व्यथा
कर्जासाठी केले हो अर्ज !
अर्जानतंरची ती आर्जवं !!
आर्जवानतंरची हि आसवे !
कुणी कुणाची हो पुसावे !!
बांधावरील काळी माय !
झाली आता हो भकास !!
झोपडीतील माझी माय !
का आहे अशी उदास !!
सख्ख्या बहिणींची हि व्यथा !
कशी कोणा न कळे आता !!
नेहमी तत्पर असे हो देण्याला !
झुरते मात्र ती क्षणाक्षणाला !!
वाट पाहे फक्त मोठ्या अपेक्षेने !
पाहिली कृष्णाची जशी द्रौपदीने !!
डोळ्यातील करुणा पाहुनी जाती !
आलेले का ना पुन्हा फिरुन येती !!
परतीच्या या अकाली पावसाने !
आभाळच असे का कोसळावे !!
कुणी कशाला कसे हो पुसावे !
ज्याचे गेले त्यालाच ते कळावे !!
ज्याचे गेले ते त्यालाच कळावे ...
© सुहास शनवारे
९८५०२३६६५७