Marathi Quote in Poem by manasvi Manu

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

काहूर माजले होते मनी,
अन दिशा हरवल्या होत्या,
दुखाच्या त्या काळोखात,
फक्त आठवणी उरल्या होत्या..

तू आलास अन सावरले,
त्या विचारांच्या गर्दीतून,
फुले हास्याची उमलली मग,
अश्रूंच्या त्या नदीतून..

तुझ्या त्या प्रेमळ मायेने,
मी पुन्हा नव्याने खुलले,
अनोळखी या जगात मला,
एक आपलेपण मिळाले.

अशीच साथ देशील ना,
प्रत्येक वळण पेलताना?
सोबत माझ्या असशील ना,
खडतर वाटेवर चालताना?

Marathi Poem by manasvi Manu : 112024138
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now