प्रेमकविता : ध्यास प्रीतीचा
हे प्रेम म्हणावे की अबोला
ना शब्द, ना आवाज तरी साद घालते मनाला
तुझेच विचार मनी माझ्या खोल समुद्राहुनी
मी नाव होऊन गेले
तरी तू आहेस त्या किनाऱ्यावरी
येशील का , प्रतिहाक देशील का
मी अजूनही तिथेच आहे ,तू मागे वळून पाहशील का...