True Essence of Happiness in Marathi Philosophy by Arjun Sutar books and stories PDF | सुखाचा शोध

Featured Books
  • THE ULTIMATE SYSTEM - 6

    शिवा के जीवन में अब सब कुछ बदल रहा था एक समय पर जो छात्र उसक...

  • Vampire Pyar Ki Dahshat - Part 4

    गांव का बूढ़ा गयाप्रसाद दीवान के जंगल में अग्निवेश को उसके अ...

  • स्त्री क्या है?

    . *स्त्री क्या है?*जब भगवान स्त्री की रचना कर रहे थे, तब उन्...

  • Eclipsed Love - 13

    मुंबई शहर मुंबई की पहली रात शाम का धुंधलापन मुंबई के आसमान प...

  • चंद्रवंशी - अध्याय 9

    पूरी चंद्रवंशी कहानी पढ़ने के बाद विनय की आँखों में भी आँसू...

Categories
Share

सुखाचा शोध

ऑफिस सुटल्यानंतर घरी जात असताना, यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये "मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?" हे गाणे सुरू झाले. हे गाणे आधीही अनेक वेळा ऐकले होते, पण आज मात्र मी स्वतःलाच विचारू लागलो—सुख म्हणजे नक्की काय? आनंद म्हणजे काय?
आपण एवढेच म्हणू शकतो की "मी आनंदी आहे" आणि त्याचा अनुभव घेऊ शकतो, पण आनंद मोजता येत नाही. पूर्वी आपले संत आणि आध्यात्मिक गुरु सुखी होण्याचे मार्ग सांगायचे. मात्र, वाचनाची आवड कमी झाली आणि असे मार्गदर्शकही आजूबाजूला राहिले नाहीत. त्यामुळे आता गुगलशिवाय पर्याय उरलेला नाही!
जेव्हा मी गुगलवर "सुख" याची व्याख्या शोधली, तेव्हा मला महान तत्त्वज्ञ अ‍ॅरिस्टॉटल यांचे काही विचार वाचायला मिळाले आणि काही सुंदर व्हिडिओ पाहायला मिळाले.

खूप वर्षांपूर्वी मला असे वाटायचे की "खूप पैसा कमावला की सुख मिळेल." हे काही अंशी खरे असले, तरी पैसा फक्त गरिबी दूर करू शकतो; पण त्यातून मिळणारे सुख किती काळ टिकते?
जो पैसा आपण स्वतःसाठी खर्च करू शकतो, तोच खरा आपला. पण जर आपण तो इतरांसाठी वापरला, तर त्यातूनही एक वेगळे सुख मिळते.
पण... हे लिहिण्याआधीच, आपण स्वतःला या समाजात सिद्ध करण्यासाठी पैसा कमवावा लागतो. कारण, "ज्याच्या खिशात पैसा नाही, त्याने कितीही मोठे तत्त्वज्ञान सांगितले तरी ते ग्राह्य धरले जात नाही!"

ययाती राजा खरा आनंद उपभोगामध्ये शोधत असतो. पण एक वेळ अशी येते, जेव्हा त्यांनाही जाणीव होते की हे सुख दीर्घकाळ टिकणारे नाही. आपण कितीही मोठे राजविलास जीवन जगत असलो, तरीही 'आपण खरोखर सुखी आहोत' असे ठामपणे सांगणारा कोणीही नाही

"पैसे कमावताना जर आपल्याला आनंद मिळत नसेल, तर आपण खरंच सुखी आहोत का?" काही लोकांना वाटते, "यशस्वी झालो म्हणजे सुखी झालो." पण गंमत अशी आहे की आपण यशस्वी आहोत की नाही, हे ठरवण्याचा अधिकारही समाजाकडेच असतो!
यश मिळवण्याच्या प्रक्रियेत जर आनंद नसेल, तर त्या यशाला खरेच सुख म्हणता येईल का?

माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे त्याच्या आजूबाजूचे लोक आनंदी असतील, तर तोही आनंदी होतो. म्हणूनच, "चांगले हितसंबंध आणि विश्वासू मित्रपरिवार असणे" हे सुखी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
आपले दुःख कमी करण्यासाठी आणि आनंद द्विगुणित करण्यासाठी आपल्याला मित्रपरिवाराची आवश्यकता असते. तसेच, आपल्याला भावना व्यक्त करण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठीही मित्र हवेत.
जीवन हे खडतर आणि प्रतिकूल असते, त्यामुळे विनोदाला विशेष स्थान आहे. 'विनोदबुद्धी असेल, तर दुःखांची तीव्रता कमी करता येते.' म्हणूनच, आपल्याला हसवणारे आणि सावरणारे लोक सोबत हवेत.

काळानुसार सुखाची व्याख्या बदलत जाते—बालपणीचे सुख वेगळे, तरुणपणीचे वेगळे, आणि प्रौढावस्थेतील सुख वेगळे. म्हणजेच, सुखाची व्याख्या सतत बदलत राहते.
मग खरे सुख नक्की कशात आहे? आणि नेमके काय केल्याने सुख मिळेल?
याचा शोध तरी कसा घ्यावा?

अ‍ॅरिस्टॉटलचे एक विचारमूल्य सांगावेसे वाटते –
"Meaning is a close relative of happiness."
तसेच, गोत्तहोल्ड यांचेही एक सुंदर वाक्य आहे –
"For me, the greatest beauty always lies in the greatest clarity."

याचा अर्थ असा की, आपल्या जीवनाला काहीतरी अर्थ आणि दिशा असावी. कोणत्याही अपेक्षा न ठेवता दुसऱ्यांसाठी काही करता येत असेल—मग ते कोणत्याही स्वरूपात असो, जसे की चित्रकला, कविता, लेखन, संगीत किंवा सामाजिक कार्य—तर त्यातून आपल्या जीवनाला खरी अर्थपूर्णता मिळते.

पैसा मिळवला, उपभोग घेतला, यशही मिळवले—मग आपल्याला दीर्घकाळ टिकणारे सुख भेटले आहे का?

खरं तर, अशा टिकाऊ सुखासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे—समाधान!

समाधान नसेल, तर आपण सतत अधिकाधिक यशाच्या मागे धावत राहू. पण त्यामध्ये खरे सुख मिळेलच असे नाही.
आयुष्यात जे काही सुरू आहे, आणि जे विचार मनात येतात, ते स्वीकारायला शिकले पाहिजे. स्वीकार केल्याने मनाला शांती आणि समाधान मिळते. समाधानी असणे यातच खरे सुख आहे.
"अपेक्षा न ठेवता काही गोष्टी करता आल्या, तर त्यातच खरे सुख आणि समाधान आहे!