मध्यरात्र उलटून गेली होती. समीरला अचानक जाग आली. कुठे थोड्या वेळापूर्वी त्याचे डोळे लागले होते . त्याला आज काही केल्या झोप येत नव्हती , त्याची बायको मात्र गाढ झोपेत होती.थोडा वेळ गेला असेल तेवढयात त्याला खोलीबाहेर कसला तरी आवाज आला. समीर उठला आणि दारापाशी गेला. त्याने दार उघडले व तो बाहेर डोकावला . बाहेर अंधार होते बहुतेक दिवे बंद केले होते. त्या अंधारात त्याची नजर भिरभिरली , काही अंतरावर त्याला काहीतरी दिसले, काय आहे ते म्हणून समीर निरखू लागला . अचानक त्याला विचीत्र वाटू लागले. आपल्या मागे कोणीतरी आहे असे त्याला वाटले , तो लगेच मागे वळला पण , मागे कुणी नव्हते .तो दार बंद करण्यासाठी वळला , तेवढयात त्याची नजर समोर गेली. त्याला समोर दोन लाल डोळे चमकताना दिसले . तो हादरला कारण ती आकृती त्याच्याकडे सरकत होती. समीरने वेळ न दवडता लगेचच दार बंद केले. धडधडणारे काळीज घेऊन तो आपल्या बिछान्यात शिरला |
बदला - गोष्ट अत्याचाराची - भाग 1
मध्यरात्र उलटून गेली होती. समीरला अचानक जाग आली. कुठे थोड्या वेळापूर्वी त्याचे डोळे लागले होते . त्याला आज काही झोप येत नव्हती , त्याची बायको मात्र गाढ झोपेत होती.थोडा वेळ गेला असेल तेवढयात त्याला खोलीबाहेर कसला तरी आवाज आला. समीर उठला आणि दारापाशी गेला. त्याने दार उघडले व तो बाहेर डोकावला . बाहेर अंधार होते बहुतेक दिवे बंद केले होते. त्या अंधारात त्याची नजर भिरभिरली , काही अंतरावर त्याला काहीतरी दिसले, काय आहे ते म्हणून समीर निरखू लागला . अचानक त्याला विचीत्र वाटू लागले. आपल्या मागे कोणीतरी आहे असे त्याला वाटले , तो लगेच मागे वळला पण , मागे ...Read More
बदला - गोष्ट अत्याचाराची - भाग 2
संध्याकाळी समीर व सुस्मीता घरी आले . आल्याबरोबर सुस्मीता निकीताच्या खोलीत गेली . निकीता पलंगावर झोपलेली होती ."कशी आहेस ,तुझी तब्येत कशी आहे?"आई चा आवाज एकून निकीता उठली.," मी फार बरी आहे .", निकीता." जेवणाला खाली येतेस की खोलीतच आनू", सुस्मीता ." नको आई! मी फ्रेश होऊन येते खाली ", निकीता.रात्रीचे जेवण उरकले होते निकीता आपल्या खोलीत आली . तिने लगेच च आपल्या मैत्रिणीला फोन केला व एवढ्या दिवसात कॉलेजमध्ये काय घडले ते विचारून घेतले .निकीता अभ्यासाच्या टेबलाकडे वळली तिला दोन तिन दिवसांत गेलेला अभ्यास पुर्ण करायचा होता . काही वेळातच तिचा फोन घनाणला . निकीताने मोबाईल जवळ घेतले ...Read More
बदला - गोष्ट अत्याचाराची - भाग 3
निकीता फार घाबरलेली होती . समोरच तिच्या आई बाबांची खोली होती जिचे दार किल-कीले उघडे होते . निकीताने आपल्या धक्क्याने ते दार लोटले पाहते तर काय ? आत कोणीच नव्हते .खोलीत आई - बाबा नव्हते की तिचा भाऊ ही नव्हता . आता निकीता खुप हादरली ती जिण्याकडे वळली तर तिची आईही जिण्यावर नव्हती . निकीता धाड धाड जिणा उतरून खाली आली . उजवीकडे काही पावलांच्या अंतरावर घराचे मुख्य प्रवेशद्वार होते पण तीकडे काहीच नव्हते . निकीता लगेच डावीकडे वळाली तिची नजर किचनरूमकडे वळाली , किचन रूम. बंद होते .आता निकीता चे लक्ष नेहमीच बंद असणाऱ्या खोलीकडे गेली . तिला ...Read More
बदला - गोष्ट अत्याचाराची - भाग 4
त्या दोघांची पाऊले त्या खोलीच्या दिशेने जात होती . खोलीजवळ येताच काडुसने दार जोरात ढकलले . दोघेही खोलीत शिरले पण आत कोणीच नव्हते.काडूस," कुठे गेली ती ? किती धुळ साचली आहे खोलीत ."दोघेही खोलीभर फिरले पण त्यांना काहीच सापडले नाही.काडूस," ती इथे नाही , चल लवकर बाहेर शोधू नाहीतर हातीतून निसटेल ती आणि पुढे आपल्यालाच अडचण निर्माण करेल ."" कुठे जाण्याची गरज नाहीये मित्रा .....", काहीतरी लक्षपूर्वक पाहत अनिकेत म्हणाला . तो लगेच खाली वाकला व पलंगाखाली डोकावला ."हा... हा.. हा इथे आहेस तर तू ?"निकीता पलंगाखाली लपली होती अनिकेतला पाहताच ती एकदम घाबरली . भितीने तिच्या मेंदूनेच आता ...Read More
बदला - गोष्ट अत्याचाराची - भाग 5
संध्याकाळी सुस्मिता व सुरेश घरी आले . आल्या आल्या सुस्मिताची नजर मुलांना शोधू लागली . निकीता काही तिला दिसली . तिने करणला जवळ घेतले," तुझी दिदी कुठे आहे ?"" ती संपूर्ण दिवस खोलीत झोपूनच राहते ", करण म्हणाला . सुस्मिता ," म्हणजे तिने जेवणही केले नाही काय ?"" ती खाली आली नव्हती , मघाशी ओरडत होती . मला फार भिती वाटली तिला पाहून म्हणून मी तिथे थांबलो नाही.", करण म्हणाला ." बापरे ! ", सुस्मिता लगेचच निकीताच्या खोलीत शिरली . निकीता आपले तोंड उशीत शिरवून झोपली होती . " निकीता उठ काय होतेय तुला , तू जेवणही केले नाहीस", ...Read More