Black Diamond Operation - 7 in Marathi Detective stories by Chaitanya Shelke books and stories PDF | ब्लॅक डायमंड ऑपरेशन - 7

Featured Books
Categories
Share

ब्लॅक डायमंड ऑपरेशन - 7

प्रकरण ६ : सावल्या अंधारातल्या

     सरलाच्या घरात अंधार होता. चेतन तिच्या मृतदेहाशेजारी उभा राहून मिळालेल्या चावीचा विचार करत होता .

    बाहेर तीन सावल्या हळूहळू घराच्या दिशेने येत होत्या. त्यांचे पायऱ्यांवर पडणारे  आवाज शांत रस्त्यावर स्पष्ट ऐकू येत होते .

" हे लोक कोण असावेत ? " चेतन मनात विचार करत होता . "  श्यामने पाठवलेले माणसं, की पोलिस ? "

कोणताही अंदाज घेण्याआधीच दार धाडकन उघडलं !

 " तुम्ही कोण ? "  चेतनने सावध आवाजात विचारलं .

   तिघांपैकी एक जण पुढे आला . उजव्या हातात त्याच्या एक लोखंडी रॉड चमकत होती. "चेतन, आम्हाला माहीत आहेस तू कोण आहेस ... पण इथून जिवंत जाशील, याची काहीही शाश्वती नाही ! "

     चेतन लगेचच सावध झाला. युद्धाशिवाय इथून सुटका होणार नाही, हे त्याला कळून चुकलं.

. संघर्ष अंधारात

       पहिला हल्ला समोरच्या गुंडानेच केला . त्याने लोखंडी रॉड जोरात चेतनच्या दिशेने भिरकावला , पण चेतनने बाजूला झुकून हल्ला चुकवला आणि लगेच त्याच्या हाताला पकडत त्याला भिंतीवर आदळलं .

        तितक्यात दुसऱ्या गुंडाने मागून हल्ला करायचा प्रयत्न केला , पण चेतनने टेबलावरील एक लाकडी खुर्ची उचलून त्याच्यावर भिरकावली . धडाम ! तो सरळ खाली कोसळला .

तिसऱ्याने पिस्तूल काढून चेतनच्या दिशेने रोखलं !

     चेतनने क्षणार्धात सरलाच्या टेबलावर पडलेली एक काच पकडली आणि ती थेट पिस्तूलधाऱ्याच्या हातावर मारली. वेदनेनं तो ओरडला आणि पिस्तूल खाली पडलं .

याचा फायदा घेत , चेतनने त्याला एका जोरदार ठोशाने जमिनीवर पाडलं .

चावीचा रहस्य

गुंड बेशुद्ध पडताच , चेतनने श्वास घेतला . ही चावी नक्की कुठली ?

         त्याने सरलाच्या घरात लपवलेल्या काही गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला. एका कोपऱ्यात एक जुनी धातूची पेटी दिसली. त्याच्यावर तोच नंबर होता , जो चावीच्या टोकावर कोरला होता —" ७८१ " .

" म्हणजे ही चावी ह्या पेटीसाठीच आहे ! "

 चेतनने चावी टाकली आणि वळसा फिरवताच पेटी "क्लिक" करून उघडली .

आत एक जुनाट पाकीट होतं . त्यावर गणपत चौधरींच्या हस्ताक्षरात काहीतरी लिहिलं होतं —

" जर ही कागदपत्रं बाहेर आली , तर श्यामचं संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त होईल ! "

       चेतनने आत डोकावलं आणि त्याला काही कागदपत्रं दिसली . त्यावर बऱ्याच कंपन्यांची नावं होती , पैशांच्या देवाणघेवाणीचे पुरावे होते ... आणि एका नावावर त्याच्या नजरा स्थिरावल्या —

" श्याम ट्रान्सपोर्ट कंपनी  –  गुप्त सौदे . "

           " म्हणजे श्यामची सत्ता केवळ गुन्हेगारी विश्वापुरती नाही, तर त्याचा हात राजकारण आणि व्यवसायांपर्यंत पोहोचला आहे ! "

  पण या आधी चेतन पुढचं काही वाचू शकला असता , बाहेर पोलिसांची गाडी येऊन थांबली !

पोलिसांचा सापळा ?

" तुम्ही आतले , बाहेर या ! आम्हाला माहिती आहे की तुम्ही इथे आहात ! "

देशमुखांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता .

     चेतन काही क्षण विचारात पडला. "देशमुख खरंच मदत करायला आला आहे की श्यामने त्याला हाताशी घेतलंय ? "

आता त्याच्याकडे दोनच पर्याय होते — पोलिसांसोबत जायचं , की चोरट्या मार्गाने बाहेर पडायचं ?

 

(  पुढच्या भागात : चेतन पोलिसांच्या तावडीत सापडेल का ? फाईल सुरक्षित ठेवू शकेल का ? श्याम पुढचा डाव काय खेळणार ? )

 

 - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -- -