५
युद्धजन्य परिस्थिती देशात निर्माण झाली होती. पाकिस्तान ड्रोनहल्ल्याचा मारा करीत होता. त्यानं दोन दिवसात तब्बल तीनशे ते चारशे ड्रोनहल्ले केले होते. मात्र भारतानं ते ड्रोनहल्ले आपल्या स्वदेशी बनावटीच्या आकाश नावाच्या क्षेपणास्त्रानं अगदी मिनिटाच्या आतच परतावून लावले होते. ज्याची क्षमता होती, पंचवीस किलोमीटर. ते क्षेपणास्त्र ५.७८ मीटर लांब होतं. ते क्षेपणास्त्र ९६ प्रतिशत भारतीय बनावटीचं होतं. तशीच त्याच्यात एकाच वेळेस अनेक दिशांनी येणाऱ्या हवाई हमल्याला सामोरे जाण्याची क्षमता होती.
आकाश क्षेपणास्त्र सन १९८३ ला बनविण्यात आलं होतं. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं ते भारतीय सैन्यात दाखल झालं नव्हतं. काही काळानं का होईना, ते क्षेपणास्त्र भारतीय हवाई दलात व त्यानंतर भारतीय सैन्यदलात आलं व पुढं त्याचे अनेक प्रकार अस्तित्वात आले होते व सध्या भारत हेच क्षेपणास्त्र संयुक्त अरब अमीरातीसह इतर देशांना निर्यातही करीत होता. हे क्षेपणास्त्र अगदी सहजपणे साध्या ट्रकमधून वाहून नेता येत होतं. हे जरी खरं असलं तरी आजही काही काही कुटूंबात आपल्या घरी शिवाजी, संभाजी निर्माण व्हावा असं मानत नव्हते. तशी देशाला आता सैनिकांची गरज भासणार होती आणि लोकांना शिवाजी, संभाजी दुसऱ्याच्याच घरी निर्माण व्हावा असं वाटत होतं. त्यामुळं रुकसारला वाटत होतं की घराघरांतून शिवाजी, संभाजी निर्माण व्हावा? कुणीतरी हिंमत दाखवायलाच हवी. कारण हिंमत जर दाखवली नाही तर कोणीही या देशावर हमला करेल व बाबर बनेल, औरंगजेब बनेल व संभाजीसारख्या विरांची हत्या करुन महाराणी येशुबाईचं कुंकू पुसेल. तसाच अफजलखान येईल व तो येथील निरपराध लोकांचा बळी घेईल. निरपराध गाई गुरांना व पशुंना त्रास देईल. तसाच देवळे व देवळातील मुर्ती नष्ट करेल. त्यासाठी कुणाला तरी शिवाजी, संभाजी बनावंच लागेल. परिणाम माहित असतांनाही. कारण हातात सापडल्यास किंवा संधी मिळाल्यास हेच औरंगजेब तळपू तळपू या नश्वर देहाला संपवतील. म्हणूनच हिंमत करावी लागेल कुणाला तरी संभाजी बनण्याची आणि कुणाला तरी शिवाजी बनण्याची. त्यानंतर औरंगजेब निर्माणच होणार नाही. अन् निर्माण झालाच आणि संभाजी संपलेच. तरी इतिहास बनेल संभाजी बलिदानाचा. ही सत्य बाब आहे.
शिवाजी पाहिजे, संभाजी पाहिजे असं लोकं म्हणतात. परंतु तो आपल्या घरात नाही तर दुसर्यांच्या घरात हवा असतो. एकदोनच हिंमतवान असतात की जे आपला एकुलता एक मुलगा देशासाठी वाहतात. अर्थात देशसेवेसाठी देतात.
भारत हा विचारी देश आहे व या देशात पुत्र जन्मावर कायद्यानं बंदी जरी घातली नसेल तरी विचारानं बंदी घातली आहे. या देशात खर्च परवडत नाही. मुलांचं व्यवस्थीत शिक्षण होत नाही म्हणून काही लोकं दोन किंवा एकच पुत्र जन्माला घालतात. त्यानंतर कुटूंबनियोजन करतात. काही ठिकाणी स्वतः डॉक्टरी यंत्रणा त्यात मार्गदर्शन करुन एक किंवा दोनच अपत्य ठेवायला सांगतात. अशी दोन अपत्य जन्माला घातली तर त्याचं फारच लाड असतं कुटूंबात. आईवडीलांना ती प्रिय असतात व त्यांचं झालेलं बरंवाईट त्यांना आवडत नाही. याऊलट पाकिस्तानचं आहे. पाकिस्तानी अनेक अपत्य जन्माला घालतात. त्यांचं पालनपोषण करता येवो की न येवो. ते त्याचा विचार करीत नाही. महिलांना तर मुलंच पैदा करण्याची जणू मशीन समजतात. त्यांना त्यावर विचारले असता ते सांगतात की कुटूंबनियोजन करणं म्हणजे अल्लाच्या कामात अडथडा आणणं होय. अल्ला जसा मुलांना जन्माला घालतो. तसा तो त्याच्या पालनपोषणाचीही जबाबदारी घेतो. त्यांना जर विचारलं की एवढी मुलं जन्मास घातल्यावर त्यांचं शिक्षण करता येतं का? त्यावरही त्यांचं उत्तर होय असंच येतं. तसं पाहिल्यास पाच पाच मुलं असलेल्या घरातही दोन तीन शिकलेली मंडळी असतातच. काही घरात मुली जरी हुशार असतील तरी त्यांना शिकण्यास बंदी आहे. ते कोणतीही कामं करतात व त्या कामात त्यांना लाज वा शरम वाटत नाही. याऊलट भारतात एखादा मुलगा जास्त शिकलाच तर त्याला कोणतंही काम करायला लाज वाटते व ते आईवडीलांवर ओझं बनून राहात असतात. पाकिस्तानमध्ये वयाच्या दहाव्याच वर्षी मुलं सक्षम होतात व ते मिळेल ते काम करण्याची उर्मी दाखवतात. तसं भारतात नाही आणि जेव्हा ती लहान वयात कामाला लागतात. तेव्हा त्यांच्यात विचारी गुण येत नाही. त्यांच्यात गुन्हेगारीचाच जास्त प्रमाणात गुण येतो. शिवाय पाच सहा मुलांमधून एक दोन मुलं ते अल्लासाठी अर्थात धर्मासाठी वाहतात. मग त्यात युद्ध का असेना. ते लोकं युद्धालाही अल्लाचंच काम समजतात. जास्त विचारी नसल्यानं केवळ जे कोणी त्यांच्यात शिकलेले असतात. त्यांच्यावर अगदी सहजतेनं विश्वास करतात. त्यावेळेस ते विचारच करीत नाहीत की अशी शिकलेली मंडळी ही रास्त विचार सांगत आहेत की नाही. बस, त्यांचं चुकीचंही बोलणं असेल तर त्यावर सहज विश्वास करुन त्यापद्धतीनं वागणे याला ते जास्त प्राधान्य देतात.
लोकसंख्येच्या बाबतीत विचार करतांना एका एका दाम्पत्यांच्या घरी आठ ते दहा मुलं अगदी सहज दिसतात. पाचच्या वर तर बऱ्याचशा घरात मुलं आहेत. अवघ्या तीस वर्षातील त्यांच्या एका कुटूंबाची आकडेवारी पाचशेच्या वर जाते. याऊलट भारतीयांचं आहे. भारतातील हीच तीस वर्षाची आकडेवारी पाहिली तर पन्नासवर जाते. या ठिकाणी दोघांमधील लोकसंख्येचं प्रमाण मोजमाप केल्यास कहॉं राजा भोज और कहॉं गंगू तेली अशा अर्थाची जी म्हण आहे, तशी होते. म्हणजेच भारतीय लोकसंख्येच्या दहापट त्यांची लोकसंख्या वाढते. समजा एखादा आजारी पडल्यास त्याला ते जडीबुटी देवून सुधरवतात. त्याला दवाखान्यात सहसा नेत नाहीत. तसं पाहिल्यास ते सहसा आजारीही पडत नाहीत व आयुष्यमानाचा विचार केल्यास बरीचशी मंडळी ही शंभरच्या वरचं आयुष्य जगतात.
पाकिस्तानातील लोकसंख्यात्मक परिस्थिती आज भारतातीलही काही मुस्लीम समुदायांच्या घरी आहे. बऱ्याचशा मुस्लीम समुदायात अशीच मुलं आहेत व त्यांचा खर्च भारत सरकार करीत आहे. काही मुस्लीम समुदाय कर भरत नाहीत. परंतु सरकारी राशन उचलतात व त्यांचा भुर्दंड भारतावर पडतो व भारतातील सर्वसामान्य नागरिकांवर पडतो. भारतात राहणारे काही मुस्लीम माझ्यासारखे नाहीत की जे भारताचं खावून भारताशी इमानदारी दाखवतील. ते भारतात राहतात. भारताचं खातात व पाकिस्तानचे गोडवे गातात. तेच आतंकवादी लोकांना पनाह देतात. त्यांच्याशी चर्चा करतात. त्यामुळंच या देशात आतंकवादी शिरतात व पहलगामात महिलांचं कुंकू पुसतात. बरेचसे मुस्लीम धर्माला मानतात व धर्मासाठी काहीही होवो, प्राण देत असतात. मग ते हा विचारच करीत नाहीत की आपण कुठे राहतो. ते भारतातच राहून तिरंग्याचा अपमान करतात. पाकिस्तानी झेंडे उंचावतात. पाकिस्तानी झेंड्याचा अपमान त्यांना सहन होत नाही. तसंच कोणी राष्ट्रगीत म्हणत असेल वा भारत माता की जय म्हणत असेल तर ते त्यांना सहन होत नाही. वंदेमातरम तर अजिबात सहन होत नाहीत. मदरसे आहेत. परंतु काही मदरशात राष्ट्रगीत होत नाही.
भारतात मुस्लीम समुदाय राहतो व तो धर्माला जास्त महत्व देत असतो आणि द्यायलाही पाहिजे. कारण आपल्याला आपले सगेसोयरे जसे प्रिय आहेत. तसाच प्रिय आहे आपला धर्म. धर्मासाठी वीर संभाजी राजांनी आपलं हाल हाल करुन बलिदान दिलं. एवढा धर्म प्रिय असायलाच पाहिजे. परंतु मुस्लिमांनी एक गोड गोष्ट समजून घ्यायला हवी की आपण मुळ मुस्लीम आहोत की रुपांतरीत. रुपांतरीत असेल तर धर्माबद्दल चिडायची तेवढी गरज नाही. सर्व धर्म समानच आहेत हे त्यांनी मानायला हवं आणि मुळ असतील तर ठीक आहे. परंतु मुळ जरी असतील तरी दोन देशाचा वाद त्यांनी समजून घ्यावा. समजून घ्यावे की आम्ही भारतात राहतो व भारत आमचा नाही माझा देश आहे. मी इथे राहतो ना. माझी पिढी याच देशात राहते ना. माझी पिढी हाच देश पोषतो ना. याचा विचार करायला हवा.
पहलगामचा कुंकू पुसण्याचा प्रकार हा धर्मावरुन घडलेला प्रकार आहे. केवळ हिंदू नावाच्या एका प्रजातीवर घातलेला घाव आहे. हिंदूंचा त्यांच्या मनात असलेला द्वेष आहे. याचा अर्थ असा नाही की पहलगामची घटना ही केवळ हिंदूंसाठीच झाली. ती घटना तमाम भारतीयांसाठी घडली. ज्यात भारतात राहणारे सर्व लोकं जबाबदार आहेत. ती घटना भारताच्या सरहद्दीत घडल्यानं आपण ही जबाबदारी स्विकारायलाच हवी. हं, तीच घटना जर बाकीच्या देशात घडली असती तर त्याचा एवढा बाऊ केलाच नसता. परंतु ती घटना भारतात घडली. ती एखाद्या मुस्लिमाबाबत जरी घडली असती तरीही त्याचा बाऊ केल्या गेला असता. कारण तो व्यक्ती हा भारतीय असता. तो भारतातील रहिवाशी असता. याचाच अर्थ असा की जो जो कोणी व्यक्ती भारतात राहात असेल, मग तो कोणत्याही धर्माचा का असेना, त्याची जर धर्मावरुन हत्या होत असेल तर त्याची जबाबदारी ही देशानं स्विकारायलाच हवी व देश स्विकारेलच. पहलगाम घटनेत भारतानं शिमला करार मोडला. कारण आहे अस्मिता. आम्ही पाकिस्तानला एवढी मदत करतो. आपल्या देशातील उगम पावलेल्या नद्यांचं पाणी विनामूल्य देतो. ती नदी आमची भुमी वापरते. तरीही त्याचा पैसा घेत नाही. आमची भुमी वापरणारी नदी पाकिस्तानात जात असतांना आम्ही त्याच नद्यांवर बांध बांधून त्यांची सुरक्षीतता करतो. पावसाळ्यात जास्त पाणी जावू देत नाही आणि उन्हाळ्यात त्यांची तहान भागेल यासाठी पाणी सोडतो. एवढं सगळं करीत असतांना जर पाकिस्तान आमच्याच देशाच्या उपकाराची जाणीव ठेवत नसेल, आमच्याच देशावर वार करीत असेल वा आमच्याच देशाचं कुंकू पुसत असेल तर आम्ही त्यांना का बरं माफ करावं? हा प्रश्न तमाम भारतीयांच्या मनात असायलाच हवा. मग तो भारतात राहणारा कोणत्याही धर्माचा व्यक्ती का असेना. हा वाद हिंदूंचाच वाद नाही तर हा वाद आहे तमाम भारतात राहणाऱ्या सर्वच जाती आणि धर्माच्या लोकांचा. तो वाद आहे मुस्लिमांचाही. एक खरा भारतात राहणारा मुस्लीम, त्यानं केवळ आणि केवळ भारताचाच विचार करावा. पाकिस्तान आपल्या धर्मबांधव आहे म्हणून पाकिस्तानचा विचार करु नये. त्यांचा विचार करायला त्यांच्या देशातील धर्मबांधव सक्षम आहेत.
भारत पाकिस्तान लढाई. ही लढाई प्रत्येक धर्माचीच आहे. ही केवळ एका हिंदूंची नाही. जे जे भारतात राहतात. येथील भुमी वापरतात. येथील अन्न वस्र व निवारा वापरतात. त्या सर्वांची आहे. आपला भारत देशच आपल्याला पोषतो. पाकिस्तान पोषत नाही. त्यामुळंच आपण सर्वजण या देशाचे देणे लागतो. तेव्हा हाच विचार भारतात राहणाऱ्या तमाम लोकांनी करायला हवा की भारत माझा देश आहे व भारतावर संकट येत असेल तर ते माझे संकट आहे व त्या सर्व संकटांना मी भारत देशाचा रहिवाशी असल्यानं तोंड देणारच. मी पाकिस्तानात काल जरी राहात असलो तरी आज भारतात आहे व ज्या दिवशी मी पाकिस्तानची सरहद्द सोडली व भारतात आलो. आता मी भारताचं बनूनच संकटाला सामोरे जाईल. जरी त्या देशात माझे सगेसोयरे राहात असतील तरी. यावेळेस आपण महाभारत थोडं नजरेसमोर ठेवावं की तमाम नातेवाईक, गुरु व आप्त समोर उभे असतांना केवळ ते नातेवाईक नाही तर ते अधर्मी आहेत हा विचार करुन अर्जुनानं बाण सोडले. त्या बाणानं त्याचा गुरु, त्यांचे आजोबा, त्याचे भाऊ व त्याचे सर्वच सगेसंबंधी मरण पावले. परंतु जे काही घडलं. ते धर्मासाठीच घडलं याचा विचार करुन अर्जून पुढे सरकत गेला. पुढे त्यानं दुर्योधनाच्या पत्नीशी म्हणजेच भानुमतीशी विवाह करुन कुणबा जोडला. तिनंच कौरव आणि पांडव या दोघांना एक करुन टाकलं. तेच आपल्याला करायचं आहे. याही भारत पाकिस्तान लढाईतून धर्मांध विचाराची माणसं संपवून एक बलशाली हिंदुस्थान तयार करायचा आहे. ज्या देशात हिंदू मुस्लीमच नाही तर इतर धर्मही गुण्यागोविंदानं राहू शकतील. परंतु असं होणार नाही. कदाचीत जागतिक शक्तीसमोर आपल्याला पराभवाचा सामना करावा लागेल असं वाटतंय.
सध्या भारत पाक ड्रोन हल्ले होत आहेत. युद्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळेस भारतातील कोणीतरी संभाजी वा शिवाजी बनण्याची गरज आहे. पाकिस्तानसारख्या औरंगजेब व अफजलखानाला शह देण्यासाठी. कुणीतरी हिंमत दाखवायची आहे. जर प्रत्येकानं विचार केला की शिवाजी, संभाजी दुसऱ्याच्याच घरात निर्माण व्हावा, आमच्या घरात नको. तर अशा परिस्थितीत आपण पाकिस्तानचे ड्रोनहल्ले परतावून लावू शकणार नाही. तसेच अशा निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीवरही मात करु शकणार नाही. कदाचीत आपल्या घरातील शिवाजी, संभाजी बनण्याने पाकिस्तानचं नामोहरण करता येईल नव्हे तर युद्धजन्य परिस्थितीवर मात देखील करता येईल यात शंका नाही. तेव्हा देशातील प्रत्येक नागरिकांनी अशा संकटाच्या समयी शिवाजी, संभाजी बनून पाकिस्तानच्या कुटनीतीचा सामना करावा हे तेवढंच खरं.
********************************************