#kayotsav / love
नकळत मी तुझा होवुन गेलो।।
तुझ्या प्रितीच्या पहिल्या नजरेत,
मी चिंब न्हाऊन गेलो ।
नकळत माझ्याच मी,
तुझा होऊन गेलो ।।
प्रेमाचा अर्थ मी,
जाणलाच नव्हता कधी ।
पाहुनी तुज सामोरी आज,
काहितरी होतंय या हृदयी ।।
अनाकलनीय हृदयीची धडधड,
तीस अॅसिडिटी मी म्हणुन गेलो ।
नकळत माझ्याच मी,
तुझा होवुन गेलो ।।
भेट तुझी-माझी,
अशी सहज होवून जावी ।
न दवडता क्षण जराही,
प्रेमगीते आपण गावी ।
प्रेमगुंजन करण्याऐवजी,
नोकझोक करुनी गेलो ।
नकळत माझ्याच मी,
तुझा होवुन गेलो ।।
स्मृतीपटलावर माझ्या
पहिल्या भेटीची आठवण ताजी ।
कसे अडकलो प्रेमबंधनी,
ओळखही नसता जराशी ।।
पहिली भेट ती दोघांची,
अजुनही विसरू नाही शकलो ।
जेव्हा पहिल्यांदा मी नकळत,
तुझा होवुन गेलो ।।