Bhagya Dile tu Mala.. in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | भाग्य दिले तू मला ...... भाग -9

The Author
Featured Books
Categories
Share

भाग्य दिले तू मला ...... भाग -9

"शौर्य नाश्ता..."मॉम त्याची भरलेली प्लेट पाहून म्हणाल्या 



"पॉट भरलं माझं.."तो म्हणाला आणि स्टडी रूमच्या दिशेने निघून गेला.... 


"आरा ह्याला काय झालं.... "नंदिनी मनातच म्हणाली... 


"नंदिनी .. जा तुम्ही पण आवरा ... परत शौर्य घाई करतील... आणि ड्रेस च घाला.... साडीत त्रास होतो ना तुम्हाला ..."मॉम म्हणाल्या आणि नंदिनी ने मनातच देवाचे आभार मानले ... एवढी छान सासू दिली म्हणून... 


"हो मॉम,..."नंदिनी हसत म्हणाली आणि ती हि उठून रूममध्ये गेली.... 


आता पुढे .... 


शौर्य स्टडी रूममध्ये गेला तेव्हा 'पपा खिडकीतून बाहेर पाहत होते.... तो त्याच्या मागे जाऊन उभा राहिला... 

"पप्पा .."त्याने आवाज दिला तसे त्यांनी मागे वळून पहिले .... आणि स्टडी रूममध्ये असलेल्या सर्वात मोठ्या चेअर वर जाऊन बसले... त्यांनी त्याला नजरेनेच समोर बसण्याचा इशारा केला ... तसा तो हि काही ना बोलता चेअरवर वर जाऊन बसला... 



"नंदिनी आणि तुमच्यात सगळं ठीक आहे ना ..??"त्यांनी त्याच्या डोळ्यात पाहत सवाल केला.... 



"असं का विचारत आहात तुम्ही....??"त्याने पार्ट त्यांनाच प्रश्न केला... 


"कारण मला असं वाटत मी तुमच्यावर हे नातं जबरदस्ती ने लादलं.... ज्यामुळे तुम्हाला जास्तच त्रास होतोय...." ते म्हणाले.... 


"असं काही नाही पप्पा ... तुमचा शब्द माझ्यासाठी लकेर आहे माहित आहे तुम्हाला..."तो हि त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला... 



"मला माफ कर... कदाचित माझ्या मित्राला दिलेला शब्द पाळण्यासाठी मी तुम्हाला माझ्या शब्दात अडकवलं.." ते उदास होत म्हणाले.... आणि त्याला कोणीतरी काळजात सुई टोचल्या सारखं झालं... कारण त्याचे 'पपा त्याचे सर्वकाही होते.... आतापर्यन्त तो कधीच त्याच्या शब्दाबाहेर गेला नव्हता.... त्यांनी शब्द टाकला म्हणूनच तत्याने नंदिनीशी लग्न केलं होत.... पण तेच सॉरी बोल्त होत्र.... जे त्याला आवडलं नाही ...... 


"तुम्हाला सॉरी बोलायची गरज नाहीये पप्पा..... ती आता माझी जबाबदारी आहे...."तो म्हणाला 


"फक्त हबाब्दारी आहे एवढं म्हणून चालत नाही शौर्य... ती पार हि पदवी लागते..... आणि मला कुठेतरी तुम्ही कमी पडताना दिसतंय...."'पपा त्याच मघाच वागणं आठवत म्हणाले.... जेव्हा त्यांनी नंदिनी ला कॉलेजला सोडायला नकार दिला.... 


"तुम्हाला वाटत तसे काही नाही... माझी महत्त्वाची मिटिंग आहे म्हणून म्हणालो मी...."तो उगाच म्हणाला.... आणि त्यांनी नजर त=रोखून त्याच्याकडे पाहिलं.... शेवटी ते हि त्याचेच वडील होते.... त्याच्याह मुलाच्या मनातलं ओळखणार नाही असं कधी होईल का...???


"ठीक आहे.... तुम्ही म्हणत आहेत तर ठेवतो विश्वास ... उभा तुम्ही उशीर होईल तुम्हाला ..." ते म्हणाले तसा तो मान हलवत हो म्हणाला .... तो दरवाजा पर्यंत गेलाच तेच त्यांनी त्याला पात्र आवाज दिला.. त्याने मागे वळून पाहिलं.... 

"शौर्य ... माझ्या मित्राला मी नंदिनी च लग्न तुझ्याशी लावण्याचा शब्द दिला... कारण त्यावर परिस्थिती तशी होती.... पण हे जरी खार असलं तरी ... त्या आधीच मी नडणीला तुमच्यासाठी पसंत केलं होत.... हे हि तेवढंच खार अशी.... कारण माझा विश्वास होता... त्याच तुमच्यासाठी योग्य आहेत...."ते म्हणाले आणि त्याने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं तो काही हि न बोलता तिथून बाहेर पडला.... तो जाताच त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला.... 


"नरेंद्र .... मी तुला दिलेला शब्द नक्कीच पाळणार... तुझी मुलगी या घरात सुखातच राहील.... आणि तिच्या डोक्यावर जे संकट घोगावत आहे ना.... ज्यासाठी तू तीच लग्न शौर्य नंदिनी सोबत लावलं... माझी मदत मागितली.... तर जो पर्यंत शौर्य नंदिनी सोबत आहेत ते त्याच्या केसाला हि धक्का लागू देणार नाही.... कारण एवढा विश्वास मला माझ्या मुलावर आहे..."ते स्वतःशीच म्हणाले.... 

"सर छोट्या मॅडम बाहेर वाट पाहत आहेत तुमची..."तो खाली येताच एक नोकर पुढे येत म्हणाला... तो मग बाहेर निघून गेला.... 




तो बाहेर आला तेव्हा नंदिनी गाडीजवळ उभी होती... तो येताच रॉकी पटकन त्याच्याजवळ आला... 



"रॉकी तू त्या गाडीत ये.... आणि बॉडीगार्डड ना नीट समजावून साग... ती तिला कॉलेजला सोडतोय... तुम्ही पण मागेच या..."शौर्य म्हणाला ...  


"एस बॉस .."रॉकी म्हणाला आणि नंदिनी साठी गाडीत जाऊन बसला ... त्याच्या मागे बॉडीगार्ड ची गाडी देखील होती ... 

"शौर्य ने बटन दाबून गाडी अनलॉक केली आणि ड्रायव्हिंग सीट वर जाऊन बसला... ती अजून हि बाहेर उभी होती ... त्याने एक सुस्कारा सोडला...... 


आता बसायला इन्विटेशन हवं का..."तो म्हणाला तशी ती गोधळली ... आणि पटकन गाडीत बसली... 


"सीट ब्लेट ..."तिला तसाच बसलेलं पाहून तो म्हणाला ...

"हो...." ती म्हणालाय.... आणि सीट बेल्ट लावू लागली... पण तिला ते काही जमत नव्हतं ... त्याने वैतागून एकदा तिच्याकडे पाहिलं आणि घड्याळात पाहिलं... त्याला मीटिंगला खर्च उशीर होत होता.... त्याने कपाळावर दोन बोट घासली.... आणि लगेच तिच्या बाजूला झुकला .... त्याच्या अचानक जवळ येण्याने ती मात्र गोंधळली आणि पटकन हात काढून मागे सीट ला टेकवून बसली.... तो मात्र काही न बोलता.... सीट बेल्ट लावत होता.... 

सेट केलेले केस... ट्रिम बियर्ड , चेहऱ्यावर तोडासे वैतागलेले भाव त्याचा तो चार्मिंग लूक पाहून ती त्याच्यात ऋण गेली .... त्यात त्याच्या बॉडी स्प्रे तिला धुंद करत होता.... ती एकटक त्याला न्याहाळत होती .... आणि तिच्याही नकळत तिच्या हृदयाची धडधड वाढली होती... त्याच वेळी त्याने तिच्याकडे पाहिलं... आणि ते ब्राऊनडोळे तिच्या काळ्याभोर डोळ्यात अडकले... 


दोघांमध्ये फक्त हवा जाईल एवढंच अंतर होत.... त्याचे गरम श्वास तिला तिच्या तोंडावर हिणवू लागले.. तशी तिची चलबिचल वाढली.. आणि तिने गडबडून नजर वळवली ... तिने नजर हटवताच तो भानावर आला आणि परत टीकच्या सीट वर बसला त्याने गाडी स्टार्ट केली... 


पूर्ण रस्त्यात ती शांतच होता... त्याने एकदा हि तिच्याकडे पाहिलं नाही आणि नाही तिच्याशी एक शब्द बोलला.... 


"सडू कुठला.... कायम चेहऱ्यावर राग घेऊन फिरतो.... किती बोर होती...." ती मनातच म्हणाली .... 


"मी थोडं जवळ आलो तरी चाललं नाही.... आणि तो निखिल कमरेवर हात फिरवत ओटा ते आवडलं वाटत...."तो मनातच म्हणाला.... 

"मघाशी पण त्या निखिल कडे रागात पाहत होता.... पण बरेच झालं.... नालायक मुद्दाम माझ्या कमरेवर हात ठेवला... पप्पा आणि मॉम होते म्हणून नाहीतर सांगितलं असत त्याला...."ती मघाच निखिल च वागणं आठवून म्हणाली.... 

"हे तोड फक्त माझ्याजवळ असल्यावर चालत.... त्या निखिलला काही बोलायची तर हिम्मत झाली आणि.... कि काही बोलायचं च नव्हतं...." तो परत मनात म्हणाला.... 

तिने आता सरंल मोबाईल काढला आणि तोच चालत बसली... काहीच वेळात कॉलेज आले .... तशी तिने गाडी थांबवली.... ती खाली उतरणार तोच .... 


"बायको ... " त्याने आवाज दिला आणि तिने वैतागून त्याच्याकडे पाहिलं.... 



"नंदिनी नाव आहे माझं ..."ती घुश्श्यात म्हणाली... 


"हो पण माझी तर बायकोच आहेस ना.... नाही का.."तो म्हणाला आणि थोडासा तिच्याजवळ झुकला.... तशी ती लगेच मागे झाली .... त्याने हात पुढे केला आणि तिच्या ड्रेसच्या आत गेलेलं मंगळसूत्र वर ककधल ... पण ते करताना त्याच्या बोटाचा हलका स्पर्श सुद्धा तिला करंट देऊन गेला.... 


"माझ्या नावाचं आहे ना .. मग असं जरा वर ठेवत जा...."तो म्हणाला आणि तिने नाक मुरडले.... 

"हो माहित आहे.... सारखं आठवण करून द्यायची गरज नाही... कारण ते मंगळसुत्र नाही तर फास आहे आहे माझ्या गळ्यातला मजबुरी म्हणून घातलं आहे... नाही तर तुझ्या नावाचं मंगळसूत्र च वाक्य .. तुझं नाव हि माझ्या नावापुढे लावलं नसत ..."ती रागात म्हणाली.... कुठे ना कुठे तिच्या मनात राग बाहेर पडला होता... कारण या लग्नात कोणीच तिची मर्जी विचारात घेतली नव्हती..... 


"हं .... पण काय करणार... आता आयुष्यभर तुला हाच फास घालून फिरायचं आहे...."तो गालात तिरकस हसत म्हणाला.... आणि त्याच हसन तिला डिवचण्याचा आहे... असं तिला वाटलं तस तिला राग आला.. 


ती काहीही ना बोलता.... खाली उतरली... ती जाणार तेव्हढ्यात त्याने परत तिला आवाह दिला 




"ती गाडी आणि तो ड्रायव्हर तुझ्झ्यासाठीच आहे.... कॉलेज सुटलं कि त्याच्यासोबत घरी जा... आणि कॉलेजला हि त्याच्यासोबतच यायचं ..."तो ऑर्डर सोडल्या प्रमाणे म्हणाला.... 


"मला काही नकोय तुमची गाडी आणि ड्रायव्हर ... माझी मी जाईल...."ती तोऱ्यात म्हणाली ..... 


"सांगितलं तेवढं ऐकायचं... उगाच मला जबरदस्ती करायला भाग पडू नको..."तो रागात म्हणाला 


"दुसरं येत तरी काय तुम्हाला ... जबरदस्ती शिवाय.... असच जबरदस्तीने करून तुम्ही माझ्याशी लग्न हि केलंत.... काय मिळालं तुम्हला .... झाला का बदल पूर्ण ..."ती डोळ्यात पाही आणून म्हणाली आणि लगेच निघून हि गेली... तो मात्र तसाच तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला.... 


"तुझ्यासोबत बदल घेण्यासाठी मला तुझ्याशी लग्न करण्याची गरज नव्हती.... मी हेलग्न केलं ते हि तुझ्यासाठी .... पण हे कदाचित तुला नाही कळणार ... आणि मी सांगू शकणार नाही.. तुला..."तो स्वतःशीच म्हणाला... 



"बॉस ... निघायचं ना..."रॉकी म्हणाला तसा.. तो खाली उतरला आणि मागे जाऊन बसला.... रॉकी हि पुढे बसला.... ड्रायव्हर जो मागच्या गाडीत होता तो ड्रायव्हींग सीट वर जाऊन बसला.... आणि गाडी धुराळा उडवत तिथून निघून गेली....

नानंदिनी साठी ठेवलेला ड्रायव्हर आणि गाडी तिथेच उभार होते... सोबत बॉडीगार्ड कुणाला समजणार बारकाईने निरीक्षण करत होते.... पण या सगळ्यात दोन डोळे असे हि होते... यांनी आताच नंदिनी ला त्या भल्या मोठ्या पॉश गाडीतून उतरताना पाहिलं होत.. आणि त्याच्या कपाळावर हलक्या आठ्या पडल्या होत्या.... 




क्रमशः ..... 



स्टोरी ला देत असलेल्या प्रेमासाठी खर्च थँक्यू ..... 


आज थोडे फार हिट नक्कीच मिळाले असतील तुम्हाला .... आता ये काय आहेत हे तुम्हीच सागा मला.... 

कमेंट आणि स्टिकर द्याल विसरू नका....