तिच्या वाढदिवसाला तीला वाटले येईल कदाचित फोन किंवा मेसेज ..पण छे
काहीच नाही ..नाही म्हणले तरी थोडी वाट पाहत होती ती त्याच्या शुभेच्छा ची ..पण जावू दे नाही तर नाही
कोण कुणाला फोर्स थोडेच करू शकते ?
आणी अचानक पाच सहा दिवसांनी ती शनिवारी दुपारी घरी आली पाहते तो काय
एक कुरियर वाला वाट पाहत होता ..म्हणाला “म्याडम दोन दिवस झाले मी येवून जातोय तुम्ही तर भेटत
नाय ....कुठले कुरियर पार्सल आले आहे आपल्याला ..तीला काहीच समजेना ..पण न बोलता तिने सही
करून ते ताब्यात घेतले आणी उलट सुलट करून पाहिले मागे काहीच पत्ता वगैरे नव्हता ..
घरात येवून तिने ते उघडले ..पाहते तर काय त्यात एक चिट्ठी आणी एक छोटी डबी ..आधी तिने
ती चीठ्ठी उघडली ..कुणी पाठवले आहे ते पाहायला ..
प्रिये ...
तुझ्या वाढ दिवसाला मी फोन वगैरे नाही केला म्हणून रुसली आहेस ना
..पण खरे सांगू आपला नाही तसल्या गोष्टीवर विश्वास ..
खरे तर सरळ येवून तुला भेटून माझ्या शुभेच्छा डायरेक्ट”.... ...”वर ..द्यायचा विचार होता
पण काय करू ग ....ही मजबुरी ..हे अंतर ..ही नोकरी ..!!!!
सारे सारे काही असल्याने नाही जमू शकले
पण आता हे बघ ही भेट दिलीय ना तुला
आणी हो थोडी उशिरा पाठवली कारण जनरल लोकांनी तुला त्या दिवशी “विश केले असेल
मला “स्पेशल ...राहाय्चेय तुझ्या साठी ..म्हणून हा सारा ...खटाटोप !
आणखी एक...सांगू ही जी भेट तुला दिलीय ना
ती मी जेव्हा तुला प्रथम भेटलो ना
तेव्हाच घेवून ठेवली होती बर का ....खास तुझ्या आगामी वाढदिवसासाठी !!!
आता प्लीज ..राणी तुझ्या गोड आवाजात मला फोन करून सांग ना ..ही भेट तुला मिळाली ते
सारे वाचून ती ..चकित झाली आणी तीला हसू पण आले
खरेच त्याच्या प्रेमाची तऱ्हा ..”वेगळीच “..होती
डबी उघडून पहिली तर सोन्याचे ..झगमगते सुंदर कानातले झुमके होते त्यात
फार महागाचे वाटत होते ...पण खरेच “अप्रतिम “..होते
तिने फोन लावला त्याला ..एरवी फोन उचलायला उशीर लागत असे
पण आता मात्र लागलीच उचलला ..आणी भरदार आवाज आला “हाय डिअर ..
मिळाली का आमची ...”प्रेम भेट “?
ती हसली आणी म्हणाली ..काय वाट च पाहत होतास वाट्ते फोनची ..
का नाही पाहणार आमच्या राणीला ..हा “तोहफा “..आवडला का नाही नको विचारायला
अरे पण इतका डीटेल पत्ता कुणाला विचारलास ..
कुणाला म्हणजे ..या वाऱ्याला ..या ताऱ्यांना ..या गुलाबाच्या सुगंधाला ..आणी चंद्राला
पण माहीत आहे ..तुझा पत्ता त्यानीच सांगितला मला ....
तीला हसूच आले ..तरी पण ..
ती लटक्या रागाने म्हणाली ..”काय रें हा तुझा “विचित्रपणा ?आणी इतकी महाग भेट ?
अग तुझ्या पुढे जगातली कोणती ही भेट “..महाग नाही ..
तुझ्या साठी चंद्र आणी सूर्य पाठवलेत ..कानात घालायला ..
आणी त्यांची “शोभा ..फक्त तुझ्या कानात आहे बर का ...!!
काहीतरीच तुझे ..खरा “कवी आहेस बघ ...
मग आहेच मुळी ...आणी आता ही एक “लावण्यवती कविता भेटलिय ना मला ..
हम् तो ऐसेच है ...तुम्हारे ..और सिर्फ तुम्हारे ,,
ए गप ना इतकी नको तारीफ करू ...ती संकोचून म्हणाली
खूप सुंदर आहे तुझी भेट ...मला भेट आणी ती देण्याचा “अंदाज दोन्ही आवडले
ये हुवी ना बात ....मला माहीत होते ..तु पण तीतकीच “रसिक आहेस !!!❤❤