प्रेमाचा पाऊस
पाहुनी पावसाच्या सरी
हुरहूर दाटे माझ्या उरी
तु नसला माझ्या जवळी तरी
सोबत आवडे तुझीच खरी
चिंब भिजावं तुझ्या प्रेमात
नको कुठलाही दुरावा
मिठीत तुला घेताना
श्वास वेगळा ना उरावा
विसावू दे क्षणभरी
माथा तुझ्या मांडीवरी
भ्रान्त कशाला या जगाची
मीं प्रेम केले का उगाची
हळुवार फिरवत तु
केसावरुनी माझ्या हात
तु ने मला या
जगापासुनी अज्ञात
मिठीत तुझ्या येऊ दे
प्रेमात तुझ्या न्हाऊ दे
प्रेम आपले पुरापरी
ओसंडूनी वाहू दे
आता कुठ मला सार
जग समजलंय
तुझ्या माझ्या प्रेमाचं
गुपित हे उमगलंय
चाहूल तुला असू दे
माझ्या या वेड्या मनाची
आठवण ठेव सदा
आपल्या गोड क्षणांची
कवयित्री
कोमराज