आई

किती बोलवे तुला
किती लिहावे तुझ्यासाठी ,
तुझ्या इतकी माया .
नाही ग कोण लावीत या जगी कोणी .

9 महिने तू सोसल्या कळा
दिवस रात्र जागून भरविले घास मला
तुरुतुरु रांगायला शिकलो,
तू बोट धरून चालायला.

चिमुकला घास भरवित
अंगाई गायची मला.
चुरुचुरू बोलायला शिकलो पहिलं म्हणलो होतो बाबा,
काग आई! दिवस रात्र तू सांभाळ केला तरी मी बाबा पहिला उच्चार केला .
धुळुधुळू पळायला शिकलो
तुझ्या आधाराने चालायला शिकलो .
खेळत बागडत मोठा झालो
एवढ सहन फक्त तूच केलं .

तुझ्या छायेतच मोठा झालो,
खरं सांग आई ?
तुझ्या विना वाली मला आहे आहे काग कोणी.

Marathi Poem by Bhavana kamble : 112040988

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now