"तुझ्यासोबत बदल घेण्यासाठी मला तुझ्याशी लग्न करण्याची गरज नव्हती.... मी हेलग्न केलं ते हि तुझ्यासाठी .... पण हे कदाचित तुला नाही कळणार ... आणि मी सांगू शकणार नाही.. तुला..."तो स्वतःशीच म्हणाला...
"बॉस ... निघायचं ना..."रॉकी म्हणाला तसा.. तो खाली उतरला आणि मागे जाऊन बसला.... रॉकी हि पुढे बसला.... ड्रायव्हर जो मागच्या गाडीत होता तो ड्रायव्हींग सीट वर जाऊन बसला.... आणि गाडी धुराळा उडवत तिथून निघून गेली....
नानंदिनी साठी ठेवलेला ड्रायव्हर आणि गाडी तिथेच उभार होते... सोबत बॉडीगार्ड कुणाला समजणार बारकाईने निरीक्षण करत होते.... पण या सगळ्यात दोन डोळे असे हि होते... यांनी आताच नंदिनी ला त्या भल्या मोठ्या पॉश गाडीतून उतरताना पाहिलं होत.. आणि त्याच्या कपाळावर हलक्या आठ्या पडल्या होत्या....
आता पुढे ....
नंदिनी आज तब्बल आठ दिवसानंतर तिच्या कलेजला अली होती.. शेवटच्या वर्षाला शिकत होती ती .... अचानक लग्न ठरलं आणि झालं हि त्यामुळे आठ दिवस ती कॉलेजला अली नव्हती....
पण आज तिला परत एकदा कॉलेजमध्ये येऊन खूप छान वाटत होत.... तिची नजरतिची बेस्ट फ्रेंड ईशा ला शोधात होती... तेवढ्यात तिला पाठीमागून कोणीतरी आवाज दिला....
"नंदू..."आवाज आला तस तिने मागे वळून पाहिलं.... आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली....
"हेय हाय सिद ...."नंदिनी हसत म्हणाली आणि त्याच्याजवळ गेली....
"कसा आहेस ...."ती म्हणाली
"मी मजेत आहे...."तो हसून म्हणाली ...
"हं मजेत तर असणारच ना... एवढ्या मोठ्या बिझनेसमन सोबत लग्न जे झाली... पाहिलं मी मघाशी एवढ्या मोठ्या पॉश गाडीतून आलीस ते..."सिद्धार्थ टोमणा मारत म्हणाला... तास तिचा चेहरा खाड्कन पडला ... ती काही बोलणार तीच ईशा तिथे आली....
"आग नंदू कधी आलीस तू ... चल ना कँटिंग मध्ये बसुयात अजून क्लास ला वेळ आहेत... खूप बोलायचं आहे तुझ्याशी..."ईशा नंदिनी चा हात धरत म्हणाली.. आणि तिने एक रंगीत कटाक्ष सिद्धार्थ वर टाकला.... कारण तो नंदिनी शी ज्या पद्धतीने बोलत होता ते सगळं तिने ऐकलं होत.....
"हो ईशा जाऊयात... सिद तू असं का म्हणाला आता... काही झाली का ... तू एवढं का चिडलेला आहेस..."नंदिनीला समजत नव्हतं.... तो तिच्यासोबत असं का बोलला ते... ईशा आणि तो बेस्ट फ्रेंड होते... कायम एकत्र असायचे .... पण आज सिद्धार्थचं बोलणं तिच्या मनाला लागलं होत....
"आग तो कसा आहे माहित आहे ना तुला .... तू आज एवढ्या दिवसाने अली आहेस ना.... म्हणून मुद्दाम तुझी खेचर आहे... तो... हो ना सिद...."ईशा हसून नंदिनी ला म्हणाली आणि तिने सिद्धार्थ कडे पाहिलं....
"माझं बोलणं जास्त मनावर नको घेऊ.... चला कॉफी घेऊयात आपण...."सिद थोडा हसत म्हणाला आणि पुढे चालायला पण लागला... तस ईशा ने सुटकेचा निश्वास टाकला.... तिला सिद्धार्थ बरोबर लागणार होत ... पण इकडे नंदिनी च मात्र त्याच्या बोलण्याने समाधान झालं.... सिदगदार्थ ने आतापर्यन्त कधीच तिची अशी मस्करी केली नाव्व्हती .... आज त्याच्या डोळ्यात तिला वेगळाच काही तरी दसत होता....
"नंदू आग चाल ... कसला विचार करते.. "ईशा तिला विचारात हरवलेलं पाहून म्हणाली...
"हो चाल जाऊयात ... मला नोट्स पण हव्यात..."नंदिनी भानावर येत म्हणाली...
"डोन्ट वरी काढून ठेवल्यात मी तुझ्यासाठी... देते... "ईशा हसून म्हणाली आणि मग दोघी हि कँटिंग मध्ये गेल्या...
शौर्य ऑफिसमध्ये आला तसा मिटिंग मध्ये बिझी झाला.. लग्नाच्या गडबडीत त्याच खूप सर काम पेंडिंग होत त्यामुळे कालपासून सलग एकामागून एक मिटिंग शेड्युल केलेल्या होत्या....
दुपारचं लाँच ब्रेक झाला तसा तो थोडा फ्री झाला.... त्याने त्याच ब्लेजर काढून चेअर वर अडकवलं आणि मागे पाठ टेकवून डोळे बंद करून शांत बसला.... सकाळपासून शेड्युल बिझी होता... त्यामुळे आता त्याला थोडं रील्याक्स वाटलं होत.... पण डोळे बंद केल्यावर दुसर्याच क्षणी त्याच्या नजरेसमोर ते काजलने भरलेले डोळे आले... जे थोडेसे बावरले होते... ते गुलाबी ओठ जे घट्ट मिटलेले होते.... सगळ्यात लक्षवेधक तर तिच्या ओठाचा खाली असलेला कला तीळ होता.... सीट बेल्ट लावताना तिच्या जवळ गेल्यावर त्याला मोह आवरला नाही....... आणि तिच्याकडे पाहिलं होत.... आणि आता उगाच आपण तिच्याकडे पाहिलं असं त्याला वाटत होत... कारण जेव्हा तो डोळे बंद करत होता... त्याला तिचा तोच चेहरा आठवत होता.... .. त्याने वैतागून डोळे उघडले...
"शौर्य हि मुलगी तुला खरच सुखाने जगू घेणार नाहीये... का आठवतीय एवढी ती.."त्याने डोक्याला हात लावला ... तेव्हढ्यात दारावर टकटक झाली...
"येस ..."तो म्हणाला तसा रॉकी आत आला... "रॉकी काही महत्वाचं आहे का.... नसेल तर ऐकट सोड मला ..."तो डोक्याला हात लावत म्हणाला.. जे आता दुखायला लागले... होते....
"सॉरी बॉस ते तुम्ही सांगितलेली सगळी माहिती काढली आहे... पण ठीक... मी नंतर येतो..."रॉकी त्याला असं डोकं धरून बसलेले पाहून म्हणाला ... पण रॉकी जे बोलला ते ऐकून शौर्यने त्याच्याकडे पाहिलं .....
"कुठेय माहिती ..."शौर्य म्हणाला ... तसे रॉकी ने एक इन्व्हलप त्याच्या हातात दिल...
"बॉस तुम्ही ठीक आहात ...."रॉकी ने थोडं दबकत विचारलं...
"हम गोळी घेतली कि होईल ठीक..."तो म्हणाला आणि याने अधीरतेने टी इन्व्हलप उघडलं.... त्यात काही लोकांचे फोटो होते... शौर्य बारकाईने ते सगळं पाहत होता....
"अजून काही माहिती मिळाली आहे...."शौर्य ने इन्व्हलप बंद करत म्हणाला....
"येस बॉस .... त्या आणि त्याचे आई बाबा तीन वर्षांपूर्वी मुंबई मध्ये आले... त्याच्या आधी ते दिल्ली मध्ये राहत होते.... इथे मुंबई मध्ये त्यांना जास्त कोणी ओळखत नाही .... कारण बाबाचा सगळा बिझनेस दिल्ली मधेच होता... तीन वर्षांपूर्वी त्यांनी कॉलेज जॉईन केलं.... एक मैत्रीण ईशा आणि ...."रॉकी बोलण्याचा थंबला ....
"आणि काय ..."लक्ष देऊन ऐकणारा शौर्य म्हणाला....
"आणि एक मित्र देखील आहे.... सिद्धार्थ .... मी माहिती काढली तेव्हा समजलं त्याला मॅडम आवडतात .... पण हे अजून मॅडम ला माहित नाहीये..."रॉकी शौर्य चा अंदाज घेत म्हणाला ... पण त्याचा चेहरा निर्विकार होता...
"ओके ... ये तू .. आणि हो... या सिद्धार्थ च्या मागे आपली मांस लाव... मला याच्या प्रत्येक गोष्टची खबर हवीये..."शौर्य म्हणाला ...
"येस बोस.. मी लंच आणि गोळी पाठवतो ..." रॉकी म्हणाला आणि निघून गेला....
"मिस नंदिनी राणे.... अजून किती काय काय राज आहेत तुझे.... तू तर काही सांगणार नाहीस... आता एकच व्यक्ती आहे जे मला सगळं खरं सांगू शकते ..."शौर्य स्वतःशीच म्हणाला
क्रमशः .....
कमेंट करायला विसरू नका .....