युरोपियन हायलाईट

(2)
  • 3.8k
  • 0
  • 1.4k

युरोप पहाणे हे फार वर्षापासून पाहिलेले एक स्वप्न होते ..युरोप पहायचं ठरवल तेव्हा आधी त्या विषयी थोडे वाचून घेतले होते .युरोपला प्राचीन इतिहास आहे त्यामुळे इथल्या प्रत्येक गावात तुम्हाला जुन्या इमारती/राजवाडे पाहायला मिळतात .प्रत्येक गावात एक तरी म्युझियम असतेच .इथली प्राचीन संस्कृती आणि इतिहास याचे अत्यंत चांगल्या पद्धतीने जतन केलेलं पाहायला मिळते .लंडन .. आमची युरोप टूर सुरु झाली ती लंडन मधुन .लंडन पूर्वी पु ल च्या अपूर्वाई पुस्तकातून भेटले होते .तेव्हापासून लंडन पाहिले पाहिजे असे वाटायचे .मुंबई लंडन साडेनऊ तासाचा प्रवास ,तशात तेथील घड्याळ साडेचार तास मागे ..एवढे असुन सुद्धा थंड हवामाना मुळे थकवा अजिबात जाणवत नव्हता .लंडनला गेल्यागेल्या तिथल्या शिस्तबद्ध जीवनाचा लगेचच अनुभव आला .

1

युरोपियन हायलाईट - भाग 1

युरोप पहाणे हे फार वर्षापासून पाहिलेले एक स्वप्न होते ..युरोप पहायचं ठरवल तेव्हा आधी त्या विषयी थोडे वाचून घेतले .युरोपला प्राचीन इतिहास आहे त्यामुळे इथल्या प्रत्येक गावात तुम्हाला जुन्या इमारती/राजवाडे पाहायला मिळतात .प्रत्येक गावात एक तरी म्युझियम असतेच .इथली प्राचीन संस्कृती आणि इतिहास याचे अत्यंत चांगल्या पद्धतीने जतन केलेलं पाहायला मिळते .लंडन .. आमची युरोप टूर सुरु झाली ती लंडन मधुन .लंडन पूर्वी पु ल च्या अपूर्वाई पुस्तकातून भेटले होते .तेव्हापासून लंडन पाहिले पाहिजे असे वाटायचे .मुंबई लंडन साडेनऊ तासाचा प्रवास ,तशात तेथील घड्याळ साडेचार तास मागे ..एवढे असुन सुद्धा थंड हवामाना मुळे थकवा अजिबात जाणवत नव्हता .लंडनला ...Read More

2

युरोपियन हायलाईट - भाग 2

पॅरिसपॅरिस हिंदी आणि इंग्रजी सिनेमातून अनेकदा पाहिलं होतं आणि अर्थातच आवडलं होतं.एमिली मिडनाईट इन पॅरीस ,आणि काही आंतरराष्ट्रीय सिनेमातून दर्शन होतेचित्रकार , चित्रे याविषयी वाचता लिहिताना पॅरीसचा उल्लेख सतत येतंच असतोशम्मीचा एन इव्हिनिंग इन पॅरिस तर हा तर अनेक वेळा पाहिलेला आणि मनावर मोहिनी पडलेला चित्रपट .त्यामुळे उत्सुकता होतीच ..लंडनच्या सेंट पँक्रा स्टेशनवर सोपस्कार पार पाडून युरोस्टारची वाट बघत बसलो.इथलं वायफाय खुप छान आहे त्यामुळे वाट पाहताना बरेच लोक मोबाईल मध्येच गर्क होते.आमच्या बरोबरच्या दोन मैत्रीणी नुकत्याच घेतलेल्या मोबाईल सेटिंग मध्ये गुंतलेल्या होत्याहे स्टेशन तर सुंदर आहेच पण बसण्याची व्यवस्था बऱ्याच खुर्च्या असुन सुद्धा सततच्या गर्दीमुळे अत्यंत अपुरी वाटते ...Read More

3

युरोपियन हायलाईट - भाग 3

चॉकलेटचे शहर बेल्जियम ..पॅरिस मधुन बाहेर पडल्यावर आमचे पुढचे ठिकाण होते बेल्जियम.बेल्जियम हा फेमस चित्रकार रेने माग्रिटेचा देश.येथेच हुशार टिनटिन होऊन गेला.इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी या सर्वापेक्षा बेल्जियम लहान आहे बेल्जियमची जागा मध्यवर्ती असल्याने सगळे लोकं भांडायला मध्यवर्ती पडते म्हणून इथं येत असतBattlefield of Europe म्हणून बेल्जियमची ओळख आहेनेपोलिअन जिथे लढाई हरला ते वाटर्लु इथलंच.अनेक वर्षानंतर बेल्जियम आता प्रगती करतेय .ब्रुसेल्स ही बेल्जियमची राजधानी.ब्रुसेल्स फार छान टुमदार शहर आहे. गजबजलेल्या फॅशनेबल पॅरिसमधून या ब्रुसेल्स गावात आल्यावर फार छान आणि शांत वाटतेआमच्या जेवणाच्या हॉटेलच्या आसपास सुंदर रेसिडेन्शिअल बंगलो असलेली कॉलनी होती.वीकएंड असल्याने सुट्टीचा दिवस होता आणि लखलखीत सुर्य असल्याने लोकं ...Read More

4

युरोपियन हायलाईट - भाग 4

नेदरलँडबेल्जियम नंतर आंम्ही निघालो नेदरलँड कडे ..ब्रुसेल्सचा शेजारी असणारा हा देश खुप देखणा आहे .याला हॉलंड पण म्हणतातट्युलिपचा देश चा देश .सायकलचा देश ...!!नेदरलँड आणि सायकल म्हणजे एकअजोड’ साथ आहे .अगदी फेविकॉल जोड सारखी तशी सायकल चालवायची पद्धत सगळ्याच युरोपीयन देशात आहे .प्रदूषण कमी होतं म्हणून इथं खूपजण सायकल चालवतात .सायकल घालवण्यात कमीपणा मानत नाहीत.चांगली शिकलेली उत्तम पगार असणारी माणसंही सूटबुट घालुन सायकल चालवतात .कार असतात पण कार्समागे सायकली बांधुन , कार्सवरही सायकली रचुन फिरतात .प्रदूषण कमी व्हावं म्हणून सरकार सायकलचा पुरस्कार करतं .महापौर पण सायकलने ऑफिसात जातात.रस्तेही तसेच चकाचक आणि मुलायम आहेत !!नेदरलँड मधली “सायकल फिरवण्यात मग्न पब्लिक ...Read More