माझ्या आशेला आज वाट मिळाली
ती मग्न स्वप्नांच्या सुरात,
ज्याला ताल न संगीताचा, न वाद्याची
तीच्या कल्पनांना साथ फक्त मनाच्या मृदंगाची...
ती आकाशाकडे पाहते,जणू पक्षांची हाक तीचीत वाट पाहते
आज मी तीच,आज मी तीच
समुद्राच्या किनारी लहरीला हाक मारते,
त्या लहरी ज्या माझ्या मनाची लहर आहेत.
ती मीच आहे,मी तीच आहे.
जी आतुर आहे,
तीचं अस्तित्व दाखविणाऱ्या समुद्राला भेटण्यास
जी कधी उल्हासाने, तर कधी व्याकुळतेने,
कधी धीर ठेऊन, तर कधी अस्वस्थ होत,
वाट पाहते समुद्रतटाची...