ते झाड - मागं वळून बघू नकोस

(5)
  • 9.2k
  • 0
  • 4.3k

चेतन सहा वर्षांनंतर गावात परतला होता. शहरी आयुष्य, कॉलेज, नोकरी... या सगळ्यांमध्ये अडकून गेलेल्या चेतनसाठी गाव म्हणजे फक्त आठवणीतलं एक पान होतं. पण आजोबांच्या मृत्यूनंतर गावात येणं अपरिहार्य झालं. धुळे जिल्ह्याच्या एका लहानशा गावात त्याचं लहानपण गेलं होतं – ओढ्यामागची माती, पावसात भिजणं, आणि संध्याकाळी आजीकडून ऐकलेल्या भीतीदायक गोष्टी. विशेषतः एक गोष्ट त्याच्या मनात कायम कोरली गेली होती… "ते झाड – मागं वळून बघू नकोस..." ते झाड गावाच्या सीमेजवळ होतं – एक वाकलेलं, कुरूप, काळसर झाड. गावातल्या प्रत्येक लहान मुलाला त्या झाडाची भीती वाटायची. लोक म्हणायचे, तिथं आत्मा राहतो. जो त्याच्याकडे वळून पाहतो, तो कधीच परत येत नाही.

1

ते झाड - मागं वळून बघू नकोस - 1

Chapter 1 : परतफेड चेतन सहा वर्षांनंतर गावात परतला होता. शहरी आयुष्य, कॉलेज, नोकरी... या सगळ्यांमध्ये अडकून गेलेल्या चेतनसाठी म्हणजे फक्त आठवणीतलं एक पान होतं. पण आजोबांच्या मृत्यूनंतर गावात येणं अपरिहार्य झालं. धुळे जिल्ह्याच्या एका लहानशा गावात त्याचं लहानपण गेलं होतं – ओढ्यामागची माती, पावसात भिजणं, आणि संध्याकाळी आजीकडून ऐकलेल्या भीतीदायक गोष्टी. विशेषतः एक गोष्ट त्याच्या मनात कायम कोरली गेली होती… "ते झाड – मागं वळून बघू नकोस..." ते झाड गावाच्या सीमेजवळ होतं – एक वाकलेलं, कुरूप, काळसर झाड. गावातल्या प्रत्येक लहान मुलाला त्या झाडाची भीती वाटायची. लोक म्हणायचे, तिथं आत्मा राहतो. जो त्याच्याकडे वळून पाहतो, तो कधीच परत ...Read More

2

ते झाड - मागं वळून बघू नकोस - 2

Chapter 2 : हरवलेले पावसाचे ठसे चेतनच्या गायब होऊन आज दुसरा दिवस होता. गावात एक विचित्र शांतता पसरली घराबाहेर माणसं कमी आणि कुत्र्यांचं भुंकण जास्त. गावातल्या प्रत्येकाच्या मनात भीतीचा एक धसका निर्माण झाला होता. ज्याने चेतनला झाडाकडे जाताना पाहिलं होतं , त्याचं आता बोलायचं धाडस होत नव्हतं. प्रियंका फाटक उघडून गावच्या चावडीकडे आली . तिथे दत्ता काका, गणपत सरपंच, आणि पोलीस उपनिरीक्षक साळुंखे चौकशी करत होते . " शेवटचं त्याला कुणी पाहिलं ? " साळुंखेंचा कडक प्रश्न . " मी पाहिलं होतं , " प्रियंका पुढे आली, आवाजात घाबरलेपणा होता. "रात्री साडेआठ वाजता ... त्याने सांगितलं होतं की ...Read More

3

ते झाड - मागं वळून बघू नकोस - 3

Chapter 2 : हरवलेले पावसाचे ठसे चेतनच्या गायब होऊन आज दुसरा दिवस होता . गावात एक विचित्र शांतता होती. घराबाहेर माणसं कमी आणि कुत्र्यांचं भुंकण जास्त . गावातल्या प्रत्येकाच्या मनात भीतीचा एक धसका निर्माण झाला होता . ज्याने चेतनला झाडाकडे जाताना पाहिलं होतं , त्याचं आता बोलायचं धाडस होत नव्हतं . प्रियंका फाटक उघडून गावच्या चावडीकडे आली. तिथे दत्ता काका , गणपत सरपंच, आणि पोलीस उपनिरीक्षक साळुंखे चौकशी करत होते. " शेवटचं त्याला कुणी पाहिलं ? " साळुंखेंचा कडक प्रश्न. " मी पाहिलं होतं , " प्रियंका पुढे आली , आवाजात घाबरलेपणा होता . " रात्री साडेआठ वाजता ...Read More

4

ते झाड - मागं वळून बघू नकोस - 4

Chapter 3: मौली आजीचं इशारा चेतनच्या गायब झाल्यानंतर गावातल्या लोकांचा धीर ढासळला होता. झाडाजवळ सापडलेल्या पायाच्या विचित्र ठशांनी मोबाईल, टॉर्च फेल होण्यामुळे पोलिसही संभ्रमात पडले होते. दत्ता काका मात्र काही बोलायला तयार नव्हते. ते शांत होते, पण त्यांच्या डोळ्यांत काहीतरी लपलेलं होतं – एखादं जुनं रहस्य… किंवा अपराध? त्या संध्याकाळी गावात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली – "मौली आजी परत आली!" मौली आजी – गावाची वेडी की काहीतरी जास्त? गावातल्या एका मोडकळीस आलेल्या झोपडीत राहणारी मौली आजी अनेक वर्षांपूर्वी गावातून गायब झाली होती. लोक म्हणत असत की ती भोंदू, तांत्रिक प्रकार करणारी, झाडाशी काहीतरी संबंध असलेली बाई होती. पण ...Read More