण्यात आलेला उपाय. त्यावर विश्वास ठेवून सत्ताधीशानं ठरवलं. आपण ऑपरेशन सिंदूरची जबाबदारी रुकसारवरच द्यावी. 
           रुकसार....... रुकसार ही भारतीय सैन्यात विंग कमांडर होती व तिला युद्धजन्य परिस्थितीचा अनुभव होता. तिच्या मदतीला अनेक सारे वीर होते व त्यात आणखी महिलाही होत्या. त्यातील एक सपना. 
           तिचं नाव सपना होतं व ती हिंदू होती. दोघ्याही अनुभवसंपन्न होत्या व दोघांच्याही अनुभवाचा फायदा ऑपरेशन सिंदूर अंतर्गत देशाला होणार होता. त्यातच ती जबाबदारी रुकसारवर सोपविण्यात आली व ठरलं की ऑपरेशन सिंदूर मिशन यशस्वी करायचं. अन् हे मिशन पुर्ण होईपर्यंत या कानाची त्या कानाला खबर नको. अर्थात सर्व गोष्टी व निर्णय गुप्त ठेवायचे. केव्हा पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणावर हल्ले करायचे. ते सेनेनच ठरवायचं.
         रुकसार मुस्लीम होती. परंतु देशाप्रती ती इमानदार होती. त्यातच तिनं ऑपरेशन सिंदूर ही मोहिम यशस्वीपणे हाताळली नव्हे तर ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं. त्यानंतर ती चर्चेत आली. सपना प्रसंगी मागे पडली. दोघींचं योगदान तेवढंच होतं. परंतु रुकसार मुस्लीम असल्यानं ती जास्त चर्चेत आली होती.
          महिला.... एक घरातील लक्ष्मी. खरं तर हिंदू धर्मशास्त्रानुसार महिलांना घरातील लक्ष्मी मानलं जातं. मग ती कोणत्याही जातीतील वा धर्मातील स्री का असेना. हाच सन्मान जोपासला आहे भारतात. जो पुर्वी अखंड हिंदुस्थानात होता.
          पुर्वीच्या महिला पुर्वी हिंदुस्थानात असतांना युद्धात पती मरण पावताच जोहार करीत होत्या. परंतु परकीय मुस्लीम सत्तेच्या नादात लागत नव्हत्या वा त्यांच्या अत्याचाराच्या शिकार होत नव्हत्या. पहलगाम मधील घटना अशीच होती. पहलगाम घटनेत महिलांचे कुंकू मिटविण्यात आले होते. सोबतच म्हणण्यात आलं की तुम्हाला तुमचे कुंकू का मिटवले गेले. असं जर सत्ताधीशांनी विचारलं तर खुशाल सांगा की हे आंतकवाद्यांनीच केलंय.
          पहलगाम घटना. ज्या घटनेत पर्यटक पर्यटनाला आलेले होते. ज्यात हिंदू होते. काही मुस्लीम होते. त्यामध्ये काही आतंकवाद्यांनी या सर्व पर्यटकांना घेरलं. म्हटलं की तुम्ही हिंदू आहात की मुस्लीम. ज्यांनी हिंदू आहोत असं अभिमानानं सांगीतलं. त्यांना जागीच उडवलं आणि ज्यांनी मुस्लीम सांगीतलं, त्यांना कलमा वाचायला लावल्या अर्थात म्हणायला लावल्या. यात जे हिंदूच होते, परंतु आपला जीव वाचविण्यासाठी जे खोटे बोलले होते व मुस्लीम सांगीतलं होतं. त्यांना मुस्लीम कोणत्या कलमा पठन करतात. हे माहित नसल्यानं ते कलमा पठन करु शकले नाहीत. ज्यातून शंका निर्माण होवून त्यांचाही त्यांच्या पत्नीच्या डोळ्यासमोर अंत करण्यात आला व एका हिंदू प्रजातीला दाखविण्यात आलं की या विधवा झालेल्या महिलांना कोणी स्विकार करीत नसतील तर आम्ही त्यांचा स्विकार करु. जसे आमचे पुर्वज असलेले बादशाहा करीत होते. परंतु त्यांना भारताची ताकद माहीत नव्हती असंच वाटत होतं व ही आंतकवादी घटना एक ठिणगी ठरली ऑपरेशन सिंदूर घडविण्यासाठी.
          आम्ही भारत देशात राहतो व आमचा भारत देश सहिष्णू आणि धर्मनिरपेक्ष देश आहे. इथे ज्याप्रमाणे हिंदूंचा आदर आहे, त्याप्रमाणेच मुस्लिमांचाही आदर आहे. हा भारत देश हिंदूंना जसे संरक्षण देतो. त्यांचा जसा सन्मान करतो. तेवढाच सन्मान हा मुस्लिमांचाही करतो. तसाच तेवढाच सन्मान सर्व धर्मियांचाही करतो. भारतात पुर्वीपासूनच हिंदू, मुस्लीम, शिख, ईसाई, पारशी अशी वेगवेगळ्या धर्माची मंडळी राहात असतात. पर्यायानं सांगायचं झाल्यास हे सर्व धर्मीय अतिशय आनंदानं व गुण्यागोविंदानं राहात असतात. असे असतांना पहलगाम घटना या देशात होणे म्हणजेच देशातील हिंदू मुस्लीम एकतेवर प्रश्नचिन्हं निर्माण होणे होय. तसं पहलगाम घटनेनंतर घडलंही. हे एका फेसबुकवरील व्हिडीओ वरुन दिसून आलं.
           फेसबुक....... ज्या फेसबुकला जगातील लाखो लोकं मानतात. त्यावर असाच पहलगाम घटनेनंतर एक व्हिडीओ गाजला. भारतात राहणाऱ्या मुस्लिमांनी भारतीय झेंडे जमीनीवर ठेवून त्या झेंड्यांना पायदळी तुडवलं. त्यातील काही झेंडे जाळले. हा अपमान होता. तो अपमान केवळ तिरंगी झेंड्यांचा नाही तर तो अपमान भारताचाच होता. त्या बदल्यात भारतीयांनी पाकिस्तानचे झेंडे जमीनीवर चिकटवले व त्याला पायदळी तुडविण्याचा तमाम भारतीयांनी प्रयत्न केला. परंतु तो पाकिस्तानचा अपमान नाही तर आपला अपमान आहे असं वाटून काही स्वतःला भारतीय न मानणाऱ्या मुस्लिमांनी ते झेंडे हातानं ओरबाडून काढले. यावरुन विचार येतो की जी मुस्लीम मंडळी भारतात राहतात व पाकिस्तानचे झेंडे ओरबाडून काढतात. पाकिस्तानी झेंड्यांचा अपमान होतो म्हणून नव्हे तर पाकिस्तानचा अपमान होत आहे म्हणून. खरं तर हा भारत देश ज्या आपल्या देशात राहणाऱ्या तमाम मुस्लीम धर्मीय लोकांना पोषतो. त्यांच्या जेवनाची, कपड्यालत्याची व्यवस्था करतो. त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करतो. त्यांना राशन दुकानातून अन्नधान्य पुरवतो. त्या मुस्लीम समुदायांनी पाकिस्तानचे गोडवे का गावेत? हा प्रश्न भारतातील सर्व लोकांसमोर पडतो. अन् मग विचार येतो की आपण पाकिस्तानचे लाड का पुरवावेत. पहलगाम घटनेमध्ये जे आतंकवादी आले. ते आलेच कसे? कदाचीत भारतातीलच काही फुटीरवादी लोकांनी त्यांना भारतात आणले असावे. ज्यातून पहलगाम घटना झाली व तमाम सव्वीस महिलांच्या पतींची हत्या केल्या गेली. 
          ऑपरेशन सिंदूर. हे सत्ताधीशानं नाही तर तमाम भारतीयांनी घडवून आणलेली घटना. ही घटना व्हायलाच हवी होती. कारण जबाव द्यायलाच हवा होता. त्याशिवाय पाकिस्तान दबला नसता. कारण नियम आहे. आपण शत्रूला घाबरत राहिलो तर तोच शत्रू एक ना एक दिवस आपल्याला गिळंकृत करणारच. परंतु त्याला जर आपली ताकद दाखवली तर तो आपल्या वाट्यालाही जात नाही. हेच ऑपरेशन सिंदूरवरुन दिसून आलं व त्या त्या तमाम पाकिस्तानच्या बाजूने वागणाऱ्या व भारतातच राहणाऱ्या लोकांनाही एक चपराक मिळाली की आता आपण भारतविरोधी जास्त बोलू नये. भारताच्या विरोधी वागू नये. आपण भारतातच राहतो आणि भारताचीच मालमत्ता खातो. मग भारताकडूनच बोलायला हवं आणि भारताला ज्या घटना शोभतील. त्याच घटना करायला हव्यात. उगाचंच पाकिस्तानच्या अनैतिक कृत्याचं समर्थन करुन पाकिस्तानचा जयजयकार करु नये. नाहीतर काल पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं पाकिस्तानचं ऑपरेशन सिंदूर केलं. तोच भारत उद्या आपलंही ऑपरेशन करेल व त्याला नवीन वेगळंच नाव देईल. ऑपरेशन स्पीक किंवा ऑपरेशन कृत्य. विशेष सांगायचं झाल्यास ऑपरेशन सिंदूर होणं गरजेचं होतं. कारण ते तमाम भारतीयच होते की ज्यांचं कुंकू पुसलं गेलं होतं. त्यांचा कोणताच गुन्हा नव्हता तरीही. गुन्हा एवढाच होता की ते फिरायला गेले. गुन्हा एवढाच होता की त्यांना कलमा पठन करता आल्या नाहीत. ज्यात त्यांच्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला नव्हे तर हत्या. जर ऑपरेशन सिंदूर झालं नसतं तर पाकिस्ताननं एक नवी डकार दिली असती व म्हणत सुटला असता की जो भारत स्वतःला सक्षम समजतो. त्या भारतानं आमचं केलं तरी काय? महत्वपुर्ण बाब ही की आमचा भारत हा सक्षम आहे व तो सहिष्णू आणि शांत आहे. याचा अर्थ तो प्रत्येक वेळेस चूप बसतो असे नाही. तोही वीटचं उत्तर दगडानं द्यायचं जाणतोच. ऑपरेशन सिंदूर ही अशीच बदल्याची घटना. वीटचं उत्तर दगडांनी देणारी घटना. ज्यात भारताचा विजय झाला होता. या घटनेनं केवळ पाकिस्तानलाच चपराक मिळाली असे नाही तर या घटनेनं भारतातच राहणाऱ्या तमाम पाकिस्तानाचे समर्थन करणाऱ्या लोकांनाही चपराक मिळाली. कारण ज्यांनी पाकिस्तानचं समर्थन केलं होतं. त्यांच्यावर पोलीस कारवाई झाली होती. त्यांना महाविद्यालयानही काढून टाकलं होतं. शिवाय जर भारतात राहायचे असेल तर भारताचे बनून राहा. अन्यथा पाकिस्तानात जावून राहा. असंही भारतानं सुनावलं होतं. महत्वपुर्ण बाब ही की भारतात जर राहायचं असेल तर भारताचं बनून राहायला हवं. भारताचेच गोडवे गायला हवे. भारताकडे वाकडी नजर टाकू नये. जर वाकडी नजर टाकाल तर आम्ही ऑपरेशन सिंदूर नक्कीच करु. सिंदूरचा बदला ऑपरेशन सिंदूरनंच करु. हे सत्ताधीशांचं म्हणणं होतं.
****************************************