उंबरठा
असंख्य हुंदके,उमाळे दाबले जातात
शब्द आतल्या आत गोठले जातात
वेदनेचा महापूर अडवले जातात
उंबरठ्याच्या आत
इच्छा,आकांक्षा दूर लोटल्या जातात
कवितांची पाने मिटली जातात
स्वप्नांचे पंख अलगद छाटले जातात
उंबरठ्याच्या आत
खरा चेहरा लपवला जातो
मुखवटा खोटा चढवला जातो
आवाज अंतःकरणातील दडवला जातो
उंबरठ्याच्या आत
खोट सहज खपवल जात
डोळ्यातील पाणी लपवल जात
अपमानाच विष पचवल जात
उंबरठ्याच्या आत
काय काय अन किती किती
हिच तिच अन तुझ माझ
असच सहज सुटत जात
एक एक पान मिटत जात
उंबरठ्याच्या आत
सविता सातव २२-७-२०२१