Marathi Quote in Poem by manasvi Manu

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

तू साद दिली नाहीस तर, हा प्रहर ओसाड वाटेल,
निखळ मैत्रीचा हा प्रवास, मला थोडा अवघड वाटेल..

मी नसेन सोबत तेव्हा, तू मनाशीच थोडे बोलावे,
एकटे वाटले कधी तुला, तर माझे शब्द आठवावे..

तुझ्या सुखाच्या बागेत, मी फुलांचे सुगंधीपण होईन,
तुला गरज लागेल तेव्हा, मी हक्काची सावली होईन..

तुझ्या काळजाच्या कोपऱ्यात, माझं एक छोटं नाव असावं,
अन् जगाच्या या गर्दीत, फक्त मैत्री आपलं गाव असावं..

Marathi Poem by manasvi Manu : 112024137
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now