तिचं स्वातंत्र्य
एक हुंदका दाबलेला...त्या बंद दाराआड
एक मुक रुंदन ......त्या बंद दाराआड
एक स्वप्न विखुरलेले......त्या बंद दाराआड..
एक मन कोमजलेले.....त्या बंद दाराआड..
एक कळी कुसकरलेली......त्या बंद दाराआड..
वर्षा नु वर्ष तिचे स्वातंत्र्य
कैद आहे......त्या बंद दाराआड
चित्र आता हे बदलते आहे .ती जागी होत आहे.
संसार रथाची चाके दोन, पती आणि पत्नी.
पुरुष प्रधान संस्कृतीत तिला मानले गेले गौण.
चूल आणि मुल सांभाळ, तेवढीच तुझी अक्कल.
तुला काही कळत नाही,तेव्हा रहा तू बनून गुलाम.
समानतेचा शिक्षणाचा , संविधानाने दिला सुंदर हक्क.
तिचा लढा लढण्या साठी आता आहे ती सज्ज.
उच्च शिक्षण आणि हुशारी ने गाजवले तिने राष्ट्रपती पद.
नका समजू तिला लाचार आणि असह्य.
संविधानाने दिले आहे तिला मनमोकळे जगण्याचे स्वातंत्र्य.
समाप्त