Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

पत्र सुमने 2
प्रिय सोना...

आज पहिल्या वेळा तू नसताना ऍमेझॉन वर ऑर्डर केले
दोन ड्रेस घेतले स्वतः साठी
खुप दिवस घेणंच झालं नव्हतं
आणि एक कार कव्हर
बघ ना तू इथे नाहीस त्यामुळे तुझी लालचुटुक कार अगदी पोरकी झालीय
इथे सगळ्याच्याच आपल्या आपल्या गाड्या आहेत
त्यामुळे तुझ्या गाडीला कोणाचा हात लागत नाही
तू कार च्या बाबतीत किती particular असायचा
कार कायम स्वच्छ लागायची तुला
मध्यंतरी नीट पुसली पण गेली नव्हती
त्यामुळे थोडी मळकी झाली होती
मधल्या काळात कोण कधी पुसते आहे इकडे कोणाचे लक्षच नव्हते
पुसायचे राहू दे ती गमती म्हणून किंवा तुझी आठवण म्हणून चालवायला सुद्धा कोणी तयार नाही
काल आधी स्वच्छ पुसून घेतली कार वॉश करणाऱ्या कडून
आणि छान मिलिटरी स्टाईल कव्हर मागवले आहे
उद्या घालून घेईन
म्हणजे थोडी intact तरी राहील
मला आठवते आहे
आपण ऍमेझॉन शॉपिंग खूप करायचो
अगदी चप्पल बूट पासून कपडे, रेनकोट, स्वयंपाक सामग्री, नाईट ड्रेसेस..
कुठलीही गोष्ट घ्यायची असे ठरले की तू मोबाईल घेऊन आधी सर्च करायचा
माझे ड्रेस ,त्यांची स्टाईल ,फॅशन, रंग
हे सगळं तू ठरवत होतास
मग मला दाखवली की मग त्यावर शिक्का मोर्तब व्हायचे
दर वर्षी शाकंभरी देवीला साडी घेताना मला पण एक रंग पसंत करायला सांगून माझ्या साठी पण खरेदी करायचा
कोणतीही वस्तु उत्तम असावी याकडे तुझा कटाक्ष असे
स्वस्त काही तुला पसंत पडत नसे
काही कपडे मला आवडले तरीही ते तुझ्या वयाला शोभणार नाहीत असे म्हणून तू कधी कधी reject पण करायचा
मलाही कधी त्यात काही वावगे वाटले नाही
तुझे कपडे बूट सिलेक्ट करताना सुद्धा तुला माझी चॉईस लागायची
जरी बाहेर दुकानात आपण शॉपिंग केली तरीही पसंती तुझीच असे
तुझी चॉईस खूप सुंदर होती
असे म्हणले की तू हसत म्हणायचा
म्हणून तर मी तुला पसंत केले
कपड्यांच्या बाबतीत सुद्धा ते वापरायचे तुझे हिशोब ठरलेले असत
एकदा एखादा कपडा अंगात घातला की तुझ्या मते दहा रुपये फिटले
अशा हिशोबाने त्याची किंमत वसूल झाली की ते कपडे द्यायला ठेवलेल्या गाठोड्यात टाकायचे
हाच हिशोब बूट व इतर गोष्टींना लागू होत असे
दर तीन महिन्यांनी जुनी भांडी वस्तु याचा पसारा आपण देउन टाकत असू
कपडे देताना सुद्धा स्वच्छ धुवून नीटनेटक्या घड्या घालून देण्याकडे तुझा कटाक्ष असे
आपल्या दोघांच्या कपड्यांचा वापर चांगला असल्याने
जरी द्यायला काढले तरी ते कपडे इतके चांगले असत
की सामाजिक काम करणारे आपले मित्र म्हणत
अहो किती छान कपडे का बरे देताय
तेव्हा माझे उत्तर असे
छान असताना असे कपडे देऊन टाकायचे म्हणजे घेणाऱ्याला बरे वाटते
आणि हे कपडे दिल्याने आम्ही पण नवीन कपडे नवीन फॅशन वापरायला मोकळे
जुने बूट चप्पल बाटल्या डबे आपण कित्येकदा जवळ बांधकाम चालू असणाऱ्या वॉचमन लोकांना देत असू पण त्यांनाही खूप देऊन झाल्यावर आपण त्या गोष्टी व्यवस्थित पिशवीत ठेवून दिसेल अशा अवस्थेत जवळच्या ओढ्याच्या कट्ट्यावर ठेवत असू
माझ्या किंमती साड्यांच्या बाबतीत मात्र तुझे मत अगदी वेगळे असायचे
इतर वापराचा नियम त्यांना नसायचा
कित्येक साड्या वर्षात एकदोन वेळच
नेसल्या जात
तेव्हा तू मला म्हणायचा तू देवी आहेस
देवी कधी एकदा नेसलेली साडी परत नेसते का..
अशा वेळी मला भारावल्या सारखे होत असे..

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112014934
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now