"he is dead ..."इन्स्पेक्टर ने त्याची नास चेक केली.... तिथे असलेली विशेष ची मांस त्याला प्रत्येक क्षणाची खबर देत होते.... तो स्वतः येऊ शकत नव्हता.... पण त्याची सगळ्या माणसावर नजर होती...
धडाम...
ती भिंत खाली कोसळली .... पण त्या मगच दृश्य बघून सगळ्याचे पाय जमिनीला खिळले....
समोर एक रस्ता होता जो जमिनीखाली जात होता.... सगळ्यांनी मोबाईल टॉर्च लावले ... पहिले आधी दोन कॉन्स्टेबल आत गेले त्याच्यामागे ऋग्वेद आणि त्याच्या पाठोपाठ सगळे घुसले /// जवळपास दोन मिनिटाचा तो रास्ता होता....
"सर..."पुढे असलेला कॉन्स्टेबल जाग्यवर थांबला...
"काय...?.."ऋग्वेद
"इथे दोन रूम आहेत..."ते बाजूला झाले तस ऋग्वेद पुढे आला... त्याने दोन्ही रूमच्या दरवाजाला कान लावून आतमध्ये काय चाललंय ते समजतंय का बघायचा प्रयत्न केला.... पण कोणताच आवाज येत नव्हता....
"हा दरवाजा तोडा ...sss"त्याने दुसऱ्या दरवाजाकडे इशारा केला.... आणि जरा मागे झालं....
constable नि जोरात धक्का मारत दरवाजा तोडला .... ढाक्यासोबत ते आत गेले.... पण ऋग्वेद ची पावलं दरवाज्यातच थांबली....
ती पूर्ण रूम सजवली होती.... deam lights लावल्या होत्या.... बेड वर गुलाबाच्या पाकळ्या पसरलेल्या होत्या आणि त्यावर .... त्यावर प्रणिती पडलेली होती.... ती त्याच्यासोबत असताना घातलेल्या कपड्यातच होती.... पण आता बेशुद्ध होती कि अजून काय..??..
"ए thab.....ssss "कॉन्स्टेबल ओरडला... आणि तो भानावर आला.... रूममधून एक पन्नाशी पार झालेला माणूस पाळायचा प्रयत्न करत होता... पण त्याला पाळायला येत नव्हते कारण त्याने प्रमाणापेक्षा जास्त दारू घेतली होती.....
बाहेरून येणाऱ्या इन्स्पेकटर आणि ऋग्वेद च्या माणसांनी त्याला पकडलं .... ऋग्वेद धावतच प्रणिती कडे आला...
"नीती ....sss .....नीती....... ssss ..."तो तिच्यागळावर मार्ट उठवण्याचा प्रयत्न करत होता.. पण तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं तिच्या अंगावरच्या ड्रेस ठिकठिकाणी फाटला होता... लागोपाठ त्याने त्याच ब्लेजर तिच्या अंगाभोवती गुंडाळलं आणि उचलून घेतलं....
"आम्ही इथलं सगळं बघतो आणि तुम्हाला रिपोर्ट करतो सर.."इन्स्पेक्टर त्या बखोटी पकडलेल्या माणसाकडे बघत बोलले...
"हा माणूस मला हवाय...."ऋग्वेद
"हो..."इन्स्पेक्टर जास्त काही बोलले नाही ....
ऋग्वेद धावतच प्रणिती ला घेऊन त्या घरातून बाहेर आला.... गार्ड ला पटकन गाडी काढली....
प्रन्ति चे श्वास खूप कमी होते.... तिचे हात घासत तो शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता.... डोळ्यातून यायला बघणार पाणी अडवत होता....
"नीती wake up ...sss "तो मध्ये मध्ये तिच्या गालावर मार्ट होता....
"सर आलो लवकर..."गार्ड ने गाडी सूर्यवंशी mantion कडे थांबवली ... डोक्टर ची पूर्ण team आलेली होती...
गाडीतून प्रणितीला घेऊन उतरत तो पळतच आत आला.... त्याच्या हातात प्रन्तिला असं बघून सगळेच घाबरले ... त्याने बेडरूममध्ये तिला झोपवलं .... डॉक्टर लागोपाठ पुढे आले.... आणि त्याला बाहेर जाण्यास सांगितलं....
रूम बाहेर येत तो तसाच दरवाज्याजवळ बसला ... मांगापासून थांबवलेला हुंदका आता बाहेर पडला ,.... घरातले सगळे तर त्याला पहिल्यांदा रडताना बघत होते....
"बाळा काय झालंय ...?नीती...?.. ठीक आहे ना...?.."मॉम नि त्याला कुशीत घेतलं ...
"मॉम .. ती... ती.."त्याने झालेलं सगळं सांगितलं ... ऐकून सगळेच घाबरले...
"काही होणार नाही... स्ट्रॉग आहे ती ... आपल्याला तिला हिम्मत द्यावी लागणार ... रडून काही होणार नाही.... "मॉम नि पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला जवळ घेतलं....
वीस मिनिटांनी nurse नि दरवाजा उघडला... प्रणिती बेड वर झोपली होती .... डॉक्टर नि तिचे कपडे change केले होते.. हातापायाला झालेल्या सगळ्या जखमांना ड्रेसींग केलं होत... आजी आणि मॉम तिच्या बाजूला बसल्या....
"आम्ही इंजेकशन दिली...(त्यांनी एकदा घड्याळात बघितलं तर सकाळचे तीन वाजलेले ..)नऊ वाजेपर्यंत शुद्ध येईल त्यांना ... तेव्हा पुन्हा एकदा हे injection द्या..." डॉक्टर नि ऋग्वेद कडे अपॆत दिल... आणि त्याला बाहेर यायला इशारा केला...
"मिस्टर सूर्यवंशी तुमच्या wife ला drugs देण्यात आली .. जे खूप आधी बॅन आली त्या जेव्हा शुद्धी त येतील ना तेव्हा फिजिकल इंटिमसी साठी भीक मागतील पण तुम्हाला त्याच्या बॉडीच temperature कमी करायचं आहे.... त्यानं थंड पाण्याच्या bath tub मध्ये ठेवा... आणि नंतरच ते injection द्या.... असं त्याच्या शरीरातील ड्रग्स चा अंमल कमी होईपर्यंत होणार ... समजतंय ना मला काय सगयच ते...?"डॉक्टर
ऋग्वेद च्या हाताच्या मुठी खूप आवळल्या होत्या ... त्याचीच नख हातात घुसली होती..!!!
फक्त मान हलवत तो आत आत आला... घरातल्या सगळ्यांना त्याने अराम करायला पाठवलं ... रात्रभर कोण झोपलंच नव्हतं ... आता आकाशात हळूहळू सूर्यकिरण यायला सुरुवात झाली होती....
ऋग्वेद तसाच प्रणिती चा हात हातात घेऊन एकटक तिच्या सुकलेल्या चेहऱ्याकडे बघत होता.... काय बोलायला हवं...?.. काय करायला हवं...?.. त्याला काहीही समजत नव्हतं .. आणि त्याने एवढं घाणेरड कृत्य ...
तिच्या नाजूक गोऱ्या हातावर त्याच्या बोटाचे वर्ण स्पष्ट दिसत होते,... त्याने अलवार त्यावर मलम लावायला घेतलं...
********************************
"धर्मेश ला मिस्टर सूर्यवंशी ची मांस गेलीत ..."जॅबी विशेष कडे आला होता...
"मला वाटत आता मिस्टर सूर्यवंशी ना आपल्याला सगळं सांगायला हवं... कारण धर्मेश ची माहिती काढल्यावर त्यांना सगळं समजणारच आहे...."विशेष
"हॅम ... ठीक आहे ..."जॅबी
"राजकुमारी ला सुद्धा सगळं समजायला हवं ... पुढच्या महिन्याच्या उत्सवाला त्यांना हैद्राबादला न्यायला हवं ... नक्कीच त्यांना काहीतरी आठवणार ..."विशेष
"आयडिया चांगली आहे.... मिस्टर सूर्यवंशी ना सगळं सांगितल्यावर ते आपली मदत नक्कीच करतील..."जॅबी
".हम्म ....... तू लक्ष ठेऊन राहा...तो धर्मेश त्याच्या तावडीतून सुटत नये... इकडे त्याच्या गावावर आपल्या लोकांनी कब्जामिळवलाय .."विशेष
"बर केलं ... ज्यांनी दिल त्याच्याच जीव घेतला... त्या माणसाने.."जॅबी
"आता सध्या मृनु ह्या तब्येतेकडे लक्ष दे... काही लागलं तर मला नक्कीच कळव .... मी आता हैद्राबाद ला जातोय .... त्याच गाव घेतल्यावर आता तिथली व्यवस्था करावी लागेल .... नंतर आपण मिस्टर सूर्यवंशी सोबत बोलू...."विशेष डोळे चोळत उठला...
"हो.."जॅबी ने त्याला chopper पर्यंत सोडलं....
***************************************
"आ ....sssss ... सोड मला... sss ..."प्रणिती एवढ्या मोठ्याने ओरडली कि बाजूला असलेला ऋग्वेद घाबरला.... दरवाजा बंद असल्याने बाहेर आवाज गेला नाही....
ती पूर्ण घामेजली होती... शरीर थरथरत होत... जोरजोरात श्वास घेत होती... अंगाला अशी खाज येत होती कि ती जखमा पण न बघता जोरात खाजवत होती...
"नीती नाही..."ऋग्वेद ने तिचे दोन्ही हात पकडले ....
"माझ्याकडे बघ ... मी तुझा वेद ... तू ठीक आहेस ... आपण आपल्या बेडरूम मध्ये आहोत.... बघ..."त्याने एका हाताने तिचे दोन्ही हात पकडले आणि दुसरा तिच्या गालावर फिरवला .....
"तो...तो...मला....हात लावत होता...."तिला बोलता येत नव्हतं .... जीभ अडखळत होती... ऋग्वेद ला तिला असं हतबल बघून रडायला येत होत.... जास्त विषारी न करता त्याने तिला उचलून घेतलं आणि बाथ टब मध्ये ठेवलं.....
पण पाच मिनिटातच ती पुन्हा बेशुद्ध झाली..... त्याच्या डोळ्यातून एकसारखं पाणी वाहत होत.... तिला असं बघून किती त्रास होत होता तो सांगू शकत नव्हता.. तसेच तिच्या केसावरुन हात फिरवत त्याने बॉडी temperature नॉर्मल होईपर्यंत तिला पाण्यात ठेवलं आणि नंतर स्वतःच तिचे कपडे change करून बेड वर झोपलं .... आणि दुसरं injection दिल....
तिचा हात हट्ट घेऊन तो बसून राहिला.... दहाच्या दरम्यान घरातले सगळे बघायला आले ती झोपली होती... ऋग्वेद पण फ्रेश झाला... प्रणिती बारी होईपर्यंत तो काय बाहेर जाणार नव्हता... खूप वेळ सगळे तिच्यासोबत होते... नंतर लाँच बनवायला म्हणून मॉम आणि खाली गेल्या... घातलं वातावरण एकदम शांत झालं होत...
"वेद.... sss ,....."ती पुन्हा घाबरून उठली ... ऋग्वेद ने पुढे जात पटकन तिला मिठीत घेतलं ...
सृष्टी ने पायाचा ग्लास पुढे केला ..... तिच्या थरथरल्या ओठांना त्याने ग्लास लावला.... तिने एक घोट पाणी पीळ बाकी सगळं खालीच सांडत होत....
आजी सगळ्यांना बाहेर घेऊन आल्या... ऋग्वेद तसाच मागून तिला घट्ट मिठी मारून बसला....
"त....तो....माणूस .... वेद ... त्याने .."ती रडत होती....
"मी आहे ना... तू काही बोलू नको .... सगळं ठीक आहे .... शांत राहा..."ऋग्वेद तिच्या डोक्यावरून हात फिरवायला लागला....
"ना...नाही...मी...मी .... चांगली नाही... त्याने ... मला हात...."
"बाळा शांत हो.... तू please काहीही बोलू नको .... झोप फक्त ..."ऋग्वेद ला तीच बोलणं ऐकून आता राग यायला लागला होता...
त्या माणसाने जे केलं त्यासाठी ती स्वतःलाच दोष द्यायला लागली होती....
"मी तुमच्या .... लायक नाही.... मी ...मी...मारून...."
"just shut up ..."ऋग्वेद ओरडला .... इकडे तिला असं बघून त्याचा जीव जायची वेळ आलेली आणि ती मारण्याच्या गोष्टी करत होती....
त्याचा आवाज एकूण प्रणिती याहून घाबरली.... आणि बोलायची बंद झाली... फक्त रडत होती....
"you are pure soul .... स्वतःला दोष देऊ नको ...."त्याला चुकी लक्षात आली... तिला खाली झोपवत त्याने डोक्यावर ओठ टेकवले ... ती फक्त डोळे बंद करून पडून राहिली....
हळूहळू सगळे भेटायला आले... पण काहीच बोलत नव्हती... एकटक नजर लावून बसलेली फक्त......... ना चेहऱ्यावर कोणते एक्स्प्रेशन... फक्त रडायची...
तो दिवस असाच गेला ऋग्वेद तिच्या बाजूला हलला सुद्धा नाही.... पण इ कोणाशीच बोलली नाही ... नुसती मान टाकून होती....
दुसऱ्यादिवशी ऋग्वेद ने नव्या ला बोलावलं निदान तिच्याशी तरी बोलेल .... तिला फ्रेश्श करून त्याने बेडवर बसवलं... पण ती काहीच रिस्पॉन्स देत नव्हती .... जर खूप वेळ बोलायचं प्रयत्न केला तर फक्त रडायची ... नव्या संद्याकाळी येणार होती तोपर्यंत ऋग्वेद प्रणितील घेऊन गॅल्लरी मध्ये बसला.... तिच्याशी बोलता बोलता सूप भरवत होता...
"नीती ... बोल ना... तुला त्रास होतोय का ते पण समजत नाहीय बाळा.... असं शांत राहून कास चालेल .... ?.."ऋग्वेद अगदी पोटतिडकीने बोल्ट होता.... पण प्रणिती फक्त समोरच्या झाडाकडे बघत होती..... डोळ्याच्या पापण्या पण हल्ल्या नव्हत्या....
"असं किती दिवस शांत राहणार तू...?.... तुझी काही चुकी नव्हती तिला कुशीत घेऊन कुरवाळत होता... खूप वेळ तो तिला घेऊन बसला होता....
जरा अंधार पडायला लागला आणि gate कडे हालचाल जाणवली ... त्याने बघितलं .... तर काव्या आलेली गार्ड तिला आत सोडत नव्हते .... त्याने प्रणिती ला उचलून घेतलं आणि आत बेड वर झोपवलं ... तशी ती स्वतःहून तर उठायची नाही...
बेडरूम चा दरवाजा नीट बंद करत तो खाली आला ...
"मॉम जरा वर जा.... नीती एकटी आहे.... "ऋग्वेद
"हो जाते .... हा पास्ता बनवतेय तिला तो घेऊनच जाते.... "मॉम
"हा..."ऋग्वेद मान हलवत घरातून बाहेर पडला आणि गते कडे security जवळ आला.... काव्या ला आतमध्ये सोडायला सोडून त्याने watchman ला security अजून कडक करायला सांगितली ..... पर्वा कंपनी ची anniversery होती .... त्यामुळे आता त्याला कोण्या हि प्रकारची रिस्क घ्यायची नव्हती...
त्याच्यासोबत बोलून काव्या सोबत आत येत होताच कि लक्ष रूमच्या gallary कडे गेलं आणि पावलं तिथेच थांबली .... तिथे lawn मध्ये असणारे आजी सृष्टी , सर्वेश सुद्धा घाबरले ...
प्रणिती gallary च्या अगदी कडेला उभी होती.... फक्त एक पॉल टाकलं आणि बस्स..!!!
"नीती... sss ..."खालून ऋग्वेद जिवाच्या आकांताने ओरडत होता.... पण तिला कोणाचेच आवाज येत नव्हते... ती सरळ बघत होती....
काय वाटत प्रणिती खाली उडी मारेल.....???....
क्रमशः