####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
" मनुष्य स्वभाव "
????????
_*मानसाला चांगले ते दिसत नाही वाईट मात्र फार लवकर दिसते.इतरांचे दोष पाहण्याचा माणसाचा स्वभाव आहे इतरांचे दोष दाखविताना तो दोष आपल्यात आहे किंवा नाही याचा माणूस विचार करीत नाही.किंबहुना बऱ्याच वेऴा आपला दोष झाकण्यासाठीच माणूस इतरांचे दोष दाखवतो.पण,इतरांकडे एक बोट करताना उरलेली बोटे आपल्याकडे असतात हे मात्र माणूस विसरतो.स्वतःच्या ठिकाणी दोष असताना इतरांच्या दोषाची चर्चा करणे किंबहुना इतरांना त्यावरून बोलणे योग्य नाही तसा आपला अधिकार नाही.असे सांगतात की; शांतीब्रह्म श्रीएकनाथमहाराजांकडे एक स्त्री आपला मुलगा फार गूऴ खातो म्हणून तक्रार घेऊन आली.मुलाला त्यांनी उपदेश करावा ही तिची अपेक्षा पण, श्रीनाथमहाराजांनी तिला एका आठवड्यानंतर मुलाला आणण्यास सांगितले.आठवड्यानंतर त्यांनी मुलाला उपदेश केला;'जास्त गूऴ खाणे आरोग्याला चांगले नाही.'तिने विचारले;'एवढे सांगण्यासाठी आठवडा कशाला ?' श्रीनाथमहाराज म्हणाले;'आई,मी स्वतःअधिक गूऴ खाणे सोडले.त्यासाठी आठवडा गेला मगच मी त्याला उपदेश करू शकलो.'कथेतील तात्पर्य महत्त्वाचे पण सर्वांना हे शक्य होत नाही.उलट स्वतःच्या दोषांचे ते समर्थन करतील.महाभारताच्या प्रारंभी म्हणजे आदिपर्वात शकुंतला दुष्यंतराजाला याचीच जाणीव करून देते,*_
_*राजन्सर्षपमात्राणि पराच्छिद्राणि पश्यसि !*_
_*आत्मनॊ बिल्वमात्राणि पश्यन्नपि न पश्यसि !!*_
_*राजा 'इतरांचे मोहरीएवढे दोष तुला दिसतात.पण स्वतःचे बेलफऴाएवढे दोष पाहूनही त्याकडे तू डोऴेझाक करतोस.लोकांना स्वतःच्या डोऴ्यातले मुसऴ दिसत नाही पण,इतरांच्या डोऴ्यातले कुसऴ दिसते.आधी स्वतःचे दोष पहावेत आणि त्याची निवृत्ति करावी हेच आत्मपरीक्षण.'*_
_*!राम कृष्ण हरि.......!!*_
_*शुभ दिवस........*_
????????