बी. एड्. फिजीकल भाग 6
हात जोडीत तात्या म्हणाला,“हितंच भेटलात तेबरं ... वर आणि घेटू नका..... माझ्या बापजाद्यान हा धंदा केलेला नाही.” उद्या कमी पडलेलामाल जावून घेवून या नाहीतर बीलं तरी बदलून आणा.” फडणीस वहीत यादी उतरून घेत होता.“ बागुल म्हणाला, “खराड्या,ह्यो बामन लई येड्याबोड्याचा हाय की....आमाला कामाला लावलं की.वही मिटून घेत फडणीसरागाने म्हणाला,“ काय बोललास रे बागूल? आं.... आधी माफी माग.” बागूल भलताच निबर होता,“आता मापी आनी कस्या बद्दल?” मग न राहवून चावरेकर म्हणाला,“कसली घान शिवी दिलाईस येड्यातू.... चुकलो म्हन नी हो मोकळा.....” त्यावर अधिकच चिडून बागुल बोलला,“ लई शाना हाईस की......आमालाच दानीला द्येवून वर आनी आमालाच शिकीवतोस व्हय रं .. तुजा काय संबंध...” फडणीस निकरावर येत म्हणाला,“आता शेवटचं सांगतोय्...माफी माग.” बागूल डोळे लाल करीत बोलला,“ उद्याच्याला तूट भरून देतोय्य की... न्हाई मागनार माफी.... काय करनारेस?” संयम सोडून तात्याने फाड्कन बागूलच्या अशीकानफटीत मारली पाचही बोटांचे वळ उठले. बागूल खुनशीपणे म्हणाला, “ह्याचा वचपा कदीतरी काडिन की मी बी....” तात्या म्हणाला, “ते सोड रे..... मी काय रस्त्यावर पडलेला नाही.बॅच मध्ये आमच्या कडची पोरं आहेतच की..... हे प्राचार्यांच्या कानावर गेलं ना तर तुला घरी बसावं लागेल”
एकादशीला बऱ्याच लोकांचा उपास असल्यामुळे सगळ्यानाच पोटभर खिचडी, मोठं ग्लास भर दूध आणि प्रत्येकी दोन डझन केळी असा मेन्यू ठरलेला होता.संध्याकाळी सामान आल्यावर नेहेमी प्रमाणे आम्ही तिघेही तात्याच्या मदतीला गेलो. लेडीज मेसचा वाटा बाजुलाकेला. मोजमाप ठरलेलं असलं तरी फळं वगैरे थोडी जादा आणली जात. त्यादिवशी प्राचार्य,जाधव सर आणि जोशी डॉक्टर याना २/२ डझन केळी हवी होती. त्याचे पैसे ते तात्याकडे जमा करणारहोते. ती मोजदाद करून आम्ही त्यांच्या वाटण्या वेगळ्या केल्या. तात्याने त्यांची नोंद करून आपल्या वाटणीची केळी काढून घेतली. आम्हाला स्वत:च्या वाटणीतली दोन-दोन केळी दिली नी आपणहीखाल्ली. रात्री मेसमध्ये गेल्यावर सर्वांबरोबर तात्यालाही दोन डझन केळी आणि सरानी नेलेल्या केळ्यांचे पैसे मेस बॉयने आणून दिले. तात्या म्हणाला, “माझ्या वाटणीची 'केळं' मी संध्याकाळ्च्याला घेतली आता मला नको.काळे , चावरेकर नी प्रभू तुमच्या वाटणीतलं एकेक केळ मला द्या. संध्याकाळी रुमवर गेल्यावर माझी डझनभर केळं खाऊन संपवली की पोरानी.”
एक गंमत होती तात्या केळ्याला 'केळं' किंवा 'केळे'न म्हणता अनुस्वार गाळून केळ म्हणे. एक असेल तर केळ नी अनेक वचनी केळी न म्हणता अनुस्वारवापरून 'केळं' म्हणे. आम्ही कोकण्ये यावरूनत्याची चेष्टा करू. तात्या हसून सांगे आमच्या कडच्या मराठीत असंच म्हणतात. तिघांच्या वाटणीची खिचडी तात्या, मी, प्रभू, रावूळ नी गोवेकर पाच लोकाना पुरली. उरलेली दोन ताटं देशमुख धडसग्रूपने उडवली. शिवाय त्यांच्या वाटणीचे सगळी केळीही फन्ना केली. त्या शिवाय सगळ्यानावाटून जादाची उरलेली केळी मेस बॉयनी लगेच वाटून टाकली, प्रत्येकाला दोन दोन वाटणीला आली. आम्ही ग्लासभर दूध आणि तीन-चार केळी जेवणावर खाऊन उरलेली रुमवर नेऊन पुढचे दोन तीन दिवस पुरवून खाल्ली. राऊळ म्हणाला, हे खाणारे मेले माणूस नाय.... बैलाच्याजातकाचे हत....ह्येंची तऱ्हा म्हंजे पिशागत तरी बरी.
चारपाच महिन्यानी मेसची मिटींग झाली तेव्हा मलाअचानक क्ल्यू सुचला.शाकाहार मांसाहार थाळीच्या खर्चावर मी आक्षेप घेतला. मटण प्लेट वरचा खर्च नी स्वीटवरचा खर्च यातली तफावत सरळ-सरळपक्षपात करणारी होती. मीच त्यावर तोडगाही सुचवला. मेस रजिस्टरमध्ये दोन्ही आहार घेणारांची नोंद असते.तेंव्हा यापुढे फिस्टच्या वेळची बीलं काढताना मांसाहर खर्च भागिले खाणारांची संख़्या आणि शाकाहारी मेन्यू खर्च भागिले शाकाहारींची संख्या अशी बील आकारणी व्हावी. प्राचार्याना हे पटलं नी त्यानंतरतशी बीलं काढायला लागल्यावर शाकाहारीना मासिक बिलात पंधरावीस रुपये कमी होवू लागले. दोन तीन महिन्यानी मी, प्रभु, चौधरी, चावरेकर, राऊळ,ओक, गोवेकर मेस कमिटीवर गेलो. त्या महिन्यात बिलांचे आकडे वाढवून खावडी काढायचा प्रकारझाला नाही.त्या महिन्याला सहा वेळा फिस्ट देवूनही मासिक बील आलं शाकाहरीना ७६ नी मांसाहारीना ८४ रुपये. पण पुढच्या महिन्यात पुन्हा मागचे पाढेपंचावन्न तशी गत झाली.
ऑग़स्ट अखेर आमचे प्रॅक्टिस टीचिंग लेसन्स सुरुझाले. आमची एक अध्यापन पद्धती शारिरीक शिक्षणव दुसरी पदवी परीक्षेतील विषयानुसार दिली जाई. दोन्ही मेथडचे प्रत्येकी १५ प्रमाणे एकूण ३० पाठ होते.अध्यापन अनुभव असणाराना दुसऱ्या मेथडचे ५ पाठकमी केले जात. बोरीवलीचं गोखले स्कूल, सन्मित्र आणि अ.भि.गोरेगावकर- गोरेगाव. उत्कर्ष मालाड, अरविद गंडभीर जोगेश्वरी, पांडुरंग स्कुल आणि पटेलस्कूल कांदिवली या शाळा गटवार विभागून दिलेल्या होत्या. मी , प्रभु, चावरेकर योजूनएक गट मिळवला.१७ ऑगस्टला आमच्या गटातले चौदा जण आणिप्रा. सबनीस मॅडम व प्रा. गोंदकर हे निरिक्षक गोखले स्कूल मध्ये दाखल झालो.माझा दुसरा पिरीयड झाला.पाचव्या पिरियडनंतर ग्रूप डिस्कशनझालं. मुलांमध्ये मी, प्रभु, चावरेकर, लिमये, महात्मे आणि मुलींमध्ये मोने, गायकवाड,खराटे यांचे लेसन्स चांगले झाले. पण बिटला,जवाहर हाऊसचा लिडर चव्हाण, गोटिस आणि मुलींपैकी जाधव यांचे पाठ पडले. ही शाळा नामांकित होती. प्रत्येक वर्गाच्या सात-आठडिव्हिजन्स आणि प्रत्येक वर्गात ६५पर्यंत पट असे. मुलं सुशिक्षित कुटुंबातली, हुषारनी तल्लख. जे नीट तयारी करून आलेले होते त्याना चांगला प्रतिसाद मिळाला. पण जे कच्चेहोते, अशुद्ध घाटी वळणी भाषा बोलणारे त्यांची पुरती भंबेरी उडाली.
सहाव्या पिरियडला आमच्या ग्रूपमधील प्रशिक्षणार्थी बिटला याचा ५ अ वर हिंदीचालेसन होता. 'सोहनका घर ' हा ८ ओळींचा पाठ होता. हा ३५ मिनीटं कसा काय पुरवायचा हा त्याला प्रश्नच पडला होता. पाठपद्धतीत पाठाच्या ढोबळमानाने पाच पायऱ्या आहेत. त्यांचा तंत्रशुद्ध वापर केला तर घटक लहान / मोठा हा प्रश्नच उरत नाही. पाचवीला हिंदी व इंग्रजी भाषा नव्याने शिकायच्या असतात. बिटला हा पेहेलवान गडी. राऊळच्या भाषेत ढोपरात / गुडघ्यात मेंदू असणारा गडी.त्याने गेल्या वर्षीच्या कुणाचे तरी पाठाचे टाचण पैदा करून तो उतारा काढून मार्दर्शकांची सही मिळविलेली. त्याने आपली अडचण मार्गदर्शकाना मोकळेपणी सांगितली असती तर त्यानी त्याला नेमकं मार्गदर्शन करून तयारी करून घेतली असती. ते टाळल्यामुळे त्याची भंबेरी उडाली. त्याने काही सेकंदात पाठ वाचून संपवला. दोन तीन प्रश्न तेही चुकीची वाक्यरचना करून विचारले आणि त्याचा स्टॉक संपला. घामामूम होत तो वर्गातमागच्या बाजूला येवून मार्गदर्शक प्रा. कुलकर्णीसरना म्हणाला, “सर झालं माझं शिकवून..... आताकाय करू?” सर माझ्याकडे वळून म्हणाले, “ काळे तुम्ही काहीतरी इंग्रजीची उजळणी घेतलीत तरी चालेल. पण तास रिकामा सोडून जाता नये. नाहीतर बोंबाबोंब होईल नी या पुढे ही शाळा मिळणार नाही. ”
मग मीपुढे गेलो. फळ्यावर सुगरणीचा घरटा नी चिमणीचा गोल घरटा अशी चित्रे काढली नी प्रश्न विचारला. 'ये किसके घरहै?' मुलानी उत्तर दिले. चिडियाके.... एक तल्लख मुलाने सुगरणीचा घरटा दाखवून विचारले, ‘सर इस घर के चिडियाको क्या बोलते है?’ मला माहिती होतं. ' बाया, सोनचिडी कहते है.' मग पाठात आलेले मिट्टी, दिवाल, छत, खपरैल या शब्दांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी साठी वर्गाची भिंत, छप्पर दाखवून ये छत है, ये दिवाल है ही वाक्य म्हटली. ( क्रमश: )