इकडे लॅपटॉप च्या स्क्रीन वर तो तिला रडताना पाहून त्याच्याही नकळत त्याच्या हृदयात कालवाकालव झाली ... पण दुसऱ्याच क्षणी तो परत निर्विकार झाला... त्याने हि मग लॅपटॉप वरच्या cctv बंद केला.... त्याच आयुष्य काहीच दिवसात पूर्ण बदललं होत.... जिचा तिरस्कार करत होता... तिलाच स्वतःचा कायमची सामील करून घेतलं होत... त्याला धड तिच्यावर राग हि काढता येत नव्हता..... आणि प्रेम... ते थोडं अशक्यच होत....
त्याने टेबलावर ठेवलेला वाईन उचलला आणि तोंडाला लावला.... त्याच्या डोक्यात सध्या काय सुरु होत ते... फक्त त्यालाच माहित होत....
आता पुढे ......
रात्र झाली तसा नंदिनी च्या पोटात भीतीने गोळा आला... कारण दिवसभर तो रूममध्ये नसला तरी ... आज आणि इथून पुढची प्रत्येक रात्र तो आपल्या सोबत या एकाच रूममध्ये असणार आहे... त्याने आपल्यासोबत काही केलं तर....??"विचार करूनच तिला घाम फुटला.....
तो उशिरा येणार होता... त्याचे पप्पा हि अजून आले नव्हते.... बाकी कुणाशी तर तिची दिवसभरात एकदाही भेट झाली नव्हती.... डिनर पण तिने आणि मॉम ने केला होता.... मॉम सोबत होती.... डिनर पण तिने आणि मॉम केला होता.... मॉम सोबत होती... तोपर्यंत तिला काही वाटले नाही पण आता रूम मध्ये येताच मनावर एक दडपण आले....
"नंदू.... कुठे फसलीस ग... आता ह्या खडूस सोबत एकाच रूम मध्ये राहायचं ..."ती नख कुरतडत इकडून तिकडे फेऱ्या मार्ट होती.... बेडच्या वर त्याचा ब्लॅक सूट आणि ब्लॅक गॉगल घातलेला एखाद्या मॉडेल ला हि लाजवेल असा फोटो होता...
"काय बघतोस असं...??तुझ्यामुळेच माझ्यावर हि वेळ आली आहे .... कुठे बघतो ते पण कळत नाही... कशाला लावायचा तो काळा गॉगल . उगाच शायनींग...."ती तिच्या फोटो कडे पाहत तोड वाकड करत म्हणाली... पण तो तर फक्त फोटो होता उत्तर कास देणार ना...
"नंदू , नंदू .... काहीतरी विचार कर.... ह्याचा काही भरवसा नाही... बेडवर शेजारी झोपायचं म्हणजे... त्याने फायदा घेतला तर.... नाही न्हाई..."ती विचार करून सुद्धा घाबरली ... तेवढ्यात तिची नजर सोफ्यावर गेली आणि तिचे डोळे चमकले....
"हा मी इथेच सोफ्यावर झोपते... म्हणजे टेंशनच नाही... हो हेच बेस्ट आहे..." ती खुश होत म्हणाली....
"त्या आधी हि साडी चेंज करते... किती जड आहे..... दिवसभर वैताग आला नुसता ..."ती साडी कडे पाहत म्हणाली ... पण आता तिला बाथरूम मध्ये जायचा खूप कंटाळा आला होता.....
"इथेच चेंज करते.... तसे हि मॉम म्हणाल्या होत्या तो खडूस उशिराच येतो..." ती स्वतःशीच म्हणाली आणि तिने तिच्या बॅग मधून एक नाईट ड्रेस बाहेर काढला... ... अजून हि तिचे कपडे बॅग मधेच होते...
तिने खांद्यावरची पिन काढली आणि साडी काढून बाजूला ठेवली ... पटकन ब्लाउज काढून शर्ट आणि पँट असलेला नाईट ड्रेस घेतला...
"हुश्श ... झालं.. किती छान वाटत आहे असं ... चल नंदू तो सदू यायच्या आधी झोपून घे ..."ती म्हणाली आणि बेडवरती एक उशी आणि ब्लँकेट घेऊन सोफ्यावर येऊन झोपली ...
पण आता एवढ्या मोठ्या रूममध्ये तिला खूप ऐकत वाट होत... झोप हि येत नव्हती.. पण तो यायच्या आत तिला झोपायचं होत.... त्याचा विचार येताच तिने ब्लँकेट पूर्ण तोंडावर ओढून घेतलं... त्याच वेळी इकडे तो ऑफिसमध्ये बसून लॅपटॉप वर तिलाच पाहत होता...
"मूर्ख बळवंट असं कोण कपडे चेंज ककरत का...."त्याने रंगात लॅपटॉप बंद केला......
त्याच्या मॉम चा कॉल आला तेव्हा त्या म्हणाल्या नंदिनी ला वाट पाहायला लावू नको लवकर ये म्हणून त्याने ती काय करते हे पाहण्यासाठी त्याच्या रूममध्ये असलेलं cctv चालू केलं... आधी तर ती नख कुरतडत इकडून तिकडे फेऱ्या मार्ट होती... नंतर त्याच्या फोटो कडे पाहून रागात काहीतरी बोल्ट होती..... नंतर तिची बॅग ओपन करून तिने त्यातुंन कपडे घेतले ... त्याला वाटले ती नक्कीचह आता बाथरूम मध्ये जाईल कपडे चेंज करायला ..... पण पुढच्याच क्षणी त्याचे डोळे मोठे झाले कारण तिने तिथेच साडीचा पदर काढून बाजूला टाकला आणि साडी काढत होती.... ते पाहून त्याने लगेच तोड फिरवून घेतलं होत... त्याला तिचा खूप जास्त राग आला होता....
त्याला यायला जरा उशीरच झाला होता.... तो रूममध्ये आला तेव्हा रूमचे सर्व लाईट बंद होते... फक्त एक छोटा लाईट तेव्हढा चालू होता.... त्याने समोर पाहिलं तो सोफ्यावर झोपली होती ब्लँकेट सोफ्यावरून खाली पडलं होत... तिने पाय पूर्ण पोटाजवळ दुमडून घेतले होते... केस अस्ताव्यस्त आणि गँलरीतून येणाऱ्या वार्यानेच हलकेच उडत होते.... त्याच्या हि नकळत तो तिच्याजवळ खाली गुडघ्यावर बसला....
त्याच्या छातीला लागला एवढी हाईट.... लांबसडक काळेभोर केस.... गोरापान चेहरा.... चेहऱ्याला सूट होईल असं नाक.... आणि कमनीय बाधा ... दिसायला अगदी नक्षत्र सारखी होती... तिच्या गालावर रुळणाऱ्या बाटा मागे सारण्याचा मोह त्याला... आवरला नाही .... त्याने अलगद तिच्या गालावरून एक बोट फिरवत कानामागे नेलं तसे तिचे केस हि मागे गेले.... त्याच्या बॅटचा थोडासा स्पर्श झाला तशी तिची थोडी चुळबुळ झाली ... चेहऱ्यावर थोडे वैतागलेले भाव आले .... तो गालातच हसला... तिच्या गुलाबी ओठाची हलकी हालचाल झाली आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला.... लाईट च्या मंद प्रकाशात तिचा चेहरा कमालीचा सुंदर दिसत होता..... बाहेर चा चन्द्र हि फिका पडेल एव्हढा ..... तो तिला एकटक पाहत बोट.... पण आता तिची चुळबुळ वाढली होती .... कदाचित तिला सोफा झोपायला कमी पडत होता.... त्याने थोडासा विचार केला आणि अलगद तिला उचलून घेतलं... तिला जग यायच्या आधी त्याने लगेच तिला बेडवर झंझोपवलं... आणि खाली पडलेलं ब्लॅकेट तिच्या अंगावर टाकून एसी च टेंप्रेचर सेट केलं.... त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती मस्त झोपली होती.. त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली.... पण...पण... दुसऱ्याच क्षणी तो भानावर आला.....
"शौर्य काय करतोय तू हे.... तिचे केस मागे घेतोय .... तिला असं एकटक पाहतोयस... तिला व्यवस्थित झोप लागावी म्हणून तिला उचलून बेडवर झोपवतोय.... कंट्रोल कर स्वतःला ... तू असा तिच्याकडे आकर्षित कसा होऊ शकतो.... विसरलास का.... ती काय वागली आहे तुझ्याशी ..."त्याच मन त्याला आतून ओरडून सांगत होत....
"नाही ,.... मी काहीच विसरलो नाही... हा शौर्य सूर्यवंशी त्याचा झालेला अपमान कधीच विसरणार नाही ..... आणि तिला हि विसरू देणार नाही.... मिस नंदिनी राणे ... तू माझी बायको झाली कारण कुणाच्या तरी वाचनात मी अडकलो होतो... पण याचा अर्थ मी तुला माफ केलं असा होत नाही... तू केलेल्या प्रत्येक चुकीची शिक्षा तुला नक्की मिळणार ..."तो तिच्यावर एक रागीट कटाक्ष टाकत म्हणाला .... आणि बाथरूम मध्ये निघून गेला
क्रमशः
खुप प्रश्न पडले असतील ना... सगळे उत्तर जशी कथा पुढे जाईल तसे मिलतील ... फक्त धीर धारा.... कारण कथा पुढे खूप इंटरेस्टिंग असणार आहे.... कॉमेंट नक्की करा लिहिण्याला बळ देतात