स्वर्ग सुंदरी किंवा अप्सरा नाही
मनाला रूचणारी ती साधीसुधी नाही
ती मनमोहणारी चित्त चोरणारी
ती सुंदर आकृती पण चोर नाही
हळव्या मनाची चंचल स्वभावाची
मनाच्या कोपऱ्यात सर्व लपवून ठेवणारी
ती प्रेमळ वागणारी शांत राहणारी
प्रेमानी मला नेहमी जपणारी
मनात वसणारी डोळयांत लपणारी
केसांच्या गुंत्यात..... बांधून ठेवणारी
ना मी गुन्हेगार ना ती अटकेत ठेवणारी
किती सुख त्या बंधनात
बंधन असूनही ना बंध वाटणारी
प्रेमाचे वचन निभावणारी
पावलोपावली सोबत चालणारी
सुख असो कि दुःख असो कर्तव्य बजावणारी
ती नार हिरकणी नशिबानं भेटणारी
_हर्षद मोलिश्री