"सर इथे पुढे एका दुकानाच्या cctv मध्ये van पास होताना दिसतेय... नंबर मिळालाय ..."गार्ड
"ट्रेस कर... कुठेय बघ ..."ऋग्वेद
"बघतोय सर .."गार्ड लॅपटॉप वर काहीबाही कटर होता.... इकडे ऋग्वेद चा जीव वर खाली होत होता...
"मिळालं सर.. गोडाऊन एरिया ..."गार्ड ने बोलायची फुरसत कि ऋग्वेद ने गाडी सुरु केली... एकदम फास्ट ड्राइव्ह करत तो तिथे पोहचला... पण अंधार असल्यामुळे त्याला काहीच दिसत नव्हते....
त्याच्यामागोमाग गार्ड आले त्यांनी सगळ्यांनी टॉर्च लावले त्या पूर्ण एरिया मध्ये सगळी मांस पसरली...
"तू...?.."प्रणिती ला शुद्ध आली तेव्हा तिला खुर्चीला बांधलेलं होत... ती सुटण्यासाठी धडपड करतच होती कि समोरून एक मास्क घातलेली मुलगी आली तिने प्रणिती समोर आपला मास्क काढला....
ती दुसरी तिसरी कोणी नसून श्रुती होती...!
"हो मी.. तुला काय वाटलं तू माझी जागा अशी मिळवशील आणि मी तुला सहजासहजी सोडून देईल ..?..."श्रुती
"मूर्ख आहेस तू...?.. चुकी तुझी होती.... कंपनी ने तुझ्यावर एवढा भरवसा ठेवलेला... आणि तू तो तोडलंय... आणि एवढाच नाही तर तू केलेल्या फ्रेंड बद्दल पण मला समजलय ..." प्रणिती
"जास्तच हुशार आहेस तू .."श्रुती ने प्रणितीच्या कानाखाली मारली...
"जे तुला माहितीय ते तुझ्यापर्यंत च राहणार .. कारण तू तर आता इथून वर जाणार आहे.."श्रुती ने हसत तिच्या सोबत आलेल्या माणसांना इशारा केला ... त्यांनी त्या गोडाऊन मध्ये पेट्रोल ओतायला सुरुवात केली...
"सोड मला.... हे करून तू सुटणार नाहीय.... वेद तुला सोडणार नाही.."प्रणिती
"वेद..?.. छान छान .... पण विसरू नको.. ते फक्त प्रिया मॅडम चे आहेत ... तुझ्यासारखी गावंढळ मुलगी त्यांना शोभत पण नाहीस.. एवढं काय केलंस ग कि सर तुझ्झ्या जाळ्यात फसले ...?..हा..?.."श्रुती
"पेट्रोल...?..."ऋग्वेद ला पेट्रोल चा वास यायला लागला .. तस त्याने आजूबाजूला बघितलं... नक्की वास कुठून येत होता ते समजत नव्हतं....
पुढे पुढे जाता त्याला अजून उग्र वास यायला लागला .... आणि समोर बजाज च गोडाऊन होत.... त्याने रंगात सगळ्या गार्ड ना इशारा केला.... त्यांनी दरवाजा तोडला....
द्रवजयच्या आवाज आला तस श्रुती ने मागे बघितलं.... ऋग्वेद ला बघून तिच्या हातातला lighter खाली पडला... पण पेट्रोल ओतलेला असल्याने आजूबाजूला लागोपाठ पेट घेतला...
ऋग्वेद ने त्याच्या गार्ड ना श्रुती ला पकडून ठेवायला सांगितलं ... आणि तो पुढे धावत गेला.... प्रणिती च्या भोवती गोलाकार आग लागली होती....
"तुम्ही ... तुम्ही... जावा इथून..."प्रणिती ओरडत होती....
"are you mad ..?... तुला सोडून मी कुठेही जाणार नाहीय.."ऋग्वेद च एका बाजूला असलेल्या चादरीवर गेलं... ती घेत त्याने आग वीजवण्याचा प्रयत्न केला... एव्हाना खूप धूर झाला होता... बाहेरून चार पाच लोक आले त्यांनी fire extingusher ने ती आग वीजवळी .... पण तोपर्यंत धुराने प्रणिती ची हालत खराब झाली होती...
तिला उचलून घेत ऋग्वेद गोडाऊन च्या बाहेर आला ... प्रणिती जोरात खोकत होती... "पाणी..." त्याने पाण्याची बॉटल तिच्या तोंडाला लावली...
दहा मिनिटांनी फ्रेश हवा घेतल्यावर तिला थोडं बार वाटलं
"ठीक आहेस ना...??.." ऋग्वेद
"हो.." प्रणिती
"चल .."ऋग्वेद ने तिचे ओले झालेले केस नीट कानामागे केले आणि तिला घेऊन गाडीत बसला... एक क्षण पण तिला मिठीतुन त्याने बाजूला केल नव्हतं ...
"मॅडम ठीक आहेत .... त्याचे मिस्टर इथून घेऊन गेलेत..."त्या fire extinguisher घेऊन आलेल्या माणसांनी विशेष ला फोन केला..
"ठीक आहे ,.. हे जे कोणी केली त्याला त्याचे गार्ड घेऊन गेले असतील ... तुम्ही लक्ष ठेवा .... समजा त्या माणसाला त्यांनी जीवनात सोडलंच तर तुम्ही तिथल्या तिथे मारायचं ...." विशेष
"yes sir ..."त्या माणसाने फोन ठेवला...
अर्थात विशेषला माहित नव्हतं त्या माणसाला जीवनात सोडणं तर दूरच ऋग्वेद तर नको जन्म करून सोडणार होता....
****************************
"आता कास वाटतंय..?...." ऋग्वेद प्रणिती ला घेऊन सूर्यवंशी mantion ला नाही तर त्याच्या वीला ला घेऊन आला होता...
तिला नीट अंघोळ करायला लावली होती... आणि आता जेऊन झाल्यावर तो तिला बेडरूम मध्ये घेऊन आला होता...
"ठीक आहे.. पण तो वास.."तिच्या नाकात अजून पण तो पेट्रोल चा वास होता.... त्याने कसतरी वाटत होत...
"शांत झोपलीस या कि बार वाटेल ... मी डॉक्टर ना विचारलं..."ऋग्वेद
"हंम्म ...."प्रणिती बेड वर पडली.... ऋग्वेद ने तिला जवळ घेतलं आणि कुरवाळत बसला....
"आह्ह ..."मधेच कळवळली ...
"काय झालं..?.." ऋग्वेद
"दुखतंय.... पाठीकडे काहीतरी..." प्रणिती
"थांब turn हो बघू..." ऋग्वेद ने तिला मागे फिरवलं ... तिच्या पाठीवर रक्ताचा डाग पडला होता...
" नीती रक्त येतंय इथून .... तू सांगणार कधी..?.." ऋग्वेद चा आवाज वाढला...
"अ...हो ... मला ते अंघोळ करताना चुरचुरल पण वाटलं असच काहीतरी असेल.. ते तिथे त्या खुर्चीला खिळा होता तो कदाचित...."प्रणिती
"तुला किती वेळा विचारली .... दुखत असेल तर सांग ..."तो उठला आणि बाजूच्या ड्रॉवर मधून क्रीम घेऊन आला....
"दाखव चल लवकर...."ऋग्वेद
"अहो ... मी ..मी .... लावते...." प्रणिती ला त्याच्या समोर शर्ट काढायचं ह्या विचाराने च अंगावर शहरे आले.... एकत्र तिने आत सुद्धा काही घातलं नव्हतं ...
"आणि तू कस लावणार आहेस..?... हात पोचणार तुझा..?.."ऋग्वेद
"ते मी बघते ... तुम्ही क्रीम द्या...."प्रणिती ने तयचय हातातून क्रीम घेतली आणि बाथरूम मध्ये गेली....
तिला बघून हसतच रुजड gallary मध्ये आला.... आणि गार्ड ला फोन करून श्रुती ला उपाशीच बांधून ठेवायला सांगितलं.... सोबत बजाज वर पण लक्ष ठेवायला लावलं ....
येऊन तो बेड वर बसला... लक्ष सगळं बाथरूम च्या दरवाज्याकडेच होत... आणि थोड्याच वेळात चेहरा पाडत प्रणिती बाहेर आली.... तिच्याकडे बघून त्याला खूप हसायला येत होत.... पण तोंडासमोर मूठ घरत त्याने स्वतःवर कंट्रोल केलं....
"झाली ना लावून क्रीम... ये झोपूया..." ऋग्वेद ने उठत light चा switch ऑफ केला....
"आता हे मुद्दाम नाटक करतात ... तू पण ना नीती.. मूर्खच आहेस... नको तिथे डोकं चालवायला जाते...." ती मनातच स्वतःशी बडबडत होती....
"अ..हो ..."प्रणिती
"हम्म .."ऋग्वेद ने हसत मान डोलावली.... त्या अंधारात पण प्रणिती ला त्याचे रुंदावलेले ओठ दिसत होते.. पण आता करणार काय..?..
"ते...ते....मला नाही लावता आली तर तुम्ही .."
"हम्म ... मी काय...?.." ऋग्वेद त्रास द्यायचा एक चान्स सोडत नव्हता...
"तुम्ही लावून द्या ना,...."प्रणिती
"ये इथे..."त्याने हात धरत तिला जवळ ओठाला ...
"तुला अजूनही भीती वाटते माझी..." ऋग्वेद ने अलगद तिच्या सिल्की केसातून हात फिरवत प्रश्न केला .... ह्यावर ती काहीच बोलली नाही ... बोलणार तरी काय होती... त्याच्या जवळ आल्यावर काय काय होत.... ते सागितलं तर तो तील नक्कीच अजून चिडवणार होता....
"तास नाही ... पण .."प्रणिती
"okey relax ... तू झोप इथे.... मी क्रीम लावतो..." ऋग्वेद
"तुम्ही आधी डोळे बंद करा...."प्रणिती
"नीती डोळे बंद करून मी क्रीम कशी लावणार ...?.." ऋग्वेद
"तो तुमचा प्रश्न आहे.. तुम्ही बघा..."प्रणिती
"okey ... पण आता झोप .... जास्त वेळ तसेच ठेवू नको ते.... infection होईल..." ऋग्वेद ने जबरदस्तीने डोळे बंद केले.. त्याच्या डोळ्यसमोर हात फिरवत प्रणिती ने कन्फर्म केलं.. नि मग शर्ट काढून तो बेड वर उलटी झोपली.. light बंद असल्यामुळे एवढं काही वाटलं नाही...
ती झोपल्याच समजल्यावर ऋग्वेद ने हळूच डोळे उघडले ... त्या नधारात पण तिची ती नितळ गोरी त्वचा चमकत होती... त्याने जखम झालेली त्या जागी बघितलं तर रक्त येऊन ते सुकलेल होत.... त्याने अलगद हात फिरवत त्यावर क्रीम लावली.... आणि इथे प्रणिती च्या अंगातून विष घेई... एकत्र त्याचा थंड हात आणि वर ती क्रीम... त्यालाच कंट्रोल करायला सगुण ती आता स्वतःवरचा कंट्रोल घालवत होती....
ऋग्वेद ने क्रीम लावली आणि तिच्या बाजूला पडला तिला तडत ...!
त्याला तस बघताना बघून प्रणिती ने पटकन त्याच्या डोळ्यावर हात ठेवला... त्याने हसतच तिला हात तसाच धरला आणि स्वतःवर ओढलं.....
"वेद .." प्रणितीचे डोळे बटाट्यासारखे मोठे झाले...
ऋग्वेद ने दोघावरून ब्लॅंकेट ओढून घेतलं आणि तिला अजून घट्ट पकडल...
प्रणिती अजूनही मोठे डोळे करून त्याच्याकडे बघत होती.....
"i know मी handsome आहे .... पण असं लाईन मरण बरोबर नव्हे मिसेस सूर्यवंशी .."त्याची बोट तिच्या उघड्या पाठीवर नक्षी बनवत होती... तन्वी त्यामुळे ती अजून उत्तेजित होत होती....
"हे..हे...बघा...सोडा ना मला .."प्रणिती
"आता माझ्याकडे सोडा wine bear काहीही नाहीय.."ऋग्वेद बोलत होता ...पण प्रणितीच लक्ष फक्त त्याच्या त्या हलणाऱ्या ओठावर स्थिरावलं होत... तिने पटकन त्याच्या ओठांना ताब्यात घेतलं...
ऋग्वेद ने मानेत हात घालत तिला अजून जवळ घेतलं... आणि ओठाचा स्वाद चाखण्यात मग्न झाले... थोड्या वेळाने ती आपणच त्याच्या थोड्याश्या उघड्या ओठाचा स्पर्श त्याच्या छातीला हात होता... तसेच तिचे केस सावरता सावरता तो पण झोपला...
दुसऱ्यादिवशी दोघे तिथूनच ऑफिस ल आले.... प्रणिती ला बघून प्रिया ने हाताच्या मुठी आवळल्या .... श्रुती चा प्लॅन फ्लॉप झाला होता.... पण ती प्रियाचं नाव घेणार नव्हती कारण प्रियाने तिला प्रॉमिस केलेलं होत तिच्या आईची काळजी घेण्याचं..!
प्रणिती च्या डोक्यावर ओठ टेकवत ऋग्वेद त्याच्या private लिफ्ट मध्ये गेला... ती पण कामाला लागली...
दोन टीम दिवस असेच कामात गेले ... ऋग्वेद ने विशेष ला डील साठी हो म्हटले होते... पण ती एवढ्यात नाही तर पुढच्या महिन्यात होणार होती .. साध्या त्याला बजाज कडून जी डील मिळाली त्यावर लक्ष केंद्रित करायचं होत... त्यासाठी च ज त्याने जॅबी ला ऑफिस मध्ये बोलावलं होत ... त्या दोघांची मिटिंग झाली.... सगळ्या मध्ये त्याने नवीन डील बद्दल माहिती circulate केली....
मिस्टर ऋग्वेद.... त्या दिवशी मी तुम्हाला congratulate करायला विसरलो... many many congratulation .... and happy married life ...!"जॅबी ने ऋग्वेद च्या हातात हात मिळवला....
"थँक्स ... come i will show you ऑफिस..."ऋग्वेद त्याच्यासोबत बाहेर आला....
प्रियाला त्याने जॅबी साठी त्याच्याच floor वर केबिन तयार करायला सांगितली.... कारण काम त्यांना लवकर करायचं होत...
सगळ्या डिपार्टमेंट फिरत ते फायनान्स कडे आले.... ऋग्वेद ला जॅबी काहीतरी शोधत असल्यासारखा वाटत होता.... आणि फायनान्स डिपार्टमेंट ला आल्यावर प्रणिती वर त्याची पडून चाऱ्यावर आलेली smail ऋग्वेद च्या नजरेतून सुटली नव्हती....
त्याला तर सगळ्याचा गळा आवळावा वाटत होता.... जो तो येत होता तो त्याच्या बायकोबद्दल विचारत होता... जाळून जाळून तो खाक झाला होता...
"छान वाटलं तुम्हाला भेटून मिसेस सूर्यवनशी .."जॅबी ने प्रणिती च्या हातात हात मिळवला ... तस प्रणिती formally हसली... पण तिची नजर ऋग्वेद वर पडली तस तिने एवढा गिळला .... तो मारक्या बैलासारखा तिच्याकडे बघत होता... तिने पटकन जॅबी च्या हातातून आपला हात मागे घेतला...
"i think तुमचे husband तुमच्यावर जास्तच प्रेम करतात....."जॅबी ने थोडं पुढे जात प्रणितीच्या कानात सांगितलं... पण त्याला प्रणिती च्या जवळ गेलेलं बघताच ऋग्वेद ला त्याला तिथेच आप्तव वाटत होत...
प्रणिती तर त्याच्या शब्दावर हरवली होती... प्रेम...?... मनात काहीतरी गुदगुदल्या करून गेलं .... ह्यावर कधी विचारच केला नव्हता तिच्या मनात फक्त ऋग्वेद जवळ असावा .... त्याच आजूबाजूला असं तिला आवडत ... एवढं च... काय ते होत ..... पण आजूबाजूला असं तिला आवडत ..... एवढंच काय ते होत.... पण त्याच्यापुढे ती गेलीच नव्हती....
"मी...मी..येतो...उद्या भेटू..."जॅबी प्रणितीच्या केबिन मधून बाहेर पडला.... तिच्याकडे बघितल्यावर त्याला पुढे जाऊन मिठी मारावी वाटत होती.... पण तिच्या नजरेत तर त्याच्यासाठी अनोळखी भाव होते... मन घट्ट करतच तो तिथून गेला....
"नीती... जा हात धुवून ये..."
"ह्ह..?.."ऋग्वेद च्या आवाजाने ती भानावर आली... "इथे.... ये...."ऋग्वेद च तिला केबिन मधल्या वोशरूम ला घेऊन गेला... आणि स्वच्छ हात धुऊन दिले.... आता प्रणिती ला खरच त्याच्यावर हसायला येत होत ... आणि पटकन हसली...
"तू माझ्यावर हसतेय ..?.."ऋग्वेद
"तुम्ही...तुम्ही... अगदी तो गरम झालेला pressure कुकर असतो ना त्याच्यासारखे दिसतायत ..."प्रणिती जोरात इयर हसन कंट्रोल करत बोलली....
"pressure cooker ..?... नीती तुला मी कुकर दिसतो...?.."ऋग्वेद ने तिला कंबरेत हात घालत जल ओढलं ... नेमकं आजच तिने साडी घातली होती..... आणि त्याची बोट बरोबर तिच्या उघड्या पोटावर फिरत होती....
"आ...पण....ऑफिसमध्ये आहोत.."प्रणिती
"पण तुला मला कुकर बोलल्याची शिक्षा मिळेलच ..."ऋग्वेद तिच्या अगदी जवळ होता ...... त्याचे गरम श्वास तिला चेहऱ्यावर जाणवत होते.... त्याची नजर फक्त तिच्या ओठावर स्थिरावली होती.... आणि ते बघून तिच्या पोटात फुलपाखरांची तांडव घालायला सुरुवात केली होती.....
"आता नाही बोलणार...."प्रणिती
"पण आतापर्यन्त बोलली त्याच काय..?.."ऋग्वेद उरलेलं अंतर पण कमी करत च होता कि काव्या दरवाजा उघडून भसकन आत घुसली....
"हा..?... स .... सॉरी .... सर... जाते... मी..."ती बावरून बाहेर जायचं सोडून समोरच्या भीतीवर आपटली....
तिचा वेडेपणा बघत ऋग्वेद ने डोळे फिरवले .... आता बाहेर जाऊन तशी काय उपयोग होणार होता... तो blazer नीट करत तिथून बाहेर पडला....
"हे..हे..काय चाललं होत...?.. निदान केबिन लॉक तरी करायची..." काव्या
"ते..मी..."प्रणिती
"हा...हा...काय ते मी..."काव्या ने तिच्या पोटात मारलं.... प्रणिती चे लाजून लाजून गाल दुखायला लागले होते.....
"ए मला सांग इथे कोणी handsome मुलगा आलेला का...?... बाहेर चर्चा चालू आहे.... मी वोशरूम ला गेली आणि मिस झालं..."काव्या
"आग ते कोणीतरी नवीन client आहेत... जॅबी नाव आहे वाटत .... उद्या पासून ते येणारच आहेत तेव्हा बघ.."प्रणिती ने तिच्या डोक्यात मारलं .. आणि तिच्या चेअर वर जाऊन बसली....
जॅबी ..?.. असेल foreigner नको... गेला उडत...."काव्या ने उत्तर नाक मुरडले .... तस प्रणिती हसली......
"काम कर आता जा,... नवीन charge शीत बनवावी लागणार आहे...."प्रणिती ...
"जाते..माते..."काव्या ने तिच्या पुढे हात जोडले आणि तिच्या जागेवर गेली.....
*****************************
"तू हे का केलंस... समजेल माळ..."आज पहिल्यांदाच ऋग्वेद श्रुती ला बांधून ठेवलं होत तिथे आला होता.....
"तिने माझा अपमान केला म्हणून .."श्रुती
"ह्यात बजाज चा हात होता...?ऋगवेद
"कोण बजाज..?..."श्रुती
"तो बजाज ज्याच्या गोडाऊन मध्ये तू नीती ला बांघलेलं..."ऋग्वेद
"नाही.. तेफक्त मला बंद दिसलं म्हणून मी तिथे गेले .... बाकी ते कोणाचं आहे ते मला माहित नाही...."श्रुती
"तुझ्यासोबत जून कोण कोण involve होत ह्यात..."ऋग्वेद
"कोणीही नाही .... मी हे स्वतः केलं .."श्रुती
"ठीक आहे .... हीच काय करायचं तुम्हाला माहित आहे...." ऋग्वेद उठला आणि गार्ड कडे नजर लाजली....
तो तिथून बाहेर आला.... घड्याळात बघितलं तर जेवणाची वेळ झालेली ..... ice क्रीम घेऊन तो घरी आला.... सगळं जेवणासाठी त्याचीच वाट बघत होते....
फ्रेश होऊन तो जेवायला आला.. काकी भट वाढायला म्हणून कुकर घेऊन आल्या ते बघून प्रणिती ला पान्हा हसायला आलं...
"प्रणिती..?...काय झालं...?... तू कुकर कडे बघून कशाला हसतेय ,,,...?..."मॉम
त्याच्या बोलण्यावर ऋग्वेद ने खुन्नस देत प्रणिती कडे बघितलं .... तिने तोंडावर हात ठेवत हसन कंट्रोल केलं.... "वाहिनी तू भाई ला कुकर बोलतेस का..?सर्वेश ने मोठ्याने विचारलं ... आणि कंट्रोल केलेलं तिचा सगळं हसन एकदमच बाहेर पडलं ..... तिच्यासोबत सगळेच हसायला लागले....
ऋग्वेद मात्र डोळे मोठे करून सगळ्याकडे बघत होता.... शेवटी त्याने ignore करत स्वतःच्या जेवणावरच लक्ष केंद्रित केले .. रूममध्ये ऊग्वेद कुठे दिसत नाहीय ते बघून प्रणिती हळूच आत आली... तिला माहित होत त्याच्या तावडीत सापडलो तर आज तिची सुटका नव्हतीच...
change करून ती झोपायला जाणार कि त्याने मागून तिला पकडलं... प्रणिती ने डोळे बंद करत मनातच स्वतःच्या चार पाच कानाखाली मारून घेतलं...
"हा...तर.... कणलातरी खूप हसायला येत होत..."ऋग्वेद
"हसायला..?...कोण ते...?.."प्रणिती
"आहे कोणीतरी पण त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे ना...?..."ऋग्वेद
"असं कास ... फक्त हसण्याला कोण शिक्षा थोडीच देत..."प्रणिती
"मी देतो..."ऋग्वेद ने तिला गर्र्कन स्वतःकडे वळवलं....तिचे सिल्की केस त्याच्या चेहऱ्यावरून फिरून गेले... तस तिच्या शाम्पू चा वास त्याच्या नाकाला भिनला....
"हा.... तर शिक्षा... अशी...."बोलता बोलता त्याने एका हाताने तिच्या नायटा च्या जॅकेट ची गाठ सोडली,... आणि प्रणिती ला समजला पण नाही....
ते नायलॉन च कापड अंगावरून सळसळत खाली पडलं तस ती भानावर आली....
त्याच लक्ष तिच्या मानेकडे उठून दिसणाऱ्या कॉलर बोन वर पडलं ... जे त्याची कमजोरी होती... खाली वक्त त्याने तिथे ओठ टेकवले... प्रणिती श्वास घ्यायचाच विसरून गेली... त्याचे ओठ तिथेच आजूबाजूला फिरायला लागले....
तीच लक्ष नाहीय ते बघत त्याने तिला उचलून घेतलं आणि बेड वर झोपवलं .... उठ्वरोथ टेकवत दोघेही पुन्हा स्वप्ननगरीत गेले ....
मोठा भाग टाकलाय ... रात्र भर जग राहून ... त्यामुळे तुमच्या समीक्षा आणि स्टिकर्स अपेक्षित आहेत....
क्रमशः