Bhagya Dile tu Mala - 3 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | भाग्य दिले तू मला .... भाग -३

The Author
Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

भाग्य दिले तू मला .... भाग -३

"मिस नंदिनी राणे ... भूतकाळ तर मी हि विसरलो नाही आहे.. पण माझी मजबुरी आहे जे मी तुला सहन करतोय... नाहीतर हा शौर्य सूर्यवंशी त्याच नुस्कान आणि झालेला अपमान कधीच विसरत नाही ..."तो स्वतःशीच म्हणाला.. आणि हातात वोच चढवून बाहेर निघून गेला.... 


-----आता पुढे------


"हे काय शौर्य ,.... तुम्ही तिथे निघालात तयार होऊन ..." त्याला असं सूट बुटात तयार होऊन खाली येताना पाहून त्या कपाळावर आठ्या पडून म्हणाल्या ... 


"ऑफिस ला चाललोय मॉम... दुसरं कुठे जाणार...." तो ब्रेकफास्ट साठी बसत म्हणाला .. तो बसला तसे एक नोकर लगेच त्याचा ज्यूस आणि डायट फूड घेऊन आला आणि त्याच्यासमोर ठेवलं..... 

"शौर्य फक्त दोन दिवस झालेत तुमच्या लग्नाला... नंदिनी काय विचार करतील...."मॉम नाराजीचा म्हणाल्या..... 

"ऑलरेडी चार दिवस वाया गेलेत माझे ... झालं ना लग्न... मग आता मी एक क्षण हि वाया घालवू शकत नाही.... खूप काम बाकी आहेत माझी ...." तो ज्यूस पिट म्हणला .... 

"काम काय तुमचे रोज चालू असतात... शौर्य हेच दिवस असतात एकमेकांसोबत वेळ घालवण्याचे एकमेकांना समजून घेण्याचे.... ते काही नाही तुम्ही नंदिनी ला घेऊन कुठेतरी बाहेर जा काही दिवस..."त्या जवळ जवळ हुकूम सोडत म्हणाल्या .... 

"एकमेकांना वेळ द्यायला आणि समजून घ्यायला अख्ख आयुष्य पडली .... सध्या काम महत्वाचं ... आणि तिचे हि एक्झाम जवळ आलेत.... शेवटचे दोन मंथ कॉलेज चुकून चालणार नाही... " तो म्हणाला तसे त्यांनी निराशेने त्याच्याकडे पाहिलं ... तो मात्र रिलॅक्स होता.... जणू हे सगळं त्याच आधीच ठरलं होत... त्या काही बोलणार तेवढ्यात त्यांना वरून पायऱ्या उतरून खाली येणारी नंदिनी दिसली आणि लगेच चेहरा नॉर्मल केला...

"अरे नंदिनी आलात ... या बस नाश्ता करून घ्या ...." त्या हसून म्हणाल्या.... तशी ती अवघडली... एक तर त्यांना पाहून तिला दडपण आले होते... त्यात तिला खाली यायला पण उशिरा झाला होता... असं पहिल्याच दिवशी उशीर आला तर सासू नक्कीच ओरडेल असं तिला वाटलं... पण त्या तर नॉर्मल बोल्ट होत्या... ती पटकन पुढे झाली आणि त्यांनी दाखवलेल्या चेअर वर बसली... 

"सॉरी उशीर झाला खाली यायला..."ती दिलगिरी व्यक्त करत म्हणाली... 

"अहो असुद्या काही हरकत नाही...."त्या हसून म्हणाल्या त्याची नजर तिच्या गळ्यावर गेली... जिथे अंधुक लाल निशाण दिसत होत... ते पाहून त्या गालातच हसल्या .... 


तिने आता समोर पाहिलं आणि त्याला समोरच्या चेअर वर बसलेलं पाहतच तिच्या कपाळावर आठ्या पडल्या... आणि त्याने रूममध्ये जे केलं ते आठवून त्याचा परत राग आला... ते आठवतच तिचा हात तिच्याही नकळत तिच्या गळ्यावर गेला... जिथे चांगलंच लाल निशाण पडले होते... जे तिने फाउंडेशन लावून कसे बसे लपवले होते... ती रंगात त्याच्याकडे पाहत होती... तो मात्र तिच्याकडे पाहून गालात हसला आणि त्याची नजर तिने हाताने झाकलेल्या गळ्यावर गेली... तिला त्याची नजर जाणवताच तिने गडबडून हात खाली केला.. आणि एक जळजळीत कटाक्ष त्याच्यावर टाकला पण त्याच्यावर मात्र त्याच्या काहीच परिणाम झाला नाही.... तो निवांत त्याच खात होता.... 



"नंदिनी काय झालं... खाताय ना...."मॉम तिला नुसताच असं बसलेलं पाहून म्हणाल्या... त्याच्या आवाजाने ती भानावर आली आणि तिने चेहरा नॉर्मल केला.... 


"हो खाते..." ती म्हणाली आणि खाऊ लागली.. पण तिला आता खूप वेगळं वाटत होत... लग्नाच्या वेळ आणिकाल पूजेला हि तिने पाहिलं होत त्याची खूप मोठी फॅमिली होती... पण आता इथे तो आणि त्याची आई सोडली तर कोणीच नव्हतं.... तिची भिरभिरती नजर पाहून त्यांना समजलं ती काय विचार करत असेल ते.... 


"तुम्ही विचार करत असाल ना ... घरात एवढे मांस असून इथे आम्ही दोघेच की...??" मॉम म्हणाल्या.. 


"हो म्हणजे ते.. काल पूजेला भरपूर लोक होती ना म्हणून..."ती म्हणाली.... 


"आता हि आहेत घरात सगळे... काही बाहेर पण निघून गेलं.. इथे सगळेजण जेवण , नाश्ता आपापल्या रूममध्ये च करतात... मी शौर्य आणि त्याचे पप्पा आम्ही तिघेच जेवतो.. ते जरा लवकर बाहेर गेलेत आज... आता तुम्ही हि एक ऍड झालात...."मॉम म्हणाल्या तशी ती कसनुसं हसली... पण तिला हे खूप विचित्र वाटलं... एवढी मोठी फमिली असून काय फायदा.. जर ऐकतच राहायचं असेल तर... ती विचार करत खाऊ लागली.... 

"मॉम माझं झालं.. येतो मी..."तो चेअर वरून उठत म्हणाला.... आणि ब्लेझर घेऊन निघाला हि... पण त्याच्या बोलण्याने मात्र मॉम च्या कपाळावर आठ्या पडल्या... ज्या त्याला लगेच समजल्या... 

"नंदिनी... मी ऑफिसला चाललोय.. बोर झालीस कि कॉल कर.. "तो मांडणी कडे पाहून हसत म्हणाला... आणि ती थोडी शॉक झाली कारण आज तो पहिल्यांदा तीच नाव घेत होता.. ती फक्त त्याच्या तोंडाकडे गोधळून पाहत होती...

"नंदिनी अहो लक्ष कुठे तुमचं... शौर्य निघालेत ऑफिस ला जा त्यांना बाहेर सोडून या.."मॉम म्हणाल्या तशी ती भानावर आली आणि तिने होकारार्थी मान हलवली... तो बाहेर जायला निघाला तशी इ हि त्याच्या मागे जायला निघाली.. दोघांना पाहून मॉम गालातच हसल्या आणि त्या हि त्याच्या रूममध्ये निघून गेल्या ... 


"इट्स ओके ... बाहेर आलीस तरी चालेल.." तो तिला त्याच्या मागे आलेलं पाहून म्हणाला.... 


"तुला काय वाटलं मी खर्च तुला बाय करायला आले का... जास्त स्वप्न पाहून नको... मला बोलायचं होत म्हणून आले..." ती रंगात म्हणाली... तसा तो तिच्याकडे वळला त्यामुळे ती थोडी गोधळली आणि जागीच थांबली... तो एक एक पॉल तिच्याजवळ येऊन लागला... आणि ती आता पूर्ण भीतीला जाऊन टेकली... तो तिच्या एकदम जवळ होता... आणि ती त्याला येवढ्याजवळ पाहून श्वास रोखून उभी होती.... ती तिथून जाणार तोच त्याने तीच हात घट्ट पकडला.. तशी ती जागीच थांबली . 

"बायको ... किती वेळा आठवण करून द्यायची ... नवरा आहे मी तुझा... माझ्याशी बोलताना इज्जतीत आणि कमी आवाजात बोलायचं समजलं..... परत सांगायला लावू नकोस... नाहीतर या शौर्य सूर्यवंशी ला समोरच्याची बोलती चांगलीच बंद करता येते माहितीये ना तुला ... कि आठवण करू देऊ ..." तो तिच्या डोळ्यात आरपार 

आरपार पाहत म्हणाला... आणि त्याच्या बोलण्याचा रोख तिला बरोबर समजला .. तिने रागाने त्याच्या हातातून हात काढून घेतला.... 


"ते मी कशी विसरून शकते.. तू माझं पूर्ण आयुष्य खराब केलं आहेत... असो... ते तर नाही बदलू शकत मी... एवढंच सगयच होत.. उद्या पासून कॉलेज ला जाणार आहे... त्यामुळे तुझ्या घरच्यांची परमिशन घे..."ती म्हणाली आणि आली तशी निघून पण गेली.. तो तसाच तिला पाठमोरी पाहत राहिला... 

"बॉस निघायचं ना..."एक भारदस्त आवाज आला आणि त्या सोबत त्याचा पीए कम बोर्डिंगार्ड रॉकी त्याच्या समोर अदबीने उभा राहिला .. शौर्य ने मान हलवली आणि बाहेर गेला .... रॉकी ने एकदा नंदिनी गेली त्या दिशेने पाहिलं आणि मग तो हि पळत जौंगाडीत बसला.... 

"रॉकी तुला सांगितलेलं काम केलस का...?"शौर्य बाहेर पाहत म्हणाला... 


"येस बोस.. ड्रॉयव्हर कम बॉडीगार्ड अरेंज केला आहे.... जो कायम सावलीसारखी त्याच्या सोबत असेल... शिवाय अजून काही बॉडीगार्ड हि अरेंज केलेत..."रॉकी म्हणाला... 


"मला त्या सगळ्यांना स्वतः भेटायचं आहे... भेटून मग फायनल करू..."शौर्य म्हणाला आणि रॉकी थोडा चकित झाला... गेले पाच वर्ष तो शौर्य साठी काम करत होता.... पण आता पर्यंत त्याने कधी त्याच्या कामावर शंका घेतली नव्हती... पण आज तो स्वतहा त्या बॉडीगार्ड ना भेटणार म्हणाला होता... 


"येस बोस... मी ऑफिस मध्ये बोलवतो त्याला ..."रॉकी म्हणला ... मग मात्र शौर्यने त्याचा लॅपटॉप ओपन केलं नि आलेलं मेल चेक करू लागला.... 





क्रमशः 

नंदिनी फुल तसं देत आहे शौर्य ला... पण तिचा हा राग किती दिवस टिकेल त्याच्यासमोर....???


काय चाललंय ह्या शौर्यच .. कधी प्रेमाने बोलतो तर कधी राग- काढतो....???


कोणासाठी असतील हे बॉडीगार्ड ...??????